जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी म्हणल ना की मेदे अन्जलीची सोय देवा मध्ये करनार म्हणजे करणारच.>>
रश्मी, ती तिथे राहायला येणार म्हटल्यावर पहिली आठवण तुझीच आली. Happy

फाटकी चड्डीवाला इज ब्यॅक...
येस्स तीच स्टोरी असणार मेदे त्यांच्या रेशीमगाठी जुळवून देणार.

मेदे त्यांच्या रेशीमगाठी जुळवून देणार.>>

सीरियल जुलै महिन्यात संपते आहे असे ऐकले.>>

हो., आदू मार्गाला लागला कि शिरेल संपवण्याला अर्थ पण येईल.

अर्चू परतलेय... बेफींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं असणार... Lol
समस्त देसाईवाडीकाअंच्या पुढाकाराने, अथक प्रयत्नांनी, कल्पक (???) क्लुप्त्यांनी फाच आणि अंजलीचे सूत जुळवून मग फाटकी चड्डी आणि अंजली यांचा लग्नसोहळा अनुभवून देसाईवाडी (व देवातील देवासारखी माणसे) तृप्त झाली की शिरेल संपेल (अशी आशा!!)

फाटकी चड्डी आणि अंजली यांचा लग्नसोहळा अनुभवून देसाईवाडी (व देवातील देवासारखी माणसे) तृप्त >>> बाबाजींचं पण नाव घाला यात. त्यांच्या जीवाचा घोर मिटेल एकदाचा Proud

बाबाजींचं पण नाव घाला यात. त्यांच्या जीवाचा घोर मिटेल एकदाचा >> अगदी अगदी Proud कित्ती ती जीवाला तकतक... जसं काही जगावेगळ्या मुलीचा जगावेगळा बाप!

ट्रेलरमध्ये "तुम्हाला आमचा शेवटचा फोन" वै. निर्वाणीचं का बोलत होते बाबाजी? एक्झिट होतेय की काय अँकीचं आगमन व्हायच्या आधीच?

रेशीमगाठींचा गुंता आता लवकर संपण्याच्या मार्गावर आहे असं या लेखात लिहिले आहे Happy

http://www.loksatta.com/lokprabha/article-about-marathi-serial-1112613/

एकदाचे ते देसाई , कुडाळकर आणि टीव्हीसमोरचे प्रेक्षक सगळेच सुटतील..

देसाई पकडून आणलेल्या लोकांच्या नस्त्या विवंचनेच्या जाचातून, कुडाळकर मंडळी "देसाई प्रवचनच्या" जाचातून आणि प्रेक्षक या सगळ्याच जाचातून सुटतील एकदाचे Proud

आदित्य नगरकर, बाबाजी कुडाळकर सगळी मंडळी देसाईवाडीत जमून काय तो एकदाचा निकाल लावतील Wink

बहुदा पेपरमध्ये हा लेख अजुन छापून आला नसावा आणि १९ तारखेच्या पेपरमध्ये छापला जाणारा लेख कदाचित ऑनलाईन आधी अपलोड केला असावा.
नाहीतर, लोकसत्तावाले झोपलेत!

हो १९. लिक झाली बातमी बहुतेक आधीच Lol

तरीच आता ललित नाटकात येणार आहे. कालच मटा मध्ये वाचलं त्याची हिर्वीन श्रेया बुगडे आहे नाटकात. मला एवढी आवडत नाही ती. कॉमेडी बरी करते पण गुजराथी आणि मराठी दोन्ही रंगभूमीवर काम करते असं वाचलंय मागे.

काल ती अंजलीची बहीणा देसायांकडे आली. पुढचे बघितले नाही म्हणून का आली कळले नाही पण असे अनोळखी घरी फोन न करता कोण जाते Uhoh तेही मुंबईत जिथे अंतर खूप जास्त असते आणि दिवसा घरात कोणी असेल याची खात्री नसते

ती अन्जली बद्दल काहीतरी सान्गत होती. प्रकरण नाजूक आहे वगैरे. पण माझ्या मुलीने तिचे तोन्ड बन्द केल्याने ( टिव्हीचा आवाज हळू ) मला ती काय बडबडते आहे याचा अन्दाज आला नाही.:अओ:

ती फाटक्या चड्डीबद्दल सान्गत होती का?

अगं ती सांगते की अंजलीचं लग्न तिने पाहून ठेवलेल्या मुलाशी लावण्यात देसायांनी मदत करावी. त्यालाही मुलगा वगैरे आहे. तर ती अंजली बहिणीचे हे दुसर्या लग्नाबद्दल बोलणे काही मनावर घेत नसते. म्हणून त्या बहिणीचा खटाटोप यांच्या घरी येऊन मदत मागायची.

लवकर आटपला बाजार तर बरच आहे.
अवांतर : श्रेया बुगडे चांगली थिएटर अभिनेत्री आहे. तिने लहानपणी वाटेवरती काचा गं या नाटकात अप्रतिम काम केलं होतं.

हो वाटेवरती काचा ग मध्ये बघितली आहे तिला (श्रेया बुगडे) पण मला नाही एवढा तिचा रोल आवडला, तोच रोल दुसरीने तिच्यापेक्षा छान केला जास्त. (दोन्ही टीव्हीवर पहिले). अर्थात हे माझं वै. मत.

तिची कॉमेडी चांगली असते. पण एका सिरियलमध्ये व्हिलनचा रोल तिला अजिबात जमला नव्हता. मला वाटतं असंभव मध्ये 'पीहू' चा रोल तिने केला होता.

हा, ती गुजराथी रंगभूमीवर पण फेमस आहे.

ह्या मालिकेत चित्रा होती (सायली देवधर) तिचा मराठी चित्रपट येतोय 'Blackboard'. कदाचित म्हणून तिचा रोल संपवला असेल तिथे, तिला वेळ नसेल.

काल-परवा केव्हातरी एक मोठ पोस्टर बघितल ज्यात आदे होता.. नवीन शिरेल येतेय वाट्ट टॅगलाईन आहे "नडला तर फोडला" अशी कैतरी. आदे टपोरी रोलमध्ये आहे आणि हिरवीणीबरोबर पंजा लडवण्याच्या पोझात बसलाय.

जाई ती एका सिरीयलमध्ये व्हिलन होती पण अजिबात नीट नाही केलं तिने, फार एकसुरी केलं. बऱ्याच जणांनी त्या channelच्या fb पेजवर टाकलं होतं की एकतर तिची भूमिका संपवा किंवा दुसरी व्हिलन आणा. करेक्ट होतं ते .

चला हवा येवु द्या पण तिचं बेयरिंग फारच लाऊड असत कुठल्याही कॅरॅक्टरमधे Sad पण गुणी अभिनेत्री आहे योग्य संधी मिळावी.

पण भाऊ कदम, कुशाल बद्रिके, सागर कारंडे या सगळ्यांना बरोबरीने साथ देते कुठेही कमी पडत नाही हे महत्वाचं. असो विषयांतराबद्दल माफ करा.

हो वाटेवरती काचा ग मध्ये बघितली आहे तिला (श्रेया बुगडे) पण मला नाही एवढा तिचा रोल आवडला, तोच रोल दुसरीने तिच्यापेक्षा छान केला जास्त. >> नाही पाहीला दुसरीने केलेला रोल. Happy

Pages