सॅटीन आणि फक्त सॅटीन

Submitted by टीना on 8 August, 2015 - 03:15

ममो ने काही दिवसांपुर्वी काढलेल्या या धाग्याने मला चांगलीच भुरळ पाडली. सुरुवातीला जमतय का नै ते बघु तर अस म्हणुन सुरु केलेला प्रयोग चांगलाच successful झाल्यावर अजुन काहितरी वेगळ असं म्हणत म्हणत मी नवनविन शिकत गेली..
आधी ममोच्या धाग्यावर मग माझ्या पराक्रमाच्या धाग्यावर अस करता करता ते धागे हायजॅक होऊन जातील म्हणुन सगळा पसारा इथ करावा म्हटलं म्हणुन हे नविन धाग्याच प्रयोजन.

आता हि फुल; फुल न राहता त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी मी तयार करायला सुरुवात केलीय. त्यात मुख्यत्वे हेअर अ‍ॅसेसरीज जास्त आहे.. आता विचार आहे की नेकपीस, इअररिंग्ज, छोट्या मुलींच्या ड्रेससाठी वेस्ट बेल्ट वगैरे सुद्धा करुन पाहिल..अर्थात हे माझ्या मॉडेल वर सर्वात पहिले ट्राय करेल आणि त्याकरीता तिची ना नाही. तिच्यामते मी तिची बेस्ट फॅशन डिझायनर आहे. त्यामुळे मी अजुनतरी विन विन सिच्युएशन मधे आहे.

I hope तुम्हा सर्वांना हे प्रकार आवडतील आणि तुम्ही तुमच्या मॉडेल्स वर ते ट्राय कराल..

याउप्पर माझ्या मॉडेल च्या येत्या वाढदिवसाला तिच्या मित्रमैत्रीणींसाठी रिटर्न गिफ्ट म्हणुन यातल काही देऊ शकतो असं माझ मत पडलं.. मुलांसाठी काय यावर अजुन नक्की काही ठरल नाही पण त्यावर विचार चालु आहे.
येत्या नोव्हेंबर मधे माझ्या भाचाचा पहिला वाढदिवस आहे तेव्हा सर्व बच्चेकंपनींसाठी क्राऊन वगैरे बनवावे असा पन डोक्याट प्लॅन आहे..आणखीही बरच काही बाही चाललयं विचारात Wink .. जे काही करेल त्याचे फोटो वरचेवर अपलोड करेलच मी इथे..

सद्ध्या बनवलेल्यांपैकी काही.. ममो आणि माझ्या धाग्यावर टाकलेले प्रचि सुद्धा इथच संग्रही करुन ठेवते.. तुम्ही केलेल्या प्रयोगांच पन इथं स्वागत आहे..

सर्व काही तयार स्थितीत नाहिए खरतर..बराच कच्चा माल सुद्धा दिलाय मी खाली..

१.उदा. ही फुल..काही वापरली..काही शिल्लक आहेत अजुन..

२.

३.

४. ह्या हेअरक्लीप्स

५.

६.हे सर्व हेअरबेल्ट

७.

८.

९.

१०.

११. याचे इअररिंग्ज करावे का ?

१२. हा बो..

१३. आणखी काही फुलं..

१४. न जमलेलं

या फुलांच्या मदतीने छोट्या बाहुल्यांचे ड्रेस , हेअरस्टाईल मधे वापरतो ते ब्रॉच, बुके, फ्लॉवरपॉट मधल्या फुलांच्या स्टिक्स, नेकपिस प्रमाणेच पेंडंट, ग्रिटींग कार्ड्स, फोटोफ्रेम्स, पर्स्/बॅग, मोबाईल कव्हर, विंडचेन, स्टिकर्स, बुकमार्क्स, ज्वेलरी बॉक्स, पेन स्टॅन्ड, वॉल आर्ट अस भरपुर काही बनवता येईल.. ज्यांना आवड असेल त्यांनी करा मग सुरुवात..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व प्रचंड सुंदर
तो काळा हेअर बँड मला खूप आवडला.इथे रंगीत फुलं वाला निळ्या बेस वर आहे तो काळा किंवा क्रिम बेस वर केला
आणि मॉम अँड मी किंवा फर्स्ट क्राय वर टाकला तर अवाच्या सवा किंमतीत विकता येईल असा विचार आला Happy

हेच ते ज्याच्याबद्दल मी काल बोलत होते Wink

हे कलर कॉम्बिनेशन दाखवण्यासाठी काढलेला प्रचि :

आणि हे फायनल प्रॉडक्ट Happy

खुप मस्त ! लवकरच निसर्गातली फुलांची अनो़खी डीझाईन्स घेऊन येईन.. तूम्हा सर्व कलाकारांना नक्कीच भुरळ पडणार आहे.

सही दिसतयं... महान कलाकार आहेस तु!!
आरतीतै +१.. आणुन ठेवलं सॅटीन .. १-२ फुलं केली .. मनासारखी झाली नाही म्हणुन कोपर्यात ठेवलं सामान! Sad

वा टिना खूप सफाई आहे तुझ्या कामात. भारी गुणाची आहेस गं.

जाई, जमतंय जमतंय. अजून practice कर की छान सफाईदार काम होईल.

टीना, हे आता केलेलं आहे ना, ते हेअर बँडपेक्षा सत्तरीच्या दशकातल्या हेरविणी घालायच्या तसलं साईडला लावलेलं अतिच भन्नाट वाटेल. त्याच रंगाचा ड्रेस आणि ही हेअर अ‍ॅक्सेसरीज वर भलामोठा गॉगल परफेक्ट रेट्रो लूक येईल.

नंदिनी ,
माझी मॉडेल वय वर्षे सव्वातीन आहे Wink
तिला वेगवेगळे ड्रेस घेऊन देत असते मी आणि त्यावर मॅचिंग करत असते मी..
तु सांगितलेल्या लुक मधे पण मज्जा येईल..ट्राय करतेच आता..

ज्या विडिओ ला मी फॉलो केल त्यांनी २७ फुल तयार केलेली मोजली मी मग मी पन २५ करुन ठेवली..
पण बेस जरा छोटा असल्यामुळे उरलेत त्यांपैकी काही..

त्यात हे केल मग मी Happy

पण आणखी काही फुल उरलेली आहेत..
माझा विचार त्या फुलांना घेउन जोडीला मोत्यांची सर करायची असा आहे..
मस्त वाटणार न ते पण कॉम्बिनेशन..या हेडबँड च्या संगतीला घालायला पन मस्त वाटणार ..

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रमैत्रीणींनो..
उद्याचा दिवस म्हणजे माझ्या आवडत्या दिवसांपैकी एक .. छान वाटत का तर Happy

तर उद्या दिवसभर हे गळ्यात घालुन मिरवणार आहे मी Wink

आज मै उपर .. आसमाँ नीचे..

https://www.youtube.com/watch?v=AhUApcBAbZA
विडिओ जरुर बघा..
सुरुवातीला जरा अतिशयोक्ती वाटण्याची शक्यता आहे ( मला वाटली होती .. मुळात प्रकाश पडला नव्हता सुरुवातीला म्हणुन असेल ) पण worth watching.. Happy

टिनीमिनी...... सुप्पर्ब यार,,,,,,,,, किती छान करते आहेस.. तो वरचा हेअर बँड सुप्पर लाईक

आणी आता चक्क तिरंगी फुलाचा नेकलेस.. वॉव

( ऐ बाई, इतकी एनर्जी, वेळ कुठून आणतेस.. लईच कवतिक वाटतं तुझं ..झोपते बिपतेस ना रात्री??. __/\__ )

Pages