मुंगरे की चटणी

Submitted by अल्पना on 22 March, 2015 - 12:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दिड वाटी चिरलेल्या डिंगर्‍या (मुळ्याच्या शेंगा) /मुंगरे, एक मध्यम आकाराचा कांदा, अर्धी वाटी पुदिना, अर्धी वाटी कोथिंबीर, आमचुर (चवीप्रमाणे), अर्धा चमचा गरम मसाला, चमचाभर धण्याची पुड, मीठ, गुळ (चवीप्रमाणे), २-३ हिरव्या मिरच्या

क्रमवार पाककृती: 

मुळ्याच्या शेंगा, कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि पुदिना एकत्र करून मिक्सरमध्ये वाटावेत. त्यात चवीप्रमाणे मीठ, गरम मसाला, धण्याची पुड, गुळ आणि आमचुर घालून परत एकदा मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. चटणी तयार. Happy

वाढणी/प्रमाण: 
खाऊ त्या प्रमाणे.
माहितीचा स्रोत: 
साबा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही लागली चटणी उग्र सिंडरेला. माझ्या एक लक्षात आलंय, पंजाब्यांच्या बहूतेक चटण्यांमध्ये कच्चा कांदा घालतात.

हो मनीमोहोर, ही चटणी अगदी हिरवीगार दिसते.