कोलंबीचं बरटं

Submitted by मृण्मयी on 5 March, 2015 - 15:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वाटीभर स्वच्छ केलेल्या कोलंब्या
७-८ लसूण पाकळ्या. (भदाड्या लसणाच्या २-३)
भरपूर कोथिंबीर आणि झेपेल तितक्या हिरव्या मिर्च्यांचं वाटण- अर्धी वाटी
२ मोठे टोमॅटो (किंवा ३ टेबलस्पून टोमॅटो पेस्ट)
२ मोठे कांदे. (कॉस्टको कांदा -१)
हळद
तिखट
मीठ
पाव वाटी तेल (हिंम्मत असेल तर जास्त)

kolambeecha-barata-maayboli.jpg

क्रमवार पाककृती: 

-कोलंब्यांना हिरवं वाटण, हळद आणि मीठ लावून तासभर मुरत ठेवायचं.
-तेल कडकडीत गरम करून त्यात लसूण ठेचून घालायचा. लाल होऊ द्यायचा.
-यावर बारीक चिरलेला कांदा गळून जाईपर्यंत परतायचा. (गळणारा घटक- कांदा)
-आता बारिक चिरलेले टोमॅटो किंवा टोमॅटो पेस्ट घालून तेल सोडेपर्यंत परतायचं.
-तिखटपूड घालून थोडं परतून घ्यायचं.
-कांदा-टोमॅटो भरपूर शिजून एकजीव झाल्यावर, तिखट घालून परतल्यावर, कोलंबी घालून २-३ मिनिटं परतायचं.
-बरटं तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
१ माणूस
अधिक टिपा: 

-बरट्याला कुठलाही मसाला घालायचा नाही.
-आलं घालण्याचा विचारही मनात आणायचा नाही.
-कोलंबीच्या आकारानुसार शिजायला कमी अधीक वेळ लागेल. जास्तं शिजून चिवट व्हायला नको.
-पाणी घालून पातळ रस्सा करायचा नाही. पण अगदीच कोरडं वाटलं तर कोलंब्या परतून झाल्यावर, आच बंद करून, पाव कप कढत पाणी घालून मिसळायचं.

माहितीचा स्रोत: 
..पुन्हा एकदा मोनाडार्लिंग. (बहीण)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतंय. बरट्यापुढे पोळ्या किती सात्विक दिसतायत. निळू फुले शेजारी जयश्री गडकरच... >>>> smiley36_0.gif

फोटो तोपासु! मी ही अशिच करते फक्त लसुण,हिमी,कोथिबिर एकत्र वाटुन घेते, घरच्या श्रिम्प फॅनला तिखट- मसाला चालत नसल्याने फक्त ताजी धना-जिरा पावडर असते.

वाव

तो पा सु

m gonaa mis this , आर्धा तास वा ट बघायचा संयम ठेवावा लागेल

माझी ऑल टाईम फेव्हरेट डीश.

पण याला बरट म्हणतात हे माहीत नव्हते. आम्ही सवतळलेली कोलंबी म्हणतो.
मस्त दिस्तोय फोटो.

या टाइपने मी जे काही करते त्यात सवयीने आलं घालतेच. पण आता इतकं बोल्ड लिहिलं आणि ब्युटीफुल फोटो Wink म्हटल्यावर आलं आपलं करणं आलं. Happy

फोटोमुळे जास्त टेम्प्टिंग वाटतंय. न सोललेली कोलंबी वापरली तर चालेल का? सोलायचा कंटाळा नाही आला. पण सालाचं जे काही उतरतं त्याची चव जास्त चांगली लागते असं लेटेस्ट ऑब्झर्वेशन आहे.

धन्यवाद मंडळी!

>>बरट्यापुढे पोळ्या किती सात्विक दिसतायत. निळू फुले शेजारी जयश्री गडकरच... Lol

वेका, शाब्बास! तुम्ही आलं न घालण्याचा निर्णय घेऊन 'पुरानी परंपराओंकी जंजीरे' तोडताहात. Happy

>>सोलायचा कंटाळा नाही आला. पण सालाचं जे काही उतरतं त्याची चव जास्त चांगली लागते असं लेटेस्ट ऑब्झर्वेशन आहे.
बर्‍याच जणांना ती चव आवडते असं बघितलंय. आंबा आणि कोयी खाव्या तसं सालाच्या कोलंब्या खातात! Proud

पण सालं काढली नाही तर डीव्हेन कसं करणार? कोलंबीचं आतडं(?) खायला चालत असेल तर सालं न काढता शिजवता येईल. आकारानं मोठ्या कोलंब्या असतील तर आतड्यातली घाण जास्त असेल. त्याची कचकच न आवडणारे सालं सोलून व्हेन्स काढतात. बारक्यांचं चालून जावं. Happy

खाताना डिव्हेन करायला लागतं. पण यु इज म्हणिंग राइट ल्हान्यासाठी चालेल...

फार कामं लावता ब्वा...आता फ्रीज उघडणे आले...शुक्रवारी शाकाहारी सैपाक केला तर विकेंडपर्यंत उपोषणाला बसतील मंडळी.

फक्त शेपटा ठेवायच्या चव उतरण्यासाठी. मस्त लागते ह्या पद्ध्तीने कोलंबी. फोटो बघुन भुक लागली !

kolaMbi na solata barech lok vaapratat, pan tila devein kelyashivay majhya ghashakhali ti utarayachi naahi.

>>kolaMbi na solata barech lok vaapratat, pan tila devein kelyashivay majhya ghashakhali ti utarayachi naahi.

कोलंबीची अगदी सरधोपट का असेना, पण अ‍ॅनाटॉमी माहिती झाल्यावर ते खाणं खरंच कठीण आहे! Proud

नुस्त्या शेपट्या कश्या ठेवायच्या? काल सोलताना शेपटासगट सगळंच निघून येत होतं.

डीवेन करायचे पण साल ठेवायचे असे करता येते पण त्यासाठी कोलंबी ताजी फडफडीत हवी. फ्रोजन कोलंबीचे नाहीच जमत. Sad

सालीनं केला घोटाळा असं म्हणावं का?

स्वाती२ हे तुम्ही समजावू शकलात तर प्रयत्न करायला आवडेल. अर्थात फडफडीत कोलंबी मग ग्रोसरीच्या दिवशी प्लानिंग करावं लागेल. माझ्याकडे वाइल्ड कोलंब्या हमखास मिळायचं दुकान थोडं लांब आहे.

वेका,
ताजी कोलंबी असेल तर डोके काढायचे. मग एका हातात कोलंबी शक्य तितकी सरळ पकडून पटकन काळा धागा ओढायचा. न तुटता निघतो. कवच खाताना काढायचे. देशात असताना खाडीची ताजी कोलंबी मिळाली की अशा प्रकारे केली जायची.

कॉस्ट्कोमधे मिळतात शेल ऑन , पण डिव्हेन केलेल्या कोळंब्या .

धारदार सुरी असली तर घरी करु शकता, पण ते सोलण्यापेक्षा जास्त कठीण .

प्राजक्ता | 7 March, 2015 - 03:04

आज केल! बरोबर कावन पराठा आहे.>>>>>>> ओ प्राजक्तातै, त्या पराठ्याची रेस्पी टाका की.पापुद्रे पाहून जीव जळला.

ओह.

तुम्ही आलं न घालण्याचा निर्णय घेऊन 'पुरानी परंपराओंकी जंजीरे' तोडताहात.>>> जंजीरे नाही हो, ’जिंजर की पुरानी परंपरा’ तोडताहेत. Wink

सानी, प्राजक्ता, फोटो देखणे आहेत! Happy बरटं करून फोटो इथे टाकल्याबद्दल धन्यवाद!

नाठाळ, भारी होता! Lol

>>आम्ही सवतळलेली कोलंबी म्हणतो.
तुमची स. को. थोडी वेगळी दिस्तेय.

तव्यावर जरासं तेल घालून त्यात ठेचलेला लसूण लाल करायचा. त्यावर हळद, तिखट, मीठ आणि लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ लावलेली कोलंबी परतायची. एंड प्रॉडक्टला सवताळलेली कोलंबी म्हणायचं, असं शिकवण्यात आलं आहे. Happy

सगळे फोटो देखणे!

>>तव्यावर जरासं तेल घालून त्यात ठेचलेला लसूण लाल करायचा. त्यावर हळद, तिखट, मीठ आणि लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ लावलेली कोलंबी परतायची. एंड प्रॉडक्टला सवताळलेली कोलंबी म्हणायचं, असं शिकवण्यात आलं आहे.

>> +१

Pages