वस्तीगृहाचे दिवस (अर्थात हॉस्टेल डेज)

Submitted by मृण्मयी on 8 August, 2009 - 20:00

हा गप्पांचा फड सुरु केला आहे हॉस्टेलच्या दिवसांतल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी!

जगाच्या पाठीवर कुठल्याही हॉस्टेलमधे असलं तरी घरापासून दूर राहून अनुभवलेलं हे विश्व खूप विविध रंगी असतं. नव्या मित्रांचं तयार झालेलं नवं कुटुंब, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या किंवा बदलाव्या लागलेल्या सवयी, कर्फ्यु चुकवून केलेला उनाडपणा, संकटात कुटुंबीयांआधी धावून येणारे जिगरी दोस्त... सगळंच आगळं वेगळं!

तेव्हा मायबोलीकरांनो, सांगा तर आपआपले अनुभव!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोती :), होय.. तिथल्या स्टँड वर अजुनही रिक्षावाले कॉलेज्-कॉलेज म्हणुन ओरडत असतात्..सगळी एकाच ठिकाणी आहेत्...किती कॉलेजची नावे घेणार ?

व्वा ... धम्माल बी बी!
मी जळगावला हॉस्टेलला होते तेव्हाची गोष्ट ! माझी एक मैत्रीण राजी ( मला ज्यु. होती ती) ती धुळ्याला बी. एस्सी. करत होती ...मी एम एस्सीला जळगावला! राजी म्हणजे एकदम ऑल राउंडर ( पॉजिटीवली घ्या हं) एका वर्षी तर तिला ४३ बक्षिसे होती कॉलेज इयर एंडींगला! आणि बाईसाहेब म्हन्जे चित्रकला, कविता, नाट्यछटा, शेरो शायरी , एकपात्री..आणि बडबडणे.. सर्वांमधे नेहमी पुढे! कलात्मकता खुप!
तिने काय करावे.. त्यावेळेस ईमेल नव्हते की मोबाईल! रेक्टर हॉस्टेलवर रहात नव्हती... रोज सकाळी फक्त १० वा. एक राऊंड व्हायचा तिचा ..त्याचवेळेस काय कोणाची पत्र वगैरे आली तर ती एकदा नजरेखालुन घालायची ( म्ह़णजे उघडुन नाही बरं का! ) काही आक्षेपार्ह वाटलं / दिसलं तर त्या मुलीला बोलावुन तंबी द्यायची! होस्टेलमधे सुरवातीला मी अन माझी पार्टनर आम्ही दोघीच पोस्ट ग्रॅज्युएटच्या..बाकी सर्व अंडर ग्रॅज्युएटच्या मुली होत्या. आणि अस्मादिक म्हंजे एकदम शांत, सिन्सीयर मुलगी म्हणुन सगळे ओळखत!
तर, राजीचे पत्र म्हणजे नेहमीच ४-५ पानी निबंध असायचा...मग त्यात अगदी डायरी लिहिल्यासारखं सविस्तर.. शेरो -शायरी / कविता मधे मधे पेरलेलें ! तर या बाईने म्हणजे राजीने एक पाकीट पाठवले..त्यात ४-५ पानी पत्रं. पाकीट व्यवस्थित बंद केलेलं ! वरुन पत्त्याच्या जागी 'नयना' ऐवजी कुठल्यातरी हिरोईनचे ( बहुतेक जुही चावलाचे) फक्त डोळे काढुन चिकटवले. पाकीटाच्या उलट्या बाजुला ( जिथे पाकीट चिकटवतो) तिथे 'guess who? ' असे लिहिलेले.. मग तिथे एक स्माईली ( नेहमी स्माईली टाकायची) यावेळेस काय बुद्धी झाली तिला ...की तिथेही एका हिरोईनचे ( मला वाटते माधुरी) ओठ फक्त कापुन चिकटवेलेले!
मग काय ही राजी म्हणजे 'एक मुलगी आहे' हे रेक्टरला समजावता समजावता माझ्या नाकी नऊ आले. ( त्यात या बाईसाहेब, पत्रात काय बोलतांनाही 'च्यायला' वगैरे शब्द वापरायच्या) Happy

मी होस्टेलला एकदाही ऑफिशियली राह्यले नाहीये. नाही म्हणता एकदा फिरोदियाच्या तालमीला खूप म्हणजे खूपच उशीर झाला तेव्हा संबंधित लोकांची नजर चुकवून मैत्रिणीच्या रूमवर राह्यले होते. आणि सकाळी उठून घरी आले होते. पण तेवढंच.
परदेशात शिकायला असताना डॉर्मसच्या वाटेला कधीच गेले नाही. तिनही वर्ष अपार्टमेंट घेऊनच राह्यले. सो होस्टेलवरच्या चोरीछिपे भानगडी करायची संधी मिळाली नाही कधीच. Sad

आजचा किस्सा...
मी होस्टेल नाही पण शेअर्ड अपार्टमेंट मधे रहातो...
अपार्टमेंट मधे माझ्याखेरीज २ आयरिश बायका आणि १ ब्रिटिश मुलगा आहेत...
ते तिघंही जॉब करतात... आणि मी शिकतो...

गेले २ आठवडे आयरिश बायका मेक्सिको ला सुट्टीसाठी गेल्यात... परत यायला अजून ४ दिवस...
आज सकाळी ब्रिटिश पोरगा कामावर निघाला... पण तेवढ्यात खोलीत काहितरी कागद विसरले म्हणून घाईनी वर आला... धांदलीत खिशातनं किल्ली काढायच्या नादात ती खाली पडली आणि पायाची ठोकर बसून समोरच्या खोलीच्या दाराखालून आत... तो मला विचारत आला की त्या खोलीची डुप्लिकेट आहे का?... माझ्याकडे नव्हती... त्या खोलीतली बाई सोमवार रात्री उगवणार... याच्या खोलीची डुप्लिकेट किल्ली पण खोलीत अडकलेली... अब क्या करें?
अचानक मला सिनेमातला सीन आठवला... त्याला म्हणालो लेट्स ट्राय टू ब्रेक इन... तो म्हणे पण कसं... मी ड्रॉवर मधून एक जुनं प्लास्टिक ट्रॅव्हलकार्ड काढलं... आणि साधारण अंदाज घेऊन आत सरकवून त्या बाई च्या खोलीचं दार उघडलं...
मग हे साहेब आत जाऊन किल्ली घेऊन आले आणि स्वतःच्या खोलीचं दार उघडलं...
मला म्हणे... तू जीनियस आहेस... कसलं स्किल आहे...
मी मनात म्हटलं... लेका सिनेमे बघ...

हे बि बि काय आहे? <<< बी बी म्हणजेच Bulletin Board किंवा बातमी फलक... आता तुम्ही 'वसतीगॄहाच्या' बातमी फलकावर आहात. मायबोलीवर असे असंख्य बातमीफलक किंवा बी बी आहेत..
विनय Happy

मी कधी हॉस्टेलमध्ये राहीलेली नाही आणि आता लग्न झाल्यामुळे शक्यताच नाही. Uhoh
पण सगळ्याचे अनुभव वाचायला मजा येतेय..
नंदिनी छान आहे कथा.. Happy

मी होस्टेलला रहात होते तेव्हा बरीच धमाल केली होती. थोडंच आठवतंय पण आता.
ती एक अख्खी बिल्डींग होती त्यात पहील्या आणि दुसर्‍या मजल्यावर मालक रहायचे (बिल्डींगचे)
आणि तिसरा मजला मुलिंचं हॉस्टेल होतं. एकच फ्लॅट होता आणि स्वयंपाक घरात ३, हॉलमध्ये ४ आणि बेडरूममध्ये ३ अशा एकूण १० मुली होतो आम्ही. हॉल आणि स्वयंपाकघरातल्या मुलींच्यात बर्‍यापैकी एकी होती पण बेडरूममधल्या मुली स्वत:ला फार शहाण्या समजायच्या. सगळ्या MPSC वाल्या होत्या. त्यांचं जेवण, झोप काहीच वेळेवर नसायचं, वर थोडा आवाज झाला तरी आम्हाला सगळ्यांना सारख्या गप्प बसवायच्या...
हॉलमधल्या आणि किचन मधल्या मुली सर्व कामकरी होत्या, त्यात माझं ऑफिस सर्वात जवळ असल्यानं मी शेवटी जायची, दुपारी जेवायला पण यायची पण या mpsc वाल्या कायम दारं बंद करून आत अभ्यासाचं नाटक करायच्या दिवसभर. एकदा आमचं भांडण झालं .

दुसर्‍य दिवशी मी ऑफिसला बाहेर पडताना माझ्या डोक्यात शैतानी विचार आला आणि मी हळूच बेडरूमला कडी घातली आणि हापिसला निघून गेले या पोरी आत. स्वयंपाकघर, हॉल कनेक्टेड होतं, शिवाय ३रा मजला; मुली रहायच्या त्यामुळे ३र्‍या मजल्यावर इतर कुणाचा वावर असायचा नाही.
लंच टाईममध्ये मी ऑफिसातून येता येता मेसमधून डबा आणायची. त्या दिवशी आणायला गेले तर काकू म्हणाल्या अगं त्या अमूक अमूक तिघींना पाठवून दे डबा आणायला... Proud माझं मन अगदी प्रसन्न झालं मी उसनी उत्सुकता तोंडावर आणून विचारलं आल्या नाहीत त्या? Proud नाही म्हणाल्या चहा प्यायला पण आल्या नाहीत. मी मनात खूप हसले Lol

मी हॉस्टेलवर गेल्यावरही मला फार आवाज आला नाही. मी गुपचुप जेवून परत हापिसला गेले.
संध्याकाळी हा हंगामा, त्या तिघी दिवसभर उपाशी होत्या... त्यांना अखेर कुणीतरी ३ का ४ वाजता बाहेर काढलं. माझ्यावर जाम भडकलेल्या तिघीही. पण मी शेवटपर्यंत हार मानली नाही आणि मान्यही केलं नाही की मी कडी घातली म्हणून.

ज्यावेळी हॉस्टेल सोडलं त्या वेळी तिघींना बोलवून सगळ्यांसमोर सांगितलं की कडी मी घातली मग त्यातली एक जोरजोरात हासली म्हणाली आम्हाला माहितच होतं की ती तूच आहेस.

एकूण १० मुली होतो आम्ही >> काय हे ? दहा जणी एका फ्लॅट मधे ? अरे बापरे...>>> अगदी WWF च्या Battle Royal, Royal Rumbble सारखे वातावरण असेल नाही....

केड्या अरे बापरे करू नको, इथे अजून बाकिची हॉस्टेल्स जाऊन पहा, मग तुझ्या लक्षात खरी परिस्थिती येईल. आमचा तो फ्लॅट बराच ऐसपैस होता... अगदी साधारण ८००-९०० स्क्वे.फू. सहज असेल.

दक्स तू नेमक्या कुठल्या भागात रहात होतीस ? पुण्यात गावात रहात असशील तर मग बरोबर आहे..तिथे आहे तशी परिस्थिती. पण १० म्हणजे फार जास्त होतात... किचन कट्ट्यावर पण झोपायचा का मग Proud Light 1

माझ पण हॉस्टेल असच होत - शनिवारपेठेत.
खालि २ मजले रुम्स होत्या मुलिंना रहायला आणि टॉप फ्लोर ला काकु रहायच्यात.
एक मोठ्ठी रुम होति आणि त्यात आम्हि ७ जणि रहायचोत.
सगळ्या वेगवेगळ्या कॉलेजला.
पण खुप धमाल करायचो.

काय धमाल किस्से आहेत Happy मी देखील नागपुरात नोकरी करत असताना बर्डीला एका होस्टेलला रहायचे..वार्डनला सतवायचे, सगळ्या मिळुन जाम धिन्गाणा घालयचो. मस्त दिवस होते ते..:)

सदाशिव पेठ ..>> मग बरोब्बर आहे !:) घ्या अजुन एक.

मी युपीएससी च्या तयारीला चाणक्य मंडल ला होतो तेंव्हा, सदाशिव पेठेत भास्कर नावाच्या इमारतीत एक महिना राहीलो.

मालक जबरी कडक होते. विचारपुस करायला गेलो तेंव्हा च ३३ नियम असलेला एक कागद पुढ्यत टाकला. तो सावकाश वाचा अन मग आपण बोलु असे सुनावले. त्या वेळी झोपन्यापुरत्या जागेची गरज असल्याने, मंजुर आहे अशी सही करुण दिली. एक कॉपी त्याच्याकडे एक माझ्याकडे.... मी मोजुन ३३ दिवस तिथे राहीलो...........

रुम म्हंजे, खालच्या पार्किंग स्पेस ला एका कोपर्‍यात भिंती बांधुन, ६ कॉट आड्व्या/ उभ्या टाकलेल्या.

नियम तर कळस होते........उदा.

मित्र आलेले चालतील, पण १५ मिनिटापेक्षा जास्त वेळ बसु नये.
संध्याकाळी कुणी मित्र थांबु शकत नाही.
मित्र अन तुम्ही दुपारी एकत्र जेवण रुम मध्ये कराय्चे नाही. बाहेर जा.
रेडीओ वर फक्त बातम्या च ऐकु शकाल. ते ही हळु आवाजात...
एक दिवस घरी जायचे असेल त मालकांना सांगुन जाणे. घरच्या एक माणसाचा फोन नंबर देउण जाणे. (तो आधी भरुण घेतलेल्या फॉर्म मधे दिला असला तरी पुन्हा देणे)
एक महिण्याचे आत रुम सोडल्यास डिपॉसिट मिळणार नाही...... असे खुप होते, जे १५ दिएअसात भिक नको पण कुत्रा आवर म्हणुन सोडुन गेले.......मी ३३ दिवस टिकलो! Happy

>> या पुणेरी मालकांना न कंटाळणारे एकच भाडेकरु.. ते म्हणजे त्या घरातील ढेकुण
म्हणजे हे सदाशिव पेठी पुणेरी मालक ढेकणांकडूनही भाडे घेतात की काय? Biggrin

ढेकणांवरुन आठवले, आम्ही राहत असलेल्या सदाशिव पेठेतल्या फ्लॅट मधे इतके ढेकणं होते की उठता-बसता सहज नजरेस पडत. मालकांना सांगितले, काहि बंदोबस्त करा तर म्हणे, तुम्हीच आणलेत- तुम्हीच करा काय करायचे ते.
आम्हाला तर नंतर सवयच झाली त्यांची. माझा एक मित्र,महेश,त्याला तर ढेकणं चावले नाही तर काही तरी चुकल्यासारखे वाटे. एखादा ढेकुन टंब फुगुन चललेला दिसला कि आम्ही लगेच ओळखायचो कि स्वारी महेशगडा वरुन आलेली आहे. मज पामराकडे ढेकणं ढुंकुन सुद्धा बघत नसत, कारण माझं शोषण करण्यात त्यांचा वेळ आणि शक्ति बहुदा वाया जाई. Happy

Pages