स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -१

Submitted by पुरंदरे शशांक on 8 June, 2015 - 06:20

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... Happy Wink भाग -१

नुकत्याच घेतलेल्या स्मार्टफोनवर एक अ‍ॅप आढळले - स्केच नावाचे. त्याच्याशी खेळताना लक्षात आले की हे पाटी पेन्सिलसारखे आहे. सेलचा स्क्रीन ही पाटी आणि आपले बोट ही पेन्सिल - वेगवेगळे रंग, खोडरबर(इरेजर) अशा गोष्टी सापडल्यावर माझ्या मनातले मूल जागे न झाले तरच नवल... Happy Wink

लहान मुलांना प्राणी - पक्षी यात सर्वात जास्त इंटरेस्ट असल्याने हे उंदीर, ससा मी नेहमीच कुठल्याही कागदावर काढत असतो - तेच पहिल्यांदा काढायचा प्रयत्न केला ...

rabbit1.JPGmouse.jpg

मग जरा हात (नाही, नाही बोट) बसल्यावर इतर काही काढायचा प्रयत्न केलाय ....

rabbit.jpgb w flower.JPGzendu.jpgbanana leaf.JPG

मात्र हे सारे रेखाटताना अनेक अडचणी आल्या - उदा. - पेन्सिलने रेखाटताना रेष कुठे सुरु होते, कुठे संपते ते लक्षात येते. इथे बोटाची जी बाजू स्क्रीनवर टेकते ती दिसतच नाही, त्यामुळे रेष कुठे सुरु होते हे कळतच नाही त्यामुळे अनेक गमती जमतीच होतात - हे सारे कसे टाळता येईल - कृपया कोणाला याचा अनुभव असल्यास मार्गदर्शन करणे.
मा बो वर अनेक दिग्गज चित्रकार, कलाकार असल्याने त्यांच्याकडून काही शिकता येईल असे वाटल्याने इथे देत आहे इतकेच .....

एखादे चित्र पुन्हा पुन्हा पाहून काढण्याकडे माझा कल असल्याने ही सर्व चित्रकला कोणालाही बाळबोध वाटणे अगदी सहाजिकच आहे .... Happy

face.jpgparijat.jpgrooster.JPGrooster1.JPG

गुढीपाडव्याच्या रात्री गुढी कशी दिसेल अशी कल्पना करुन हे एक चित्र ....

gudhi.jpg

या सर्व चित्रात काही त्रुटी आढळल्यास त्यात सुधारणा कशा करता येतील हे जरुर कळवणे ....

धन्यवाद ....
----------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/55316 - भाग २

http://www.maayboli.com/node/55420 - भाग ३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोंबडा, केळीचे पान सुरेख!

एखादे बोथट पेन/पेन्सील (ज्याने फोनच्या स्क्रीनवर ओरखडे येणार नाहीत) बोटाऐवजी वापरता येऊ शकेल. पूर्वीच्या एखाद्या मोबाईलचा स्टायलस असला तर...

माझाही हाच अनुभव आहे. स्टाइलसच्या शोधात.विंडोजवर PicsArt आहेच आणि Fantasia Painter Free हे एक अफलातून आहे ते डालो केलंय.एखाद्या फोटोवर बाणाने खुण करणे ,शब्दास अथवा फोटोतल्या चेहेर्याभोवती वर्तुळ करणे इत्यादी खरीच कामाची सोय आहे.
केळीचे पान मलाही आवडले.
कागदावरच्या रंगचित्रांत पांढरा(रंग) भाग दाखवणे /रंगवणे किचकट असते ते इथे अगदी सोप्पे आहे.
स्क्रिन (६इंच)मोठ्ठा तेवढी मज्जा वाढते.
पुर्वी एक खेळणीवाला टोपलीत खेळणी घेऊन फिरायचा. त्याच्याकडे गुजरातकडचे छोटे वायोलिनसारखे खेळणे असायचे त्याची आठवण आली--बाबा रमाडे बापु रमाडे --ओरडायचा-मुलगा खेळेल मुलाचा बाप खेळेल.

किती सुंदर स्केचेस! ससुल्या (दोन्ही), उंदिरमामा, केळीचं पान, कोंबडा ही स्केचेस अगदी जमलीच आहेत Happy
धन्यवाद या अ‍ॅपबद्दल सांगितल्याबद्दल, लेकाला दाखवते आता.

सर्वांचे मनापासून आभार....... Happy

एखादे बोथट पेन/पेन्सील (ज्याने फोनच्या स्क्रीनवर ओरखडे येणार नाहीत) बोटाऐवजी वापरता येऊ शकेल. पूर्वीच्या एखाद्या मोबाईलचा स्टायलस असला तर... >>>> या सोनी एक्सपेरियावर बोटाशिवाय काहीही वर्क होत नाहीये...

अँप बददल माहिती हवी होती ती द्यावी हि विनंती >>>> मी हा सेल फोन घेतला तेव्हा बिल्ट-इन अ‍ॅप होते हे - त्यामुळे हे कसे डाऊनलोड करायचे याची माहिती नाहीये ...

sketch.jpg

असे दिसते हे अ‍ॅप....

कागदावरच्या रंगचित्रांत पांढरा(रंग) भाग दाखवणे /रंगवणे किचकट असते ते इथे अगदी सोप्पे आहे.>>>> मला स्वतःला तरी हे फारच चॅलेंजिंग वाटले -(बोट बॉर्डरपर्यंत जाते का नाही ते कळतच नाही Happy ) ......

पण एकंदरीतच ज्याला चित्रकलेची आवड आहे त्याला हे अ‍ॅप वापरताना आवडेलच अशी आशा आहे ...
लहान मुलांना तर पाटीवर काहीतरी गिरगटून ठेवणे वा लगेच पुसणे हे फार आवडते - टाइम किलिंगकरता त्यांना हे मस्त वाटेल (अर्थातच काही वेळ... Happy ) जरा जाण असणारी मुले काही तरी क्रिएटिव करु शकतील असे वाटते ....

पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद ....

टूथ पिक उलट्या बाजुने वापरली तर जमेल का? >>>> नाही फक्त बोटाचाच वापर करावा लागतोय !!

किंवा मग करंगळी >>> करंगळीचा वापर करता येतो इथे, पण इंडेक्स फिंगरने जे जमते ते करंगळीने नाही जमत ना !!! सर्व प्रयत्न करुन झालेत माझ्याकडून तरी .... Happy पण खूप मजा येते याप्रकारे चित्र काढताना - एकदम चॅलेंजिंग प्रकार आहे हा .... Happy

" शशांक, काय जादू आहे तुमच्या बोटात. केळीचं पान सर्वात आवडलं." ....सहमत.
क्या बात है! खुपच छान. गुढी आणि कोंबडा पण मस्तं.