स्वित्झर्लंड.

Submitted by Bagz on 13 November, 2011 - 00:46

दोन आठवड्यांपूर्वी मी आणि आई स्वित्झर्लंड ला गेलो होतो. दोन गोष्टी जाणीवपूर्वक केल्या: एक तर ऑक्टोबर च्या तिसर्‍या आठवड्यात गेलो, आणि अतिप्रसिद्ध जागा टाळून छोट्या गावांमधे राहिलो. त्यामुळे fall colours बघायला मिळाले, आणि अतिशय रमणीय, शांत अश्या ठिकाणी निसर्गाचा मनसोक्त आनंद मिळाला. तिथले काही फोटो आणि थोडीफार माहिती टाकत आहे..

आधी गेलो ते "Montreux" ला. हे एक छोटसं आणि सुंदर शहर आहे, Lake Geneva च्या पूर्व किनार्‍यावर. खालच्या फोटोत दिसतोय तो फ्रेंच मधे "qais des fleures" अर्थात फुलांचा रस्ता. ह्याचे बरेच फोटो काढलेत, झलक म्हणून दोन इथे टाकतेयः

qdf2.JPGqdf1.JPG

हॉटेल च्या खोलीतून दिसणारा lake geneva.

montreux_rv1.jpg

हा आहे Montreux चा प्रसिद्ध किल्ला "Château de Chillon".

chillon1.JPG

१००० वर्षे जुना आहे हा किल्ला. ते डावीकडे कोपर्‍यात दिसतंय (खालच्या चित्रात) ते एक स्मारक आहे. पूर्वीच्या काळी लोकांना चेटूक करण्याच्या आरोपाखाली जाळून वगैरे मारलं गेलं, त्यांचं स्मारक!

chillon2.JPG

सूर्यास्तानंतर तळ्याकाठी

lake1.JPG

एक सकाळ मस्त सूर्यप्रकाशात ...
montreux_rv2.JPG

आणि दुसर्‍याच दिवशी..
montreux_rv3.JPG

सकाळची वेळ, समोर सुंदर तलाव, शेजारी आल्प्स चे पर्वत, आणि ही पक्ष्यांची रांग. ते बगळे नसावेत, पण त्यांना बघून "बगळ्यांची माळफुले" नक्की आठवलं.

birds1.JPG

Montreux नंतर आम्ही Brienz ला गेलो. जाताना वाटेत ट्रेन मधून दिसलेलं दृष्यः

journey_m2b1.JPG

Brienz हे Interlaken पासून ट्रेनने २० मि. च्या अंतरावर आहे. Montreux वरुन आम्ही ४ ट्रेन करुन, सगळ्या सामानासकट अगदी आरामात पोचलो. प्रवासाचा शीण सुद्धा जाणवला नाही. Brienz सुद्धा आम्ही अगदी तळ्यासमोरच्या हॉटेल मधे ३ दिवस राहिलो. आम्ही पोचलो त्याच दिवशी प्रचंड पाऊस पडला.

brienz_rv3.JPGbrienz_rv2.JPG

आणि त्या दिवशी पूर्ण काळे असणारे आल्प्स चे डोंगर दुसर्‍या दिवशी सकाळी असे दिसू लागले -

brienz_rv4.JPG

सूर्यप्रकाशात चमकणारा तलाव

brienz_rv6.JPG

हे गुबगुबीत मांजर आमच्या खोलीत शिरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतं. पण.. माझ्या आईने ते सगळे प्रयत्न हाणून पाडले. Sad

kitty.JPG

Brienz च्या जवळ एक "Ballenberg open air museum" म्हणून आहे. तिथे जातानाचा रस्ता म्हणजे .. डोंगरातून वळणं वळणं घेत जाणारा आणि दोन्ही बाजूला नुसती रंगांची उधळण. पण बसच्या काचेतून नीट फोटो येत नव्हते.

ते museum तर अप्रतिम होतं. स्वित्झर्लंड मधल्या ५०० - ६०० वर्षे किंवा त्याहूनही जुन्या इमारती ह्या लोकांनी उचलून आणल्या आणि इथे पुन्हा पहिल्यासारख्या उभारल्या. शेतकर्‍यांची घरं, त्यांची अवजारं, प्राणी, धान्यं, cheese ठेवण्याच्या खोल्या आणि बरंच काही - सगळं व्यवस्थित जतन करून ठेवलंय. अवाढव्य परिसर, स्वच्छ सुंदर मोकळी हवा, चहूबाजूनी रंगीबेरंगी झाडं आणि त्यांच्या पलिकडे बर्फानं झाकलेले पर्वत. वेडच लागायची वेळ होती. तिथले काही फोटो:

bbm1.JPGbbm3.JPGbbm6.JPGbbm5.JPG

Lake Brienz भोवती फेरफटका.

b_lake1.JPGb_lake2.JPGb_lake3.JPGb_lake5.JPGb_lake6.JPG

Brienz हे गाव लाकडाच्या कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी असे लाकडाचे पुतळे दिसतात.

b_lake4.JPGwooden.JPG

Brienz गावातला Brunngasse नावाचा एक प्रसिद्ध रस्ता. इथे १४ व्या शतकातली लाकडाची घरं आहेत आणि लोकं त्यात अजून राहतात.

brunngasse.JPG

नंतर Brienz ते Zurich च्या ट्रेन प्रवासातले काही फोटो:

journey_b2z1.JPGjourney_b2z2.JPG

शेवटच्या दिवशी झुरिक एअरपोर्ट जवळच्या हॉटेल शेजारी असलेली लाल-पिवळी झाडं पाहून भारतात परतलो.

kloten2.JPGkloten3.JPGkloten4.JPG

गुलमोहर: 

अत्तीशय सुंदर्...प्रचि!!!
सुंदर.. शांत... आहे स्वित्झर्लॅड....

ते मांजराचे आणि शेवटचे प्रचि खुप आवडले.... Happy

सुंदर फोटो.
खुप वेळा जाऊन आलोय, तरी परत परत जावेसे वाटते आहे.
आता फक्त फोटो काढण्यासाठी जायचेय एकदा.

छान Happy

फार छान प्र. चि.

अत्ताच एप्रिल मध्ये गेले होते. पण असे अनवट ठिकाणी फार छान निसर्ग भेटतो. आम्ही ल्युसर्न आणि एन्गलबर्ग ला राहिलो होतो. झुरिक ते एन्गलबर्ग ट्रेन चा प्रवास स्वर्गिय होता. आमचे एन्गलबर्ग चे हॉटेल अगदी अल्प्स च्या समोर होते. खुप फोटो आहेत. जमले तर टाकीन.

प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद!
माबो वर गेली २ वर्षे आहे, पण काही लिखाण/अनुभव टाकण्याची ही पहिलीच वेळ.

@मोहन कि मीरा : एप्रिल मधे सुद्धा खूपच छान असेल ना - हिरवीगार झाडं आणि रानफुलं! पुन्हा गेले तर एन्गेलबर्ग नक्की लक्षात ठेवीन.

@आवळा : एका व्यक्ती साठी - विमानाची तिकिटं (३५०००-३६०००) + व्हिसा (५०००-६०००) + हॉटेल (रोज ५०००-६००० पासून पुढे) + अंतर्गत प्रवास (४ दिवस - ११००० swiss pass गृहीत धरुन ) + जेवणखाण (रोज १०००-१२००) असा अंदाजे खर्च येतो. व्यक्तिगत आवड/गरज ह्याप्रमाणे हे खर्च कमीजास्त होऊ शकतात.

@ Bagz माहीती बद्दल आभारी आहे..
आपल्या माहीती प्रमाणे साधारण एका व्यक्तीचा एक आठवड्याचा खर्च ९०००० रु. येऊ शकतो असा
अंदाज आहे Happy

छान.

Pages