हिंदुंनी विशिष्ट वारी मांसाहार न करणेबाबत (discussion on conflict of calendars)

Submitted by स्पॉक on 21 August, 2015 - 03:35

टिपः या धाग्याच्या सोयीसाठी हिंदु / हिंदु धर्म = हिंदु धार्मीक समुह या अर्थाने वापरला आहे .

मासांहाराबाबतीत "काही" जण सोमवारी किंवा मंगळवारी न खाता ईतर दिवशी खातात.
ईथे प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार वार बदलतो.

ईथे मी कुणाच्याही श्रद्धेवर आक्षेप घेतलेला नाही. ती श्रद्धा पाळताना हे जे वारांचे गणित आहे ते योग्य आहे की नाही असा प्रश्न मला पडला आहे.

आपण जे सद्ध्या कॅलेंडर फॉलो करतो आहोत ते तर ख्रिती ग्रेगोरीयन कॅलेंडर आहे ना? भारतात ग्रेगोरीयन आणि हिंदु (नेपाळी) असे दोन अधिकृत कॅलेंडर असल्याचे कळते.

उदाहरणः समाजा एखादी व्यक्ती म्हणत असेल की, सोमवार हा शंकराचा वार असल्यामुळे मी आज मांसाहार करणार नाही. ठीक आहे. पण हा सोमवार तर ख्रिस्ती ग्रेगोरीयन कॅलेंडर प्रमाणे आहे ना? तुमच्या स्थानीक हिंदु कॅलेंडर(महाराष्ट्राच्या केस मधे "शके") प्रमाणे सोमवार आहे का आज?

विकी वर हिंदु कलेंडरांचे फक्त महीने दिले आहेत.

  • इतिहासाप्रमाणे पुर्वी हिंदु कॅलेंडरात वार होते का?
  • त्यांची नावे आणि गणित काय होतं?
  • हे सोमवार, मंगळवार वगैरे, निव्वळ ग्रेगोरियन कॅलेंडराचे भाषांतर आहे की एतिहासीक वेदिक संस्कृतीत असे "सात" वार होते?
  • हे विशिष्ट वारी न खाण्याची फॅड आत्ता ब्रिटीश काळानंतरचे आहे की फार पुर्वि पासुन भारततील हिंदु (जे जाती/धर्माप्रामाणे पुर्र्वीही मासांहर करत होते) ते तेव्हाही प्राचीन काळी वार पाहुन मांसाहर करत असत?
  • आपली (उपास करण्याची / मांसाहर न खाण्यची ई. ई.) जी काही श्रद्धा, ज्या कोणत्या धर्माप्रमाणॅ आहे, त्या धर्माच्या गणिताप् रमाणे / पदद्धतीप्रमाणॅ ती श्रद्धा पाळायला नको का? परक्या कॅलेंडरप्रमाणे पाळलेली श्रद्धा आपल्या देवाला पोहोचते का?

संकष्टी , विनायकी , एकादशी ई. हे सगळे हिंदु कॅलंडरप्रमाणे येतात आणि तसेच पाळले जातात. त्यामुळे काही प्रश्न नाही. ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणॅ येत नाहीत.

पण ,सोमवार, मंगळवार ई. ग्रोगोरीयन प्रमाणॅ येतात आणी त्या वारी करायचा उपास / मासांहार न करणे ई. त्यांच्याप्रमाणे पाळलेजातात. हे लॉजीकल नाही.

नाईलाजाने (मी हे वार वगैरे पाळत नाही) फारच गवत खावे लागल्यामुळे कोतबो मोड मधे हा प्रश्र विचारलेला आहे Sad
तरी दोन कॅलेंडरां मधील "परस्परविरोध"(conflict) अशी चर्चा अपेक्षीत असुन धार्मीक चर्चा अपेक्षीत नाही.
धन्यावाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदल्या दिवशीचे म्हणजे रविवारची, बुधवारची वा शुक्रवारची मांसमच्छी दुसर्‍या दिवशी

>>

बाबावो ... शिळ तेही मासमच्छी ... खाऊ नये म्हणतात ब्वा. बाकी जास्ती वाट्यासाठी शिळ खाण ... नाय पटत.

तरी ३-४ वर्षांपूर्वी इथे मी काही लेख लिहिलेत त्यात विकीवरून चित्रे घेतली होती बहुतेक कारण तेव्हा विकीशिवाय अन्यत्र रेडिमेड प्रताधिकारमुक्त चित्रे मिळवायची ठिकाणे मला फारशी माहिती नव्हती.

चंद्रभ्रमणाच्या पद्धतीनुसार योग्य ते गणित करून भारतातल्या लोकांनी दिवसाचे २४ होरे ठरवले आणि अश्या २४ होर्‍यांचा एक दिवस एकेका ग्रहाला समर्पित केला. (त्यातही सोमवारी म्हणे चंद्राशी संबंधित अधिकाधिक होरे असतात. पण त्यावद्दल मला काही माहिती नाही.)

>>

कुठला दिवस कोणत्या ग्रहाचा हे ठरवायला एक नियम आहे तो असा.

प्रत्येक दिवस हा २४ होर्‍यात (तासात) विभागला आहे. आता सुर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शनि हे डोळ्यांनी सहज दिसणारे ग्रह त्यांच्या गतीनुसार उतरत्या क्रमाने मांडा. (ही गती १२ राशींचे चक्र पुर्ण करण्याची गती आहे)

शनि सर्वात मंद म्हणून पहिला.(सुमारे २.५ वर्ष एका राशीत), नंतर गुरु (१३ महिने), मंगळ, सुर्य, शुक्र, बुध, चंद्र हा असा क्रम.

आता दिवसाचा प्रत्येक होरा ग्रहांना वरच्या क्रमात विभागुन दिला आहे. ज्यादिवशी सुर्योदयाच्या वेळी ज्या ग्रहाचा होरा, तो दिवस त्या ग्रहाच्या नावाचा वार.

शनिवारी पहिला(सुर्योदयाचा) होरा शनिचा म्हणून तो दिवस शनिवार, दुसरा होरा गुरु, तिसरा मंगळ असे करत करत २४ वा होरा मंगळाचा.

मंगळानंतर क्रमानुसार येतो सुर्य आणि हा होरा आहे दुसर्‍यादिवशीच्या सुर्योदयाचा म्हणून दुसरा दिवस रविवार.

या अश्या क्रमाने सात वार येतात.

गमभन छान माहिती.
ही माहिती नक्की कोणत्या ऐतीहासीक ग्रंथात दिली आहे याबाबतीत काही कल्पना? ( म्हणजे मला त्याप्रमाणे वाचन करायला)

गमभन धन्यवाद!
ही माहिती पंचांग वाचायला आणि कुंडली मांडायला शिकवताना गुरुजीच शिकवतात.
माझे व्क नातेवाईक फार पूर्वी हे शिकत होते.
आता लिंबुटिंबु नाहीतर रश्मींना माहित असेल.

ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये वारांचा क्रम असा का? हे माहिती नाही.

पूर्वी कालगणनेत तिथींना महत्त्व होते ते आता तारखांना आहे. हिंदूंच्या सुट्यापण अमावास्या, पौर्णिमा अश्या असत. बहुधा अष्टमी पण सुट्टी असे.

(मिपावर एक लेखमालिका होती वेदाध्ययनावर तिथे अन-अध्ययनाचे दिवस म्हणजे सुट्टीचे दिवस (तिथी) कोणते ही माहिती दिली होती. त्यात बहुधा अष्टमी पण सुट्टी असे वाचल्याचे स्मरते. पुन्हा ती मालिका वाचुन इथे दुरुस्ती करीन.)

बाकी भारतावर राज्य करणार्‍या धर्मांत विशिष्ट दिवस प्रार्थनेचा (उदा. शुक्रवार, रविवार) म्हणून सुट्टी. मग त्यावरुन आठवडा पद्धत अधिक प्रचलित झाली.

मी ही माहिती बहुतेक व. दा. भट यांच्या पुस्तकात वाचली होती. नक्की आठवत नाही.

अवांतरः
टायपिंग बोक्स मध्ये जितके जास्त टेक्स्ट तितके टायपिंग स्लो होते, म्हणून एकाच प्रतिसादात सगळी माहिती देता येत नाही.

वारांना विशिष्ट देव पण ग्रहांमुळेच चिकटले. ही माहिती पण गमतीशीर आहे.

सोमवार हा चंद्राचा वार, पण चंद्र हा शिवभक्त. त्यामुळे सोमवार शिवशंकराचा वार झाला.
मंगळाने गणेशाची उपासना केली होती. त्याला वर देखील मिळाला होता, म्हणून मंगळवार गणपतीचा.
गुरु हा देवांचा गुरु, म्हणून गुरुंना तसेच दत्तांना गुरुवार.
शुक्र हा स्त्री ग्रह म्हणून शुक्रवार देवीला.
शनिवार हा शनिचा. शनीपिडेपासुन वाचण्यासाठी मारुती उपासना म्हणून शनिवार हा शनि + मारुतीचा वार झाला.

राम्/कृष्ण किंवा पुराणातल्या कुठल्या मुख्य व्यक्तीची जन्मतिथी लिहिलेली असते पण वार नसतो.
>>

जन्मवार पण असतो. कृष्णाचा जन्मदिवस बुधवार. मारुतीचा मंगळवार असे जन्मवार दिलेले आहेत. (उत्तरेकडे मारुतीचा जन्मवार म्हणून मंगळवारी मारुतीच्या देवळात जातात.)

आज गुरुवार आहे म्हणून उप्वास आहे. पण हा गुरुवार तर ग्रेगोरीयन कॅलेंडर्प्रमाणॅ आहे ना?
पुर्वी जेव्हा अमुक देवासाठी अमुक वार पाळावा असे ठरले असेल तेव्हा ग्रोगोरीयन कॅलेंडर होते का?
>>
या प्रश्नांची उत्तरे मिळाली असावीत अशी आशा करतो. Happy

बाबावो ... शिळ तेही मासमच्छी ... खाऊ नये म्हणतात ब्वा. बाकी जास्ती वाट्यासाठी शिळ खाण ... नाय पटत.
>>>>>>
ओके, कदाचित म्हणूनच वार पाळणे सुरू झाले असावे जेणेकरून पुढचा वार न खायचा असल्याने लोकांकडून शिळे खाल्ले जाऊ नये. पण त्यातही कोणी रविवारचे बुधवारी खाल्ले की आली पंचाईत.

अवांतर - चिकन शिळे चांगले लागते. निदान आमचे कोकणी स्टाईल तरी

या प्रश्नांची उत्तरे मिळाली असावीत अशी आशा करतो. >> नाही मिळालीत.
दोन्ही गुरुवार एकच आहेत हे सिद्ध करणारे गणित नाही मिळाले.
मला अजुनही असेच वाटते आहे की ऐतीहासीक काळात हे दोन्ही कॅलेंडर दोन वेगवेगळ्या वेळी सुरु होतात (त्यांची पहिली तारिख). असे असताना आज जरी वार "अलाईन" झाले तरी, ते तेच वार कशावरुन? हे काही समजत नाही आहे.
तरी, आपल्या सगळ्यांकडुन नविन माहिती मिळाल्यनंतरचा माझा स्वतःचा अभ्यस बाकी आहे. त्यात मी एखादी दृष्य तुलना केली तर माझा प्रश्न जास्त योग्य मांडता येईल असे वाटते.

आज २२ ओगस्टला, या व्यक्तीने नवे कॅलेंदर सुर केले त्यात दोन वार आहेत वार १ आणि वार २.
२२ ऑगस्ट = १
२३ ऑगस्त = २
२४ ऑगस्ट = १
२५ ऑगस्त = २
..... याप्रमाणे (ओन्वर्डस).
आत, या व्यक्तीने २३ ऑगस्ट पासुन नवे कॅलेंडर सुरु केले त्यात दोन वार आहेत ३ आणि ४ या नावाचे.
२३ ऑगस्त = ३
२४ ऑगस्ट = ४
२५ ऑगस्त = ३
२६ ऑगस्ट = ४
....याप्रमाणे(ऑनवर्डस).
अ च्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येक "२" वारी उपास करायचा आहे.
तर तो स्वतःच्या कॅलेंडरप्रमाणे,
२३, २५, २७ ऑगस्ट ओन्वर्डस याप्रमाणे उपास करेल.

आत अ वर ब राज्य करत असल्यमुळे अ चे कॅलेंडर रद्द झाले आणि ब चे कॅलेंडर लागू झाले.
वार याप्रमाणे अलईन झाले=
ब चा ३ वार = अ चा १ वार
ब चा ४ वार = अ चा २ वार
आता, वर बघितल्याप्रमाणे, ब चे कॅलेंडर आहे,
२३ ऑगस्त = ३
२४ ऑगस्ट = ४
२५ ऑगस्त = ३
२६ ऑगस्ट = ४
मग आता अ ने ब च्या कॅलेंडरप्रमाणे,
२४, २६, २८ ऑगस्ट ओनवर्डस याप्रमाणॅ उपास करावा का? कारण या नविन कॅलेंडरातील ४ हा अ चा उपासाचा वार (वार २) आहे ना? आणि ब चे राज्य असल्यामुळे त्यांचे कॅलेंडर लागू झाले ना?
अजुन यात हजारो वर्ष + लिप वर्ष + अ आणि ब यांच्या स्वतःच्या कॅलेंडरचे स्वतःचे वगळे काही नियम असतील ते,
गृहीत धरलेले नाहीत.
मग अशाप्रकारे अ चा उपास करण्यचा दिवस पुर्णपणॅ चुकत नाही का?

ग्रेगोरियनचा पहिला दिवस (एक तारीख) आणि हिंदु पंचांगातला महिन्याचा पहिला दिवस (प्रतिपदा) या दोन्ही कॅलेंडर मध्ये वेगळ्या राहिल्या पण वार ग्रेगोरियनचा सन्डे आणि आपला रविवार हा एक कसा झाला?

दोन्ही कॅलेंडर मध्ये समान वार पद्धत (सात वार) अस्तित्त्वात होती, तर नेमके synchronization कसे आणि कधी झाले तर हा खरंच संशोधनाचा विषय आहे.

जर दोघांपैकी एका कॅलेंडर मध्ये वार पद्धत नव्हती, तर मग प्रश्न सोपा होतो. (इथे पण वार इथुन तिथे गेले की तिथुन इथे आले हा वादाचा मुद्दा येतोच).

जर वार पद्धत इथुन तिथे गेली हे सिद्ध झाले की आपला सोमवार तोच जगाचा सोमवार (monday) हे देखील सिद्ध होईल. बरोबर ना?

गमभन, हा "सुद्धा" प्रश्न आहे.
पण हा प्रश्न व्यापारामुळे सोयीसाठी दोन्ही बाजुंनी वार अलाईन करुन घेतले म्हणुन सोडुन देऊ.

पण, एकदा अलाईन झाल्यानंतर, ज्या गुरुवारी मी उपास करायचा आहे तोच हा ग्रेगोरीयन गुरुवार आहे के कसे? मुळातच श्रद्धा ठेवायची एका कॅलेंडरची पण पाळायची दुसर्याप्रमाणे, ते कसे होईल?

तुमच्या प्रतिसादातील हे दोन्ही रविवार एक कसे झाले हा मायनर प्रश्न आहे.
एकदा झाल्यनंतर त्याची ओरिजिनल व्हॅलिडीटी काय आणि किती?
दोन्ही कॅलेंडरमधे "काँप्रोमाईज" झाल्यानंतरचा हा तोच ओरिजिनल रविवार आहे याचे गणित काय?

गमभन हा एडीट केलेला नवा प्रतिसाद अगदी बरोबर आहे. हेच म्हणायचे आहे मला + काही ईतर छोटे प्रश्न.

मागच्या दिवाळीत मला रुजुता दिवेकर (बहुदा मी नाव बरोबर लिहले आहे ) ज्या करिष्मा कपुरच्या डायेटीशन आहेत यांची मुलाखत पाहिलेली स्मरते.

त्यांनी अस म्हणल की भारतीय लोक नॉनव्हेज सिलेक्टेड खातात हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. असे केले तरच आरोग्य चांगले राहील. श्रावणात पचन शक्ती निसर्गतः मंद होते अश्या वेळी नॉनव्हेज न खाणे चांगले.

मांस खाण्यापेक्षा मासे खाणे श्रेयस्कर असेही त्या म्हणाल्या.

ज्योतिष्य दृष्ट्या राहु महादशा किंवा राहु दोष असताना नॉनव्हेज खाण्याने दोष वाढतो असे म्हणतात.

मला वाटतं हिंदु सणवार आणि खाण्यानखाण्याचे सोपस्कार यांचे दोन भाग पडत असावेत.

एक म्हणजे, पंचांगानुसार आलेले सण, एकादश्या, संकष्टी-विनायकी वगैरे. ते पूर्वापार चालत आले आणि तसेच चालू राहिले. बदलले नाहीत. त्यांचा वाराशी काही संबंधही येत नाही. अपवाद अंगारकी चतुर्थीचा. ती संकष्टी + मंगळवारचं कॉम्बो आहे.

आणि दुसरे म्हणजे वारानुसार खाण्या-न ख्याण्याचे दिवस ठरवले गेले ते. आपल्या कहाण्यांमध्येही आदितवारी, मंगळवारी असे उल्लेख येतात. या कहाण्या कधी प्रचलित झाल्या हे माहित नाही. खूप जुन्या असतील तर तेव्हाही वार महत्त्वाचे होते असं दिसतं. काही मराठी श्लोकातही सोमवार शंकराचा, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार लक्ष्मीचा वगैरे उल्लेख येतात.

पण कदाचित हे वार प्रकरण आपण नंतर अ‍ॅडॉप्ट केलं असेल असं वाटतं. म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडर आपल्या जीवनात आल्यावर हे ही आणि ते ही असं झालं असावं. असा एक अंदाज.

ऊऊऊऊऊऊह!

कोरा म्हणजे हिंदूबंधू आयायटी "सेपियन्स" किंवा सेपियोसेक्ष्युअल लोकांचे सर्कलजर्क झालेय आजकाल.

एक इंडियनपीपलक्वोरा नावाचा लय भारी रेड्डीट आहे. वाचा जरा.

Pages