भगर-आमटीतली आमटी

Submitted by मृण्मयी on 26 February, 2015 - 09:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाजलेले शेंगदाणे - वाटीभर
खवलेला ओला नारळ - अर्धी वाटी
उकडून सोललेला बटाटा - १. मध्यम आकाराचा.
दही - ३ वाट्या
५-६ कोकमं / आमसुलं
१ हिरवी मिर्ची (ऐच्छिक)
अर्धंपेर आलं (ऐच्छिक)
तिखटपूड (चवीनुसार)
मीठ
साखर
साजुक तूप
जिरं

क्रमवार पाककृती: 

-दही, तूप आणि जिरं सोडून बाकी सगळे जिन्नस एकत्र करून, थोडं पाणी घालून, मिक्सरमधून अगदी गंधासारखे बारीक वाटून घ्यावे.
- या पेस्टमध्ये आता दही घालून, नीट फेटून, आमटी जितकी पातळ हवी त्यानुसार पाणी घालावं.
-तूप-जिर्‍याच्या फोडणीत हे मिश्रण ओतून उकळी आणावी. किंवा मोठ्या भांड्यात दही-वाटण एकत्र केलं असेल तर त्यात वरून फोडणी ओतता येईल. पण उकळणं आवश्यक आहे.
-मीठ-साखर चवीनुसार वाढवता येईल.

aamati-bhagaribarobar-2-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
नुस्तीच प्यायची तर २ माणसांना जेमतेम पुरेल. भगरीबरोबर ३ माणसांना पुरवून खाता येईल.
अधिक टिपा: 

-यातले शेंगदाणे, बटाटा, दही, आमसुलं हे सगळे घटक चवी आणि आवडीनुसार कमी-जास्त करता येतात.
-हिरव्या मिरच्या आणि आलं न घालताही छान चव येते.
-लाल रंग हवा असेल तर चमचाभर साजुक तुपात काश्मिरी तिखट पोळवून आमटीत वरून ओतायचं.

माहितीचा स्रोत: 
(आमची मोनाडार्लिंग!) - बहीण
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहा! काय रंग आलाय सुरेख! मृ , तू अनेक वर्षांपूर्वी अशीच बटाटा घालून पण आमसूल नसलेली उपासाची आमटी माझ्या विपूत लिहिली होतीस. मी बरेचदा करते त्या पद्धतीने. Happy आता आमसूल घालून करेन.

आम्हीपण ह्याला दाण्याची आमटी म्हणतो पण दही नाही घालत. कोकम घालतो, ओले खोबरं (ऐच्छिक).

बटाटा, भोपळा पण ऐच्छिक.

दाणे पित्तकर असतातना त्यामुळे कोकम घातलेलं चांगलं.

जहबहराट!
करून खाणार.
samoसीड्स >>>> लक्षात ठेवले पाहिजे.(स्वगत)
परमन्टनेसपणा >>>>> Lol
लोखो,असेच भारतात जाऊन आल्यावर भारी भारी रेसप्या टाकत जा (अजुन एक उदा. हिरव्या मिरच्यांची भाजी)

हे हायब्रिड आहे - दाण्याची आमटी+सोलकढी + उपासाची बटाटा भाजी.
सुरेख दिसते. नक्की करणार (बटाटा कटाप मात्र. दाण्याची आमटी + सोलकढी एवढंच करणार). थँक्यू.

मृण, पीनट सूप नाव दे. Proud

किंवा पीपोयोको (पीनट, पोटॅटो, योगर्ट, कोकोनट) सूप. Proud

वर जवळपास सगळ्यांनीच लिहिल्याप्रमाणे दही, बटाटे आणि नारळ नवीन आहेत. त्यापैकी बहुधा नारळ घालून बघेन. Happy

बटाटा आणि खोबरं आमच्याकडे पण नाही घालत....दही किंवा चिंच-गूळ पण घालतात....कधी काहीच आंबट न घालता पण होते!

तुम्ही दिलेले व्हेरिएशन करून बघण्यात येईल!

फोटो मस्त आलाय मृण.

दही, बटाटे नवीन असं मी पण म्हणते गं शूम्पी Wink

दा.कु.त ओ.खो. एखादी हि.मि. घालून बाऽरीक वाटायचं. आमसूलाऐवजी आमची अम्मा ह्यात चिंच घालते. चवीला मीठ साखर आणि वरून तूप-लवंग-जिरं-सु.मि.ची फोडणी.

दा.कु.त ओ.खो. एखादी हि.मि. घालून बाऽरीक वाटायचं. आमसूलाऐवजी आमची अम्मा ह्यात चिंच घालते. चवीला मीठ साखर आणि वरून तूप-लवंग-जिरं-सु.मि.ची फोडणी.>> हीच माझी पण रेसीपी.

आम्ही वर्‍याचे तांदूळ असे म्हणतो. शेफ विकास खन्ना म्हणतात त्याप्रमाणे कमी इन्ग्रेडिअंट वापरून जबरदस्त चव आणता येते. वरील रेसीपीत. नारळ दही बटाटा हे सुपरफ्लुअस वाट्ते आहे. पण करून पाहिल्या शिवाय कळणार नाही. सो ओपिनिअन ऑन होल्ड. छानच लागत असणार. एक प्रकारचा रिचनेस येत असेल नारळाने, बटाटा फॉर व्हॉल्युम आणी दही आय डोंट नो इफ नीडेड. पण एक टेक्स्चर येत असेल.

ही डिश पंचतारांकित पद्धतीने सर्व्ह करता येते. :
वर्‍याच्या तांदुळाचा बेस. वर कुरकुरीत उपासाची बटाटा काचर्‍या भाजी भोवतीने हा दाण्याच्या आमटीचा सॉस. आणि सोबत काकडीची कोशिंबीर दह्यातली बोल मध्ये. एक उपासाची साबुदाण्याची पापडी तळून मधील पदार्थावर खोचता येते. की एकदम जय जय शिवशंकर वाटते. धिस इज माय मोस्ट फेवरैट कंफर्ट फूड.

छानच आहे रेसिपी..

आमची पद्धत-
१) १ वाटी भाजलेले शेंगदाणे
२) स्वादानुसार मिरची तुकडे/पेस्ट करुन
३) जिरे
४)तुप
५)मीठ
६) चिंच्/आमसुल
७) गुळ

शेंगदाणे अगदि बारिक वाटून घेणे. तुप-जिरे-मिरची तुकडे/पेस्ट ची फोडनी करणे , त्यात शेंगदाण्याचे कूट+मीठ पाण्यात मिसळून ओतणे. मग उकळी आली कि भिजवलेली चिंच्-गुळ आगळ / आमसूल- गुळ मिश्रणात घालणे. उकळल्या नंतर चिंच्-गुळ आगळ घातल्याणे थोडासा दाटपणा येण्यास मदत होते.
ही आंबट-गोड्-तिखट अशी आमटी वरई/भगर सोबत किंवा नुसती ओरपायला(तोपासू Wink ) ही मस्तच लागते.

ह्यात बदल म्हणून कधीतरी उकड्लेल्या बटाट्याच्या फोडीही घालते. छान लागते

हो आम्ही पण याला दाण्याची आमटी म्हणतो.. पण बटाटा नाही वापरत. हरकत नाही बटट्याने थोडा पातळ्पणा कमी होइल.. करून बघायला हरकत नाही. आमसुल किवा चिंचेचा कोळ घातला की एक मस्त स्वाद येतो
मृण्मयी आवडली पाककृती.___/\___

मलाही बटाट्याची अ‍ॅडिशन आवडली. नुसती खूपच पातळ होते. बटाट्याने त्याला जीव येईल जरा. पण वर्‍याचे तांदूळ चटकन अळतात आणि नंतर कोरडेही होत जातात. त्यामुळे ही आमटी जास्तीतजास्त पातळ ठेवण्याकडे कल असतो.
वरून जिर्‍याची खमंग फोडणी द्यायची आणि कोथिंबीर 'भुरभुरवायची' Happy भारी लागते मग.

वरी, दाणे सगळंच पित्तकर. त्यामुळे आंबटपणा हवाच. आमसूल, चिंच, दही काहीही घाला, पण घाला.

सगळ्यांसारखच मी पण बटाटा नाही घालत. पूनमने म्हंटलय तस "जास्तीतजास्त पातळ ठेवण्याकडे कल असतो"
आणि आमसूल किंवा दही घालते. पण आता दोन्ही घालुन आणि बटाटा पण घालुन करुन बघेन. Happy

आमटीमधील बटाट्याला का ही.फी करताय्त सगळे, बटाटा कुठेही टाका, मस्तच लागतो. फक्त तो मिक्सरमधून काढल्यावर मिश्रण चिकट होईल असे वाटते. नुसतच लहान चौकोनी फोडी करून घातल्यास बेष्ट लागेल.

बटाटा किसून घातल्यास आमटी (आमच्यात उपासाचे सांबार!) मिळून येत नाही (का माहीत नाही.)

मृ, जुनी करायला ठेवलेले लक्षात हाय का ठेवून विस्रून गेलीस?

आम्ही बटाटा घालुन दह्याची करतो,,
किंवा आमसुलाच्या साराची दाण्याचा कुट लावुन करतो,,,
बाकी फोटो एक दम तो पा सु...

बटाटा बिग नो नो असल्याने, विदाऊट बटाटा आणि दही केली. आमसुल चव अप्रतिम!! आई नेहमी मिरे घालते, म्हणुन ते फक्त अ‍ॅड केले. धन्यवाद मृण्मयी Happy

Pages