
वाटीभर स्वच्छ केलेल्या कोलंब्या
७-८ लसूण पाकळ्या. (भदाड्या लसणाच्या २-३)
भरपूर कोथिंबीर आणि झेपेल तितक्या हिरव्या मिर्च्यांचं वाटण- अर्धी वाटी
२ मोठे टोमॅटो (किंवा ३ टेबलस्पून टोमॅटो पेस्ट)
२ मोठे कांदे. (कॉस्टको कांदा -१)
हळद
तिखट
मीठ
पाव वाटी तेल (हिंम्मत असेल तर जास्त)
-कोलंब्यांना हिरवं वाटण, हळद आणि मीठ लावून तासभर मुरत ठेवायचं.
-तेल कडकडीत गरम करून त्यात लसूण ठेचून घालायचा. लाल होऊ द्यायचा.
-यावर बारीक चिरलेला कांदा गळून जाईपर्यंत परतायचा. (गळणारा घटक- कांदा)
-आता बारिक चिरलेले टोमॅटो किंवा टोमॅटो पेस्ट घालून तेल सोडेपर्यंत परतायचं.
-तिखटपूड घालून थोडं परतून घ्यायचं.
-कांदा-टोमॅटो भरपूर शिजून एकजीव झाल्यावर, तिखट घालून परतल्यावर, कोलंबी घालून २-३ मिनिटं परतायचं.
-बरटं तयार आहे.
-बरट्याला कुठलाही मसाला घालायचा नाही.
-आलं घालण्याचा विचारही मनात आणायचा नाही.
-कोलंबीच्या आकारानुसार शिजायला कमी अधीक वेळ लागेल. जास्तं शिजून चिवट व्हायला नको.
-पाणी घालून पातळ रस्सा करायचा नाही. पण अगदीच कोरडं वाटलं तर कोलंब्या परतून झाल्यावर, आच बंद करून, पाव कप कढत पाणी घालून मिसळायचं.
माझा प्रश्न सिंडीने विचारलाय.
माझा प्रश्न सिंडीने विचारलाय. फोटो मस्त दिसतोय. पुढच्यावेळी भारतात आलीस की माझ्या लेकीसाठी वाटीभर बरटं डब्यातून घेऊन ये.
फोटो पाहून एकदम
फोटो पाहून एकदम तो.पा.सु.
मस्त झणझणीत रेसिपी.
सॉरी उशीरा लिहितेय. रविवारी
सॉरी उशीरा लिहितेय. रविवारी केलं होतं मस्त झालेले.
भरपूर कोथिंबीर आणि झेपेल तितक्या हिरव्या मिर्च्यांचं वाटण- अर्धी वाटी>>> यातला फक्त मिरच्यांचं वाटण-अर्धी वाटी वाचले. मिरच्या कमी टाकल्यामुळे मसाला टाकला.
मी पण केले होते वीकांताला.
मी पण केले होते वीकांताला. खुप आवडले!!!
प्रतिक्रियांबद्दल आणि करून
प्रतिक्रियांबद्दल आणि करून बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
>>यातला फक्त मिरच्यांचं वाटण-अर्धी वाटी वाचले.
नाही हो नाही! अर्धी वाटी मिर्च्यांचं वाटण नाही. पण, "हॅ! हे कसलं तिखट! बरटं कसं कानातून वाफा काढणारं जहाल हवं. तरच मजा!" असं सुनवणार्यांच्या मज्जेखातर तसं योग्य प्रमाण आहे म्हणा!
काल संध्याकाळी बरटं केलं
काल संध्याकाळी बरटं केलं एकदाचं. रेसिपी प्रिंट करके रखो असं बाबाने, अन प्लीज राइट इट इन माय नोटबूक इन इन्ग्लिश असं बार्क्याने सांगितलंय ...
हेड ऑन श्रिम्प आणले होते चायना टाउनमधून , त्यामुळे जरा जास्तीच भारी झाले असावेत
प्लीज राइट इट इन माय नोटबूक
प्लीज राइट इट इन माय नोटबूक इन इन्ग्लिश असं बार्क्याने सांगितलंय ...>> हे फारच आवडले.
प्लीज राइट इट इन माय नोटबूक
प्लीज राइट इट इन माय नोटबूक इन इन्ग्लिश असं बार्क्याने सांगितलंय ..>> मानलं.
बरट्याने डोक्यात बरेच दिवस
बरट्याने डोक्यात बरेच दिवस घरटं केलं होतं. शेवटी विकांताला सालं आणि व्हेन काढलेली कोळंबी आणून जीव शांत केला. बच्चे कंपनीसाठी नुस्तं हिरवं वाटण लावलेलं व्हर्जन केलं. माझ्याक्डच्या मिरच्या बेताच्या तिखट आणि बिया काढलेल्या असतात त्यामुळे त्यांनी चापलं. आमच्या बरट्यात लाल तिखट घातलं. सगळ्या सुचना तंतोतंत फॉलो केल्या फक्त सवयीप्रमाणे कोळंब्यांना थोडं अमसूल लावलंच
टेस्ट मे बेस्ट. नेक्स्ट टाइम तेल थोडं कमी करून पाहिन. पाव वाटीनाही पण मी नेहमी घातलं असतं त्यापेक्षा जास्त तेल वापरलं होतं.
फोटू बिफोर आणि आफ्टर दोन्ही प्लेट. कोथिंबीर श्रेय ताजी ग्रोसरी
इतर वेळी केली असती तर एखादी काडी खोचली असती. एंजॉय आणि आभार्स दोघी बहिणी (मृ आणि मो)
आक्का वीकएंडला केलेला हा
आक्का वीकएंडला केलेला हा प्रकार, जबरी झाला.
चुकून स्वीट कांदा वापरला पण त्याने वेगळीच लज्जत आली असे धरतो.
वेका, भारी फोटो
वेका, भारी फोटो
वेका, फोटो झकास! दुसर्या
वेका, फोटो झकास! दुसर्या फोटोत (हहनुसार) कोथिंबीर जास्त पसरल्यामुळे बरट्याशी नीट नजरानजर होत नाही. फोटोकरता धन्यवाद!
असामी, वेका, बरटं करून इथे कळवल्याबद्दल थँक्स!
कोथिंबीर पसरल्यावर लक्षात
कोथिंबीर पसरल्यावर लक्षात आलंच होतं. म्ह्णून त्या एका कोलंबीवरचा पडदा बाजुला करून नजरानजर व्हायची (थोडी) सोय केलीय पहा बरं नीट
मृ तै, हे बरटं चिकन वापरून
मृ तै, हे बरटं चिकन वापरून केलं तर चालेल का ?
पाककृती बोले तो एकदम
पाककृती बोले तो एकदम तोंपसु............................
संडेकु करके देख्या, आवड्या...
संडेकु करके देख्या, आवड्या...
मृ..यापुढे '.... चं बरटं'...
मृ..यापुढे '.... चं बरटं'... '...चे लोणचे' असे मुख्य साहित्य नसलेली पाककृती टाक. लोक त्यात 'रिकाम्या जागा भरा' म्हणत त्याना आवडेल ते भरतील....
उदा...
. उकडीच्या बटाट्यांचं बरटं.
. वेज मान्चूरियन बरटं...
. सेलरीचं बरटं...
. पेने पास्टाचं बरटं
. बर्फाचं बरटं
वगैरे वगैरे...
देसाई,
देसाई,
बर्फाचं बरटं पण खरंच सांगू
बर्फाचं बरटं
पण खरंच सांगू का, काल भाजी घेताना डोक्यात घोळ झाला. डोळ्यासमोर हा वरचा मृणने दिलेला फोटो आणि मेधाची नवी कारल्याची भाजी असं तरंगत होतं. आज पाहते तो ही दोन वेगळी जगं आहेत. आता कारल्याचं बरटं करून तिसर्या जगाचे प्रश्न सोडवावेत का विचार चालू आहे.
माने, नाठाळ धन्यवाद! >>मृ
माने, नाठाळ धन्यवाद!
>>मृ तै, हे बरटं चिकन वापरून केलं तर चालेल का ?
प्रति-ध्वनि, अगदी युनिकॉर्नचं शिंग घालून केलं तरी चालेल. फक्त आलं घालू नका.
>>कोलंबीवरचा पडदा बाजुला करून नजरानजर व्हायची (थोडी) सोय
हे वाचून उगीचच 'रुख़ से जरा नकाब हटा़ लो..' आठवलं.
गोगा,

मग पुढलं पोस्ट येईलः कृपया व्हेज मंच्युरियनचं बरटं करताना मंच्युरियनमधलं आलं काढून टाकण्यासाठी काही खास टीप द्याल का?
आशू,
आशू,
अरारारा!
अरारारा!
अगदी युनिकॉर्नचं शिंग घालून
अगदी युनिकॉर्नचं शिंग घालून केलं तरी चालेल. फक्त आलं घालू नका. >>>
युनिकॉर्नचं शिंग >>>
युनिकॉर्नचं शिंग >>>
>> उकडीच्या बटाट्यांचं
>> उकडीच्या बटाट्यांचं बरटं
उकडता उकडता विनोद.
>> युनिकॉर्नचं शिंग

अगदी युनिकॉर्नचं शिंग घालून
अगदी युनिकॉर्नचं शिंग घालून केलं तरी चालेल >>> इकडे युनिकॉर्नचं शिंग मिळणं अवघड आहे. त्याऐवजी दुसर्या कोणाचं शिंग घातलं तर चालेल का?

अगदी युनिकॉर्नचं शिंग घालून
अगदी युनिकॉर्नचं शिंग घालून केलं तरी चालेल. फक्त आलं घालू नका. >>>

अगदीच बाई युनिक प्रतिसाद
उकडता उकडता विनोद . त्याऐवजी
उकडता उकडता विनोद

.
त्याऐवजी दुसर्या कोणाचं शिंग घातलं तर चालेल का? <<< कुणाचं घालाल? भाशिंग, रणशिंग, संताशिंग, की दाराशिंग. ??
इथे my choice असे उत्तर दिले
इथे my choice असे उत्तर दिले तर चालेल का आक्का ?
वा! तोंडाला पाणी
वा! तोंडाला पाणी सुटले...
कोलंबीचं लिप्तस असचं करतात. कांदा-टॉमेटो वर कोलंबीत अजिबात पाणी न घालता, जे होतं ते लिप्त.
मला असं वाटतं लाल कांदा, टॉमेटो, आलं लसुण गोळी, तिखट आणि वर कोलंबी असं एकत्र शिजवलं की लाल कांद्याचा रंग पालटतो व थोडा काळपट मिश्रण दिसतं.
कारण हेच साहीत्य घेउन थोडे घटक कमी जास्त केल्यास किंवा काढून टाकल्यास एवढा काळपट्पणा येत नाही असं माझं निरीक्षण आहे.
-कमळी.
Pages