सॅटीन आणि फक्त सॅटीन

Submitted by टीना on 8 August, 2015 - 03:15

ममो ने काही दिवसांपुर्वी काढलेल्या या धाग्याने मला चांगलीच भुरळ पाडली. सुरुवातीला जमतय का नै ते बघु तर अस म्हणुन सुरु केलेला प्रयोग चांगलाच successful झाल्यावर अजुन काहितरी वेगळ असं म्हणत म्हणत मी नवनविन शिकत गेली..
आधी ममोच्या धाग्यावर मग माझ्या पराक्रमाच्या धाग्यावर अस करता करता ते धागे हायजॅक होऊन जातील म्हणुन सगळा पसारा इथ करावा म्हटलं म्हणुन हे नविन धाग्याच प्रयोजन.

आता हि फुल; फुल न राहता त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी मी तयार करायला सुरुवात केलीय. त्यात मुख्यत्वे हेअर अ‍ॅसेसरीज जास्त आहे.. आता विचार आहे की नेकपीस, इअररिंग्ज, छोट्या मुलींच्या ड्रेससाठी वेस्ट बेल्ट वगैरे सुद्धा करुन पाहिल..अर्थात हे माझ्या मॉडेल वर सर्वात पहिले ट्राय करेल आणि त्याकरीता तिची ना नाही. तिच्यामते मी तिची बेस्ट फॅशन डिझायनर आहे. त्यामुळे मी अजुनतरी विन विन सिच्युएशन मधे आहे.

I hope तुम्हा सर्वांना हे प्रकार आवडतील आणि तुम्ही तुमच्या मॉडेल्स वर ते ट्राय कराल..

याउप्पर माझ्या मॉडेल च्या येत्या वाढदिवसाला तिच्या मित्रमैत्रीणींसाठी रिटर्न गिफ्ट म्हणुन यातल काही देऊ शकतो असं माझ मत पडलं.. मुलांसाठी काय यावर अजुन नक्की काही ठरल नाही पण त्यावर विचार चालु आहे.
येत्या नोव्हेंबर मधे माझ्या भाचाचा पहिला वाढदिवस आहे तेव्हा सर्व बच्चेकंपनींसाठी क्राऊन वगैरे बनवावे असा पन डोक्याट प्लॅन आहे..आणखीही बरच काही बाही चाललयं विचारात Wink .. जे काही करेल त्याचे फोटो वरचेवर अपलोड करेलच मी इथे..

सद्ध्या बनवलेल्यांपैकी काही.. ममो आणि माझ्या धाग्यावर टाकलेले प्रचि सुद्धा इथच संग्रही करुन ठेवते.. तुम्ही केलेल्या प्रयोगांच पन इथं स्वागत आहे..

सर्व काही तयार स्थितीत नाहिए खरतर..बराच कच्चा माल सुद्धा दिलाय मी खाली..

१.उदा. ही फुल..काही वापरली..काही शिल्लक आहेत अजुन..

२.

३.

४. ह्या हेअरक्लीप्स

५.

६.हे सर्व हेअरबेल्ट

७.

८.

९.

१०.

११. याचे इअररिंग्ज करावे का ?

१२. हा बो..

१३. आणखी काही फुलं..

१४. न जमलेलं

या फुलांच्या मदतीने छोट्या बाहुल्यांचे ड्रेस , हेअरस्टाईल मधे वापरतो ते ब्रॉच, बुके, फ्लॉवरपॉट मधल्या फुलांच्या स्टिक्स, नेकपिस प्रमाणेच पेंडंट, ग्रिटींग कार्ड्स, फोटोफ्रेम्स, पर्स्/बॅग, मोबाईल कव्हर, विंडचेन, स्टिकर्स, बुकमार्क्स, ज्वेलरी बॉक्स, पेन स्टॅन्ड, वॉल आर्ट अस भरपुर काही बनवता येईल.. ज्यांना आवड असेल त्यांनी करा मग सुरुवात..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाॅव टीना, तु तर कमाल केलीस.
काय काय सुंदर सुंदर केलयसं ग.
गुरू से चेला सवाई ग. खूप छान वाटतय.

मस्तय टिनुटले. सगळे छान गोग्गोड आहेत. हेअर बॅन्ड अतीशय आवडले. माझ्या मुलीने जर हे बघीतले तर घे म्हणूनच मागे लागेल.:फिदी: ऑलरौन्डर आहेस तू.:स्मित:

एक बहोतही सॉल्लीड्ड आईडीया मिळाली..तयार करुन लवकरच हजर करेल म्हणते..
तोवर जस तयार करणार आहे म्हणजे मी ज्याची कॉपी मारणार आहे त्याचा फटू दाखु का ?
तुम्ही ४ ५ जणांनी दुजोरा दिला तर दाखविन म्हणते Happy

मेरे मन मे भी वहिच द्वंद्व चालु है..
दोन मिंट हे वाट्टे दोन मिंटात ते..
जाऊदे बा..
म्हणुन मी कुठल्या कुठल्या रंगाच कॉम्बिनेशन करणार आहे ते पण टाकणार म्हणुन फटू काढून ठेवला पण परत तेच..अस वाटतय डायरेक्ट्च दाखवावं Wink

टिने, वरचे सगळे+१
दंडवत स्विकार गो माये __/\__

मुळात एखाद्या मधे कला असणं हे कौतुकाचं, त्यात लगेचच्या लगेच कंटाळा न करता उत्साहाने त्या त्या गोष्टी बनवायला घेणं त्याहुन जास्त कौतुकाचं!
का माहीत नाही पण आय एम सो प्राऊड ऑफ यू बेबी Happy

जाई, They are ssssooooo cute..
खुपच छान..
तु करुन पाहिल त्याबद्दल अभिनंदन Happy

रीये..
थँक्यु गं ..

धन्यवाद टीना . काल तुझा बाफ बघून खुप दिवसापासून भिजत घातलेल हे घोंगड़ सुधारायला घेतल . ट्रायल and एरर पद्धतीने सुरुवात केली. थोड्या प्रयत्नानंतर जमल. पण मी हे वेगळ्या पद्धतीने केलेय. मनीमोहोरताईच्या पद्धतीने अजून जमत नाहिये. म्हणजे त्या पाकळ्या कश्या फोल्ड करायच्या त्या. मग दूसरी मेथड यू ट्यूब वर सापडली . Happy

चला छान केलेस जाई..
पहिल्या झटक्यात सहसा जमत नै अश्या गोष्टी..त्यातही महत्वाच म्हणजे आपल्या डोक्यात जे चित्र तयार असत तस जमण म्हणजे मुश्किलचं असते.. Wink पण कर कर तयार आणि बाहुलीला सजव तुझ्या Happy ऑल द बेस्ट..

चंबू ,नक्की दाखवा Happy

.त्यातही महत्वाच म्हणजे आपल्या डोक्यात जे चित्र तयार असत तस जमण म्हणजे मुश्किलचं असते..>>> हो ना ! त्यात वीडियो पाहून तितकासा अंदाज येत नाही

ते पांढर फूल माझ्या मामेबहिणीच्या फ्रॉक वर लावणार आहे

काल तुझा बाफ बघून खुप दिवसापासून भिजत घातलेल हे घोंगड़ सुधारायला घेतल <<<जाई. माझ घोंगड भिजतच आहे अजून. Uhoh ममोंचा धागा बघून लॉटमध्ये सॅटीन रीबीन्स आणल्या. एका रात्री दीड वाजेपर्यंत ट्राय केल. दुसर्‍या दिवशी जमल दोन फुल करून ते प्रकरण कपाटात ढकलल. Proud
टिनाला पकडून न्याव का? Wink

टीना, जाई मस्त फोटो आहेत.

आपल्या त्या मेहेंद्या पण बाकी आहेत न <<<<< जाई हो ते पण आहेच आणि तिच्या चपात्यांचा फोटो पण टेंम्प्टींग आहे. त्यात ती त्रिकोणी मऊसूत चपात्या बनवते. जो मेरे बसकी बात नही.

Pages