किशोर मासिक : बालपणी च्या आठवणी

Submitted by सोन्याबापू on 14 February, 2015 - 01:32

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अंतर्गत, बालभारती ने सर्वप्रथम 1971 मधे किशोर प्रकाशित करायला सुरुवात केली!!, पाठयपुस्तक मंडळात विषय तज्ञ म्हणुन माझे वडील "सिलेबस रिव्यु" ला पुण्याला जात असत, त्यांनीच प्रथम मला ह्या मासिकाची गोडी लावली, कॉन्वेंट मधे शिकुनही आज जी काही मोड़की तोड़की मराठी मी लिहु शकतो त्याचे बऱ्याच अंशी श्रेय ह्या मासिकाला मी देतो, 1992 ते 2000(वय वर्षे 7 ते 16) दर महिन्याला हे मासिक घरपोच अगदी वेळेवर येत असे पोस्टाने. वाचनाची आवड आईबाबांनी फार पद्धतशीर् लावली होती मला ते आज कळुन येते, रेल्वेत 6 वर्षाचा असताना प्रवासात एकदा हळुच "चाचा चौधरी" हाती दिला होता मला त्या वयात ती चित्रे चाचाजी अन साबु चे पराक्रम त्यांनी गोबरसिंह अन धामाकासिंह ला दिलेली धोबी पछाड़ वाचता वाचता हाती किशोर सरकवले गेले. सुरवातीला ते लांब लेख चित्रे नसलेले (कमी असलेले) मासिक नको वाटे तेव्हा बाबा किंवा आई रात्री झोपताना त्यातले लेख कथा वाचुन दाखवत हळूहळू त्यात रस वाटायला लागला, 16 चा झालो तेव्हा त्याच प्रकारे "एक होता कार्वर" हाती आले! क्रमबद्ध आवड विकसित करत मग आजोबांच्या कपाटात असलेल्या सावरकर, टिळक, आझाद, भगत, मानवेंद्र नाथ रॉय इत्यादी ताऱ्या बरोबर ओळख वाढली! थोर पुरुष भांडतात ते विचारसरणी वर अन अनुयायी भांडतात ते पुरुषांचे नाव घेऊन हे सत्य नेमक्या वयात कळले.
किशोर चा खाका उत्तम होता!! त्याच्या तत्कालीन संपादक मंडळीच कौतिक करावे तितके कमी!प्रथम एक लेख शिवाजी महाराजांच्या न ऐकलेल्या कथा (हिरकणी,गड आला पण सिंह गेला वगैरे सोडुन) असत ते लेख सुद्धा बाबासाहेब पुरंदरे,सेतु माधवराव पगड़ी,निनाद बेडेकर वगैरे बाप लोकांचे असत, त्यानंतर एखाद बालवीर हीरो (फास्टर फेणे, बिपिन बुकलवार टाइप) कसा सत्यरक्षणार्थ करामती करतो ह्या आशयची एक फिक्शनल गोष्ट, मधेच कोडी शब्दकोडी ,शेवटी जागतिक अन राष्ट्रीय चालू घडामोडी अन क्विज अन अगदी शेवटी बालवाचक अन त्यांच्या पालकांचा पत्रव्यवहार असला साधा सुटसुटीत मामला, एका "किशोर"वयीन मुलावर वाचन संस्कार करायचा परफेक्ट मसाला अन रेसिपी होती ती!!!

दगडाचे सूप लिहिल्यावर सहज हे सगळे आठवत गेले अन लिहित गेलो. आपल्या पैकी किती जणांनी किशोर वाचले आहे? आपला अनुभव काय होता? किशोर चा आपल्या जड़णघड़णीत एक वाटा असल्याचे किती जणांस् वाटते, नसल्यास असे कुठले साहित्य होते ज्याने त्याला हातभार लावला, चला ह्या धाग्यात हे सगळे चर्चा करुयात

(नॉस्टॅल्जिक) बाप्या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किशोर नियमीत वाचायचे. स्पेकल्ड बँड कथेच भाषांतर पहिल्यांदा किशोर मध्येच वाचले होते.
किशोर, चंपक, चांदोबा, ठकठक या सर्वांना एक आठवणींचा कप्पा आहे.