Submitted by मृण्मयी on 8 August, 2009 - 20:00
हा गप्पांचा फड सुरु केला आहे हॉस्टेलच्या दिवसांतल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी!
जगाच्या पाठीवर कुठल्याही हॉस्टेलमधे असलं तरी घरापासून दूर राहून अनुभवलेलं हे विश्व खूप विविध रंगी असतं. नव्या मित्रांचं तयार झालेलं नवं कुटुंब, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या किंवा बदलाव्या लागलेल्या सवयी, कर्फ्यु चुकवून केलेला उनाडपणा, संकटात कुटुंबीयांआधी धावून येणारे जिगरी दोस्त... सगळंच आगळं वेगळं!
तेव्हा मायबोलीकरांनो, सांगा तर आपआपले अनुभव!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>एखादा ढेकुन टंब फुगुन
>>एखादा ढेकुन टंब फुगुन चललेला दिसला कि आम्ही लगेच ओळखायचो कि स्वारी महेशगडा वरुन आलेली आहे. >>

जळगाव ला एम जे कॉलेजच्या
जळगाव ला एम जे कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलवर...आम्ही युनिवर्सिटीच्या पी जी च्या मुली! पण नविनच युनिवर्सिटी असल्याने आम्हाला इकडे तिकडे अॅडजस्ट केलेले! त्यात माझी रवानगी अंडर ग्रॅज्युएटच्या रुममधे! बापरे! एका रुम मधे ५ मुली !काय धम्माल करायच्या ...आम्ही बिचा-या अभ्यासु! सकाळी आंघोळीला बाथरुमवर टॉवेल टाकुन एक दुसरीचा नंबर लावायची!
रेक्टरबाई दुस-या बिल्डींगमधे! एकेका रुमकडे एक महिन्याचं ( हॉस्टेलमधेच मेस होती) दाणा-पाणी मेसच्या ताईंना काढुन द्यायचं काम! कोप-यात स्टोअर रुम होता! मेसवर दोन वेळेच जेवण...एकीच्या खांद्यावर दुसरी असं चढुन व्हेंटीलेटरमधुन आत उतरायच्या रात्रीच्या वेळेस आणि शेंगदाणे/ पोहे इ. पळवुन आणायच्या!
एकदा तर रात्री रुममधे वातींचा स्टोव्ह पेटवुन त्यांनी पोहे करुन खाल्ले! हॉस्टेलमधे कपडे इस्त्री करायला/ हिटर लावायला बंदी! आम्ही नसतांना रेक्टर बाई रुम चेक करुन जायच्या!
त्यावर आम्ही एक उपाय शोधला! बादलीमधे लावतात ते हिटर वापरायचो!(एकीने तर ब्लेडला दोन वायरी जोडुन...डेंजरस प्रकार ही केले)रोज कॉलेजला जातांना हिटर/ इस्त्री असं पर्समधे टाकुन घेउन जायचो! रात्री अभ्यासाच्या नावाने बसलं की १२ नंतर इस्त्री सुरु करायची!:P
एकदा तर रात्री रुममधे वातींचा
एकदा तर रात्री रुममधे वातींचा स्टोव्ह पेटवुन त्यांनी पोहे करुन खाल्ल>>>> आम्ही इस्त्री उलटी ठेवुन त्यावर ऑम्लेट करुन खायचो... पहिल्यांदा नुसताच अंडी (नंतर थोड तेल आणुन ठेवल होतं) मग नंतर चटणी मीठ घालुन. कांदा कापुन घालायचा योग कधी आला नाही....
पाटील
पाटील
कायच्या कायच मी कधी
कायच्या कायच
मी कधी वसतीगृहात राहिले नाहिये त्यामुळे असलेच काहिच अनुभव नाहित
<<< एकदा तर रात्री रुममधे
<<< एकदा तर रात्री रुममधे वातींचा स्टोव्ह पेटवुन त्यांनी पोहे करुन खाल्ले! >>>
<<<< आम्ही इस्त्री उलटी ठेवुन त्यावर ऑम्लेट करुन खायचो... .>>>
काय एकेक किस्से आहेत .
रोज कॉलेजला जातांना हिटर/ इस्त्री असं पर्समधे टाकुन घेउन जायचो! >>> नक्की पर्स होती की सुटकेस .
लाईटच्या छोट्या शेगडीवर
लाईटच्या छोट्या शेगडीवर स्टीलच्या ग्लासात चहा, दुधात साखर ढवळायला चमचा न मिळाल्याने पेन, पेन्सिल जे मिळेल ते वापरणे, मैत्रीणीने रात्री ड्रेस इस्त्री करून ठेवल्यावर सकाळी लेक्चरला आपणच घालून जाणे इ.इ. बरच काय काय करता येते अमृता होस्टेलवर.
हो ग ऐकल्यात खूप मजेदार
हो ग ऐकल्यात खूप मजेदार गोष्टी .. पण वरच इस्त्री वर ऑमलेट म्हणजे हाईट आहे
माझा एक मित्र इस्त्रीने पापड
माझा एक मित्र इस्त्रीने पापड भाजत असे [:)]
इस्त्रीवर ऑम्लेट ? अशक्य आहे.
इस्त्रीवर ऑम्लेट ? अशक्य आहे.
निवांत पाटिल (नाव मस्त आहे. )
निवांत पाटिल (नाव मस्त आहे.:) )
इस्त्रीवर ऑम्लेट........खरच
इस्त्रीवर ऑम्लेट........खरच height आहे......
इस्त्रीवर ऑमलेट!!!
इस्त्रीवर ऑमलेट!!!
>>>एकच फ्लॅट होता आणि
>>>एकच फ्लॅट होता आणि स्वयंपाक घरात ३, हॉलमध्ये ४ आणि बेडरूममध्ये ३ अशा एकूण १० मुली होतो आम्>>><<
आँ! माणसंच रहात होती का...? मग सिंक खाली कोण झोपत होते?
ऐस्पैस असला प्लॅट तरी पुर्ण वेळ किचन मध्येच? आणि सामान पण किचन मध्येच तीन मुलींचे? कमाल वाटली.
आमच्याकडे हिटर लावला की मेन
आमच्याकडे हिटर लावला की मेन लाइनचा फ्यूज उडायचा.. मग आम्ही त्यावर उपाय म्हणुन इस्त्रीच्या कॉईलला वायर जोडून वापरू लागलो.. तेच हिटर मग प्लॅस्टीकच्या मग मधे लाऊन अंडी उकडायचो...
खरंच आता आठवलं की वाटतं कसं
खरंच आता आठवलं की वाटतं कसं १० जणी राहिलो तिथे देवच जाणे. तरी बरं मी हॉल मध्ये होते आणि हॉल प्रचंड मोठा होता.
सॉल्लिड धागा आहे !
सॉल्लिड धागा आहे !
हॉस्टेलमधे, रूमवर आणि मित्रांसोबत- असा जवळपास दहा वर्षे राहिलो आहे. शब्दशः असंख्य किस्से आहेत. जमेल तसे टाकतोच. पण वाहत्या धाग्यावर लिहावेसे वाटत नाही कारण.. ते वाहून जाते.
ढेकूण, पाली, झुरळे, बेडूक, साप, मुंग्या, मुंगळे, चिलटे, माशा, गोम वगैरे हॉस्टेलाईट्सचे आवडते पाळीव प्राणी असतात, हे सर्वज्ञात आहेच. पण एकदा आमच्या रूममधे कुठला प्राणी निघावा?
किस्सा आहे पहिल्या वर्षाचा. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज, पिंपरी पुणे. पहिल्या वर्षी आम्हाला सकाळी डिसेक्शन, मग अर्ध्या तासाचा ब्रेक आणि लगेच लेक्चर्स असा टाईमटेबल होता. त्यात लेट अॅडमिशन असल्याने दोन टर्ममधे तीन टर्म्सचा अभ्यास, त्यामुळे दांडी मारणे, उशिरा जाणे शक्य नसे. खूप धावपळ व्हायची.
आमची रूम तळमजल्यावर, आणि घरमालक (हेच मेसवाले) आमच्यावर राहत असत. असेच एकदा डिसेक्शन करून आलो. घाईत हातपाय धुतले. दार नुसते लोटून लगेच मेस कम मालकाकडे पळालो. 'ज्याचे जेवण शेवटी होणार तो खोलीला कुलूप लावणार' असा कायदा होता. त्याप्रमाणे शेवटचा इसम कुलूप लावून लेक्चरसाठी पळाला. आम्ही आधीच पोचलो होतो. दरम्यानच्या काळात नुसत्या लोटलेल्या दाराच्या पलिकडे कोणी गेले नव्हते !
साधारण चार-पाच तासांनी- संध्याकाळी सहाला परतलो. सर्व मित्र- मैत्रिणी वगैरे सोबत. दार उघडले.
समोर साक्षात गोमाता शांतपणे जमिनीवर बसलेल्या. विरंगुळा म्हणून आजचा 'सकाळ' चघळत होत्या.
मग काय, सगळी कॉलनी दर्शनाला गोळा. घरमालकिण बाई आम्हाला यथेच्छ शिव्या घालताहेत. गाय बाहेर यायला तयार नाही.. गर्दीमुळे बावचळलीये असे बरेच काही. शेवटी मेसवाल्यांकडून एक चपाती आणून त्या नैवेद्याला दाखवत दाखवत गोमाता बाहेर आल्या. सुदैवाने पाच तास टिचभर खोलीत कोंडूनही त्यांनी काही मोड-तोड केली नाही.
इतरांच्या खोलीत पाली-झुरळे निघतात, पण पुण्यवान लोकांच्या खोलीत 'गाय' निघते असा एक विनोद पुढे अनेक दिवस गाजत राहिला.
<<<समोर साक्षात गोमाता
<<<समोर साक्षात गोमाता शांतपणे जमिनीवर बसलेल्या. विरंगुळा म्हणून आजचा 'सकाळ' चघळत होत्या.<<<

हो पण त्या शेवटी गेलेल्या इसमाचं / मित्राचं काय केलत तुम्ही ते नाही सांगितलं?
मी ज्या होस्टेलात होते तिथे
मी ज्या होस्टेलात होते तिथे आम्हाला कॉमन पॅसेजमधील प्लग पॉईन्टवर हॉटप्लेट वापरता यायची. वीकान्ताला जेव्हा रविवारी सायंकाळी होस्टेल मेस बंद असे तेव्हाच शक्यतो हॉटप्लेट वापरली जाण्याबद्दल होस्टेल व्यवस्थापन दक्ष होते. रेक्टर क्वचितच दिसत. बर्याचदा त्यांची चक्कर रात्रीच असायची. दिवसभरात होस्टेलच्या ऑफिसातील क्लार्क व स्वच्छतेचे काम करणार्या मावश्यांची देखरेख / पाळत असे. एकदा का ऑफिस बंद झाले की मात्र मुली आपापसात नंबर लावून हॉटप्लेट्स वापरत असत. नंबरवरून भांडणे, एकीच्या हॉटप्लेटचे कनेक्शन काढून हळूच तिथे आपली हॉटप्लेट लावणे, नंतर ''अग्गो बाई, असे झाले का?'' वगैरे कॉमन होते. मॅगी, चहा, कॉफी, अंडाभुर्जी, सामिष पदार्थ व मूगडाळखिचडी असे पदार्थ एकाच ठिकाणी तयार होत असत! आणि त्यांसोबत गप्पांचे चर्हाट! आमच्या त्या दिव्य हॉटप्लेटांवर पदार्थ तयार व्हायलाही बराच वेळ लागायचा.... बिरबलाची खिचडीच जणू!! मग एकमेकींच्या रूम्सवर धाडी घालायच्या, असतील नसतील तेवढे फराळाचे, खादडायचे सामान हुडकायचे व ते खादडत (टोस्टला लिंबाचे लोणचे / च्यवनप्राश लावून खाण्यापर्यंत!) बिरबलाची खिचडी शिजेपर्यंत कळ काढायची असे उद्योग चालत. एकदा तेथील एका मणिपूरच्या मैत्रिणीने मला खूप भूक लागली होती म्हणून चघळायला त्यांच्याकडे मिळणार्या खास प्रकारच्या चीझचा तुकडा दिला. तो चीझचा तुकडा सागरगोट्यापेक्षा टणक होता, व नंतर तासभर तोंडात ठेवूनही विरघळला नाही तेव्हा दु:खी अंतःकरणाने फेकून द्यावा लागला होता!!
आमच्या हॉटप्लेटांचा संग्रह खरोखरी बघण्यालायक होता! काही हॉटप्लेटा वारसा हक्काने मिळालेल्या - जुन्या पुराण्या होत्या. त्यांचे तंत्र आत्मसात होईपर्यंतच अनेकदा सेमिस्टर संपत यायचे. कोणी त्यांमधून धूर काढायचे, कोणी ठिणग्या काढायचे....
तिथे पदार्थ बनविणे म्हणजे नुस्ते जादूचे प्रयोग चालायचे आमचे!!!
काय धम्माल धागा आहे! फार्फार
काय धम्माल धागा आहे!
फार्फार मज्जा आली वाचून... 
अस्मादिकांनी कौन्सेलिंग कोर्ससाठी पुण्यात हॉस्टेलमध्ये राहण्याची संधी घालवली. घरात उबदार घरट्यात रहायची सवय झाल्याने हॉस्टेलमधले वातावरण पाहूनच इतके रडले, की आई बाबांनी परत घरी जायचंय का? हे विचारताक्षणीच बाडबिस्तारा गुंडाळून परतीच्या प्रवासाला लागले. पण नशीबात जे असते, ते चुकत नाही हेच खरे!
जर्मनीत मास्टर्स आणि पीएचडी च्या निमित्ताने हॉस्टेलचे जीवन अनुभवायला मिळालेच! पण नशीबाने मास्टर्सच्यावेळी पेईंगगेस्ट म्हणून एका जर्मन घरात राहिले. सुदैवाने फार प्रेमळ आज्जी आजोबांचा सहवास लाभला. त्यांच्या सुंदर घरात राहण्याचा, भव्य आणि अत्याधुनिक स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्याचा आणि त्यांच्या काटेकोर स्वच्छतेकडे बघून ते धडे गिरवण्याचा अनुभव मिळाला. भारतीय पदार्थ बनवून त्यांना खाऊ घातले, जर्मन पदार्थ त्यांच्याकडून शिकले. माझे मोडके तोडके जर्मन ऐकून त्यांनीच इंग्रजी डिक्शनरी आणलेली
बरेचदा एकटेपणाने रडू यायचे, पण आता मागे वळून पाहिले, तर ते दिवस फारसे वाईट नव्हते. असे जाणवते. त्यांच्या पुतण्याने तर मी इंडियन म्हणून मला स्वयंपाकाला लागेल म्हणून माझ्या छोट्याशा रुममध्ये छोट्याश्या हॉटप्लेट्स आणि किचनच्या भांड्यांचा सेट, फ्रिज, त्याचा जुना कॉम्प्युटर, फ्री वायलेस लॅन, लॅन्ड फोन असं सगळं सगळं दिलं होतं..
टॉयलेट बाथरुम तेवढं कॉमन होतं. शेजारच्या रुममधल्या आळशी, अस्वच्छ चायनीज मुलाने ते बाथरुम वापरले, तर सिगरेट आणि त्याच्या पारोश्या अंगाचा येणारा आणि अर्धातास टिकणारा मळमळायला लावणारा वास सोडला, तर बाकी मला काहीही त्रास म्हणून नव्हता.
पीएचडीसाठी मात्र खर्या खुर्या हॉस्टेलमध्ये रहायला मिळाले. ते नर्सिंग कोर्स करणार्या विमेन्ससाठीचे होते. शेजारीच असलेल्या मिशनरी हॉस्पिटलमध्ये त्या कोर्ससाठी जात. डॉक्टरमैत्रिणीच्या वशिल्याने तिथे रुम मिळाली होती. स्वतंत्र रुम+ बाथरुम होते. किचन कॉमन होते. जनरली जर्मनीतले सगळेच स्वच्छ असले, तरीही मुले-मुली एकत्र शेअर करत असणार्या हॉस्टेलचे किचन म्हणजे स्वच्छतेच्या नावाने बोंबच असते. पण हे हॉस्टेलच वेगळे होते. माझ्या नशीबाने सगळ्या नर्सिंगवाल्या स्वच्छ मुली-बायकांमध्ये राहिल्याने चकाचक कॉमन किचनच मिळाले. शिवाय एक केरळी फादर भेटले- त्या शेजारच्या मिशनरी हॉस्पिटलशी संलग्न काम करणारे. त्यांनी चक्क मला सेकंडहॅन्ड फ्रिज आणून दिला आणि माझी मोठीच सोय केली.
दोन्ही राहत्या ठिकाणी मला भारतीय लोकांची कमी जाणवून एकटेपणा फार वाटायचा. पण आता विचार केल्यावर खरंच असं वाटतं, मी फार समृद्ध अनुभव घेतले आहेत. पण ते घेत असतांना मात्र उगाच मनात उदास भाव, आई वडिलांच्या आठवणीने वेडे होणे, देशाची, जेवणाची आठवण येणे, मराठी भाषेची ओढ असले सगळे किंतू ठेवल्याने ते अनुभव मी कमी आनंदाने अनुभवले.
इस्त्रीवर ऑम्लेट >> समोर
इस्त्रीवर ऑम्लेट >>
समोर साक्षात गोमाता शांतपणे जमिनीवर बसलेल्या. विरंगुळा म्हणून आजचा 'सकाळ' चघळत होत्या.<<<
ढेकूण, पाली, झुरळे, बेडूक, साप, मुंग्या, मुंगळे, चिलटे, माशा, गोम वगैरे हॉस्टेलाईट्सचे आवडते पाळीव प्राणी असतात, हे सर्वज्ञात आहेच. >>> अजुन एक प्राणी अॅड करा लिस्ट मधे - साप!
मी कॉलेजमधे असताना पेइंग गेस्ट म्हणुन राहिले होते. अनेको किस्से आहेत खरंच. रात्री अभ्यास करुन , जर्नल पूर्ण करुन तीन साडेतीन झाले की भुकेमुळे झोप यायची नाही. मग डबे उचकून चिवडा, चकली, चट्णी ब्रेड असले पदार्थ खायचे आणि मग झोपायचो.
ज्यांचा बंगला होता त्या काकू दूध घेऊन ठेवायच्या ( तो एक वेगळाच किस्सा) आणि आम्ही ग्लासभर चहा बनवुन प्यायचो. कारण नुसतं दूध चांगलं लागायचं नाही पण भूकही लागायची. तो चहा करणे आणि कधीतरी मॅगी बनवणे याव्यतिरिक्त काही करायला बंदी होती.
एकदा आम्ही तिघी रुममधे परिक्षेसाठी अभ्यास करत होतो. टेबल खुर्ची नसल्याने आपापल्या कॉटवरच बसुन वाचायचो. सगळ्यात आतल्या बाजुला माझी कॉट होती त्याच्या बाजुला पुस्तकांचे रॅक. त्यात प्रचंड कोंबाकोंबी करुन पुस्तकं.
तर अचानक गेटपाशी काहितरी हालचाल जाणवली म्हणुन वर पाहिले तर गेटमधुन सळसळ करत एक साप येत होता. मी किंचाळुन कॉटवर उभी राहीले तशाच बाकीच्याही. तो साप सरळ आमच्या रुममधे घुसून त्या पुस्तकाच्या रॅक पाठी गेला. आम्ही तिघी जोरजोरात किंचाळत कॉटवर. शेवटी आजुबाजूचे लोक आले आणि बर्याच प्रयत्नानंतर त्या सापाला मारण्यात आले.
मीही पुण्यात होस्टेलला रहात
मीही पुण्यात होस्टेलला रहात असताना आई व पप्पा भेटायला आले. जाताना आई म्हणाली तुझ्या रेक्टरला भेटून मग जातो. मग आमची वरात रेक्टर ओफिसला. भेटून झाल्याव्रर उठ्ताना आई म्हणाली, मुलीवर लक्श असु द्या. त्यावर आमच्या रेक्टरचे उत्तर- अहो मी काय त्याच्यावर लक्श ठेवणार, त्याच आमच्यावर लक्श ठेवतील(आधीचे आमचे प्रताप आठ्वून).
दुसरा किस्सा- रात्रीचे ११.३० वाजलेले.मी खिड्कीजवळच्या पलगावर झोपलेले, माझ्या २ रुममेट माझ्या बेड्जवळ खुड्बुड करत होत्या, मला त्यामुळे जाग आली. तेव्हा मला म्हणाल्या अग हलु नकोस तु पाघरलेल्या चादरीवर पाल आली आहे. ईईईईईईईईईईई त्यानतर किती दिवस मी त्याच्या मागे लागलेले, आपण बेड बद्लवु या म्हणुन पण या बाबतीत दोस्त दोस्त ना रहा-----------(हे गाणे मी नतर बरेच दिवस त्याच्यासमोर म्हणत असे.)
सावली, सापाबद्दल अगदी
सावली, सापाबद्दल अगदी अगदी.
होस्टेलच्या माझ्या विंगच्या खिडकीतून साप होस्टेलच्या इमारतीत शिरण्याचे आणि मग होस्टेलभर किंकाळ्या, किंचाळ्यांचे अनेक किस्से झालेले आठवतात. साप महाशयांना ग्राऊंड फ्लोअरवरच्या आमच्याच विंगची खिडकी का आवडायची ते माहित नाही, पण मुली तो साप आमच्या विंगेतूनच होस्टेलात शिरला असे खात्रीने सांगायच्या! मजा म्हणजे शेजारच्या रूममधल्या शुभाताई सोडल्या तर आमच्या विंगमधील (माझ्यासकट) चारही मुलींना सर्पमहाशयांनी कधी तिथे दर्शन दिले नाही.
स्नानगृहाच्या ब्लॉकमध्येही अनेकदा सर्पमहाशय सापडायचे असे इतर मुली सांगायच्या. त्यामुळे मी रात्री-बेरात्री बाथरुमला जाताना पावलाचा उगाच फटा-फटा आवाज करत जाणे, मुद्दाम घसा खाकरणे, जोरजोरात आवाज करणे असे अत्यंत विनोदी प्रकार केले आहेत.
माझ्या रूममधल्या ट्यूबलाईटचा एका विशिष्ट स्वरपट्टीतला 'साऽऽ' लागलेला असायचा. (म्हणजे तिच्यातून तसा आवाज यायचा!) मग त्या ''साऽ'' च्या सुरात सूर मिसळून माझ्या ताना ऽऽ....
माझ्या विंगमधील मैत्रिणींची खाशी करमणूक व्हायची!
आमच्या विंगमध्येच होस्टेलचे ऑफिस होते. दिवसभर तिथे एक क्लार्क मॅडम त्यांचे काम करत व आमच्यावर देखरेख करत बसलेल्या असायच्या. ऑफिसातले संवाद, फोनवरची भाषणे, स्टाफला रागवारागवी इत्यादी गोष्टी आम्हाला आमच्या रूममध्ये बसल्या बसल्या सहज ऐकायला यायच्या. ज्या मुलींच्या किंवा मुलींविरुद्ध तक्रारी असायच्या त्यांना उगाच वाटायचे की आम्हाला त्यांच्या संदर्भात ऑफिसात जे काही बोलणे झाले आहे ते कळालेले असणार! मग त्या जाम खोदून खोदून आमच्याकडे त्याबद्दल चौकश्या करायच्या. आणि आम्हाला अनेकदा त्यामुळे अशी काहीतरी तक्रार / घटना घडली आहे याचा सुगावा लागायचा. नाहीतर आम्ही चौघीजणी (शुभा ताई वगळता) त्या बाबतीत ठार अज्ञानी होतो. होस्टेलची गॉसिप-हॉटलाईन, कॅम्पसमधील गरमागरम चर्चा इत्यादींमध्ये आम्हाला फारसा रस नसायचा. सहज कोणी सांगितले तर मग ''लाईटबल्ब मोमेन्ट'' होऊन कित्येक घटनांचे अर्थ लागायचे, मस्तकात लख्ख उजेड पडायचा... मग रातोरात आमची विंग-मैत्रिणींची चहा/ हॉट चॉकलेट/ कॉफी मीटिंग व्हायची. खाऊचे डबे खोलून खमंग गप्पा व खमंग खादाडी व्हायची. पण ते सर्व तिथल्यापुरतेच!
लेट नाईट झाली, परीक्षा/ अभ्यास / गप्पा इत्यादींमध्ये रात्र जागवली की दुसर्या दिवशी उशीरा उठले जायचे. वाईट गोष्ट ही होती की स्नानगृहाचा आमच्या विंगचा ब्लॉक बरोब्बर होस्टेल ऑफिसच्या समोर होता. अगदी दात घासायलाही ऑफिसच्या उघड्या दरवाजासमोरून जावे लागायचे. क्लार्क मॅडम कावळ्याचे लक्ष ठेवून बसलेल्याच असायच्या. ऑफिसात कधी कोणी बाहेरचे लोक त्यांना भेटायला आलेले असायचे. त्यांच्याशी चुकून नजरानजर झाली तर सकाळच्या (किंवा दुपारच्या) त्या आमच्या ''अवतारात'' फारच ओशाळे वाटायचे!
वर मी लिहिलंय त्याप्रमाणे आमच्या हॉस्टेलातल्या हॉटप्लेट्स ह्या सिनेमातल्या हिरॉईन इतक्या महत्त्वाच्या असायच्या सर्व मुलींसाठी! (म्हणजे मेसचे जेवण किती बेक्कार असेल ते ओळखा! :हाहा:) हॉटप्लेट्सची पळवापळवी किंवा बिनापरवानगीने बिनधास्त वापर हा प्रकार सर्रास चालायचा. आम्हाला आपल्या रूममध्ये हॉटप्लेटचा किंवा इस्त्रीचा वापर करण्यास बंदी होती. त्यासाठी कॉमन पॅसेजमध्ये व कॉमन रूममध्ये खास प्लग पॉईन्ट्स होते. तिथेच हॉटप्लेटचा वापर किंवा इस्त्री करण्यास परवानगी असायची. पण मुली सर्रास आपल्या रूममध्ये हॉटप्लेट्स वापरायच्या. बाकीच्या ज्या मुली कॉमन पॅसेजात आपली हॉटप्लेट वापरायच्या त्यांना अचानक कधीतरी आपली हॉटप्लेट गायब झाल्याचा साक्षात्कार व्हायचा... मग ती हॉटप्लेट दुसर्याच कोणत्या तरी मजल्यावर किंवा विंगमध्ये सापडायची... नळावरच्या भांडणांप्रमाणे हॉटप्लेटभोवती भांडणे जुंपायची.... तू तू मैं मैं व्हायची... एकंदरित मनोरंजनाचा खासा कार्यक्रम असायचा तो! त्यातून त्या जर बंगाली / आसामी / मणिपुरी मुली असतील तर त्या त्यांच्या भाषेतून भांडणे करायच्या. मग तर आणखी मज्जा! आपल्या मराठी मुलीही बर्याच होत्या आमच्या होस्टेलात... पण कधी कुणा मराठी मुलीला फारसे आवाज चढवलेले, भांडताना ऐकले नाही! (आमच्या शेजारच्या शुभाताई मात्र मध्येच कुणाशी तरी का ही ही कारणावरून भांडायच्या!) बाकीच्या मुलींसमोर इतर मराठी मुलींचा आवाजच कमी पडायचा बहुतेक! आणि तिथेही एक बंगाली मुलगी दुसर्या बंगाली मुलीशी बंगालीतून भांडू लागली की तिच्या बाकीच्या बंगाली होस्टेल मैत्रिणी जमा होऊन कोणाची तरी बाजू घ्यायच्या. तेच आसामी व मणिपुरी मुलींचेही! प्रांतीय एकजूट सॉलिड असायची!! मग ही भांडणे, जिच्याशी भांडण झाले आहे त्या हॉटप्लेट मालकिणीला एव्हाना हॉटप्लेटवर तयार झालेला (बहुतेकदा) सामिष पदार्थ खाऊ घालून कशीबशी आटोक्यात यायची. पण तरी खूप ड्रामेबाजी चालायची!
ज्या गोष्टी करायला हॉस्टेलात परवानगी नाही, त्या गोष्टी प्रांतीय एकजुटीच्या बळावर सर्रास केल्या जायच्या. तरी एकंदरित वातावरण बरेच बरे होते. शहरी मुली इतर शहरी मुलींबरोबर ग्रुप करायच्या, तर खेड्यापाड्यांतून किंवा ग्रामीण भागातून आलेल्या मुली इतर ग्रामीण भागातील मुलींबरोबर ग्रुप करायच्या. माझ्या विंगमधील आम्हां पाचही जणींचे कोणतेच ग्रुप्स नव्हते. मग आमचाच एक शहरी+ग्रामीण, मराठी+बंगाली+गुजराती+कोंकणी असा एक खास ग्रुप बनला. आता तिथल्या काही मैत्रिणींशी फक्त फेसबुकावर, इमेल आणि फोनवरून संपर्क उरलाय. पण तरी त्या मैत्रीची मनातली गोडी काही कमी होत नाही.
मस्तच अकु.. अजुन लिही ना..
मस्तच अकु.. अजुन लिही ना..
अगदीं साधंच हॉस्टेल होतं
अगदीं साधंच हॉस्टेल होतं आमचं, एका ट्रस्टने चालवलेलं. चार-पांच खोल्याना मिळून एक प्रशस्त कॉमन स्नानगृह. ढेकणांच्या त्रासामुळें बरेच जण मधल्या कॉरिडॉरमधेच पथारी पसरून झोपत. आमचा एक मित्र 'टेक्स्टाईल इंजीनीअरींग' करत होता. नेमकं थंडीच्या दिवसात बिचार्याला पहांटे उठून कुठल्याशा कापड गिरणीत ' प्रॅक्टिकल्स'साठी जावं लागे. " अग आई ग ! काय कडकडीत गरम पाणी; देवा कशी करूं आंघोळ. अरे कुणी करा रे मदत मला ", रोज मोठमोठ्याने स्नानगृहातून येणार्या त्याच्या या असल्या ओरडण्याने आमच्या पहांटेच्या झोपेचं खोबरं व्हायचंच. मग बाहेर कॉरिडॉरमधे " जा रे कुणीतरी आणि लकटा साल्याला नळाखालीं", असं थोडा वेळ झालं कीं कुणीतरी डोळे चोळत उठून स्नानगृहात जायचा. तिथं उघडेबंब हे महाशय कुडकुडत उभे असायचे. थंड गार नळाच्या पाण्यात आंघोळ करायला मनाची तयारी करायला कधीं मोठ्याबे स्तोत्रं म्हणायचे, 'आई, आई, भाजलो ग गरम पाण्यात ' म्हणून ओरडायचे पण शेवटी कुणीतरी येवून नळाखालीं लकटल्याशिवाय ह्याची आंघोळ व्हायची नाही ! बरं, आंघोळ झाल्यावर गुपचूप जावं गिरणीत, तर तसंही नाही. बाहेर पडताना ज्याने नळाखाली लकटलं असेल त्याला पुन्हा झोपेतून उठवायचं, " देव तुझं भलं करो, चांगली बायको तुला मिळो ! " असलं कांही तरी नाटकी बोलून आपल्याला थंडीत बाहेर जावं लागतंय अन हे आरामात झोपताहेत याचा प्रेमळ सूडही तो उगवत असे !!
भाऊ
भाऊ.,
भाऊ.,

भाऊ
भाऊ
महान किस्से आहेत!
म्हणून ओरडायचे पण शेवटी
म्हणून ओरडायचे पण शेवटी कुणीतरी येवून नळाखालीं लकटल्याशिवाय ह्याची आंघोळ व्हायची नाही !>> लकटल्याशिवाय म्हणजे काय?
कळाले नाही.. बाकी किस्से मस्तच..
Pages