ईस्ट युरोप - तयारी आणि बर्लिन १

Submitted by मोहन की मीरा on 30 May, 2015 - 13:14

एकदा जाण्याचे ठरवल्यावर मग मात्र ह्या विषयावर व देशांवर माहिती काढायला सुरुवात केली. सुरवात अर्थातच जर्मनी पासून केली. जर्मनी मध्ये सगळ्याच महत्वाच्या शहरांची दुसऱ्या महायुद्धात हानी झाली. पण त्यातही बर्लिन आणि ड्रेसडेन ची अपरिमित हानी झाली. बर्लिनचे तर नंतर लचके तोडले गेले. हिटलर स्वत: तिथे रहात असल्याने तसेच नाझीचे मुख्यालय इथेच असल्याने सहाजिकच इकडे सगळ्यात जास्त बॉंब वर्षाव झाला. त्यामुळे सुरुवात बर्लिन ने करायची ठरली. मग ड्रेस्डेन आणि मग इतर देश. साधारणत: माझा प्रवास असा झाला

बर्लिन- ड्रेस्डेन-प्राग-क्रेको-झाकोपाने-बुदापेष्ट-झाग्रेब-इस्त्रीया-लेक बोहींज –मुंबई

ह्यात बुदापेष्ट पर्यंतचा कार्येक्रम माझ्या मनातला होता पण झाग्रेब-इस्त्रीया (क्रोएशिया), लेक बोहींज (स्लोवानिया) हे मात्र अनुभव च्या मयुरेश ची पसंती होती. प्रवासाचे दिवस वाढतात म्हणून माझी जरा कुरकुर चालू होती. पण तिकडे गेलो नसतो तर एका अतिशय सुंदर अनुभवाला मुकलो असतो.

ह्यावर्षी जायचे कारण हे की नंतर पुढल्या वर्षी लेक १०वीत जात असल्याने आमची इच्छा असूनही तिच्या शाळेच्या मनात नसल्याने आम्हाला कुठे जाता येणार नाही. लेकीला (वय १३ पूर्ण) घेवून जाताना मनात जरा भीती होती. की तिकडे फक्त बघायचे आहे. म्हटलं तर भिंत म्हटलं तर कायमचा दुरावा- हा नजरिया असल्याने ती हे सगळ कसे अनुभवेल हा प्रश्न होता. बरं बर्फ नाही, डिस्ने पार्क नाही, तिला माहित असलेली कोणतीही गोष्ट नाही!!! त्या मुळे जरा धाकधुकीत मोबाईल वर अनेक गेम, पेन ड्राईव्ह वर अनेक सिनेमे, अशी जय्यत तयारी केली. तिची पूर्व तयारी म्हणून तिला डायरी ऑफ आन फ्रांक वाचायला दिले. तिची आवडीची दोन-चार पुस्तके बरोबर घेतली. पण सगळ्यात जास्त तिने मला सरप्राईज केले!!!! तिला ह्या सगळ्या गोष्टीची गरजच नाही लागली. एकदाही गेम वा सिनेमा पहिला गेला नाही. पुस्तकं वाचणे हे श्वासा सारखे असल्याने ती मात्र सगळी वाचून झाली. पण एकाही क्षणी तिने आई कंटाळा आला हे शब्द काढले नाहीत. हॉटेलातल्या टी.व्हि. ला तर हात लावला नाही. माझा व नवर्याचा मोबाईल मुद्दामूनच रोमिंग ठेवला नाही. वेगळच कार्ड घेतलं. नो disturbance !!!!!

तयारी तर जय्यत होती. आता वेळ आली व्हिसा ची. इस्ट युरोप मध्ये शांगेन व्हिसा चालतो. पण क्रोएशिया एक वर्षांपूर्वी च युरोपियन युनियन मध्ये आली आहे. त्या मुले तिकडे शागेन चालत नाही. पण शांगेन असेल आणि कोएशियाहुन शांगेन देशात प्रवेश असेल तर त्यांचा वेगळा व्हिसा काढावा लागत नाही. त्यामुळेच स्लोवेनिया शेवटी ठेवले.

नंतर चा प्रश्न होता तो चलनाचा!!!! ह्या ने मात्र फारच दमवलं. युरो फक्त जर्मनी आणि स्लोव्हेनियात चालतात. बरं आम्ही बरीचशी कंट्री साईड फिरणार असल्याने त्यात्या देशाचे चलन बाळगणे आले. परत बाकी तुम्ही वेळ आली तर क्रेडीट कार्डाने निभावून नेवू शकता पण जेवण व जागोजागी लागणार्या शौचालयासाठी मात्र जवळ त्या त्या चलनाची मोड अनिवार्य झाली. आपल्या कडे त्यांचे चलन नसेल तर युरो घ्यायचे पण अव्वाच्या सव्वा भाव लावून.
ह्यातल्या झेक, पोलंड, हंगेरी, स्लोव्हेनिया हे देश रशियन अधिपात्याखालुन निघाल्यावर युरोपियन युनियन मध्ये सामील झाल्या, पण त्यातही अनेक स्लेश राहिले. पोलंड व झेक युरोपियन युनियन व शांगेन दोन्हीत आहे. पण युरो झोन व बाय्लॅटरल मध्ये नाही. हंगेरी शांगेन मध्ये आहे पण युरो झोन मध्ये नाही. स्लोव्हेनिया सगळ्यात आहे. क्रोएशिया काशातच नव्हत. यायचा प्रयत्न करत आहे. आपापसात त्याच्यात खूप भांडणे आहेत. क्रोएशीया व स्लोव्हेनिया पूर्वी युगोस्लाव्हीयाचा भाग होते. पण ते जेंव्हा वेगळे झाले त्या वेळेस स्लोव्हेनियाने लागेचः युरोपियन युनियन मध्ये प्रवेश केला. युरोपियन युनियन च्या प्रवेशा साठी इतर सगळ्या सभासदांची संमती लागते. क्रोएशिया स्वत:ला स्लोव्हेनिया पेक्षा फारच ग्रेट समजतो. त्यामुळे त्यांच्यात विस्तव जात नाही. पण जेंव्हा क्रोएशियाने युरोपियन युनियन मध्ये भाग घ्यायचे ठरवले तेंव्हा मोठ्ठा विरोध स्लोव्हेनियाने ८ वर्ष केला. त्यांचा सीमाप्रश्नाचा वाद फार जुना आहे. ह्या सगळ्या कंट्री स्वत:च्या अस्तित्वा साठी लढताहेत. त्यांना लौकरात लौकर युरोपियन हा शिक्का हवा आहे. एकदाका युरोपियन युनियन मध्ये आले, की विकास कामांकरिता त्यांना निधी मिळतो. ज्याचा उत्तम उपयोग हंगेरीने केला आहे. इकडच्या भागात पर्यटन व बेसिक उद्योग सोडून फारशी प्रगती नाही. इकडे कोणी गुंतवणूक करू इच्छित नाही.

सणसणीत अपवाद खणखणीत जर्मनीचा. ती एकमेव इकोनोमी अशी आहे जी आजही युरोप मध्ये आपले पाय घट्ट रोवून उभी आहे. त्यांच्या जिद्दीला दाद द्यावीशी वाटते. हिटलर कसाही असला तरी त्याचे शब्द आज खरे झाले आहेत की “ युद्धा नंतर अमेरिका व रशिया या दोन महासत्ता बनतील. इंग्लंड व फ्रांस ला कोणी विचारणार नाही. युरोप मध्ये कोणताही निर्णय घेताना अमेरिकेला जर्मनीचाच आधार घ्यावा लागेल.” ह्याचे प्रत्यंतर आपल्याला येतेच आहे. ज्या ड्रेस्डेन वर अपरिमित हल्ला करून एकुण एक ६५००० नागरीकांचा मृत्यू झाला, त्या ड्रेस्डेन च्या राजवाड्यात बराक ओबामा दोन दिवस राहून लोकांशी संवाद साधून गेला !!!!!

टर्किश एअर लाईन ची निवड करण्यामागे फक्त सोय हाच मुद्दा होता. कारण फक्त तेच आम्हाला परतीच्या ठिकाणा हून आमच्या वेळेत आणणारे फक्त तेच होते. येताना आम्ही स्लोव्हेनियाची राजधानी लुबानिया हून येणार होतो. ( ह्या शहराचं नावही मी ह्या ट्रीप मध्ये पहिल्यांदा ऐकलं. )

जर्मनी ने आम्ही सहलीची सुरुवात केली. साधारणत: मुख्य शहरातील हॉटेल निवडण्यावर आमचा भर असतो. त्यामुळे आपल्याला शहरात फिरता येते आणि मला स्वत:ला शहराचा किंवा गावाचा फील त्याच्या गाभ्यात राहून घ्यायला फार आवडते. जरा पैसे जास्त पडतात पण इतरही फायदे होतात.

बर्लिन ला आम्ही postdamer platz ह्या मुख्य चौकामधील हॉटेल घेतले होते. हॉटेल चा परिसर खूप महत्वाच्या ठिकाणी व रेल्वे स्टेशनच्या जवळच होता. पाहिल्यादिवाशीच आम्हाला एक सुवार्ता कळली की जर्मन संसद ज्याला राईशताग म्हणतात, ते पहाण्याची अपॉईंटमेंट मिळाली होती. हॉटेल मध्ये आल्यावर दीड तासातच आम्ही सुप्रसिध्ध इमारतीच्या दारात होतो. इकडेच नाझी सरकार मध्ये अनेक जीवघेणे निर्णय घेतले गेले. हिटलर ची प्रसिध्द भाषणे ही ह्या सभागृहाने ऐकली. प्रत्यक्षात ते अतिशय साधे सभागृह आहे. अगदीच साधे. पण इमारतीचा डोम मात्र सुरेख आहे. आणि हो तिकडे वरून सफर करायचीही सोय आहे. खूपच छान नजारा होता.

8 Reischtag Berlin3.JPG

बुलंद इमारत

IMG_0062_0.JPG

जर्मन फ्लॅग ज्याचा त्या लोकांना प्रचंड अभिमान आहे. हा फोटो डोम च्या गच्ची मधुन काढला आहे

23 Reischtag Berlin20.JPG

हे त्यांच्या प्रेसिडेंट चे निवासस्थान व ऑफिस

44 Berlin sight seeing5.JPG

आर्थात त्यांच्या प्रेसिडेंट्ला राजकारणात फारसे महत्व नाही. त्यांच्या चांन्सलर अ‍ॅन्जेला मॉरकल ह्या अतिषय डायनॅमिक आहेत. सगळे महत्व त्यांना आहे. आश्चर्य म्हणजे त्या कोणत्याही सीक्युरिटी शिवाय दूसर्‍या दिवशी रस्त्याने राईश्टॅग समोरुन जाताना दिसल्या. त्यांनी सरकारी निवासस्थान घेतलेले नाही. त्या आपल्या स्वतःच्याच फ्लॅट मधे रहातात.

राईश्टॅग बघुन खुप आश्चर्य वाटलं. येवढी महत्वाची इमारत पण फारसे सीक्युरीटीचे अवदंबर नाही. पण शिस्त आणि टापटीप वाखाणण्या जोगी. आजुबाजुला प्रचंड हिरवाई. गाईड ने सांगितलं की दूसरे महायुद्ध जेंव्हा संपले तेंव्हा बर्लीन मधे एकही झाड चांगल्या अवस्थेत शिल्लक नव्हते. तेच बर्लीन आज मात्र आपल्या अंगावर भरपूर हिरवाई अभिमानने मिरवते आहे.

13 Reischtag Berlin8.JPG

पुढिल भाग

भाग २- http://www.maayboli.com/node/54109

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा सॉलीड हेवा वाटतोय. विशेषत नुसता पर्यटकाच्या नजरेतून बघण्यापेक्षा इतिहासाच्या खुणा बघण्यासाठीचा तुमचा प्रवास काबीले तारीफ आहे....

जितके तपशीलवार लिहीता येईल तितके लिहा. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे

गाईड ने सांगितलं की दूसरे महायुद्ध जेंव्हा संपले तेंव्हा बर्लीन मधे एकही झाड चांगल्या अवस्थेत शिल्लक नव्हते. तेच बर्लीन आज मात्र आपल्या अंगावर भरपूर हिरवाई अभिमानने मिरवते आहे. >>

हे फारच आवडलं. मस्त लिहित आहात. पुढील भागाची वाट बघते.

वा, फक्त इतिहासासाठी या देशातून फिरणारे विरळाच.

काही संदर्भांबाबतः
तुम्ही भेट दिलेले सर्व देश - क्रोयेशिया वगळता - युरोपियन युनिअनमध्ये गेले अनेक वर्ष आहेत. तसेच शेन्गेन करारात देखील किमान ५ वर्षे झाले आहेत. जर इतर कुठल्या शेन्गेन राष्ट्राचे रेसिडेंट कार्ड असेल तर आता क्रोयेशियात जायला मिळते. २०१३च्या मध्यापर्यंत मात्र क्रोयेशियाचा विसा लागत असेल भारतीयांना. मी हंगेरीत राहयचो तिथून वेनिसला (इटली) जाण्यासाठी ओवरनाईट ट्रेन होती मात्र ती झाग्रेब (क्रोयेशिया) मार्गे जात असल्याने जाता आले नाही. तसेच स्लोवेनियात दक्षिणेला जायलादेखील झाग्रेबमार्गे सोयीचे होते मात्र तसेही जाता आले नाही.

क्रोयेशियाला युरोपियन युनिअनमध्ये येण्यास केवळ स्लोवेनियाचा विरोध इतकेच कारण नाहिये. अनेक पदर आहेत. युगोस्लाविया फुटल्यावर सर्बिया, क्रोयेशिया, बोस्निया-हर्जगोवेनिया, स्लोवेनिया, मॅसेदोनिया, माँटेनेग्रो, कोसोवो आणि वोय्वोदिन्या अशी राष्ट्रे जन्माला आली. यातल्या सर्बिया आणि काही प्रमाणात क्रोएशियाने मुजोरी करून खूप युद्ध-माजोरी केली. त्याचे पडसाद अजून त्यांना सामिल करवून घेण्यात आडवे येतात. तसेच ही सर्व फूट धार्मिक-वांशिक फुटींवर झाली आहे. युरोपियन युनिअन अजूनही पश्चिमी युरोपची पकड आहे. त्यांना ऑर्थोडोक्स ख्रिश्चन व स्लाव राष्ट्रे सामावून घेण्यात फारसा इण्टरेस्ट नव्हता. मात्र आता रशियाला टक्कर द्यायला तिथे बरेच बदल घडतील. मागल्या वर्षी रोमेनिया-बल्गेरिया आत आले.

तुम्ही बोहिन्ज तळ्यास गेला हे वाचून भरून आले. लेक ब्लेड व बोहिन्ज ही अतीव सुंदर दोन स्थळे आहेत.

आमच्या बुडापेश्टाबद्दल वाचण्यास अत्यंत उत्सुक.

मोकिमी फार सुंदर सुरुवात..

तुझ्या मुळे या स्थळांच्या इतिहासात डोकावण्याची संधी मिळणारे आम्हाला.. Happy

अरेवा!! सकाळी सकाळी तुम्हा लोकांच्या प्रतिक्रिया वाचुन मस्त वाट्लं....आणि हो हुरुपही आला.

टण्या... ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.... असेच नवे नवे मुद्दे येत रहिले तर लिखाण जास्त परिपूर्ण होइल.

मस्तच सुरुवात. प्रवासाच्या टिप्स जशा लिहील्या आहात त्यात अजून भर घालत रहा आणि येऊ द्या पटापट पुढचे भाग.

Chaan lekhn, aani phoTo.

puDhil lekhnala subeChaa!!