मलई पालक

Submitted by स्नू on 5 February, 2015 - 01:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तेल २ टी स्पून
पालक १ जुडी
लसूण ५-६ पाकळ्या ठेचून अथवा किसून
हिरवी मिरची २ (मध्यम तिखट)
मीठ (नेहमीपेक्षा कमीच)
मलई २-३ टेबलस्पून

क्रमवार पाककृती: 

१. पालक स्वच्छ धुवून कापून घ्यावा. छोट्या पानाचा पालक स्वादिष्ट बनतो.
२. कढईत तेल तापल्यावर लसूण, मिरची आणि बारीक कापलेला पालक टाकावा आणि मिश्रण हलवत राहावे.
३. ७-८ मिनिटातच पालक शिजून गोळा होईल.
४. पालक शिजल्यावर त्यात मीठ टाकावे. (नेहमीपेक्षा मीठ कमी घालावे. पालक फार पटकन खारट होतो.
५. गॅस मंद करून मलई टाकावी आणि पुन्हा एकदा भाजी एकसारखी करावी.
६. गॅस बंद करा.
७. झाली भाजी तयार.

20150205_115724.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जण
अधिक टिपा: 

मलई टाकल्यावर गॅस फार वेळ चालू ठेवू नये.

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोप्पी आणि छान पाककृती.

रच्याकने, ७-८ मिनिटातच पालक शिजून गोळा होईल असे लिहिले आहे तर लागणारा वेळ ५ मिनिटे लिहिले आहे ते जरा बदलुन टाका.

स्नू, वा वा!! किती सोप्पी रेसिपी आहे.. पण मस्त लागत असणार, हे लक्षात येतेय.. फोटोसुद्धा मस्तच!! Happy

अरे वा! मस्तं रेसिपी.

(मी हळदीबद्दलच विचारणार होते.
साहित्यात, कृतीत हळद नाही आणि भाजी मात्रं पिवळी दिसतेय.)

स्नू,
आजच, लग्गेच बनवली बघ भाजी तुझ्या रेसिपीने... मस्तच झाली होती अगदी!! फ्रोझन स्पिनॅच वापरल्याने अक्षरशः ५ च मिनिटात झाली.. Happy
हे बघः
20150205_122428-1.jpg

दोन्ही फोटो मस्त आहेत.

मी असा दही पालक करते.
चिरलेला पालक आणि हिमि किंचित तेलावर परतायचा. झाकण ठेवून छान मऊ शिजू द्यायचा. मग थंड झाल्यावर त्यात फेटलेलं दही, जिरंपूड, मीठ घालून एकत्र करायचं आणि हिंग, जिरं सुक्या मिरचीची तुपाची फोडणी द्यायची.

धन्यू Happy
मंजुडी, पुढच्यावेळी तुझी रेसिपी पण ट्राय करणार!! आठवड्यातून किमान एकदा तरी घरात पालक शिजत असल्याने मला छान छान व्हरायटीज मिळत आहेत, याचा आनंदच आहे.. Happy

आज केली होती. मी मलई टाकून भाजी कधीच करत नाही, जड होईल म्हणून.
आज पहिल्यांदा ट्राय केली आणि खूप छान झाली:-) रेसिपी साठी धन्यवाद.