डाळ ढेमसे/ ढेमशी

Submitted by टीना on 29 June, 2015 - 05:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. ढेमसे/ ढेमशी - १ पाव ( कोवळी असली तर फारच छान.. निब्बर असली तरी काही फरक पडत नाही बस कापताना त्यातल्या बिया काढून घ्याव्या )..
२. हरभर्‍याची डाळ/चनाडाळ - अर्धी वाटी पेक्षा जर्रा कमी .. १ तास भिजवलेली
३. तेल - ३ ते ४ पळी ( नेहमीच्या भाजीपेक्षा जरा सढळ हाताने घ्या ).
४. कांदा - १ बारिक चिरुन
५. हिरवी मिरची - २ मोठ्या बारिक चिरुन आणि पाऊण चमचा अद्रक लसणाची पेस्ट
६. टमाटे - १
७. फोडणीसाठी - हिंग, जिरं, मोहरी, गोडलिंबाची एक काडी
८. तिखट- २ ते अडिच टिस्पुन ( तुम्ही हव तर कमीसुद्धा घेऊ शकता पण हि भाजी जरा तिखटच हवी )
९. हळद , मिठ चवीनुसार
१०. चिंचेच एक बुटुक
११. गरम मसाला ( मी एव्हरेस्ट चिकन मसाला वापरते ) - अर्धा चमचा
१२. बारिक चिरलेला सांभार/कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. कढईत तेल तापल्यानंतर चिमुटभर हिंग, मोहरी फुटल्यानंतर जिरं आणि जिरं तडतडल्यावर गोडलिंबाची पान टाकावी..

२. बारिक चिरलेला कांदा टाकुन जरा मऊ झाल्यावर त्यात मिरची आणि लसुण अद्रकची पेस्ट टाकावी.

३.त्यात हळद, तिखट , मिठ टाकल्यावर टमाटं टाकुन मग भिजलेली हरभर्‍याची डाळ टाकावी.. जरा वेळ परतवल्यावर त्यात कापलेले ढेमस्याचे तुकडे टाकावे..

४. पाऊण वाटी प्यायच्या पाण्यात चिंचेच बुटुक टाकुन ठेवाव.. ते पाणी भाजीत टाकाव आणि झाकण ठेऊन पुर्ण पाणी आटेस्तोवर भाजी शिजु द्यावी..

५. भाजी शिजल्यावर सर्वात शेवटी गरम मसाला आणी सांभार टाकुन पटाकन झाकण ठेऊन द्याव आणि गॅस बंद करावा..
झाली भाजी तय्यार.. Happy

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना आरामात पुरतं..
अधिक टिपा: 

१. सर्व साहित्य लिहिलेल्या क्रमानेच कढईत टाकाव.

२. गरम मसाला आणि सांभार शेवटी टाकून झाकण ठेवल्याने आत असलेली वाफ त्या दोघांची चव आणि सुगंध भरपुर वेळ टिकवुन ठेवण्यासाठी मदत करतो.

३. चिंचेच बुटुक पाण्यात टाकुन ठेवल्याने ती चिंच जरा सुटी होऊन त्याची चव पुर्ण भाजीला पुरते.. डयरेक्ट बुटुक टाकाल तर ते भाजीच्या सोबत शिजेल पण त्याची चव हवी तशी भाजीत मिसळणार नाही .

४. कृपया गुळ्/साखर टाकू नये..भाजीची मजा चाल्ली जाते..

माहितीचा स्रोत: 
मीच ती..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सृष्टी , अगं अन्जु ला आधीच विपू केली मी या रेसेपीची ..
चिनुक्स, त्यात कसला आलाय धन्यवाद..खरतर ती भरल्या ढेमश्याच्या भाजीचा धागा बघुनच कळल कि इथ बर्‍याच जणांना ढेमस प्रकारच माहिती नाही..आणि डाळढेमस्याची भाजी पण नव्हती लिहिली कुणी म्हणुन हा प्रपंच.. Happy

मस्त! आज नविन पाकृंची भरमार! ढेमशी फारशी आवडत नाही. डाळ घालूनच करते पण आमची लई शिंपल असतीया..अशीकरून पाहीन फोटू?

स्निग्धा Lol .. लिवते थांब ..
बी, जास्त नै चवळीच्या शेंगा शिजायला लागतो तेवढाच वेळ.. ५ ते ७ मिंट..

सृष्टी टीनाने मला दिली विपुत रेसिपी Happy .

मस्त आहे चमचमीत, पण टोमाटो आणि चिंच मग थोडा कणभर तरी गुळ हवाच ग टीना आमच्याकडे.

चला आता डोक्यात २-३ प्रकार आहेत आणि जरा स्वतःचे डोकं पण वापरेन. मग नवऱ्याला विचारेन कोणत्या प्रकारे करू.

टीना धन्यवाद. ह्या प्रकारे ह्यावेळी जर नाही केली तरी पुढच्या वेळी नक्की करेन.

सांभार म्हणजे कोथिंबीर हे मागे टीव्हीवर कळलं. नागपूर साईडला सांभार म्हणतात बहुतेक. कुठेतरी बाकर पण म्हणतात कोथिंबीरीला.

टिने.. मला सांबार पौडर वाटली ना Lol
बरं झालं दिनेश ने क्लिअर केलंय खाली..
तू पण रेस्पीत करेक्शन करून टाक बरं.. Happy
रच्याकने सांभार या शब्दापुढे नेहमी केश असंच वाटत आलंय.. उसको तूने धक्का दिया हय!! Proud

कृती चांगली आहे. करून पहाण्यात येईल. Happy ढेमस्यांचे एक नाव दिलपसंद ही आहे. गुजराती लोकं टिंडा म्हणतात अन टिंडोरा म्हणजे आपली तोंडली. Happy

टिंडोरा म्हणजे आपली तोंडली >>> इतका आपलेपणा वाटलाच नाही कधी तोंडल्याबद्दल Biggrin

रेसीपी वाचून छान वाटते आहे. ढेमशी कधीच खाल्ली नाहीत पण आता आणून बघेन. इकडे सध्या सुकाळ आहे असल्या भाज्यांचा..ढेमशी, तोंडली, डांगर, दुधी, गिलके, दोडके हेच दिसते बाजारात Sad

स्नू, अग दोडक्याची भाजी पण डाळ घालून छानच लागते.. निव्वळ दोडके लिबलिबीत लागतात ना म्हणून डाळ घालून करायची..याच रेसिपी ने कर बस पाणी मात्र घालु नकोस Happy

कियोमी,
करुन बघ..त्यापेक्षा तुरडाळ वापर आणखी बर पडेल..मुगडाळीची मजा नै येणार ढेमस्याबरोबर...
बाकी आजुबाजुला एखाद दुकान नै का कामचलावू ? Wink

टीनाबाय, केली ढेमशी आज शेवटी.

मी गोडा मसाला, थोडासा गरम मसाला, चिंचेचा कोळ, ओले खोबरे, गुळ, आले लसूण मिरची ठेचा (किंचित)
तिखट, मीठ आणि दाण्याचं कुट किंवा दाणे घरात नव्हते म्हणून मी भाजलेले चणे होते त्याचं थोडं कुट केलं तेपण असं सर्व मिक्स करून पाणी घालून पातळ केला मसाला.

ढेमशी चिरली, साले काढली (दोन जून होती, बियापण काढल्या, दोन कोवळी होती त्याच्या बिया नाही काढल्या). थोडासा कच्चा तुकडा खाऊन बघितला, चव नाही आवडली ढेमशाची, सो दोन वांगी आणि एक बटाटा पण चिरला. (ढेमशी, वांगे, बटाटा भाजी).

सर्व धुतल्यावर भरपूर तेलाची फोडणी करून ह्या सर्व भाज्या परतल्या मध्ये झाकण ठेऊन जरा खरपूस, मग त्यात सर्व वरचा मसाला टाकला आणि रस्सा भाजी केली. चांगली झाली पण मला ढेमशी चवीला फार नाही आवडली. ते सांबार करतात त्यात काकडी असते तशी चव वाटली. एकदा डाळ घालून करेन.

अन्जू, थोडक्यात तु मिक्स व्हेज केली तर :D..
ढेमस्याची साले नसतात काढत अगं.. आणि तशीपन ती चवीला खुप छान असतात अस कुठ म्हटलय मी Wink
बाकी तिखट आणि गरम मसाल्यामुळे ढेमस्याची मुळ चव सप्रेस होते म्हणून म्हटल होत की साखर गुळ खोबर वगैरे घालायच नाही त्यात..

टीना जून होती ग. जून असल्यास साले काढावीत असं वाचलंय माबोवरच. अग तुला नाही ग काही म्हणत मी Happy .

आता एकदा डाळ घालून करेन. अगदी कांदा-टोमाटो न घालता करून बघेन फक्त ढेमशी कोवळी बघुन आणेन.

स्नू, दोडके मिळायला लागले तुमच्याकडे? मला तरी अजून गिलकेच दिसताहेत बाजारात. ते तर दोडक्यापेक्षा लिबलिबित. (दोडके आवडतात मला)
ढेमसे अजिबात आवडत नाहीत. पण हल्ली भाज्याच मिळत नसल्याने करावे लागणार आहेत. एकदा या प्रकारे करून बघेन.

टीना, आजुबाजूला दुकानं आहेत बरीच. पण सध्या घरात तूरडाळ, मुगडाळ, हिरवे मुग मटकी वगैरे बरंच काही पडून आहे. मग परत अजून चणाडाळ आणावी का विचार करत होते Wink याआधी एकदाच ढेमशी बनवलेली. कांदा, टोमेटो, डाळ काहीही न घालता. बरी होती चव. किंचीत आंबट...

अल्पना, इथे एक आठवडी बाजार लागतो त्यात भाजी अगदी ताजी मिळते तिथे बघितले दोडके. पण थोडे कमी काटेरी (?) वाटले. घेवून ठेवते तुझ्यासाठी ह्या शुक्रवारी.