भाग पहिला, इथे पहा - http://www.maayboli.com/node/52047
पहिली ट्रीप यशस्वी झाल्यानंतर, मला आणि माझ्यापेक्षाही जास्त हुरुप मार्थाला आल्याने, लगेच पुढच्या वीकेंडला मार्थाने नवीन प्लॅन बनवुन दिला - इंटर-लाकेनला जायचा! मार्था महाचाप्टर बाई. एकाच दिवसात भरपुर पाहता यावे म्हणुन जायचा आणि यायचा मार्ग वेगळा दिला तिने!
स्वित्झर्लंडला तळ्यांचा देश म्हणतात. त्यातलीच दोन तळी इंटरलाकेन मध्ये, किंबहुना, दोन तळ्यांच्या मध्ये वसलेला प्रदेश म्ह्णुन इंटरलाकेन असं नामकरण झालय.
हवामान विभागाने दिवसभर वातावरण "सन्नी" राहिल असं सांगितल्याने तेच "मन्नी" धरुन बाहेर पडलो तर बाहेर नजारा काही वेगळाच!
१. इथे तो सुर्य आहे बरं. सकाळी १० ला टिपलेला हा नजारा!
हवामान विभागाला मनातल्या मनात शिव्या दिल्या. जास्तवेळ नाही पण, कारण कानात किशोरीताईंचा ललत सुरु होता. "रटन लागी रैन" च्या सोबतीने प्रवास सुरु होता!
२. पण थोड्यावेळात भास्करराव उगवले. कानात किशोरीताईंचाच शुद्ध सारंग! बाहेर स्वीस कंट्रीसाईड!
३. हे लालबुंद सफरचंदानी लगडलेले झाड! ट्रेन एवढ्या जवळुन गेली की फळं तोडता आली असती.
४.
५.
ट्रेन थुन या गावी पोहोचली. इथुनच इंटरलाकेन ची बोट-ट्रीप सुरु होते.पण त्याला अजुन तासभार अवकाश होता त्यामुळे जरा गावात फेर-फटका मारला. मार्थाचा बॉय-फ्रेंड या गावचा. त्याने आवर्जुन इथे फिरायला सांगितल होतं.
६. हा तिथला बस स्टॉप. त्या पिवळ्या बसेस ना पोस्ट-ऑटो म्हणतात. त्या ईतका स्वस्त आणि आरामशीर प्रवास नाही. आपली यष्टी जशी अगदी बारक्या बारक्या गावात जाते तशीच ही बया पण आल्प्स च्या अगदी आडवळणाच्या छोट्या छोट्या गावात पण जाते.
७.शिशिराची चाहुल देणारं हे तिथलं झाड
८. तिथलं हे सुंदर फुल.
९.तिथेच आरे नावाची नदी थुनच्या तलावाला (थुनरसी = थुन + सी(तलाव)) मिळते.
१०. त्या नदीवरचा लाकडी पुल. ( विशेष सुचना : पुणेकरांनी क्लेम करायला येऊ नये. )
बाहेरुन
आतुन
११. हे अजुन एक फुल
१२. आता बोट ट्रीप सुरु झाली. थुन वरुन इंटरलाकेन नावाच्या छोट्यागावी जाणारी ही ट्रीप दोन तासात या अजस्र तळ्याच्या एका टोकावरुन दुसर्या टोकाला नेते आणि आजुबाजुचा निसर्ग पाहुन आपण थक्क, थक्कर, थक्केस्ट होऊन जातो.
हा थुनच्या पाटलाचा वाडा!
आणि हे पाटीलवाडी बुद्रुक!
बोटीच्या समोर दिसणारा हा मिस्टर आल्प्स!
आणि या छोट्या टेकड्या,दोन मिसेस आल्प्स! त्यात हिरवळ असलेली आवडती आणि बोडकी असलेली नावडती!
हे मधे असलेलं बेटं!
त्या मगाच्या दोघी खरंतर अशा एकमेकांकडे तोंड करुन असतात....भांडत!
त्या दगडातुन खोदुन काढलेला रस्ता ....!
सुखी माणसाचा सदरा हवा असल्यास या घरात जाणे!
हॉलिडे रीसॉर्ट!
१३. इंटर-लाकेन गावी पोहोचलो आपण!
सॉरी पण मला फुलं आवडतात, म्हणुन ही आणखी काही!
इतक्या सुंदर फुलांस घाणेरी हे नाव!
तिथेच उमलेली ही नाजुका!
हे एक
१४. आता वाट परतीची. कानात ताईंचाच पुरीया धनश्री!
हे तळे नं. २ , ब्रिएंझरसी (ब्रिएंझचे तळे)
१५. स्वीस हीली रीजन!
१६. आजच्या दिवसाच्या भैरवीची वेळ झाली .... पुन्हा किशोरीताई...बाबुल मोरा!
पुन्हा भेटु नेक्स्ट ट्रीप च्या वेळी!
मी त्या प्रवासावार माबो वर
मी त्या प्रवासावार माबो वर तेव्हा प्र.चि. सकट प्रवासवर्णन लिहिलं होतं - इथे. फार सुंदर देश आहे तो. स्वर्गीय.
क्या बात है!!! डोळ्यांचे
क्या बात है!!!
मस्तच. 
डोळ्यांचे पारणे फिटवणारे फोटोज
जिप्सी खूप खूप धन्यवाद!
जिप्सी खूप खूप धन्यवाद!
Bagz, लिंक साठी आभार!
अ प्र ती म!
अ प्र ती म!
मानुषी ध न्य वा द !
मानुषी ध न्य वा द !
वाह!
वाह!
आहा.. मस्त आहेत फोटो सगळेच्या
आहा.. मस्त आहेत फोटो सगळेच्या सगळेच.. आणि वर्णिल पन छाने.. कशाकशाला सुंदर म्हणू कळतच नै आहे.. सर्व काही अप्रतीम आहे.. इतकी स्वच्छ नदी .. आपल्याइकड आजकाल गावाबाहेरच्या नद्या पण इतक्या स्वच्छ दिसत नै
अरुंधती, टीना धन्यवाद काही
अरुंधती, टीना धन्यवाद
तिथे ते लोक जपतात हे खरंय!
काही अप्रतीम आहे.. इतकी स्वच्छ नदी >>>>>>>>.. यामध्ये सरकारने जेव्हढे कष्ट घेतले तेव्हढेच लोकांनी पण. कधीही कचरा टकत नाहीत कुठेही. आपण नद्याना देवी वगैरे मानुन काय काय करतो
अरे कसले जबरी फोटो आहेत..
अरे कसले जबरी फोटो आहेत.. डोळ्याचे पारणे फिटतेय.. निव्वळ !!!
जिमिनीचा भाव काय हाय म्हनं
जिमिनीचा भाव काय हाय म्हनं तिथं दर गुंठ्याला ? एक खोपाट होवंच ततं !
आ. न.
मा. ज. गुंठे -पाटील .
ऋन्मेऽऽष, रॉबीनहूड धन्यवाद!
ऋन्मेऽऽष, रॉबीनहूड धन्यवाद!
जिमिनीचा भाव काय हाय म्हनं तिथं दर गुंठ्याला ? एक खोपाट होवंच ततं !>>>> मी एकदा विचारलं होतं मार्थाला. तिने सांगितलेला आकडा माझ्या आकलनक्षमतेपेक्षा बराच मोठा होता, त्यामुळे विसरलो!
कमी असल्याने खरं जमीन खुप महाग!
अप्रतिम...
अप्रतिम...
Pages