ईसबगोल - psyllium husk

Submitted by हर्ट on 8 September, 2015 - 02:20

मी रोज तीन चमचे psyllium husk पाण्यात ढवळून घेतो आणि मग भरपुर पाणी पितो. psyllium husk मधून हवे तेवढे फायबर शरिराला मिळतात. psyllium husk चे काही तोटे आहेत का? मला फक्त एकच माहिती वारंवार मिळाली ती ही की psyllium husk सोबत भरपुर पाणी घ्यावे लागते. नाहीतर पोटामधे त्याच्या गाठी होतात. पण पाणी पुरेसे प्याले की गाठी होत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतइसबगोल हा नेमका काय प्रकार आहे? इसबगोलपेक्षा काही वेगळा आहे का? शौचाला साफ होण्यासाठी वापरतात एवढाच अनुभव आहे. धन्वंतरी लोक अधिक प्रकाश टाकतील

Though Isabgol is natural food, it is still should not be taken on daily basis. Your dietary fiber must come from your regular food.

There is a risk of getting used to these kind of things. It is okay if it is taken say, once or twice a month.

फायबर करता घेत असाल तर मग नेमकं फायबर कशात आहे शिंपीसाहेब? मधात, लिंबूरसात की पाण्यात? Lol
जोक्स अपार्ट, पोट साफ होणे ह्याच बरोबर वाईट कोलेस्टेरॉल कमी करणे, हे काम सुद्धा हस्क करतं.

बी - तुम्हाला हे घेण्यासाठी कोणत्या डॉक्टर नी सांगितले आहे का ?
का घेयला सांगितले व डॉक्टरांचे काय मत यावर

इसबगोल हे महिन्यात २ वेळा laxative म्हणुन घेतात लोकं ते दह्याच्या पाण्यात रात्रभर/दिवसभर भिजवुन त्याचा फुललेला गोळा सकाळ/रात्री खातात हे माहिती आहे बी त्यात औषधी गुण आहेत ओवरडोज़ करू नका प्रॉपर कंसल्टिंग नंतर घ्या

धन्यवाद. मला हे पोटाच्या तज्ञांनीच सांगितले आहे की तुम्ही सत इसबगोल घ्या दोन महिने. तरी सुद्धा मी एकदा अनुभवी मत घेत होतो की सत इसबगोल हे कुणी वापरुण पाहिले आहे का? काही त्रास होतो का? मी कोलोनोस्कोपी केली पुण्यात डॉ. विनय थोरात ह्यांच्याकडे. ते म्हणालेत तुमच्या लार्ग ईन्टेस्टाईन्स ह्या टॉर्टीअस आहेत. पण इसबगोल घेतला तर सरळ होतील.

तुम्ही तज्ञ डॉक्टरांची ट्रीटमेन्ट घेत आहात तर लोकांचे अनुभव विचारण्यात काय हेतू साध्य होणार? समजा लोक म्हणाले अजिबात घेऊ नका, आम्हाला कससंच वाटायचं, तर तुम्ही ते स्क्रीन शॉट त्या डॉक्टरांना थोडीच दाखवणार आहात?

मी इतके टोकाचे निर्णय घेत नाही बेफिकीर. डॉक्टर खूप बिझी असतात. त्यांना आपल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देता येत नाही. अशा वेळी लोकांचे मत जाणून घेणे. त्यांचे अनुभव ऐकणे इतके जरी केले तरी काय चुक वा बरोबर हे कळते. मनुष्य सावध होतो. सतर्क राहतो.

इक्स, परसाकडचे इतरांचे अनुभव ऐकून सतर्क व्हायचं ??
सांगितलेले औषध घेऊनही तुम्हाला त्रास होत असेल तर बदला डॉक्टर, इतरांचे अनुभव काय ऐकायचे त्यात?! (पोटतिडकीने सल्ला देते असंही म्हणता येत नाही ह्या धाग्यावर, वेगळा अर्थ निघायचा.)

बी ,

मी सिलियम हस्क उफ़ इसबगोल घेतले आहे, त्याच्यामुळे पोटात बल्क फाइबर जाते नुकसान असे काही नसावे त्याचे आमचा स्टाफ वर सांगितल्या प्रमाणे दह्याच्या पाण्यात मुरवुन घेत असे मी रात्रभर भिजवत नसे तर सकाळी एक मोठा स्टील चा ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात नमकीन लागेल अन सहन होईल इतके मीठ घालुन त्यात दीड चमचा इसबगोल घालुन ते झाकून ठेवत असे १० मिनट मग घेत असे फुलुन आले की , उपयोग होतो. खाणे अनियमित असताना मी हा इलाज करीत असे (महिन्यात २ वेळा)

सी Lol

आँ ! प्रशासक कशाला त्यात ?! ठरवून विनोद होत नाही, लिहीणारा आणि ऐकणारा यांचे सूर जुळले तर विनोद आपोआप घडतो.
तुमची थट्टा करण्याचा अजिबातच उद्देश नाही आणि नव्हता पण अशा धाग्याने खरोखर मदत होणार आहे का???? सकाळचे विधीबद्दलचे अनुभव ऐकणे आणि कोकणचे अनुभव ऐकणे ह्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ते दोन्ही समान आहे असे वाटत असेल तर वर कुणी लिहील्याप्रमाणे पिकू बघाच - इंसान का मोशन उसके इमोशन से जुडा है.

सीमंतिनी, लेखकाने ने कुठे लिहिलय की सकाळचे विधीचे अनुभव लिहा म्हणून. फक्त इसब्गोल घेतल्याचे अनुभव म्हटलय.
तुम्ही उगाच कशाला ओढून ताणून विनोद करताय? अगदी लहान मुलासारखे 'परसाकडचे' अनुभव वगैरे विनोद करून तुम्हाला हसायला येतेय का?

आणि इसब्गोल फक्त सकाळच्या विधीसाठीच घेतात हा तुमचा समज आहे का?

इसबगोल किती वेळा व कसे घेतलेत हा अनुभव एकायचा असेल. ते पोटासाठीच्या कुठल्या विकारावर कोणी वापरले असेल तर काय अनुभव असा हेतू दिसतोय बीबीचा.

बी, मला वैद्याने, रोज हे घेण्यापेक्षा महिन्यातून एकदा घ्या रात्रीचे असे साम्गितले होते.पण माझी शारीरीक चाचणी करून.

तेव्हा तुम्हाला योग्या आहे की नाही डॉक्तरच सांगेल. तसे बरेच जण घेतात डॉक सल्ल्याशिवाय. पण आपापल्या जबाबदारीवर.
फायबरच हवे असेल तर तुमची ब्रोकोली भाजी , फणस बरी आहे की.:)
आणखी घेवडा, गवार खा.

नाय ग बाय झंपे, मला अजिबातच हसायला आले नाही. बघ बरं एक तरी स्मायली माझी आहे का? आणि मी आधीच स्पष्ट केले आहे मी विनोद करायचा प्रयत्न ही केलेला नव्हता.

बाकी माझे समज हा धाग्याला अवांतर विषय आहे. तेव्हा त्यांना जे ऐकायचे आहे ते त्यांना मिळो ह्या सदिच्छेवर थांबते.

आँ ! प्रशासक कशाला त्यात ?! ठरवून विनोद होत नाही, लिहीणारा आणि ऐकणारा यांचे सूर जुळले तर विनोद आपोआप घडतो.>>
सीमंतीनी पण हा विनोदाचा धागा नसताना विनोद करायचा मोह आवरायला नको का? आणि तोही इतका चीप विनोद? तू शी .. सू करत नाहीस का? ईक्स कशाबद्दल? तुझ्या बोलण्यावरुन मला असे वाटते आहे you don't have any emphathy for sick people. I have mentioned above that I have gone through colonoscopy. इतके नजरेतून उतरतात इथे एकेक. idiots!!!

सोन्याबापू, झंपी धन्यवाद.

दह्याच्या पाण्यात इसबगोल मुरवण्याची पद्धत छान आहे. इसबगोल घेतले की शरिरातील चांगले जीवाणू मरतात. म्हणून अशावेळी दही घेणे केंव्हाही चांगले. दाक्षिणात्य लोक जेवण झाले की दही घेतात ती पद्दत खूपच चांगली आहे.

इसबगोलचे अनेक फायदे आहेतः वजन कमी करण्यासाठी. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी. बद्धकोष्ठतेसाठी. जास्त फायबर मिळण्यासाठी. पोट कमी करण्यासाठी. पोट स्वच्छ करण्यासाठी. अ‍ॅसीडीटी. डायरिया. कॅन्सर. ह्यावर सुध्दा इसबगोलचा चांगला परिणाम होतो.

तेवढे खोलवर नाही सांगता येणार पण गुगलवर अनेक ठिकाणी मी हे वाचले आहे की इसबगोलमुळे वाईट तसेच चांगले जिवाणू सुद्धा शरिरावाटे बाहेर पडतात. म्हणून प्री आणि प्रो बायोटिक्सकढे लक्ष द्यावे.

बद्धकोष्ठतेसाठी = जास्त फायबर मिळण्यासाठी = पोट स्वच्छ करण्यासाठी.

हे सर्व एकच आहे. उगाच ओढूनताणून फायदे जास्त दाखवताय.

बाकीचे आहेत सर्व साईड इफेक्ट्स. साईड इफेक्ट्स करता कोणीही इसबगोल घेत नाहीत. ते केवळ फायबर आहे आणि एकाच शुद्ध हेतूनं घेतलं जातं आणि जावं.

Pages