लेमन कर्ड कप्स

Submitted by मृणाल साळवी on 27 April, 2015 - 17:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः

फिलो शीट्स = १ पॅक
अंडी = २
साखर = १ वाटी
बटर = १/४ वाटी आणि २ चमचे
लेमन = २
फेटलेले क्रिम = १/२ कप
कपकेक्सचा ट्रे
पुदिना सजावटीसाठी

क्रमवार पाककृती: 

कृती:

१. फिलो शीट्सचे छोटे चौकोन कापुन घ्यावेत. ह्या शीट्स लगेच कोरड्या होतात त्यामुळे ते एका ओल्या कापडाने झाकुन ठेवावेत.
२. २ चमचे बटर वितळवुन घ्यावे.
३. ट्रेला आतुन बटर लावुन घ्यावे. प्रत्येक चौकोनला दोन्ही बाजुने वितळलेले बटर लावुन घ्यावे.

c1

४. प्रत्येक कपमधे ३-३ चौकोन ठेवावेत.

c2

५. १८० degree Celsius तापमानावर preheat करुन घ्यावा. त्यात ट्रे ठेवुन १० मिनिटे किंवा ब्राउन रंग येईपर्यंत बेक करुन घ्यावे.
६. १० मिनिटांनी ट्रे बाहेर काढुन गार होण्यासाठी बाजुला ठेवावा.

c3

७. २ लिंबांचा फक्त पिवळा भाग किसुन घ्यावा व त्या लिंबांचा रस काढुन गाळुन घ्यावा.
८. एका मोठ्या बाउल मधे २ अंडी, साखर, १/४ कप बटर, २ लिंबाचे पाणी आणि त्या लिंबांची grate केलेली साले एकत्र घेउन चांगले फेटुन घ्यावे.
९. हे सर्व बॅटर डबल बॉयलर पद्धतीने गरम करण्यासाठी ठेवावे. (फोटोत दाखवल्याप्रमाणे).

c4

१०. हे मिश्रण शिजण्यासाठी साधारण ८-१० मिनिटे लागतात. हे शिजत असताना ते continue हलवत रहावे.
११. मिश्रणाचा thickness खालील फोटोमधे दाखवल्या प्रमाणे असावा.

c5

१२. मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करुन ते गार होईपर्यंत हलवत रहावे.
१३. गार झाल्यावर त्यावर clear foil लावुन १-२ तास फ्रीज मधे ठेवावे.

c6

१४. दुसर्‍या एका मोठ्या भांड्यात क्रिम फेटुन घेउन पायपींग बॅगमधे भरुन घ्यावे.
१५. आता तयार झालेल्या कपांमधे चमच्याने किंवा पायपींग बॅगने लेमन कर्ड भरुन घ्यावे. त्यावर फेटलेली क्रिमने सजवावे.

c8

१६. सजावटीसाठी वरती पुदिन्याचे पान ठेवावे. आवडत असल्यास वरुन तुम्ही वेगवेगळ्या बेरीजने देखिल सजवु शकता.

c9c10c11

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय भारी दिसतंय!
फिलो शीटस इकडे मिळणार नाहीत.
त्यामुळे केवळ नेत्रसुख!
पण हेच फिलींग वापरून ओपन फेस सँडविचेस बनवता येतील.
नक्की करून पाहते.

छान दिसतंय Happy

साती, हे असे कॅनोपीज वापरुन करुन बघ.
Canopy_Chat.jpg

फोटो नेटवरुन साभार. तुला जस्ट दाखवायला हा फोटो डकवलाय.

मृणाल मस्त फोटो.
अश्विनी कॅनोपिजचा फोटो मस्त आहे, माझ्याकडे असेच पडून आहेत, मला चव नाही आवडली. Uhoh

साती,

समोसा पट्टी/ स्प्रिंग रोलच्या पटटीचा वापर करून एक ट्रायल घ्या. मसब टँक बालाजी ग्रेंड बझार
( हैद्राबाद) किंवा कोणत्याही चांगल्या प्रतीच्या सुपर मार्केट मध्ये मिळून जाईल.

छान रेश्पी.

आरती, अगं त्याला चव नसणारच. त्यात भरल्या जाणार्‍या मालमसाल्यालाच चव असणार. फिलो शीट्स म्हणजे काय ते माहित नाही. त्याला चव असते का ते पण माहित नाही गं.

अश्विनी, हो चव नाही. संपवायच्या आहेत. कॉर्न चाट ट्राय करते.
अमा, साती कराची बेकरीमध्येसुद्धा समोसा पट्टी मिळते.

मुलींनो, कॅनॉपीज पण मिळत नाहीत गं.
मी जंगलाने वेढलेल्या इटुकल्या शहरात रहाते. Happy
समोसापट्टी आमच्या गावातपण कधीमधीमिळते.
ती वापरून करून पाहिलं पाहिजे हे.
या रविवारचं मिशन स्टेटमेंट ठेवलं पाहिजे हे!
Wink

साती,

फिलो पेस्ट्रीची रेसीपी ऑनलाइन मिळेल. मैदा, तेल वगैरे इन्ग्रेडिअंटच आहेत. फार काही अवघड नाही. पातळ शीट्स लाटून बेक करून घेता येतील. फिकर नॉट. ते जंगलांनी वेढलेले गाव वगैरे किती मस्त वाटतंय. आमच्या घरासमोर गार्बेज डंप, ट्रेन स्टेशन आणि हायवे आहे!

सुंदर फोटो आणि कृती.

साती,
फिलो शिट्स, खारी ( बिस्किटातली ) साठी वापरतात. जर गावात बेकरी असेल तर तिथे मिळू शकेल.

सगळ्यांचे धन्यवाद Happy
हो ह्याच कप्स मधे तुम्ही तुम्हाला आवडणारे स्पायसी फिलिंग सुद्धा भरु शकता. आपले आलु चाट / फ्रुट चाट देखिल मस्त लागेल.
हे अंड्यावाले लेमन कर्ड आवडत नसेल तर तुम्ही नेहमीचे कस्टर्ड भरुन वरुन मिक्स फ्रुट्सने सजवु शकता.
ह्या फिलो शीट्स तुम्हाला कुठल्याही सुपर मार्केटमधे मिळु शकतात.

सुरेख दिसत आहे!
मृणाल, मला पाय क्रस्टची रेसिपी हवी आहे. फिलो शीट्सपेक्षा लेमन कर्ड पाय मध्ये भरून खाल्लं तर आणखीच यम्मी लागेल Happy प्लीज पायची रेसिपी प्रमाण आणि फोटोसकट लिहा ना.