माहिती हवी आहे - राजस्थान, पंजाब भटकंती.

Submitted by मनोज. on 19 May, 2015 - 08:04

नमस्कार मंडळी..

जुलैचा दुसरा आठवडा ते ऑगस्ट या दरम्यान कधीतरी ९-१० दिवस सुट्टी घेवून अमृतसर भटकण्याचा विचार सुरू आहे.

सध्या ठरलेला आराखडा म्हणजे पुण्यातून अमृतसर पर्यंतचा रस्ता दुचाकीने पार करणे व जालीयनवाला बाग, वाघा बॉर्डर*, सुवर्ण मंदिर तसेच राजस्थानातील वाटेत असणार्‍या ठिकाणांना भेटी देणे इतकाच आहे.

एकूण ३ दुचाकींवर ३ जण जाण्याचे ठरवत आहोत. पुणे - अमृतसर - पुणे असा साधारणपणे ४००० किमीचा संपूर्ण प्रवास दुचाकीनेच होणार आहे. साधारणपणे ६ दिवस संपूर्ण प्रवासात जातील व ४ दिवस अमृतसर व वाटेतली ठिकाणे बघण्याचे ठरवत आहोत. राखीव दिवसही गृहीत धरले आहेत.

...तर या संदर्भात पुढील माहिती हवी आहे,

१) पुणे - अहमदाबाद - अमृतसर या रस्त्यावरून जाताना व येताना प्रवास होणार आहे.
अहमदाबाद नंतर जोधपूर मार्गे किंवा उदयपूर मार्गे असे दोन रस्ते दिसत आहेत. पुढेही वेगवेगळे रस्ते अमृतसर ला पोहोचत आहेत. यांपैकी कोणत्या रस्त्याने जावे..?

२) "पुणे ते अमृतसर - ३ दिवसात..!" असे काही ठरवले नाहीये. एखादा दिवस गुजरातमध्ये, एखादा राजस्थानमध्ये वाढला तरी हरकत नाहीये. त्यामुळे नेहमीची टूरीस्टछाप ठिकाणे टाळून एखाद्या वेगळ्या ठिकाणाची माहिती असल्यास अवश्य कळवावे.

३) या सफरी दरम्यान कोणती ठिकाणे आवर्जून पहावीत..?

४) खादाडी हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. अहमदाबाद, जोधपूर, उदयपूर आणि एकंदर पंजाबमध्ये विशेष अशी काय खादाडी करता येईल?

५) आणखी काही सुचना..?

**********************************************************
*वाघा बॉर्डरवर वेडेपणा सुरू असतो / तमाशा असतो वगैरे माहिती पूर्वी वाचली आहे - तरीही भेट द्यायची आहे.
**********************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

July madhe north Indiat weather titakas changal nasat. Khup humidity cha samna karava lagto. Ikadcha paus dekhil maharashtratlya pavasasarakha alhaddayak nasato. Tya drushtine tayarit ya. Tumachya pravasathi shubheccha. Khadadi baddal lavkarch lihite.

माझ्या मते सप्टेंबर योग्य होईल.१७ तारखेस गणपती आहेत .राजस्थानातल्या शहरांत गणेशोत्सव सार्वजनिक असतात अबू ,कोटा,उदयपुर जयपूर इ.शिवाय थंडावा येतो. तलाव भरलेले असतात. जयपूरच्या उत्तरेचा शेखावटी भाग हवेलींसाठी चांगला आहे आणि इकडे कमी लोक जातात.उदयपुरात मेवाड मोटर्सच्या गल्लितली जैन धर्मशाळा रु पाचशे एसि आणि अडिचशे साधी रूम विचार करण्यासारखी आहे.कोटा येथे मराठी लोक बरेच आहेत. जवळचे बुंदी अवश्य पाहा।कोटा-बुंदी-झालावाड कोणी टुअरवाले दाखवत नाहीत .

तुमचं डेस्टिनेशन राजस्थान आणि पंजाब आहे पण गुजरात मधल्या जागांबद्दल विचारलंत म्हणून एका जागे बद्दल लिहीत आहे .. मी खूप वर्षांपुर्वी गेले होते तेव्हा हा रिसेन्ट अनुभव नाही .. पण बडोद्यापासून काही अंतरावर (तास- दोन तास?) एक पावागड म्हणून जागा आहे ..

डोंगरावर चढून एक मंदीर आहे .. आम्ही पावसाळ्यात गेलो होतो .. फार मस्त जागा होती आणि पावसाळी वातावरण .. सुंदर अनुभव ..

तेव्हा हे अगदी विरुध्द दिशेला नसेल, इच्छा असेल तर जरूर जा ..