वर्षाविहार २०१५: संयोजक हवेत आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by webmaster on 26 May, 2015 - 23:18

यंदाचा (२०१५) वर्षाविहार हा आपला १३वा ववि आहे.. गेली १२ वर्ष उत्साहात साजर्‍या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कधीच वविला गेले नाहीये. खरतर कुठल्या गटगला पण गेले नाहीये. Sad पण ह्यावेळी वविला नकी येणार आहे. लेकीला घेऊन. Happy

पॅनोरॅमिक रिसॉर्ट>>> मस्त वाटतोय हा रिसॉर्ट.

रिव्हरगेट रिसाॅर्टला मी गेले आहे, २०१४ मधे. अॅम्बिअन्स खूप छान आहे, भरपूर एरिया आहे. हिरवळ असलेलं मोठं मैदान आहे. रहाण्याची सोय चांगली आहे. पण, वविसाठी त्याचा काय उपयोग? आम्ही गेलो होतो तेव्हा स्विमिंग पूल खूप खराब होता. त्यांना स्वच्छ करायला वारंवार सांगूनही काही फरक पडला नाही. आम्ही काॅर्पोरेट सहलीसाठी २५ कुटुंबे होतो.

एक कल्पना आहे. जे लोक दुसर्‍याच्या धाग्यावर जाऊन धागा बिघडवतात त्यांच्या हार तुरे देऊन सत्कार करावा. असे लोक कसे दिसतात हे ववि च्या निमीत्ताने इतरांना समजेल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख सर्वांनाच होईल.

ज्यांना दुसर्‍याचा सन्मान करता येत नाही. अर्वाच शिव्या देतात त्यांना मायबोलीश्री हा पुरस्कार देऊन सन्मान करावा. यासाठी माउअबोली ववि सारखे दुसरे व्यासपीठ नाही असे मला वाटते.

panaromic resort cha ullekh aala mhanun sangu icchite ki maze Mr tya company che Superior Field Officer aahet. So tya resort che charges 450/- per person hotil jar tyanchya kadun booking kele gele tar.
Tyat breakfast+tea/coffe, Lunch, evening High tea (snacks+tea/coffee), water rides (unlimited) included aahe.

Hyach company che dusre resort Lonavla ithe aahe. tikde pan same rate aahe.

Reply me in personal if interested.

<< ओ, ते मुंबईहून तब्बल ०५३० तास पडेल (२३० ते २५० किमी अंदाजे) >>

पुणेकरांनी आधी तिथे पोचायचं (अंतर अंदाजे १२० किमी) आणि मग सूळक्यावरून खाली दोर सोडायचा. मुंबईकर तो दोर चढून आरामात वर येऊ शकतील शॉर्टकटने.

मला नाही जमणार, आपले ते हे ओळख मागतात. (हिंट- बाबूराव कम बाबूभैया कम नि वागळे :@, :'(
तसही मीअमानवीय आहे.:-D

केवळ ओळख नाही म्हणून यायचं नाही असं कुणी करू नका.
त्या एका दिवसात इतक्या आणि अश्या ओळखी होतात, की आपण कुणालाच ओळखत नव्हतो हे संध्याकाळपर्यंत विसरून जाल Happy

सिंधुदुर्गात येणार का....
मुंबई पुण्याहुन एक रात्र प्रवास.... इथली व्यवस्था केलि जाईल....

कणकवली पासून घाट जवळ आहे...शिवाय तलावही.... नद्या... धबधबे... रात्री। पुन्हा माघारी...
वाद्य मेळ इथे आहे...

2/3 ट्रेन आहेत यायला...
थोड़ घाईच् आहे...लांब होईल

.. पण आमंत्रण आग्रहाचे आहे...

थोड़ी लालुच

www.maayboli.com/node/50147

Pages