भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळावे का?

Submitted by चौकट राजा on 12 May, 2015 - 09:36

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मालिका व्हावी म्हणून बरेच प्रयत्न करत आहेत असे वाचले. खालील बातमीमधे लिहिले आहे त्याप्रमाणे, त्यांनी त्यासाठी ढाका - कोलकाता प्रवास केला, त्यादम्यान पोलीसांनी पकडल्यावरही त्याबद्दल काही न बोलता दालमियांचे कौतुक केले इत्यादी.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5120885376480359052&Se...संपादकीय&NewsDate=20150512&Provider=-&NewsTitle=पाकिस्तानचा ‘न्योता’

एकूणात पाकिस्तान क्रिकेटला अतिशय हालाखीचे दिवस आले आहेत. गेल्या ६ वर्षात पाकिस्तानात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. आणि तिथे खेळायला कोणी उत्सुकही नाही. गेली अनेक वर्षे पाकिस्तानने दहशतवादाला पोसल्याचे हे फळ त्यांना मिळाले आहे. (बाकि तिथल्या सामाजिक परिस्थितीबद्दल तर काय बोलायचे? पण धाग्याच्या विषय क्रिकेट असल्यामुळे त्याबद्दल इथे लिहित नाही)

क्रिकेटच्या जगात सद्ध्या सोन्याचे अंडे देणार्‍या दोन कोंबड्या आहेत. त्यातली एक म्हणजे आय पी एल. ज्यात आपण जगभरच्या खेळाडूंना मधे घेतो पण पाकिस्तानी खेळाडुंना नाही. आणि दुसरी म्हणजे भारताशी एकदिवसीय सामने खेळणे! तेही आपण टाळत आलो आहोत. त्यामुळे पाकिस्तान दुबई मधे हे सामने खेळले जावे म्हणून प्रयत्न करत आहे.

तेव्हा प्रश्न असा कि भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळावे का?

मतप्रवाह १ - क्रिकेट (खेळ) / संगीत, चित्रपट इ. कला ह्यांना राजकारणाचे बंधन नसावे. दोन देशांमधील संबंध वाढवण्यास, सुधारण्यास त्यांचा वपर केला जावा. तेव्हा पाकिस्तानशी कितीही राजनैतिक वैर असले तरी क्रिकेट खेळण्यास हरकत नाही.

मतप्रवाह २ - पाकिस्तानने आजवर पोसलेला दहशतवाद आणि दाऊदसारख्या भारतातील माफियांमर्फत केलेली कृष्ण्कृत्ये ह्यांच्यामुळे अनेक निरपराध लोकांचा जीव गेला आहे व अनेक लोकांच्या आयुष्याचे नुकसान झाले आहे. तेव्हा त्या देशाशी क्रिकेट खेळून त्यांचीच धन करणे अयोग्य आहे.

वरीलपैकी मी दुसर्‍या मतप्रवाहाचे समर्थन करतो आणि बीसीसीआय ने पैशाच्या लोभापोटी असे सामने आयोजित केले तरी भारतीय खेळाडुंनी अशा दौर्‍यावर जाण्यास / खेळण्यास असमर्थता दाखवावी असेही मला वाटते. अर्थात त्यात वर्ल्ड कप सामन्यांना समावेश करता येणार नाही कारण ती स्पर्धा जगातील सर्व संघात खेळली जाते व ४ वर्षातुन एकदा होते.

हे माझे मत आहे पण माबो वरील इतरांची मते, विचार जाणुन घेण्यास आवडेल म्हणुन हा धागा.

__________________________________________________

टीप - ह्याच्याशी मोदी सरकार, राहुल गांधी वगैरेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्या विषयावर घसरणार्‍या प्रतिसादांकडे इतरांनी दुर्लक्ष करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या मतप्रवाह २ शी सहमत!
पाकिस्थान बरोबर, बीसीसीआयच्या टिमने अजिबात क्रिकेट खेळु नये. इतकच काय पण सीमेवरिल घुसखोरी व हिंदुस्थानातील अंतर्गत दहशतवाद पाकडे जोपर्यंत थांबवत नाहीत, तोपर्यंत इतरही सांस्कृतिक/राजकिय संबध हिंदुस्थानाने तोडुन टाकावेत.

टीप - ह्याच्याशी मोदी सरकार, राहुल गांधी वगैरेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्या विषयावर घसरणार्‍या प्रतिसादांकडे इतरांनी दुर्लक्ष करावे.>>>>> आणी शाहरुख, सलमान व गर्लफ्रेन्ड पण नको.

माझे ठाम मत आहे की पाकड्यान्शी क्रिकेट नकोच. कुणीही उठाव आणी भारतात दहशतवाद माजवुन पोखरुन टाकाव, मग तो कसाब असो वा सईद, याचा अतीशय सन्ताप आलाय. बास झाल. आता काट्यानेच काटा काढलेला बरा.

टीप - ह्याच्याशी मोदी सरकार, राहुल गांधी वगैरेचा काहीही संबंध नाही. > काय सांगता ? Uhoh ऐकावे ते नवलचं
रच्याकने अनुराग ठाकूर हे बीसीसीआयचे सेक्रेटरी आहे.
http://sports.ndtv.com/cricket/news/241970-india-may-host-pakistan-at-ho...
If everything goes to plan, India and Pakistan could resume their bilateral cricketing relations by the end of this year. A full-fledged tour could in fact even be hosted by India or a third country, Board of Control for Cricket in India (BCCI) secretary Anurag Thakur said on Monday.

बाकी माझे मत म्हणाल तर क्रिकेट काय तर एकही खेळ त्यांच्याबरोबर खेळू नये. महत्त्वाच्या स्पर्धा असतील तर खेळावे त्यातही आपल्याला त्यांना बाय देता येत असेल तर नक्की द्यावा.

विजय आंग्रे, सहमत!

उलट ही क्रिकेट मालिका खेळवण्यापुर्वी भारताने, पाकिस्तान समोर एक अट ठेवली पाहीजे. जर पाकिस्तान, 'दाऊद इब्राहीम' आणि इतर अतिरेकी भारताच्या हवाली करेल, तरच भारत हे सामने खेळेल म्हणुन.

पाकिस्तानशी क्रिकेट किंवा कोणताही खेळ न खेळल्याने साध्य काय होणार आहे?
त्यांच्या आर्थिक नाड्या आवळणे.?

वर एका प्रतिसादात लिहिले गेलेय,
"पाकिस्तानला होणारी भारतातील सर्वाधिक निर्यात गुज्रातेतुन होते. तीही बंद करावी ."

यातील गुजरात हे मुद्दाम मोदींना हाणलेला टोमणा असू शकतो, असला तरी त्यात गैर काही नाही. पण जर हे असे असेल तर याचा अर्थ पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळाव्यात असा आपला सरकारचाही काही हेतू नाहीये.

तर मग हे भावनांचे राजकारण कशाला? आजवर याचा फायदा दोन्ही कडचे राज्यकर्तेच उचलत आलेत. मग ते कोणत्याही पक्षाचे असो..

पाकिस्तान ही एक समस्या नाहीयेच मुळात असे नाहीये.. पण त्याचा नेहमी बागुलबोवा बनवून देशातील इतर समस्यांकडे जनतेचे लक्ष कसे जाणार नाही हेच बघितले जाते..

आणि ते क्रिकेटचे धोरणही किती दुटप्पी आहे..

शाहरूखखानने (क्षमस्व, शाहरूख येतोच आहे धाग्यात) पाकिस्तानी प्लेअर आयपीएलमध्ये खेळवा म्हणताच त्याच्या सिनेमांवर बंदी घालायचे फार मोठे समाजहिताचे कार्य काही जणांनी केले.

पण तेच वासिम अक्रम, रमीझ राजा, शोएब अखतर, वकार युनूस, मुश्ताक अहमद हे लोक्स कोच किंवा कॉमेंटेटर म्हणून दिसतातच ना. ते देखील पैस्सेच कमावतात, फुकट नाही करत हे.

चौकट राजा,

मी तुमच्या क्रमांक दोनच्या मताशी सहमत आहे. पाकिस्तान एक देश म्हणून भारताचा शत्रू आहे. शत्रूच्या उद्योगव्यवसायास भरभराट आणावयाची भारताला गरज नाही.

गुजरातेतून होणाऱ्या निर्यातीमुळे भारताचा जसा फायदा होतो तसा फायदा पाकिस्तानी संघाशी क्रिकेट खेळून होणार नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

माझे मत एक ला आहे. कारण पाकीस्तानशी आयात- निर्यात चालु आहे, बस , दोन ट्रेन सेवा चालु आहे. लोक दोन्ही देशात ये -जा करु शकता, बाकीचे देश त्याचाशी खेळतात आणी आपला त्या गोष्टीला विरोध नाही, त्याचे समालोचक, प्रशिक्षक चालतात, तर मग मॅच का नाही?
पण जर मॅच खेळायच्या असतिल तर त्या भारतात ,, उगाच ह्या मॅच चे पैसे तिसर्या देशाला का म्हणुन द्यायचे? IPL मध्ये पण पाक खेळाडुना खेळू द्यावे पण पाकिस्ताननी खेळाचे हक्क घ्यावेत. २०-२५ कोटी खेळाडुना दिले जातिल पण त्याचाकडुन शेकडो कोटी रुपये TV rights विकुन येतिल आणि भारताचा फायदा होईल. ह्यामुळे दहशत वादामध्ये चाललेला वेळ आणि पैसा पण कमी होईल.

जर बंद करायचे असेल तर सगळेच बंद करावे जसे १९९० च्या आधी दक्षिण अफ्रिकेशी केले होते. त्या काळात भारतियाना भारत सरकार कडुन द. अफ्रिकेला जायला बंदी होती आणि तसे पासपोर्ट वर पण लिहलेले असायचे.

गुजरातेतून होणाऱ्या निर्यातीमुळे भारताचा जसा फायदा होतो तसा फायदा पाकिस्तानी संघाशी क्रिकेट खेळून होणार नाहीये.

>>>>>>>

जेव्हा कुठल्याही दोन व्यक्ती किंवा देशांमध्ये व्यवहार होतो तेव्हा फायदा दोघांचाही होतोच!
कोणीही बावळट नाही की फक्त समोरच्याच्या फायद्याचाच व्यवहार करायला.

पाकडे हे आपले जानी दुश्मन, xxxxx, xxxx, xxxxxx आहेत. ती दुष्मनी ते वेळोवेळी निभावतात. तशी आपणही निभवावी.
सामने खेळण्याची तर आवश्यकता नाहीच पण इतर देवाणघेवाण सुद्धा थांबवायला हवी ..

केवळ भारताने नाही तर जगाने त्यांच्यावर बहिष्कार टाकायला हवा कारण त्यांनी पोसलेल्या दहशदवादामुळे संपूर्ण जगाला धोका आहे..

कधी नव्हे ते ऋन्मेषशी सहमत....

पाकिस्तानी कलाकार चालतात, कॉम्ंटेटर चालतात, कोच चालतात पण खेळाडू नाही हा कसला न्याय...करायचा तर ब्लँकेट बॅन करा सरसकट सगळ्याच पाकिस्तानी लोकांवर....

करायचा तर ब्लँकेट बॅन करा सरसकट सगळ्याच पाकिस्तानी लोकांवर....
>>>>

एक्झॅक्टली,

इथे प्रश्न आपल्या आवडीनिवडीचा नाही. माझे वैयक्तिक मत काहीही असो, जे देशाचे धोरण ठरेल त्याला सपोर्ट करणार. पण ते राजकारण्यांनी आपल्या सोयीने ठरवलेले नको..

पाकिस्तानी कलाकार चालतात, कॉम्ंटेटर चालतात, कोच चालतात पण खेळाडू नाही हा कसला न्याय...करायचा तर ब्लँकेट बॅन करा सरसकट सगळ्याच पाकिस्तानी लोकांवर....
अनेकवार अनुमोदन.
आता केवळ क्रिकेट वर प्रेम करणारे लोक म्हणतील, अहो पण क्रिकेट खेळाडू अतिरेकी नाहीत त्यांचा खेळ बघण्याजोगा असतो.
मी म्हणतो असेल. तसा इतर अनेक देशातल्या लोकांचा असतो. त्यांना बघा. पण आपण त्यांच्याशीच कशाला खेळायला पाहिजे? त्यांच्या कोच, समीक्षक या सर्वांवर बंदी घाला. काहिहि बिघडत नाही.

जर ते लोक चांगले असतील तर इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, न्यू झीलंड इथले लोक घेतील. पैशाचा लोभ त्यांनाहि आहे. त्या देशातील लोक मुसलमानांचे फालतू लाड करत नाहीत. एक मोठ्ठा फरक म्हणजे त्या देशांतील लोक शहाणे आहेत, क्रिकेट महत्वाचे की त्यातून अतिरेकी देशांना सहानुभूति, दया महत्वाची हे त्यांना कळते.

भारतातील भारतीय म्हणजे काय? आपली जुनी संस्कृती काय सांगते, आजची परिस्थिती काय, यातले काय खरे, याबद्दल सर्वांच्या टाळक्यात नुसता प्रचंड गोंधळ! आनंदी आनंद. क्रिकेट नि बॉलिवूडपुढे त्यांना इतर काही महत्वाचे वाटतच नाही. उद्या काश्मीरहि देऊन टाकतील पाकीस्तानला! तिथे ना क्रिकेट ना आ़जकाल बॉलीवूडचे लोक जात. निसर्गसौंदर्यासाठी बॉलिवूडवाले जगात इतरत्र जातात.

केवळ भारताने नाही तर जगाने त्यांच्यावर बहिष्कार टाकायला हवा कारण त्यांनी पोसलेल्या दहशदवादामुळे संपूर्ण जगाला धोका आहे..
अनुमोदन.
जाता जाता - शाहरुख खानच काय, अमिरखान, कपूर, कुमार यांच्या सर्व हिंदी सिनेमांवर निदान काही वर्षे तरी सरसकट बहिष्कार टाकावा नि ,सामाजिक परिस्थिती, सुव्यवस्था, सुरक्षा, संशोधन याकडे अधिक लक्ष द्यावे.

ईधर भोत सारे बडे प्लेअरां पैलेच आकू शुरू हो गयेले हय, पर मेरे जैसे छोटे लोगांकु एक लईच बेसिक प्रश्न पड्या हय.

समजा असा सरसकट बॅन केला आम्ही पाकींशी खेळणार नाही, कोणाही आजी माजी पाकी खेळाडूला भारतात येवू देणार नाही. पण समजा वर्ल्डकप सेमीला किंवा फायनलला भारत पाक आमनेसामने आले (भारतात किवा ईतरत्रं कुठे का असेना मॅच) तर मग काय करायचे सामना सोडून घरी यायचे का?
की फक्त भारतातच पाकींशी खेळायचे नाही आणि बाहेर चालेल असे पुन्हा दुटप्पी धोरण ठेवायचे. मग शारजा, नैरोबी सुद्धा पुन्हा सुरू करायला काय हरकत आहे? की फक्त वन-टू-वन सिरीज कुठेही नाही खेळायची पण तिसरी टीम असेल तर चालेल. लेम आहे हे धोरण.

हे झाले क्रिकेटपुरते मग समजा ऑलिंपिकमध्ये सेमीला किंवा फायनलला भारत पाक हॉकी टीम समोरासमोर आली तर काय करायचे, पदक सोडून द्यायचे का?
की फक्त पाक क्रिकेट टीमला बॅन आणि बाकी कबड्डी, कुस्ती पासून स्क्वॅश, वेटलिफ्टिंग सगळे चालेल?

मग नुसते क्रिकेट खेळतात म्हणून पाकी प्लेअर वर अन्याय झाला भाऊ. हे सुद्धा लेम च आहे.

थोडक्यात एकतर राजकारण, सरहद्दवाद खेळात न आणता खेळाडू (सगळे खेळ), कलाकारांचे स्वागत करावे नाही तर 'नाही म्हणजे नाही' मग कुठलीही किंमत द्यावी लागली तरी बेहेत्तर ....असे तरी ठरवावे.
मग मलाला युसूफझईलासुद्धा परवानगी नाकारावी लागेल.

माझ्या माहितीप्रमाणे पाकी प्लेअर्सना खेळवायचे/ नाही खेळावायचे हा किंवा त्यांच्याशी कुठे खेळायचे की नाही हा सर्वस्वी बीसीसीआय चा निर्णय होता त्यात सीमावाद वगैरे राजनैतिक मुद्द्यांमुळे सरकारने नियम घालून बंधने घातली असे नाहीये.....आआणि तसे असेल तर ह्या धाग्यावर चर्चेला काहीच अर्थ नाहीये.

जबतक import export अपने फेवर में है, तब तक सब चलने दो. आपले किती लोक्स तिकडे जाऊन कार्यक्रम वगरे करतात? त्त्येंना मिळालेलं उत्पन्न आणि भारतात पाकी मंडळींनी मिळवलेलं उत्पन्न ह्याचं गणित जुळवून परवानग्या द्याव्या म्हणतो मी.

व्यवहारात भावना नको, फायदा बघायला हवा. भारतात बोलावून खेळा म्हणावं. सामने अंदमान निकोबार किंवा लक्षद्वीप सारख्या ठिकाणी घ्या, म्हणजे कोण आल आणि कोण गेलं ह्यावर कडक नजर ठेवता येईल. आणि सरकार सुरक्षा वाहणार आहे तर % मध्ये BCCI मधून कट कापून घ्यावा Lol Light 1

http://aajtak.intoday.in/sports/story/cricket-diplomacy-modi-seeks-to-im...
भारतीय जनता पार्टी (बीजेपी) के कुछ सांसदों ने भले ही भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरीज को लेकर शंका जाहिर की है लेकिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिकेट कूटनीति के जरिए पड़ोसी देश के साथ बने गतिरोध को खत्म करना चाहते हैं.
सूत्रों की माने तो मंगलवार को हुई बीजेपी की संसदीय दल की बैठक में उपस्थित एक पार्टी सांसद ने गोपनीयता की शर्त पर बताया कि मोदी ने बैठक में कहा, 'हमने दोनों देशों के बीच संबंध सुधारने के उद्देश्य से क्रिकेट सीरीज शुरू करने का फैसला लिया है.'

पाकिस्तान हे नाव आलं की आपल्या मनात पहिला विचार येतो तो शत्रु राष्ट्र. त्याला अनेक कारणे आहेत पाक राजकारण्यांचे भारतातील दहशतवादाबद्दल असलेले दुटप्पी धोरण, पाक लष्कराचे भारताविरूध्द स्वातंत्र्यापासून सुरू असलेले षडयंत्र आणि पाकिस्तान हा आपला शत्रु राष्ट्र आहे हा जनसामान्य विचार.

ह्या धाग्यावरसुध्दा आधीच्या प्रतिसादांमधील बहुतांशी प्रतिक्रिया आहेत त्या म्हणजे पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याचेच काय तर कोणतेही संबंध ठेवू नयेत. काही अपवादात्मक प्रतिक्रिया सुध्दा आहेत ज्यांना वाटते की जर इतर पाकिस्तानी खेळाडू, गायक, कलाकार चालतात तर पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याचे कारणच काय? या दोन्ही मतांचा आदर आहेच, पण माझे प्रामाणिक मत आहे जर बीसीसीआयला आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिकांचे आयोजन व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी ते इतर त्रयस्थ ठिकाणी न खेळवता भारतात आणि पाकिस्तानातच खेळवाव्यात. विशेषतः पाकिस्तानात जर एवढी हिंमत बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे असेल तरच भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत.

प्रतिसाद टायपून होत नाही तोपर्यंत ही बातमी वाचनात आली.

http://maharashtratimes.indiatimes.com/international/Six-unidentified-as...

जर मालिका आयोजित करायची तर प्रथम पाकिस्तानातच क्रिकेटचे सामने आयोजित करा.

सूत्रों की माने तो मंगलवार को हुई बीजेपी की संसदीय दल की बैठक में उपस्थित एक पार्टी सांसद ने गोपनीयता की शर्त पर बताया कि मोदी ने बैठक में कहा, 'हमने दोनों देशों के बीच संबंध सुधारने के उद्देश्य से क्रिकेट सीरीज शुरू करने का फैसला लिया है.

........

Proud

पाकिस्तानबरोबर परत क्रिकेट सुरु करण्याच्या निर्णयाचे जोरदार स्वागत.
पाकिस्तान क्रिकेट जितके बहरेल तितकेच ते तिथल्या जनतेला विशेषतः तरुणांना आधुनिक जगाच्या मुख्य प्रवाहात आणेल, ज्याचा फायदा मुलतत्ववादाची तीव्रता कमी करण्यासाठी होईल.
धाग्यात दिलेली टीप इथे ज्या पद्धतीची राळ उडते त्या अगतिकतेतून लिहीली असली तरी विनोदी आहे. सर्वशक्तिमान प्रधानसेवकांच्या मंजूरीशिवाय दालमियांनी एवढे मोठे निर्णय घेतलेच नसते.

प्रधानसेवक गांधीवादी होत चाललेत.

पाकला साडी द्ली.

बादे ला दहा हजार एकर जागा दिली.

पाकबारोबर क्रिकेट खॅलणार.

ईश्वर अल्ला तेरो नाम

पाकिस्तान क्रिकेट जितके बहरेल तितकेच ते तिथल्या जनतेला विशेषतः तरुणांना आधुनिक जगाच्या मुख्य प्रवाहात आणेल, ज्याचा फायदा मुलतत्ववादाची तीव्रता कमी करण्यासाठी होईल.>>

Smiley

मस्त. चालुद्या.

ऋन्मेऽऽष,

>> कोणीही बावळट नाही की फक्त समोरच्याच्या फायद्याचाच व्यवहार करायला.

मग भारतीयांनी पाकिस्तानी क्रिकेट वाचवायचा बावळटपणा कशाला करावा? भारताला गरजच काय मुळातून?

आ.न.,
-गा.पै.

. सर्वशक्तिमान प्रधानसेवकांच्या मंजूरीशिवाय दालमियांनी एवढे मोठे निर्णय घेतलेच नसते. > हो याकडे सोईस्कर पणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. राष्ट्रहीत क्रिकेट मधे आहे Happy

पाकिस्तानी कलाकार चालतात, कॉम्ंटेटर चालतात, कोच चालतात पण खेळाडू नाही हा कसला न्याय...करायचा तर ब्लँकेट बॅन करा सरसकट सगळ्याच पाकिस्तानी लोकांवर.... >>>> सहमत आहे.

पाकिस्तानची अवस्था सद्ध्या इतकी वाईट आहे की भारताने शत्रू म्हणून सुद्धा पाकीस्तानकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. आपल्या देशात दहशतवाद पसरु नये म्हणून जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घ्यावी भारतापुढे सर्वात मोठे आव्हान चीनचे आहे. चीन आणि पाकीस्तान एकत्र येणे (किंवा एकत्र रहाणे) भविष्यात आपल्याला परवडणारे नाही आणि त्या दृष्टीने जे काही प्रयत्न करता येतील ते केलेच पाहिजेत.

अर्थात पाकीस्तानशी क्रि़केट खेळण्याचा निर्णय त्या प्रयत्नांचा एक भाग आहे असे मला म्हणायचे नाही. पण पाकिस्तानकडे अधिक लक्ष देऊन उगीचच त्यांना महत्व द्यायची गरज नाही. Pakistan does not deserve our attention असे माझे म्हणणे आहे.

BREAKING NEWS: बीसीसीआई सचिव अनुराग ठाकुर ने कहा, भारत-पाक सीरीज को लेकर सकारात्मक

Pages