मागिल गुरुवारी कंटाळा आला म्हणून ऑफिसला दांडी मारली. मिस्टरांना वेळ होता तसेच मुलीला, भाचे कंपनीला सुट्टी पडलेली. मग दिवस सार्थकी लावू म्हणून कुठेतरी फिरायला जायचा बेत आखत होतो. बेत करता करताच १ वाजला. रोज रोज आसपासची स्विमिंग पुल आणि गार्डन पाहून मुले कंटाळली होती मग म्हटल चला आज पनवेलला जाऊया आयुष रिसॉर्टला.
जेऊन निघता निघता ३ वाजले. गाडी घेतली आणि बच्चे कंपनी सकट आमची स्वारी आयुष रिसॉर्ट कडे वळली. गेट मधून आत गेलो. गुरुवार असल्याने गर्दी आजीबात नव्हती हे पाहून अजून समाधान झाल. मिस्टरांनी जाऊन आधी तिथले चार्जेस भरले. तस ते महागडच आहे. मला वाटत लहान मुलांचे २०० आणि मोठ्यांचे ३०० असा त्यांचा चार्ज आहे. त्या पैशात स्विमींग, आत फिरणे, पक्षी, प्राणि पहाणे हे होते. पण नाश्ता वगैरे लागला तर तो स्वतःच घ्यायचा होता वेगळे पैसे भरून. खरे तर लोकल रिसॉर्टला गेलो असतो तर आम्हाला फक्त स्विमींगचेच पैसे भरावे लागले असते त्यामुळे जरा खर्चिकच झाले हे पण तिथल्या निसर्गाने ही रक्कम भरून काढली. जर सकाळ पासून ह्या आयुष रिसॉर्ट मध्ये गेलो तर १००० रु. बुकींग करून नाश्ता, जेवण वगैरेची सोय होते.
बुकींग होताच मिस्टर, मुलेस्विमींगला पळाली. मी थोडावेळ बसले आणि कॅमेरा घेऊन फेरफटका मारायला गेले. तब्बल एक तास चालून खालील फोटो पटापट काढले.
१) हा आहे रिसॉर्ट मध्ये एन्ट्री केल्यावरचा निसर्गपुर्ण मार्ग.
२) इथून आत गेल्यावर बुकींग होते.
३) स्विमींग पुल अजिबात खोल नाही. ६-७ वर्षाच्या मुलांनाही चालू शकेल.
४) आतील पाणी स्वच्छ होते शिवाय आजुबाजूला झाडे असल्याने दुपारी चांगली सावली होती.
५) स्विमींग पुलच्या आधी मुलांच्या मनोरंजनासाठी छोटे गार्डन आहे.
७) इथले सगले झोपाळे टायरपासुन बनवलेले आहेत.
१०) स्विमींग पुलच्या पाठी एक ग्राऊंड आहे. त्याची ही एन्ट्री.
११) मैदानाभोवती असणारी कलाकुसर.
१४) आवारात असणार्या छोट्या रुम्स.
आतील देखावे
१६) स्विमींग पुल जवळील
१७) बोट हाऊस. ह्यात पाणी नाही.
आता जरा आतील वृक्ष संपदा पाहू. आत पुष्कळ प्रकारची झाडे आहेत.
२०) सीता अशोकची भरपूर झाडे आहेत.
३८) ही फळे कसली कोणाला माहीत आहेत का ? असतील तर प्लिज सांगा.
आता प्राणी आणि पक्षी पाहू.
४१) रशियन माकड. ह्याचा पिंजरा खुप छोटा आहे आणि जाळीदारही.
५५) एका ठिकाणी नारळाच्या झाडांमध्येच गच्ची बांधली आहे.
५८) रिसॉर्टच्या एका बाजूला मोठा महाल आहे. बहुतेक फायबरचा आहे. तिथे शुटींग तसेच समारंभ साजरे केले जातात.
वरील पैकी माहीत नसलेली बरीचशी नावे नि.ग. च्या निसर्गप्रेमींकडून साभार.
आयुष रिसॉर्टचा पत्ता:
Mumbai-Pune National Highway, (NH4)
Between Amol & raigad Petrol Pump, Village Shedung,
Panvel, Raigad 0 410 206, Maharashtra, India.
Tel : 02143 - 239185/86/87/88
जायचे असेल तर आधी फोन करुनच जा म्हणजे तिथले रेट, बुकींग, गर्दी ह्याबद्दल चौकशी करता येईल.
वा मस्त आहे प्रचि माहिती आणि
वा मस्त आहे प्रचि माहिती आणि रिसॉर्ट
छानच आहे रिसॉर्ट! धन्स गं
छानच आहे रिसॉर्ट! धन्स गं जागु
यंदाच्या देशवारीत जमतय का बघु तिथे जायला... रहायची पण सोय आहे ना?
मागिल गुरुवारी कंटाळा आला
मागिल गुरुवारी कंटाळा आला म्हणून ऑफिसला दांडी मारली. मिस्टरांना वेळ होता तसेच मुलीला, भाचे कंपनीला सुट्टी पडलेली. मग दिवस सार्थकी लावू म्हणून कुठेतरी फिरायला जायचा बेत आखत होतो.
>>>>>>>>>>>>>>
जागुतै, बॉस पण माबोकर आहे का
वाचेल वरचे लिहिलेले. 
रच्याक, ती मगर (खोटी) लिहिलेय...... साप (खोटा) नाही लिहिलेय


खरा वाटला ना
भुंगा बॉसीण आहे ती. तिच
भुंगा बॉसीण आहे ती. तिच दौर्यावर फिरत होती. :स्मितः
भुंग्या मग खर्या सापाला खोटा समजशील हा.
इनमिनतीन धन्स.
लाजो आहे ग इथे राहण्याची सोय.
व्वा छान वर्णन खासकरुन
व्वा छान वर्णन खासकरुन वृक्षवल्लींच आणि मस्त प्रकाशचित्रे...:स्मित:
प्र.चि. ५८ मध्ये दिसणारा महाल बर झाले लिहलय की तो 'कचाकड्याचा' आहे. तो क्षणभर तो खरोखरीचाच वाटलेला मला..!
जागूतै, सहीच, आमच्या
जागूतै, सहीच, आमच्या बच्चेकंपनीला कुठे न्यावे हा प्रश्न नेहेमी असतो, आता इकडे नक्की चक्कर मारणार.
>>१७) बोट हाऊस. ह्यात पाणी नाही.
पाणी बोटीत कसे असेल ? बोट पाण्यात असली पाहिजे
फारच सुंदर माहिती मिळाली.
फारच सुंदर माहिती मिळाली. फोटोही मनमोहक आहेत.
मस्त फोटो जागू रीसॉर्टही
मस्त फोटो जागू
रीसॉर्टही मस्तच.
माबो वविसाठी मस्त ठिकाण.
हो जिप्स्या माझ्या मनात तिथे
हो जिप्स्या माझ्या मनात तिथे गेले तेंव्हा हेच आल होत.
विजय, भरत धन्स.
महेश
तसेच म्हणायचे होते समजा.
38 क्रमांकामधल्या फोटोतले झाड
38 क्रमांकामधल्या फोटोतले झाड मोहाचे आहे.
ती मोहाची फळे आहेत....
सुरेख फोटो आणि लेख. प्र.चि.
सुरेख फोटो आणि लेख.
प्र.चि. ५८ मध्ये दिसणारा महाल बर झाले लिहलय की तो 'कचाकड्याचा' आहे. तो क्षणभर तो खरोखरीचाच वाटलेला मला..! >>>> मलाही.
.
.
निरू गुलजार धन्यवाद. देवकी
निरू गुलजार धन्यवाद.
देवकी
भारीये मस्त फोटो
भारीये
मस्त फोटो
ववी साठि ऊत्तम दिसतेय
ववी साठि ऊत्तम दिसतेय
(No subject)
सुंदर प्र ची माहिती हि छान
सुंदर प्र ची माहिती हि छान ...
Pages