पधारो म्हारो देस

Submitted by मनीमोहोर on 22 February, 2015 - 10:27

खूप दिवस मरुभूमीला भेट द्यायचं मनात होतं. ह्याच मुख्य कारण म्हणजे तिथली पूर्ण वेगळी भौगोलिक परिस्थिती. तो योग अलीकडेच जुळून आला आणि ह्या महिन्याच्या सुरवातीला आम्ही जोधपूर , बिकानेर आणि जैसलमेर अशी सहल करुन आलो. कोणत्याही एजंटची मदत न घेता ही सहा दिवस आणि पाच रात्रीची ट्रिप ( अगदी रेल्वे रिझर्वेशनला सुदधा ) आम्ही नेट च्या सहायाने सगळी महिती मिळवून फार उत्तम रितीने पूर्ण केली म्हणून इथे लिहीत आहे. आपली आपण केलेली ट्रिप आपण जास्त एंजॉय करतो कारण भेट द्यायच्या ठिकाणाची थोडी तरी महिती आपण मिळवलेली असते. चांगल्या हॉटेल मध्ये निवास, जोधपुर ते जोधपूर इनोवा कार , उत्तम शाकाहारी जेवण ( कैर सांगरी भाजी, दाल बाटी, चुरमा, गट्टे का साग, प्याज / मावा कचौरी, मिर्ची बडा, माखनीया लस्सी अशा लोकल डेलिकसी सह) करुनही ही ट्रिप ट्रॅवल कं पेक्षा खूप स्वस्त झाली आणि जास्त मजा ही आली. जर कोणाला जायच असेल तर हा धागा नक्की उपयोगी होईल.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काही माबोकरानी ट्रिप ची आखणी कशी केली ते विचारले आहे म्हणून इथे लिहीते. आहे.

सर्व प्रथम मारवाड बघायचे निश्चित केले आणि नेट वरुन वरील तीन ठिकाणी जायचे ठरविले.

१) ट्रेन डिसाईड करताना पहाटे पोचणारी ट्रेन टाळली आणि सकाळी दहा वाजता पोचणारी ट्रेन घेतली. त्यामूळे
झोप व्यवस्थित झाली आणि हॉटेलचा एक दिवसाचा चार्ज वाचला. तसेच ट्रेन पुढे बिकानेरला जाणार होती तरी जोधपूरलाच उतरलो कारण ती ट्रेन पुढे पॅसेंजर सारखी स्लो होत होती. तसेच जोधपूर ते जोधपूर इनोवा करण ही सोईचचं होतं

२) ट्रिप अ‍ॅडवायजर वर रिव्ह्यु बघुन आणि टॅरिफ कंपेअर करुन जोधपूरला देवी भवन हेरिटेज हॉटेल बुकिंग डॉट कॉम वरुन एक दिवसासाठी बुक इथुनच करुन ठेवले होते. पहिल्या दिवसाचं हॉटेल इथुनच बुक करावं कारण तेंव्हा आपल्या हातात वहान नसत, आपण प्रवासाने दमलेले असतो. रिक्षाने हॉटेल शोधण्यात वेळ आणि ताकद दोन्ही खर्ची पडते. जैसलमेर आणि बिकानेर ची हॉटेलं बुक केली नव्हती. तिथे प्रत्यक्ष जाउनच बुकिंग केले. दोन्ही ठिकाणी खूप डिस्काऊंट मिळाला.

३) इनोवा एसी गाडी हॉटेलच्या ट्रॅवल डेस्क वरुन घेतली.

४) साईट सीईंगची ठिकाणं ही नेट वरुन ठरवली होती आणि त्या त्या हॉटेल मॅनेजर कडून ती कन्फर्म करुन घेतली.

ट्रिप ची आयटिनररी अशी होती

१ ला दिवस- जोधपूर ( मेहरणगढ, जसवंत ठडा, क्लॉक टॉवर आणि शहरात फेरफटका )
२ रा दिवस - सकाळी जोधपूरचा उमेद पॅलेस बघुन बिकानेरला पोचणे . ( वाटेत करणीमाता मंदिर - उंदराना अभय असणारे आणि आवारात हजारोंनी उंदीर असणारे एकमेव मंदिर )
३ रा दिवस - सकाळी जुनागढ आणि लालगढ पॅलेस , दुपारी आराम आणि संध्याकाळी ऊंट सेंटर
४ था दिवस -- बिकनेर ते जैसलमेर . -- संध्याकाळी जैसलमेर लेक आणि पपेट शो
५ वा दिवस- जैसलमेर दर्शन सकाळी ( फोर्ट , हवेल्या, शॉपिंग असल्यास, जेवण, दुपारी आराम. सन्ध्याकाळी ड्युन्स ला जीप आणि कॅमल राईड, सन सेट बघणे चांदण्या रात्री लोकल कलाकारांचा मनोरंजनाचा कार्यक्रम,
जेवण . हे चुकवु नये. फार छान वाटत.
६ वा दिवस सकाळी आराम करुन बारा वाजता निघालो. पाच वाजता देवी भवन ला ( जोधपूर हॉटेल) जाऊन फ्रेश झालो. रात्रीच्या जेवणासाठी डिनर पॅक करुन घेतलं ( फोन वर ऑर्डर दिली होती ) आणि गाडीत बसलो.
एवढे दिवस अगदी योग्य होतात. घाई जराही होत नाही. आणि कंटाळा ही येत नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुंबईहुन रणकपूर एक्सप्रेस ने दुपारी तीन ला निघलो आणि दुसर्‍या दिवशी सकाळी दहाच्या सुमारस जोधपूरला पोचलो. हॉटेल च रिझर्वेशन झालेलं असल्यामुळे हॉटेल शोधण्यात वेळ गेला नाही. हवा थंड होती. हॉटेल छान होत. त्याच दिवशी दुपारी जोधपूरचा मेहरणगढ किल्ला बघायला बाहेर पडलो. हा किल्ला अगदी भर शहरात आहे. आणि खूप सुस्थितीत आहे. स्वच्छ आहे. आता सरकारच्या ताब्यात आहे. किल्ला आणि राजघराण्यातील वस्तु म्युझियमच्या रुपाने इथे जतन केल्या गेल्या आहेत. वर जाण्यासाठी लिफ्ट ची सोय आहे आणि किल्ला दखवण्यासाठी चांगले गाईड ही वाजवी दरात्त उपलब्ध आहेत. इथे असलेल्या अनेक तोफांपैकी ही एक

From mayboli

जोधपूरला बहुतेक घरांना निळा रंग देण्याची प्रथा असल्याने ह्या शहराला ब्लु सिटी असे ही म्हटले जाते.

From mayboli

हा किल्ला आतुन

From mayboli

सगळी कलाकुसर दगडातली आहे

From rajasthan- marwad

आतील जतन केलेल्या वस्तु -- पालखी

From mayboli

हस्तिदंती बॉक्स -- नक्षीकाम केलेला

From mayboli

हे उंटाच्या कातड्यापासून बनविलेले गालिचा सरकु नये म्हणून गालिच्यावर ठेवायचे ठोकळे

From rajasthan- marwad

ह्या तलवारी

From rajasthan- marwad

महालाचे सुशोभित छत

From rajasthan- marwad

हा आहे राजदरबार

From rajasthan- marwad

एका दालनात राजघराण्यातील बाळांचे पाळणे जतन करुन ठेवले आहेत हा त्या पैकीच एक

From mayboli

किल्ल्याच्या जवळच जसवंत ठ्डा ही जसवंत सिंग महाराजांची समाधी आहे

From rajasthan- marwad

त्यासमोरच अशी सुंदर बाग आहे. पाण्याची कमी असुन ही एवढी फुलवली आहे म्हणून जास्त कौतुक. हे ठिकाण ही स्वच्छ आणि व्यवस्थित राखलेले आहे.
From rajasthan- marwad

जवळच आहे हा छोटासा तलाव. छोटा असला तरी राजस्थानातील जिथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे तिथला असल्यामुळे ह्याच अप्रूप आहे.

From rajasthan- marwad

दुसर्‍या दिवशी सकाळी उमेद पॅलेस हा राजवाडा बघायला गेलो. ह्या राजवड्यात सध्या राजघराण्याचे वास्तव्य आहे. काही भागाच एक पंचतारांकित हॉटेल मध्ये रुपांतर केल आहे आणि काही भाग हा सामान्य जनतेला पहाण्यासाठी राखून ठेवला आहे.

From rajasthan- marwad

जेवणाचं टेबल

From rajasthan- marwad

From rajasthan- marwad

पॅलेसचं प्रांगण

From rajasthan- marwad

दुसरा मुक्काम पडला बिकानेरला. तिथे जुनागढ आणि लालगढ हे दोन किल्ले पहाण्यासारखे आहेत.
तिथे ही मेहरण गढ प्रमाणेच निरनिराळ्या वस्तु आणि महाल जतन केले गेले आहेत.

हे राजदरबाराच सिलींग आणि सुशोभित भिंती.

From rajasthan- marwad

बिकानेरला उंटाची पैदास आणि संशोधन केंद्र आहे. हा भारत सरकारचा उपक्रम आहे. भारतीय लष्करासाठी लागणारे उंट इथुनच नेले जातात. हे केंद्र ही स्वच्छ आणि मेंटेन केलेले आहे. इथे उंटीणीच्या दूधापासून बनविलेले चहा, कॉफी, कुल्फी असे पदार्थ मिळतात. चवीला अगदी किंचित आंबटसर, पण एकदा ट्राय करावेत.
ऊंटीण आपल्या बाळासह
From mayboli

तिथेच मावळतीच्या किरणात चमकणारी ही पोपटांची जोडी

From mayboli

राजस्थान मधले रस्ते अतिशय सुंदर आहेत. अगदी सपाट आणि सरळ. एक पैशाचा ही टोल लागला नाही एवढ्या प्रवासात. पण रस्त्याच्या दुतर्फा फक्त बाभळीची झाडं ... मनुष्य वस्तीचं नाव नाही. शेती नाही. अगदी थोडी तुरळक शेती दिसते ती ही हल्ली बांधलेल्या इंदिरा कॅनॉल मुळे.

From mayboli

आता तिसरा टप्पा होता जैसलमेरचा. इथे पिवळ्या दगडाचं बांधकाम असल्यामुळे ह्या शहराला सुवर्णनगरी असं ही म्हणतात. इतका दुष्काळी भाग असुनही इथे एक लेक ( तलाव) आहे. त्याचं नाव आहे गडेसर लेक.

From mayboli

इथले मुख्य आकर्षण म्हणजे जैसलमेर फोर्ट आणि आता हेरिटेज झालेल्या पटवान किंवा नथमल यांच्या हवेल्या

From rajasthan- marwad

हे नक्षीकाम

From rajasthan- marwad

From rajasthan- marwad

जैसलमेर पासून ४० किमी अंतरावर सँड ड्युन्स म्हणजे वाळूच्या टेकड्या आहेत. हे बघितल्याशिवाय ही ट्रिप पूर्ण होऊच शकत नाही. इथे जीप आणि उंटाच्या राईड असतात. वाळू मधून नेणारी जीप राईड साहसी आहे पण मजा येते. सगळीकडे फक्त वाळू आणि वाळू . इथून सूर्यास्त खूप छान दिसतो.

From rajasthan- marwad

From rajasthan- marwad

From rajasthan- marwad

पौर्णिमेचा चंद्र

From mayboli

धावडवलेला उंट
From rajasthan- marwad

From rajasthan- marwad

ह्या ठिकाणी आपण टेंट मध्ये राहु शकतो. ते चांगले आहेत पण आम्ही रहिलो नव्हतो. तसेच ह्या परिसरात रात्री उधड्यावर स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम आणि जेवण असे आयोजित करणार्‍या एजन्सीज आहेत. ते जरुर एंजॉय करावं

अशी ही मारवाड ची ट्रिप करुन सूर्य नगरी एक्स्प्रेस ने आम्ही घरी परतलो

From mayboli

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ममो, छान वर्णन व प्रचि . १५ वर्षापूर्वी जैसलमर उदयपुर व जयपुर अशी सहल केली होती... आठवणी जागवल्या..

वॉव, ममो मस्त ,सुखद झालेली दिस्तीये ट्रिप.. सुपर फोटोज..

हवेली ,राजवाड्यांची शान अजून टिकवलीये , मस्त!!!

उंट मायलेक, पोपटांची जोडी क्यूट आहे.. उंटाचं इतकं लहान पिलू पहिल्यांदाच पाहिलं..

छान फोटो आणि माहिती.

कोणाकडून बूकिंग करून घेतलं आणि माणशी साधारण किती खर्च आला ही माहिती लिहाल का?

धन्यवाद सर्वांना.

स्वतः गेल की कुठे ही तडजोड किंवा काटकसर न करता निम्म्या खर्चात ट्रिप होते. होमवर्क कराव लागत पण ते ही

आनंददायीच असतं .

जिप्सी, तुझ्या फोटोंची मी फॅन आहे त्यामुळे प्रतिसादाबद्दल विशेष धन्यवाद.

वर्षु, अजुन ही हवेल्या आणि राजवाडे खूप सुस्थितीत आहेत. आता काही हेरिटेज मध्ये समाविष्ट झाले आहेत.

आम्ही जैसलमेर ला एका तीन शे वर्ष जुन्या हेरिटेज हवेलीत राहिलो होतो. तो एक वेगळाच अनुभव होता.

उंटाचं इतकं लहान पिलू पहिल्यांदाच पाहिलं..>>>>+१

़खुप सुंदर फोटो आणि उपयुक्त माहिती.

छानच फोटो. आपली आपण प्लॅन केली ते पण चांगले. आपल्याला हवे तसे भटकू शकतो आपण.
( मला कधी जायला मिळणार ? )

धन्यवाद सर्वांना

मंजूडी, आम्ही कोणत्याही एजंट कडुन बुकिंग करुन घेतल नव्हत. सगळ आमच आम्हीच केलं मस्त झालं वर्क आऊट. आम्ही नेहमीच आमचे आम्हीच जातो. आत्ता पर्यंत मी एकदा ही टॅवल कं बरोबर गेलेली नाहीये.

फोटो आणि माहिती छान आहे पण अजून details देता आल्यातर पहा ना. म्हणजे ट्रिपला साधारण किति दिवस लागले, काय काय must see आहे, ते पाहायला लागणारा कालावधी, खाद्य्-हॉटेल्स कुठे काय खावे , काय प्रसिद्ध आहे, हॉटेल- कार् booking बद्द्ल माहीती (म्हणजे मला ready to go plan मिळेल Wink ).

मस्तच! आपण आपलं प्लॅन करत असू तर मस्तपैकी सहलीचा ज्वर राहातो. निम्म्या खर्चात ट्रिप होते हा फायदा आहेच! Happy
तुम्ही कसं कसं आखलं, साधारण खर्च किती आला, साईट्स कुठल्या वापरल्या याची जनरलाईज्ड माहीती देऊ शकाल का? त्या माहीतीचा मोलाचा फायदा होऊ शकेल.

धन्यवाद सर्वांना. ट्रिप ची आखणी कशी केली या बद्दल हेडर मध्येच लिहीते म्हणजे ते कायमच पहिल्या पानावर दिसेल.

Pages