Submitted by विदेश on 13 May, 2015 - 00:56
(चाल- नसतेस घरी तू जेव्हा-)
खातेस घरी तू जेव्हा
जीव घाबराघुबरा होतो
उरण्याचे होती वांधे
पोटात गोळा का येतो ..
डिश फुटून खाली पडावी
का तोल मना बिघडवतो
तोबरा मनी हीन वाटे
अन खंत वाटता रडतो ..
येतात पाहुणे घराशी
धुसफुसून सरती मागे
चिडकीशी गाठच आता
तव फंडा आठवत जातो ..
तव हालचाली बोकण्याच्या
मज डसती हजार वेळा
जीव जाई तरी हादडावे
मी बघ्याच नुसता उरतो ..
तू लांब राहशिल काय
सोडूनच या घरदारा
सगळ्यांचा जीव भकास
माझ्यासह उपास घडतो ..
ना अजून झालो तगडा
का दुष्काळातुनी आलो
तुज पाहुन समजत जाते
खाण्यास जन्म हा घडतो !
.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
निलुदा .. प्रतिसादासाठी आभार
निलुदा ..
प्रतिसादासाठी आभार !
असं खरंच असेल तर कठिण आहे
असं खरंच असेल तर कठिण आहे !
विडंबन झक्कास!
के अंजली -- प्रतिसादासाठी
के अंजली --
प्रतिसादासाठी आभार !
मज्जा
मज्जा
मस्तच विडंबन!
मस्तच विडंबन!
भारती, Nidhii
भारती,
Nidhii ...
प्रतिसादाबद्दल आभार .
छान
छान
किरण कुमार , प्रतिसादाबद्द्ल
किरण कुमार ,
प्रतिसादाबद्द्ल आभार !