गणराज गणराज सिद्धीबुध्दीदाता

Submitted by श्यामली on 21 August, 2009 - 01:54

गीत: श्यामली (कामिनी फडणिस केंभावी)
संगीत: आशिष मुजुमदार
स्वर: सावनी शेंड्ये!!श्री गजानन मानसपूजा!!

गणराज गणराज सिद्धीबुध्दीदाता
सकल दीनांच्या ऐकसी गाथा!!धृ!!

मनाची ऐसी शोभे आरास
येथेच स्थापिले गजाननास
मनीच वाहिले दूर्वा-फुलांस
शोधु कशाला गंध-गुलाला!!१!!

गणराज गणराज सिद्धीबुद्धीदाता

सुखदक्षणांचा नैवेद्य केला
स्पंदनांचा हा टाळ वाजला
जीवे ओवाळीले प्रथमेशाला
देहच अवघा प्रसाद झाला!!२!!

गणराज गणराज सिद्धीबुद्धीदाता

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा !!! हा बाफ परत वर आला.
गेल्यावर्षी हे गाणं सुमारे ५०० वेळा ऐकलं होतं. Happy आता परत ऐकताना मागच्यावर्षीचा पूर्ण उत्सव आठवला..

श्यामली आणि सावनी पुन्हा एकदा... लै भारी !!!!!

अ‍ॅडमीन, हे गाणं प्ले होत नाहीये. कृपया दुरुस्त कराल का ? फ्लॅश प्लेयरचं सगळ्यात नविन व्हर्जन असुनही अपग्रेड करा अशी एरर येते आहे.

आत्ताच ऐकली...
खूप छान आहे. सुंदर शब्दांना, लाभलेली तेवढीच तोलामोलाची चाल, आणी लाभलेला सुंदर स्वर... एक चांगली रचना ऐकायला मिळाल्याबद्दल धन्यवाद!!!...

Pages