गणराज गणराज सिद्धीबुध्दीदाता

Submitted by श्यामली on 21 August, 2009 - 01:54

गीत: श्यामली (कामिनी फडणिस केंभावी)
संगीत: आशिष मुजुमदार
स्वर: सावनी शेंड्ये



!!श्री गजानन मानसपूजा!!

गणराज गणराज सिद्धीबुध्दीदाता
सकल दीनांच्या ऐकसी गाथा!!धृ!!

मनाची ऐसी शोभे आरास
येथेच स्थापिले गजाननास
मनीच वाहिले दूर्वा-फुलांस
शोधु कशाला गंध-गुलाला!!१!!

गणराज गणराज सिद्धीबुद्धीदाता

सुखदक्षणांचा नैवेद्य केला
स्पंदनांचा हा टाळ वाजला
जीवे ओवाळीले प्रथमेशाला
देहच अवघा प्रसाद झाला!!२!!

गणराज गणराज सिद्धीबुद्धीदाता

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

मनाची ऐसी शोभे आरास
येथेच स्थापिले गजाननास
मनीच वाहिले दूर्वा-फुलांस
शोधु कशाला गंध-गुलाला >>> खुप आवडलं Happy

श्यामली..... खुप च सुंदर!

गणपतीने सगळी बुद्धी तुम्हाला च दिली, तर आम्ही गणपती का बसवावा असे वाटायला लागले! Happy

श्यामली, केवळ अप्रतिम गं!!!
मी आत्तापर्तंत कित्ती तरी वेळा ऐकली!!!

सावनी शेंडेचा आवाज अप्रतिमच आहेच, संगीतही मस्त!!
बोलांबद्दल तर काही बोलायलाच नको...
पण मला सर्वात जास्त तुझ्या आवाजतली आरती भावली!! Happy

रचना,चाल,संगीत आणि गायन....सगळंच मस्त आहे.
भट्टी मस्त जमलेय.
सवयीप्रमाणे मीही चाल लावलेय. Happy

व्वा सुरेख... गीत, संगित आणि गायन सर्वच खूप मस्त.. कालपासून सारखे ऐकतोय मी..

श्यामले ऐकत नाहीस आज काल Happy

क्या बात है जानेमन........ मस्त झालंय गाणं Happy तुझ्या आवाजातलं ऐकायला जास्त आवडेल गं.....!!

नमस्कार,

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी याची लिंक पाहिली आणि सुरुवातीचे संगीत कानी पडताच मन प्रसन्न झाले. माझा मुलगा वय वर्षे दीड..धावत आला आणि गाणे ऐकत राहिला..आणि तीन वेळा "पयत" अशी फरमाईश करुन गाणे परत परत ऐकले.

फारच सुंदर्..सर्व संबंधितांचे अभिनंदन आणि धन्यवाद एक सुंदर कलाकृती दिल्याबद्दल.

छानच गं श्यामली!
गीत आणि संगीत दोन्हीही.
सावनी शेंड्ये तर चांगलीच गाते.
एकंदरीत छान जमलय सगळं.

>तुझ्या आवाजात पण छान वाटली होती..

हो गं श्यामली, रुमा म्हणत्ये ते बरोबर आहे, तुझ्या आवाजातली आरतीही टाक इथे. तीही सुरेख वाटते ऐकायला. Happy

खूप खूप धन्यवाद सगळ्यांनाच. पहिल्यांदाच माझ्या एखाद्या कवितेला संगीतबद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हा सगळ्यांच्या अभिप्रायावरून तो ब-यापैकी ठीक झाला आहे असं वाटतय. याच श्रेय आशिषला आणि सावनीला.तर आहेच पण तू आरती लिहीच म्हणून रोज मला छळणा-या अल्पना आणि शैलजाला. या दोघींनी असं रोज रोज मला बडवल नसतं तर मी आरती लिहायचा विचारसुद्धा केला नसता. Wink

आणि आरती लिहून झाल्या झाल्या समोर मृ होती तिला ऐकवल्याबरोबर तीनेच सुचवलं की ही संगीतबद्ध झाली पाहिजे. म्हणून तिलाही.

!!इती आरतीपुराण सुफळ संपूर्ण!!

मोरया!

अप्रतिम.. अप्रतिम..
श्यामली, क्या बात है!!!
बोल सुंदर, चाल सुंदर आणि ते पेश करणारा आवाजही सुंदर,
मस्त वाटलं. Happy

Pages