वस्तीगृहाचे दिवस (अर्थात हॉस्टेल डेज)

Submitted by मृण्मयी on 8 August, 2009 - 20:00

हा गप्पांचा फड सुरु केला आहे हॉस्टेलच्या दिवसांतल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी!

जगाच्या पाठीवर कुठल्याही हॉस्टेलमधे असलं तरी घरापासून दूर राहून अनुभवलेलं हे विश्व खूप विविध रंगी असतं. नव्या मित्रांचं तयार झालेलं नवं कुटुंब, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या किंवा बदलाव्या लागलेल्या सवयी, कर्फ्यु चुकवून केलेला उनाडपणा, संकटात कुटुंबीयांआधी धावून येणारे जिगरी दोस्त... सगळंच आगळं वेगळं!

तेव्हा मायबोलीकरांनो, सांगा तर आपआपले अनुभव!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी>>.. मस्त Happy
मला ही कधी हॉस्टेल मधे रहायला मिळालं नाही.....शाळा,कॉलेज ऑफिस सर्व मुंबई मधेच...पण हे वाचायला मज्जा येतेय....

अगदी जिवाभावाचा विषय आहे.

गेली १४ वर्षं घराबाहेर राहिल्यामुळे सगळ्या प्रकारच्या वसतीगॄहांचे अक्षरशः अगणित महाभयानक किस्से आहेत. एका १८ बाय १८ च्या खोलीत १२-१४ जण राहणे, शाळेचं कडक वसतीगृह, पूर्वीच्या तबेल्याचे व्हाया जेल वसतीगृह झालेलं ठिकाण, पीजी, अपार्ट्मेंट, इंजिनिअरिंग होस्टेल, वर्किंग मेन्स हॉस्टेल, फुल्ली फर्निश्ड फ्लॅट, इन्फी मैसूरचं फाईव्ह स्टार हॉस्टेल, काही काही म्हणून सोडलेलं नाही. एकदा सुरुवात केली तर प्रचंड मोठी आठवणींची पोतडी बाहेर पडेल.. Happy

इंजिनिअरिंगला असताना आमच्या हॉस्टेलवर वारंवार लाईट जायची. त्यामुळे इंटरनेट सर्फिंग, सिनेमे पाहाणे, गेम्स खेळणे अशा महत्वपूर्ण कामांमध्ये अडथळा येत असे. याबद्द्ल तक्रार झाल्यावर रेक्टरने चांगली १.५ तास मीटिंग घेतली आणि समजावले की आपण जनरेटर बसवणार आहोत, पण त्यासाठी ३ महिने लागतील. तोपर्यंत एका बिल्डिंगमध्ये एक स्टडी रुम बनवू आणि तिथे लाईट्सची व्यवस्था करु.

यावर आमचे महान मित्र सुरु झाले.. यांना आपण स्वतः कुठले विषय शिकत आहोत, हे देखील आठवत नसे, पण गप्पा मात्र आईनस्टाईनच्या आविर्भावात..

मित्र - पण सर, तिथे फॅन असणार का?
सर - ठीक आहे, एक फॅन जोडून देतो.

मित्र - सर, हॉस्टेलमध्ये ३५० मुलं आहेत, एका रुम मध्ये कसे बसणार?
सर (वैतागून) - अहो, आपण पाहू किती लोक येतात स्टडी रुम ला..जास्त लोक येऊ लागले तर अजून एखादी रुम वाढवू.

अर्थातच तिथे कुणीही चुकूनही जाणार नव्हतंच, पण तरीही याचं सुरुच..

मित्र - सर, तिथे बसायची काय व्यवस्था?
सर (पारा वाढलेला) - जाधव, यांना बेंच टाकून द्या तिथे..

यानंतर मात्र क ह र..

मित्र - पण सर 'आम्हाला' गादीवर बसून वाचायची सवय आहे...

पुढच्या वर्षी या आणि अशाच अगणित कारणांनी त्याला हॉस्टेलला अ‍ॅडमिशन मिळाली नाही.. Happy

पुढच्या वर्षी या आणि अशाच अगणित कारणांनी त्याला हॉस्टेलला अ‍ॅडमिशन मिळाली नाही..

हे वरचे सहिय्ये Happy

Pages