सॅटीन आणि फक्त सॅटीन

Submitted by टीना on 8 August, 2015 - 03:15

ममो ने काही दिवसांपुर्वी काढलेल्या या धाग्याने मला चांगलीच भुरळ पाडली. सुरुवातीला जमतय का नै ते बघु तर अस म्हणुन सुरु केलेला प्रयोग चांगलाच successful झाल्यावर अजुन काहितरी वेगळ असं म्हणत म्हणत मी नवनविन शिकत गेली..
आधी ममोच्या धाग्यावर मग माझ्या पराक्रमाच्या धाग्यावर अस करता करता ते धागे हायजॅक होऊन जातील म्हणुन सगळा पसारा इथ करावा म्हटलं म्हणुन हे नविन धाग्याच प्रयोजन.

आता हि फुल; फुल न राहता त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी मी तयार करायला सुरुवात केलीय. त्यात मुख्यत्वे हेअर अ‍ॅसेसरीज जास्त आहे.. आता विचार आहे की नेकपीस, इअररिंग्ज, छोट्या मुलींच्या ड्रेससाठी वेस्ट बेल्ट वगैरे सुद्धा करुन पाहिल..अर्थात हे माझ्या मॉडेल वर सर्वात पहिले ट्राय करेल आणि त्याकरीता तिची ना नाही. तिच्यामते मी तिची बेस्ट फॅशन डिझायनर आहे. त्यामुळे मी अजुनतरी विन विन सिच्युएशन मधे आहे.

I hope तुम्हा सर्वांना हे प्रकार आवडतील आणि तुम्ही तुमच्या मॉडेल्स वर ते ट्राय कराल..

याउप्पर माझ्या मॉडेल च्या येत्या वाढदिवसाला तिच्या मित्रमैत्रीणींसाठी रिटर्न गिफ्ट म्हणुन यातल काही देऊ शकतो असं माझ मत पडलं.. मुलांसाठी काय यावर अजुन नक्की काही ठरल नाही पण त्यावर विचार चालु आहे.
येत्या नोव्हेंबर मधे माझ्या भाचाचा पहिला वाढदिवस आहे तेव्हा सर्व बच्चेकंपनींसाठी क्राऊन वगैरे बनवावे असा पन डोक्याट प्लॅन आहे..आणखीही बरच काही बाही चाललयं विचारात Wink .. जे काही करेल त्याचे फोटो वरचेवर अपलोड करेलच मी इथे..

सद्ध्या बनवलेल्यांपैकी काही.. ममो आणि माझ्या धाग्यावर टाकलेले प्रचि सुद्धा इथच संग्रही करुन ठेवते.. तुम्ही केलेल्या प्रयोगांच पन इथं स्वागत आहे..

सर्व काही तयार स्थितीत नाहिए खरतर..बराच कच्चा माल सुद्धा दिलाय मी खाली..

१.उदा. ही फुल..काही वापरली..काही शिल्लक आहेत अजुन..

२.

३.

४. ह्या हेअरक्लीप्स

५.

६.हे सर्व हेअरबेल्ट

७.

८.

९.

१०.

११. याचे इअररिंग्ज करावे का ?

१२. हा बो..

१३. आणखी काही फुलं..

१४. न जमलेलं

या फुलांच्या मदतीने छोट्या बाहुल्यांचे ड्रेस , हेअरस्टाईल मधे वापरतो ते ब्रॉच, बुके, फ्लॉवरपॉट मधल्या फुलांच्या स्टिक्स, नेकपिस प्रमाणेच पेंडंट, ग्रिटींग कार्ड्स, फोटोफ्रेम्स, पर्स्/बॅग, मोबाईल कव्हर, विंडचेन, स्टिकर्स, बुकमार्क्स, ज्वेलरी बॉक्स, पेन स्टॅन्ड, वॉल आर्ट अस भरपुर काही बनवता येईल.. ज्यांना आवड असेल त्यांनी करा मग सुरुवात..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा.. सगळीच एकसोएक आहेत. Happy
१० वाला हेअरबँड खूपच आवडला.
११ च्या डँगलर्स किंवा स्टडस पण छान दिसतील पण स्टडस साठी खूप छोटी साइझ लागेल..

टीना नाव वाचुन धाग्यात डोकावले तर मस्त मस्त फुले.

१० वाला हेअरबँड, ११आणि १२ अप्रतिम.....

धन्यवाद लोकहो Happy
कृती लिहायला गेली तर किचकट होईल आणि समजणार नाही अस वाटतय मला म्हणुन लिंक देते खाली..

हि ५व्या प्रचि मधल्या पाकळ्या करायची कृती : https://www.youtube.com/watch?v=z8gRGWhBZxA

हि १०व्या प्रचिची :
यात आणखीही वेगवेगळ्या प्रकारच्या पाकळया बनवायचं शिकता येईल ..
https://www.youtube.com/watch?v=LElq1iX8Y4o

आणि हि १३व्याची लिंक Proud .. I mean फुलाची :
https://www.youtube.com/watch?v=HPGMFMg7pxk

वॉव टीना जी , तुस्सी ग्रेट हो.. किती सुंदर केलंयस सगळं.. कौतुक वाटलं मनापासून!!

इसी खुशी मे वो १० नं. वाला हेअर बँड मेरा ओके? Wink

जस्ट किडिंग या!!!! Happy

धन्यवाद..
वर्षू.. Happy भेटू त पहिले..इथपासुन तर वांदे आहे Wink
आत्मधून, लिहिल नसत तर त्या वाक्यावर एखाद्यानं टेम्प टाकलच असतं Lol

सुरेख! १० हेअरबेल्ट आवडला...११चा हेअरबेल्टच चान्गला दिसेल.

www.childrensplace.com, या आमच्या कडच्या दुकानात काही काही युनिक हेअर अ‍ॅक्सेसरिज असतात, मी हेअर्बेल्ट घ्यायची/घेते मुलिसाठी बर्‍याचवेळा
www.claires.com
इथेही अजुन आयडिया मिळतिल.

थँक्यु प्राजक्ता...
पहिली लिंक छाने..बरच काही घेता येईल तिथुन भाचा भाची साठी...
दुसरी उघडतच नै आहे Sad

Pages