पधारो म्हारो देस

Submitted by मनीमोहोर on 22 February, 2015 - 10:27

खूप दिवस मरुभूमीला भेट द्यायचं मनात होतं. ह्याच मुख्य कारण म्हणजे तिथली पूर्ण वेगळी भौगोलिक परिस्थिती. तो योग अलीकडेच जुळून आला आणि ह्या महिन्याच्या सुरवातीला आम्ही जोधपूर , बिकानेर आणि जैसलमेर अशी सहल करुन आलो. कोणत्याही एजंटची मदत न घेता ही सहा दिवस आणि पाच रात्रीची ट्रिप ( अगदी रेल्वे रिझर्वेशनला सुदधा ) आम्ही नेट च्या सहायाने सगळी महिती मिळवून फार उत्तम रितीने पूर्ण केली म्हणून इथे लिहीत आहे. आपली आपण केलेली ट्रिप आपण जास्त एंजॉय करतो कारण भेट द्यायच्या ठिकाणाची थोडी तरी महिती आपण मिळवलेली असते. चांगल्या हॉटेल मध्ये निवास, जोधपुर ते जोधपूर इनोवा कार , उत्तम शाकाहारी जेवण ( कैर सांगरी भाजी, दाल बाटी, चुरमा, गट्टे का साग, प्याज / मावा कचौरी, मिर्ची बडा, माखनीया लस्सी अशा लोकल डेलिकसी सह) करुनही ही ट्रिप ट्रॅवल कं पेक्षा खूप स्वस्त झाली आणि जास्त मजा ही आली. जर कोणाला जायच असेल तर हा धागा नक्की उपयोगी होईल.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काही माबोकरानी ट्रिप ची आखणी कशी केली ते विचारले आहे म्हणून इथे लिहीते. आहे.

सर्व प्रथम मारवाड बघायचे निश्चित केले आणि नेट वरुन वरील तीन ठिकाणी जायचे ठरविले.

१) ट्रेन डिसाईड करताना पहाटे पोचणारी ट्रेन टाळली आणि सकाळी दहा वाजता पोचणारी ट्रेन घेतली. त्यामूळे
झोप व्यवस्थित झाली आणि हॉटेलचा एक दिवसाचा चार्ज वाचला. तसेच ट्रेन पुढे बिकानेरला जाणार होती तरी जोधपूरलाच उतरलो कारण ती ट्रेन पुढे पॅसेंजर सारखी स्लो होत होती. तसेच जोधपूर ते जोधपूर इनोवा करण ही सोईचचं होतं

२) ट्रिप अ‍ॅडवायजर वर रिव्ह्यु बघुन आणि टॅरिफ कंपेअर करुन जोधपूरला देवी भवन हेरिटेज हॉटेल बुकिंग डॉट कॉम वरुन एक दिवसासाठी बुक इथुनच करुन ठेवले होते. पहिल्या दिवसाचं हॉटेल इथुनच बुक करावं कारण तेंव्हा आपल्या हातात वहान नसत, आपण प्रवासाने दमलेले असतो. रिक्षाने हॉटेल शोधण्यात वेळ आणि ताकद दोन्ही खर्ची पडते. जैसलमेर आणि बिकानेर ची हॉटेलं बुक केली नव्हती. तिथे प्रत्यक्ष जाउनच बुकिंग केले. दोन्ही ठिकाणी खूप डिस्काऊंट मिळाला.

३) इनोवा एसी गाडी हॉटेलच्या ट्रॅवल डेस्क वरुन घेतली.

४) साईट सीईंगची ठिकाणं ही नेट वरुन ठरवली होती आणि त्या त्या हॉटेल मॅनेजर कडून ती कन्फर्म करुन घेतली.

ट्रिप ची आयटिनररी अशी होती

१ ला दिवस- जोधपूर ( मेहरणगढ, जसवंत ठडा, क्लॉक टॉवर आणि शहरात फेरफटका )
२ रा दिवस - सकाळी जोधपूरचा उमेद पॅलेस बघुन बिकानेरला पोचणे . ( वाटेत करणीमाता मंदिर - उंदराना अभय असणारे आणि आवारात हजारोंनी उंदीर असणारे एकमेव मंदिर )
३ रा दिवस - सकाळी जुनागढ आणि लालगढ पॅलेस , दुपारी आराम आणि संध्याकाळी ऊंट सेंटर
४ था दिवस -- बिकनेर ते जैसलमेर . -- संध्याकाळी जैसलमेर लेक आणि पपेट शो
५ वा दिवस- जैसलमेर दर्शन सकाळी ( फोर्ट , हवेल्या, शॉपिंग असल्यास, जेवण, दुपारी आराम. सन्ध्याकाळी ड्युन्स ला जीप आणि कॅमल राईड, सन सेट बघणे चांदण्या रात्री लोकल कलाकारांचा मनोरंजनाचा कार्यक्रम,
जेवण . हे चुकवु नये. फार छान वाटत.
६ वा दिवस सकाळी आराम करुन बारा वाजता निघालो. पाच वाजता देवी भवन ला ( जोधपूर हॉटेल) जाऊन फ्रेश झालो. रात्रीच्या जेवणासाठी डिनर पॅक करुन घेतलं ( फोन वर ऑर्डर दिली होती ) आणि गाडीत बसलो.
एवढे दिवस अगदी योग्य होतात. घाई जराही होत नाही. आणि कंटाळा ही येत नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुंबईहुन रणकपूर एक्सप्रेस ने दुपारी तीन ला निघलो आणि दुसर्‍या दिवशी सकाळी दहाच्या सुमारस जोधपूरला पोचलो. हॉटेल च रिझर्वेशन झालेलं असल्यामुळे हॉटेल शोधण्यात वेळ गेला नाही. हवा थंड होती. हॉटेल छान होत. त्याच दिवशी दुपारी जोधपूरचा मेहरणगढ किल्ला बघायला बाहेर पडलो. हा किल्ला अगदी भर शहरात आहे. आणि खूप सुस्थितीत आहे. स्वच्छ आहे. आता सरकारच्या ताब्यात आहे. किल्ला आणि राजघराण्यातील वस्तु म्युझियमच्या रुपाने इथे जतन केल्या गेल्या आहेत. वर जाण्यासाठी लिफ्ट ची सोय आहे आणि किल्ला दखवण्यासाठी चांगले गाईड ही वाजवी दरात्त उपलब्ध आहेत. इथे असलेल्या अनेक तोफांपैकी ही एक

From mayboli

जोधपूरला बहुतेक घरांना निळा रंग देण्याची प्रथा असल्याने ह्या शहराला ब्लु सिटी असे ही म्हटले जाते.

From mayboli

हा किल्ला आतुन

From mayboli

सगळी कलाकुसर दगडातली आहे

From rajasthan- marwad

आतील जतन केलेल्या वस्तु -- पालखी

From mayboli

हस्तिदंती बॉक्स -- नक्षीकाम केलेला

From mayboli

हे उंटाच्या कातड्यापासून बनविलेले गालिचा सरकु नये म्हणून गालिच्यावर ठेवायचे ठोकळे

From rajasthan- marwad

ह्या तलवारी

From rajasthan- marwad

महालाचे सुशोभित छत

From rajasthan- marwad

हा आहे राजदरबार

From rajasthan- marwad

एका दालनात राजघराण्यातील बाळांचे पाळणे जतन करुन ठेवले आहेत हा त्या पैकीच एक

From mayboli

किल्ल्याच्या जवळच जसवंत ठ्डा ही जसवंत सिंग महाराजांची समाधी आहे

From rajasthan- marwad

त्यासमोरच अशी सुंदर बाग आहे. पाण्याची कमी असुन ही एवढी फुलवली आहे म्हणून जास्त कौतुक. हे ठिकाण ही स्वच्छ आणि व्यवस्थित राखलेले आहे.
From rajasthan- marwad

जवळच आहे हा छोटासा तलाव. छोटा असला तरी राजस्थानातील जिथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे तिथला असल्यामुळे ह्याच अप्रूप आहे.

From rajasthan- marwad

दुसर्‍या दिवशी सकाळी उमेद पॅलेस हा राजवाडा बघायला गेलो. ह्या राजवड्यात सध्या राजघराण्याचे वास्तव्य आहे. काही भागाच एक पंचतारांकित हॉटेल मध्ये रुपांतर केल आहे आणि काही भाग हा सामान्य जनतेला पहाण्यासाठी राखून ठेवला आहे.

From rajasthan- marwad

जेवणाचं टेबल

From rajasthan- marwad

From rajasthan- marwad

पॅलेसचं प्रांगण

From rajasthan- marwad

दुसरा मुक्काम पडला बिकानेरला. तिथे जुनागढ आणि लालगढ हे दोन किल्ले पहाण्यासारखे आहेत.
तिथे ही मेहरण गढ प्रमाणेच निरनिराळ्या वस्तु आणि महाल जतन केले गेले आहेत.

हे राजदरबाराच सिलींग आणि सुशोभित भिंती.

From rajasthan- marwad

बिकानेरला उंटाची पैदास आणि संशोधन केंद्र आहे. हा भारत सरकारचा उपक्रम आहे. भारतीय लष्करासाठी लागणारे उंट इथुनच नेले जातात. हे केंद्र ही स्वच्छ आणि मेंटेन केलेले आहे. इथे उंटीणीच्या दूधापासून बनविलेले चहा, कॉफी, कुल्फी असे पदार्थ मिळतात. चवीला अगदी किंचित आंबटसर, पण एकदा ट्राय करावेत.
ऊंटीण आपल्या बाळासह
From mayboli

तिथेच मावळतीच्या किरणात चमकणारी ही पोपटांची जोडी

From mayboli

राजस्थान मधले रस्ते अतिशय सुंदर आहेत. अगदी सपाट आणि सरळ. एक पैशाचा ही टोल लागला नाही एवढ्या प्रवासात. पण रस्त्याच्या दुतर्फा फक्त बाभळीची झाडं ... मनुष्य वस्तीचं नाव नाही. शेती नाही. अगदी थोडी तुरळक शेती दिसते ती ही हल्ली बांधलेल्या इंदिरा कॅनॉल मुळे.

From mayboli

आता तिसरा टप्पा होता जैसलमेरचा. इथे पिवळ्या दगडाचं बांधकाम असल्यामुळे ह्या शहराला सुवर्णनगरी असं ही म्हणतात. इतका दुष्काळी भाग असुनही इथे एक लेक ( तलाव) आहे. त्याचं नाव आहे गडेसर लेक.

From mayboli

इथले मुख्य आकर्षण म्हणजे जैसलमेर फोर्ट आणि आता हेरिटेज झालेल्या पटवान किंवा नथमल यांच्या हवेल्या

From rajasthan- marwad

हे नक्षीकाम

From rajasthan- marwad

From rajasthan- marwad

जैसलमेर पासून ४० किमी अंतरावर सँड ड्युन्स म्हणजे वाळूच्या टेकड्या आहेत. हे बघितल्याशिवाय ही ट्रिप पूर्ण होऊच शकत नाही. इथे जीप आणि उंटाच्या राईड असतात. वाळू मधून नेणारी जीप राईड साहसी आहे पण मजा येते. सगळीकडे फक्त वाळू आणि वाळू . इथून सूर्यास्त खूप छान दिसतो.

From rajasthan- marwad

From rajasthan- marwad

From rajasthan- marwad

पौर्णिमेचा चंद्र

From mayboli

धावडवलेला उंट
From rajasthan- marwad

From rajasthan- marwad

ह्या ठिकाणी आपण टेंट मध्ये राहु शकतो. ते चांगले आहेत पण आम्ही रहिलो नव्हतो. तसेच ह्या परिसरात रात्री उधड्यावर स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम आणि जेवण असे आयोजित करणार्‍या एजन्सीज आहेत. ते जरुर एंजॉय करावं

अशी ही मारवाड ची ट्रिप करुन सूर्य नगरी एक्स्प्रेस ने आम्ही घरी परतलो

From mayboli

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहीती आणो फोटो सगळेच मस्त Happy

फक्त जयपुर थोडेफार बघून झाले आहे. बाकीचे राजस्थान शिल्लक आहे Sad

तुमी कधी गेला होतात? म्हणजे कुठल्या सिझनमधे?

सहियेत फोटो !

आमच्याकडे या राजस्थानची क्रेझ कुतुहल आहे, मी सोडून, त्यामुळेच आतापावेतो कोणाचेच जाणे झाले नाहीये.

फोटो खूपच छान आलेत. आणि माहितीपण मनापासून लिहिलेली कळतेय, सगळं वाचून लगेच जायची इच्छा झाली. इतक्यात जाणं शक्य नाहीये, पण ह्याचा जाऊ तेव्हा नक्की उपयोग होईल. धन्यवाद. Happy

धन्यवाद सर्वांना परत एकदा फोटो आवडल्याचे लिहील्याबद्दल.
नताशा, आम्ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो. तिकडे फक्त थंडीतच जाऊ शकतो. उन्हाळ्यात शक्यच नाही होणार आपल्याला. ड्युन्स तर जून जुलै मध्ये बंदच असतात. सन स्ट्रोक ची भीती असते म्हणून.

दिनेश दा, हो लिहीते ट्रिप अ‍ॅडवायजर वर ही.
ट्रिप प्लॅन करण हा माझ्या आनंदाचा भाग आहे. मला खूप आवडतं ट्रिप साठी होम वर्क करायला.
ह्या लिंकचा उपयोग झाला तर आनंदच होईल मला. म्हणून तर एवढ्या सविस्तर लिहीले.

खूप सुंदर फोटो. पोपटांची जोडी खूप आवडली.
जैसलमेर आणि बिकानेर ची हॉटेल बुक केली नव्हती. तिथे प्रत्यक्ष जाउनच बुकिंग केले. दोन्ही ठिकाणी खूप डिस्काऊंट मिळाला. <<<< मनीमोहर प्लीज त्या हॉटेल्सची शक्य असेल तर नाव आणि फोन नंबर द्या. तसेच चविष्ट जेवण कुठे केल त्यांचे फोन नंबर्स असतील तर द्या. अनोळखी ठिकाणी गेल की जेवणाचे हाल होतात. पण माहितीच ठिकाण असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही.

हा परिसर आधीच पहिला आहे. अतिशय सुरेख छायाचित्र आणि माहिती सुद्धा Happy
हेडर मधली डिटेल माहिती ही आवडली पण माणशी साधारण किती खर्च आला ही माहिती लिहाल का?

दोन वर्षाँपूर्वी कोटा ते राणकपूर बजेट ट्रीप केली होती इथे मागे बाफ टाकला होता. नंतर ही जोध -बिका- जैस॰ मरुभुमि सहल करू असं ठरवलं होतं. परंतू प्रत्येक राजवाड्यातली चित्रं-इतिहास-शस्त्र-पालख्या-हौदे पाहून कंटाळा आला होता.
लेखात नंतर टाकलेली ट्रीप माहिती आराखडा आवडला.पुढे जाणाऱ्यांस उपयुक्त आहे. संपूर्ण राजस्थानास चोवीस दिवस पाहिजेत आठ दिवसाच्या तीन ट्रीप कराव्यात आणि मध्ये कर्नाटक /केरळ/ओडीशा करावा.

मनीमोहोर, अतिशय सुरेख आणि उपयोगी लेख आहे. फोटोही सुंदर आहेत.

राजस्थान (आणि केरळ, गोवा वगैरे) हे परदेशी पर्यटकांच्या यादीवरचं पहिलं ठिकाण आहे. त्यामुळे सर्व किल्ले, महाल, बागा वगैरेंची अतिशय उत्तम निगराणी राखली जाते. काही का निमित्ताने असावा, आपल्या देशाचा संपन्न वारसा जतन केला जातोय हे महत्त्वाचं.

वाह....मेहेरेणगढ किल्ला, आतले वाडे, दगडी कलाकुसर, नक्षीकाम असलेले छत, जसवंत सींग यांची समाधी, ऊम्मेद पॅलेस, बाग काय पाहु आणि किती पाहु अस होतंय.
तुमच्यामुळे माझी पण राजस्थान ची सफर झाली, अगदी घरबसल्या. कधी तिथे गेलेच तर तुमचीच इटनेरी फॉलो करीन.

जैसलमेर तर मी पाहिले नाही पण जोधपुर पाहिले आहे अन बीकानेर बद्दल काय बोलावे कारण बीकानेर माझी सासुरवाड़ी आहे, वाळवंट प्रचंड जास्त सुंदर प्रकार असतो, मला ते रांगडे सौंदर्य प्रचंड आवडते , करणीमाता मंदिर देशनोक ला आहे (बीकानेर पासुन ३५-४० किमी अंतर), आपल्याला तिथे पांढरा उंदीर दिसला होता का? (तो दिसणे अतिशय शुभलक्षणी मानतात) ते समस्त उंदीर हे करणी मातेचे भक्त व् चारण जातीचे लोक असल्याचे सांगतात, देशनोक जवळ संध्याकाळी सुर्यास्त पाहणे हा आमचा अन आमच्या सौं चा आवडता विरंगुळा असे, सायंकाळी जेव्हा पुर्ण वाळवंट केशरी होते मावळतीच्या सुर्यात तेव्हा अवर्णनीय दिसते ! त्यात मंद वाऱ्यात गोल गोल घरंगळत जाणारी वाळलेली सावरी ची झुडपे , त्याला एक राकट अन अनवट लुक देतात

धन्यवाद सर्वांना.

माामी पटलं अगदी. परदेशी पर्यटकांना हव्या त्या सगळया सोई सुविधा मस्त उपलब्ध आहेत तिथे.

आमच्या गाइडला चार पाच युरोपियन भाषा येत होत्या. टुरिझम वाढण्यासाठी आवश्यकच आहे हे सगळं

स्वच्छता मेंटेनन्स सगळया साइट सीईंग ठिकाणाना उत्तम आहे अपवाद फक्त हवेल्याांचा. तिकडे आजुबाजुला स्वच्छता कमी आहे.

सोन्याबापू , छान केलय वर्णन तुम्ही. करणी माता मंदिरात आम्हाला पांढरा उंदीर नाही दिसला. भाग्य थोड़ं कमी पडलं आमचं (स्मित )

पंधरा दिवसांपूर्वी आम्ही वरच्या आयटिनररी प्रमाणे प्लॅन करून ही सहल करून आलो.
मस्त झाली ट्रिप.कुठे ही प्रॉब्लेम आला नाही.
धन्यवाद मनीमोहोर .

नाव, माझ्या लिहिण्याचा तुम्हाला उपयोग झाला आणि तुमची सहल छान झाली हे वाचून मस्त वाटलं.

आवर्जून हे इथे लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Pages