मला सदाशिव पेठ बघायचीय !

Submitted by हेमन्त् on 30 June, 2015 - 15:48

अनेकदा पुण्यात जावून सुद्धा या महान ऐ तिहासिक आणि सांन्स्कृतिक स्थळाचे दर्शन केले नाही … तरी ते करण्याचा इरादा आहे.
माझे काही मित्र ( जुने मुंबईकर आता पुणेकर ) हे ऐकताच थर थर कपू लागले .
" अरे X%^&(* झालास कि काय ? चाल घरी ये बिअर पिलावतो . असे हि म्हणाले ( ते चहाच नाही तर मद्य देतायत - म्हणजेच हे मुल पुणेकर नाहीत हे कळले आसेल्च.
तरी माझी विनंती खालील गोष्टी / सल्ला / सेवा मिळतील काय?

१) नकाशा - अचूक नकाशा मिळेल काय ? कारण इथे कोणीही पत्ता विचारले कि अपमान करतात !
२) गेंड्याच्या कातडीचा शर्ट - अपमान पचवायला !
३) मी ४-५ पाण्याच्या बाटल्या नेत आहे - पुरतील कां ? इथे कोणिही पाणी विचारात नाही .

अजून काही गोष्टी मला नेण्यास सांगितले

१) तंबू
२) चक मक
३) हत्यारे
४) सरपण
५) तलवारी
६) दोर
७) होकायंत्र
८) barometer

जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चकमक म्हणजे गारगोटी. सरपण कोरडे आहे हे बघून घ्या. शक्यतो पुण्याबाहेरूनच आणा. पुण्यात कुठे मिळते माहित नसले तरी कुणाला विचारू नका. शक्यतो पुणेकरांशी बोलताना जपूनच.

फक्त पुणेकरांनाच नुसते बोलून आग लावण्याची शक्ति आहे.
तलवारी बरोबर ढाली पण घ्या! बिचवे, वाघनखे या पासून सावध.

आता जाताच आहात म्हणून, पण एरवी पुणेकर नसाल तर न गेलेलेच बरे.

Happy

खर सांगायच तर आता सदाशीव पेठ नुसती नावा ला राहिली आहे, मी तिथे राहत असतांना (2006-2008) आधीचे वाडे पाडून नवीन ईमारती उभ्या राहत होत्या, पुणेकर मंडळी (काही, सगळेच नाही) पेठा सोडून ईतर area मधे राहायला गेलेत, आधी सारखे वाडे, लोका, वातावरण राहीलेला नाही,

@ झक्की धन्यवाद ! आपण अनुभवी किंवा सदाशिवपेठी दिसता ! ;))

तसेच खालील गोष्टी आवश्यक आहेत असे मला वाटते -----

१) चिलखत - राजा केळकर मधून भाड्याने मिळेल काय ? कि NDA त बघावे?
२) तिरका "अर्थ" कोश - यात पुणेरी "तिरक्या" मराठी चे सध्या मराठीत भाषांतर छापलेले आस्ते
३) वेल्डिंग चे गोगल्स - सदाशिव पेठी लोकांच्या विद्वत्तेने आंधळे होऊ नये म्हणून
४ ) शिरस्त्राण
५) KFC चा take - away , किंवा मटन - हल्ला झाल्यास दाखवून पाळायचा बेत होता - पण मित्र म्हणाले कि हल्लेखोरच खाऊन टाकतील !!

सदाशिव पेठेत काही खास पाट्या बघायला मिळतील काय ? त्यांचे फोटो काह्डू शकतो काय ?

सदाशिव पेठेत प्रसिद्ध तुसडे पणाचा आणि उद्धट पणाचा अनुभव कसा घ्यावा ?

सदाशिव पेठेत प्रसिद्ध तुसडे पणाचा आणि उद्धट पणाचा अनुभव कसा घ्यावा ? >>> त्यासाठी कृपया आरश्यासमोर उभे रहावे Wink (ह. घ्या.)

सदाशिव पेठेत प्रसिद्ध तुसडे पणाचा आणि उद्धट पणाचा अनुभव कसा घ्यावा ? >>>

सदाशीव पेठी उत्तर: सदाशीव पेठेत पाहण्यासारखे काही ही नाही, उगाचा आपला, व आमचा वेळ वाया घालवू नये...

@ बेकार तरुण मी मुंबईचा आहे . आणि आईकडून ठाण्यचा शेतकरी . आमच्याकडे थकलेला दिसला तर दारावरच्या कोणालाही पाणी देण्याची प्रथा आहे … तशी माझी आई ५ वर्षे फर्गुसन ला होती पण शेवटी सध्या शेतकरी कुटुंबातले संस्कारांवर पुणेरी खादुस्पनाची पुटे चढली नाहीत । त्यामुळे आरश्यात मला नेहमीच ऎक मुंबईकर दिसतो . आणि हो आमच्याकडे वाढदिवसाला हि ऎव्दे लोक येतात जेव्देकाही सदाशिव पेठी लग्नात येत नाहीत

खरंच तुम्ही महान आहात. कशाला ती कंजूष, तुसड्या, खडूस लोकांची सदाशिव पेठ बघायची आहे तुम्हाला? पाच वर्षं फर्गसनला म्हणजे फार हालात दिवस काढावे लागले असतील त्यांना. आमची सहानुभूती. आणि सपे त वाढदिवस करतात ही खोटी माहिती कुणी दिली तुम्हाला? आधीच्या सगळ्या माहितीप्रमाणेच ही पण दंतकथा आहे. इथे तर लोक जमतील, मग त्यांना पाणी द्यावे लागेल म्हणून कुणी मोठ्याने भांडतही नाही, रस्त्यावरसुध्दा! खोटं नाही सांगत, पण माणूस मेला तरी पटकन कळवत नाहीत, शेजारी पाजारी. त्यांची झोपमोड नको व्हायला, पुन्हा रडता रडता अपमान करणं, कुजकट तिरकं बोलणं फारच अवघड, नाही का! आणि हो, मेडिकल्सपासून ते फुलवातींपर्यंत आख्खं मार्केट दुपारी एक ते चार शटर लावून झोपा काढतं. बाकी जग बारा तास राबून जेवढं कमावतं तेवढंच पुणेकर आठ तासात कमावतात. जात्याच हुशार. पूर्वी तर घराघराच्या धुराड्यातून तोंडच्या वाफेचाच धूर निघायचा म्हणे. आता त्या वाफेचं ऊर्ध्वपतन करून खडकवासल्यात सोडतात म्हणे ते पाणी.

स पे... तस फारच कमी लिहिलय मूळ धाग्यात , बरेच गैर्समजही करुन घेतलेले दिसत आहेत असो

येथे पत्ता सांगायची पध्द्त अफलातून आहे. म्हणजे
क्षयज्ञ (एखादी ३-४ आकडी संख्या) सदाशिव पेठ पुणे असे सांगितले म्हणजे खूप असा समज आहे. जणू पत्ता शोधणा-याच्या ५ पिढ्या पेठेत राहिल्या आहेत वगैरे
मग तो पत्ता शोधणारा लक्ष्मी रस्ता किंवा टिळक रस्त्यावरुन त्याचा घर शोध कार्यक्रम चालू करतो आणि तास दिड तासाच्या अथक प्रयत्नांनी फर्लांगभर अंतर कापून कसाबसा पोहचतो .

बाकि तुम्ही या पेठेत जाऊन आल्यानंतर लिहिले तर जास्त योग्य होईल. पुणेकरांवर टिका खपवली जाणार नाही , सदाशिव पेठी असले तरीही Happy

फोतोग्राफर +१

पेठेत जायच तर Read between the line/words च्या पुढच Read inside the word शिकाव लागेल....
तुस्सी तला ड दिसला नसेलच तुम्हाला Wink

>>> तुस्सी तला ड दिसला नसेलच तुम्हाला <<<
तर तर, अन हे पण शिकाव लागेल की "सदाशिव पेठेत चोंबडेपणाला थारा नस्तो, त्याला तुस्सड्डेच उत्तर लाईफटाईम ग्यारंटीने मिळते" Proud

@आशुडी >> बेफाम मार्‍या है।

चेष्टामस्करीत लिहिलेला लेख असला,तरी एक सिरियस मत मांडतो.

मुंबई असो वा अन्य कुठलं शहर. तिथल्या माणसांचे स्वभावधर्म वगैरे गोष्टींमधे त्या माणासांकडले गुण प्रभावी नसतात. तर त्या शहराची रचना ज्या (आर्थिक/सामाजिक)तत्वांमधून आलेली असते,त्यामुळे तेथील लोकांना तसं जगणं वागणं भाग पडत असतं. किंवा त्यांचा स्वभाव त्यातून तयार होत असतो. नाहितर वाळवंटात राहाणार्‍या माणसांचं, "ही लोकं कित्ती पाणी वाचवतात नै.............!" असलं बेगडी कौतुक केल्यासारखं होइल ते. वाळवंट आहे,म्हणजे पाणी मिळवणे,जपणे,वाचवणे अपरिहार्य आहे.. हे तत्व वाळवंटात भरपूर पाणी मिळणार्‍या प्रदेशातून रहायला गेलेल्या माणसालाही पाळावं लागेल. असे गुण हे परिस्थिती जन्य कारणातून सार्वत्रिकपणे अंगिकारले जात असतात. त्यात विशेष कौतुक असं काहिही नाही. जगण्याच्या लढाईतला तो आधीचा पवित्रा,आणि नंतरचा स्वभावधर्म आहे.

एक उदाहरण देतो.. आंम्ही कोकण/मराठवाडा/विदर्भातले काहि लोक गेल्या दहा पंधरा वर्षात पुण्याइतकेच मुंबईला पौरोहित्य करण्यासाठी स्थायिक झालेले आहोत. पण आंम्हा पुण्यामधल्यांकडे वक्तशीरपणा ,कामातली -आपणहून समजून काम करण्याची वृत्ती/इनव्हॉलमेंट हे दोन गुण अगदी अभावानी अढळतात. कारण कित्तीही झालं तरी पुणं हे अजुनंही अस्सल घाटी स्वभावधर्माचच आहे.(घाटावरचाच भाग ना तो!) पण मुंबईमधे प्रत्येक बाबतीत स्पर्धा असल्यानी आंम्हा प्रत्येकाला तिकडे आपले नुसताच हिशोबीपणा(म्हणजे-व्यवहारीपणाचा पुरता अभाव),राजेशाहीपणा,बेजबाबदार प्रवृत्ती हे गुण फेकून द्यावे लागले आहेत. आणि जे व्यवसायाच्या बाबतीत बदलावं लागलेलं आहे..तेच त्या शहरात जगण्याच्या बाबतीतंही बदलावच लागतं.. त्यात आंम्ही आमचं स्वतःचं कौतुक करवून घेण्यासारखं काहिही नाही. कारण हीच (आंम्ही)पुरोहित मंडळी सुट्टीमधे गावाला वगैरे आलो,की तिकडे आलेल्या एखाद्या कामात आमचे सगळे मूळचे रंग दाखवतोच. कारण त्याशिवाय तिथलं गिर्‍हाइकंही बधत नाही..हे ही आंम्हाला पुरतं ठाऊक असतं.

आशुडी,

तुम्ही केलेलं बहारदार वर्णन ऐकून सदाशिवपेठ हा दुसरा स्वर्गच आहे याची खात्री झाली. तसंही पाहता मेल्याविना स्वर्ग दिसंत नाही असं म्हणतात. सपेत जायचं असेल तर डोक्याला कफन गुंडाळलेले बरे! Proud

पण एक गणित कळलं नाही. दुपारी १ ते ४ झोपलं तर ते ३ तास होतात. मग बाकीचं जग १२ तास खपून जे कमावतं ते त्यास सपेकरांना ९ तास लागायला पाहिजेत. तुमच्या हिशोबाने ८ कसे होतात? काहीतरी जम्माडी गम्मत असणार, बरोबर? आम्हाला सांगा ना [मोकळीजागा] गडे!

आ.न.,
-गा.पै.

@ अतृप्त - एकदम बरोबर बोललात . जात , धर्म नव्हे तर भूगोल कधी कधी जास्त परिणाम करतो वागणुकीवर !

पुण्यात खडूस , हेकट आणि कर्मठ म्हणून जी जात बदनाम झाली आहे त्याचे माझे मुंबईत बरेच मित्र आहेत . माझे बरेच मित्र पार्ल्यात आहेत . आणि त्यांना माझ्यात आणि मला त्यात काहीही वेगळे दिसले नाही … ज्याला attitude म्हणतात तो बराचसा सारखा आहे.
त्यामुळे आजही त्यातले काही पुण्यात स्थाईक झाले तरी ते घरी बोलावतात - जेवायलाच नाही तर राहायला सुद्धा !!! कधीतरी त्यांच्याबरोबर जोरदार party होते - कोणीतरी मी बहुदा मांसाहार करीत नाही त्याला हसतो ,काही प्रेमळ शब्दांची देवाण घेवाण होते , आणि मला कळते कि आतून ते मुंबईकरच आहेत .

मी एका ब्राह्मण मित्राकडून पुण्यात दारू प्याला शिकलो -- पण तो मित्र मुंबईचा होता !

हेमन्त् पन्त् , काय तर म्हणे सदाशिव पेठ बघायची आहे...

"काहीही न करता अंगातून येतो घाम अन् मग वाटतं लईच अंगमेहनत केली" असं वाटायला लावणार्ञा शहरात राहाण्या इतकं सोपं नसतय ते

शिवाय बीयरचा उल्लेख मद्य म्हणून केल्या बद्दल णिषेध

हेमन्त. आता बरोबर जातीवर उतरलात......
पोटशूळ इतका असह्य झाला होता तर आधीच स्पष्ट का बोलला नैत? उगाच सपे सपे कशाला करीत बसलात?

मुळात पुणेकर वेळेच्या हिशेबात चालतात हे एक मिथक आहे....:)

इथे वेळ पुणेकरांच्या हिशेबाने चालते...:)

तेव्हा तुमची तिसऱ्या जगातली गणिते इथे लाऊ नका. (पुणे सोडून सगळे जग हे तिसऱ्यातच मोजले जाते)

>>> मी एका ब्राह्मण मित्राकडून पुण्यात दारू प्याला शिकलो -- पण तो मित्र मुंबईचा होता ! <<<
हात्ततिच्या...दारूच काय विशेष?
जरी सपेकर स्वतः शेण खात नसले तरी तुम्ही यशस्वीपणे शेण कसे खावे यावरही छानसे लेक्चरयुक्त मार्गदर्शन सपेमधेच खात्रीने मिळू शकेल, किंवा दुसर्‍या शब्दात सान्गायचे तर शेण खाण्यास फक्त अन फक्त तुम्हीच कसे सुयोग्य आहात हे देखिल ते सिद्ध करू शकतील.
फक्त तिथल्या वेळा पाळा अन नेमक्या पत्यावर पोहोचा...
त्याशिवाय शेण स्वतःचे/घरचे/स्वतःच्या खर्चानेच आणा....! हे वेगळे सांगायला नकोच! नै का? Proud
सपेमधे "खायचे शेण" उपलब्ध होणार नाही.

धागा खूपच आवडला. निखळ करमणूक आहे. एक दोन प्रतिसाद सोडून बाकी सारे प्रतिसाद आवडले. विशेषतः आशूडी,झक्की,किकु. इतरांनीही छान भर घातली आहे. अ.आ.सुद्धा छान.

सदाशिव पेठेत प्रसिद्ध तुसडे पणाचा आणि उद्धट पणाचा अनुभव कसा घ्यावा ?

हा: हा: ! एकवेळ प्रचंड प्रदूषणामुळे श्वास घेणे कठिण होइल, पण हा अनुभव भरपूर प्रमाणात फुकट मिळेल. तुम्ही ताँड उघडा किंवा बंद ठेवा, काही करा किंवा करू नका.
फक्त आपण शेरास सव्वाशेर असल्याची झलक दाखवली तर जरा बरे वागतात.

सदाशिव पेठेत असली हत्यारे वापरत नाहीत. तिथे चालतात वा:ग्बाण आणि खलिते.
हे अत्यंत महत्वाचे.

पुणेकरांवर टिका खपवली जाणार नाही ,
एकेकाळी पुणे म्हणे मराठीचे माहेरघर, पुण्याचे मराठी लेखन, व्याकरण, उच्चार हे सगळे खरे मराठी बाकीचे नाही असे होते. आताशा काय, र्‍हस्व, दीर्घ, अनुच्चारित अनुस्वार इ. सर्व इतिहासात जमा.
तेंव्हा खुश्शाल टीका करा.

आहेत कुठे खरे पुणेकर पुण्यात? मी २००५ मधे पुण्यात गेलो होतो. माझ्या एका बाजूला शिंदे नि दुसरीकडे कुळकर्णी. यांच्या इतकी अस्सल मराठी नावे असलेले दोघे एकमेकांशी हिंदीत बोलत होते! हे कसले पुणेकर? यांनी फुक्कट जुन्या पुणेकरांच्या जीवावर गमजा कराव्यात!!

तेंव्हा सदाशिव पेठे ऐवजी न्यू जर्सीच्या मराठी विश्वात या. तिथे जुने पुणेकर खूप भेटतील.

Pages