निकाल

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

१५ नोव्हेंबर २००७. या दिवशी या सर्व पर्वाचा अंत झाला. सुरवात झाली २८ एप्रिल २००० रोजी. पण खरी सुरवात झाली
ती १८ मार्च १९९३ रोजी. त्या काळात असे वाटत होते कि याचा अंत कधीच होणार नाही का ?
आता काय आहे स्थिती ? मी या सगळ्याकडे तटस्थपणे पहायला शिकलो का ? जखमा बुजल्या, खुणाही नाहीत. पण ...
सल नक्कीच आहे. एका अर्थाने मी श्रीमंतही झालोय. ज्यानी त्या काळात जपलं, त्यांचे कधीच न फ़िटणारे ऋण आहे. पण एकदातरी हे सगळे लिहून काढायचे आहे. त्या सगळ्याना हे वाचून दु:ख होणार आहे. त्यानी जपलं नसतं तर मी आज उभाही राहु शकलो नसतो. पण त्यानाही हे सगळे कुठे माहित आहे ? दिनेश आपला आहे आणि त्याला जपायचं, या कर्तव्य भावनेने, ते मला जपत राहिले. अजूनही जपत आहेत. त्याना कल्पनाही नाही, कि त्यानी मला कुठल्या वादळात सहारा दिला. त्यानी मला एवढे बळ दिले कि आज मी इतराना जपण्याची वल्गना करु शकतोय. एका कोलमडलेल्या झाडाला, परत उभे करण्याच्या किमयेची, हि कहाणी.

ते म्हणजे माझे मायबोलीकर. माझे आई वडील, भावोजी, बहीण, भाऊ, वहीनी, भाचा, भाची, पुतण्या सगळ्यांची साथ होतीच. पण ती माझ्या रक्ताची माणसे आहेत. त्यांची साथ मी गृहीतच धरली होती. पण या मायबोलीकरानी, त्यांची साथही त्यानी, मला गृहित धरायला भाग पाडले. एखाद दुसरा अपवाद वगळता, सगळेच माझ्यापेक्षा वयाने लहान. पण त्यांचा ( आणि त्यांच्या कुटूंबियांचादेखील ) समजूतदारपणा, बघता, त्यांच्याकडून दादा म्हणवून घ्यायला, मला खरे तर संकोच वाटतोय. आज हा सगळा संकोच बाजूला ठेवतोय.

आणि हेदेखील मला मानायलाच हवे, कि बघा मी किती शूर आहे, सगळे कसे धैर्याने सोसतोय, हा माझा गर्व देखील या काळात दूर झाला, कारण माझ्यापेक्षा शूर माणसे, मला इथेच या मायबोलीवर भेटली. मला जमिनीवर ठेवल्याबद्दल मी त्यांचाही ऋणी आहे.

तसेच हे सगळे इथे लिहिण्यामागे, कुठलीही सनसनाटी निर्माण करण्याचा माझा उद्देश नाही. आपण सर्व "शहाणे" आहात आणि शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढायची नसते, हेही आपण जाणताच. त्यामुळे होते काय, कि आपल्या कोर्टाच्या कामकाजाबद्द्लच्या कल्पना या सिनेमा, नाटकातील (बहुतांशी) खुळचट दृष्यावर बेतलेल्या असतात. मी तूझ्यावर केस करिन वा माझ्यावर केस कर अशी भाषा (इथेही ) अगदी सहज वापरली जाते. तसेच एखाद्याने वैवाहिक समस्या मांडली तर त्याबद्दल चुकीचे
मार्गदर्शन केले जाते किंवा या दृष्टीने सल्ले दिले जात नाहीत. ( हे दोन्ही अलिकडेच झाले इथे ) तर कोर्टाचे कामकाज कसे चालते. ४९८ अ कलमाचा दुरुपयोग कसा केला जातो. पोलीस व सरकारि वकिलांची भुमिका काय असते, कोर्टात पुराव्यांची छाननी कशी होते, कोर्टाची भाषा कशी असते, कोर्ट आपल्या निर्णयापर्यंत कसे पोहोचते, या सगळ्यांची पण नीट कल्पना यावी, हा माझा हेतू आहे.

दुसरे म्हणजे कुणाचीही बदनामी करण्याचा माझा हेतू नाही. मी काही वर्षांपूर्वी इथे लिहिले होते त्यावेळी, चंपकने, त्या मुलीची बाजू देखील मांडली जावी, असे लिहिले होते. (चंपक आणि त्याचे कुटूंबीय आता माझे खास मित्र आहेत ) मॆ. कोर्टाने तशी पूर्ण संधी दिली होती. तसेच फ़िर्यादीच्या वतीने इथे मायबोलीवर माझी बदनामी करण्याचा प्रयत्नही झाला होता. माझ्या मायबोलीकरानी (खास करुन श्यामली, मिलिंदा आदी ) तो प्रयत्न हाणून पाडला होता. नंतरही असे तुरळक प्रयत्न होत राहिले. त्यावेळी या खटल्याचे कामकाज चालू असल्याने, मला प्रत्यूत्तर देता आले नव्हते.

सुरवात करतोय ती मे.वसई कोर्टाच्या निकालपत्रापासुन :- तर ते असे आहे. ते इंग्रजीत आहे. पण त्याचे भाषांतर न करता ते, जसेच्या तसे इथे देतोय. यातले काहि उल्लेख, सत्य असले तरी, मी टाळतोय, कारण ते इथे लिहिण्याजोगे नाहीत.
( आणि या निकालपत्रापर्यंतचा खडतर प्रवासही, क्रमाक्रमाने येतोच आहे )

प्रकार: 

PRESENTED ON 18/11/2000
REGISTERED ON 18/11/2000
DECIDED ON 15/11/2007
DURATION 06 Y 11 M 28 D
IN THE COURT OF CIVIL JUDGE (J.D.) VASAI, AT VASAI
( Presided over by Shri Mahesh Krishnaji Jadhav )
REG.GRI. CASE NO 397/2007 EXH NO 167
STATE Complainant
( Through Mira Road Police Station )
V/S
1] Shri. Vishwanath Bhivaji Shinde (deceased)
2] Smt. Shalini Vishwanath Shinde, Age 65 Yrs, R/At Kurla (Mumbai)
3] Sou. Chaya Shekhar Shinde, Age 42 Yrs, R/At Kurla (Mumbai)
4] Shri Ashok Vishnu Sawant, Age 51 Yrs, R/At Kurla (Mumbai)
5] Shri SHekhar Vishwanath Shinde, Age 46 Yrs, R/At Kurla (Mumbai)
6] Sou Rekha Ashok Sawant, Age 48 Yrs, R/At Kurla (Mumbai)
7] Shri Dinesh Vishwanath Shinde, Age 38 Yrs, R/At Kurla (Mumbai) Accused
Offence punishable under section 498(A), r.w. sec 34 of Indian Penal Code.
A.P.P. Miss Raut for state, Adv Shri. Thakkar & Adv Kum. Rupali Rajani for Accused.

JUDGEMENT
( Delivered on 15th day of November, 2007 )
All accused stand prosecuted for the offence punishable under section 498(A), r.w. sec 34 of Indian Penal Code.
2] Prosecution case in brief is that, Mangala, daughter of Mahadev Patil, solomenised her marriage with Dinesh Shinde, at Dadar, Mumbai. After marriage Mangala started to reside with Dinesh. On the first night of marriage, Dinesh disclosed his illicit relations with Chaya to Mangala. Chaya is sister-in-law of Dinesh. Dinesh told Mangala to accept his relationship with Chaya, otherwise, insisted Mangala to give divorce. After some days, Dinesh & Mangala went to Kisumu, at Kenya. Dinesh used to take suspicion about the character of Mangala. He confined Mangala in the house. On 01/08/1993 Dinesh bought Greeting Card for birth day of Chaya, as its contents are obscene. That time, Dinesh beat Mangala, He snatched the Mangalasutra from the neck of Mangala. Dinesh asked Mangala to remember that, at Mumbai she returned early in the house from her service, she found Dinesh and Chaya was XXXXXXX ( I am deleting the lines, to protect the honour of my sister in law – Dinesh ) Dinesh and Chaya threatened Mangala, not to disclose this fact to anybody otherwise they will kill to Mangala. In kisumu, Dinesh used to beat Mangala. Dinesh made phone call to father of Mangala and demanded Rs. 1,00,000/-. Thereafter father of Mangala sent ticket of Mangala. Mangala came to Mumbai, she went to her matrimonial house, that time, her father in law, Vishwanath and mother in law, Shalini not allowed her to enter in the house. They threatened to kill Mangala. Thereafter, Mangala gave birth to a son. In November, 1994, when Mangala was in Bhayander, Dinesh called her to watch a movie, and beat her in presence of her parents. After some days, Dinesh disclosed his willingness to start a new business, hence, Managala gave 20 tolas of gold, and cash of Rs 16,000/- to Dinesh. Dinesh insisted Mangala to give the divorce, and filed an application for divorce at Family Court, Bandra, Mumbai. Mangala lodged complaint about illtreatment. On receiving he complaint, C.R.No. I-96/2000 came to registered at Mira Road police station.

3] Investigating officer has recorded the statement of withnesses, collected the documents, arrested the accused and after due investigation, sent chargesheet
against the accused in the court. During pendency of the proceedings, accused No 1Vishwanath Shinde, expired. Therefore case is abated against him.
4] Charge was firmed against the accused under sec. 498 (A) r.w. sec 34 of Indian Penal Code by the then Ld. Predecessor at exh. 9. The contents of the charge were read over and explained to the accused to which accused pleaded not guilty and claimed to be tried. Their defence is total denial.
5] Statements of accused under sec. 313 of code of criminal procedure were recorded, All accused denied the contents, put to them and stated that, they have not committed any offence
6] Considering the oral as well as documentary evidence on record and on hearing the argument advanced by ld. A.P.P. Vrinda Raut for state and Ld. Counsel for Accused, following points arise for my determination and I have recorded my findings with reasons stated thereon are as under :
POINT 1 : Whether prosecution proves that accused No 2 to 7 alongwith deceased accused No. 1, Vishwanath, in furtherance of their common intention, subjected Mangala to mental and physical cruelty for their unlawful demands of money ?
FINDINGS : In the Negative
2] What offence accused committed ? In the Negative
3] What order ? As per final order.
REASONS
7] In order to prove the case, prosecution has examined in all 5 withnesses. P.W.1 Dr. Mangala Dinesh Shinde examined at exh. 66. She is the complainant. P.W.2 Mahadev Suryabhanji Patil, examined at exh. 137. He is father of complainant. P.W. 3 Nalini Mahadevrao Patil, examined at exh. 143, she is mother of complainant. P.W.4 Shri Nitinakumar Mahadev Patil examined at exh. 148. He is brother of complainant. P.W. 5 Manohar Gangaram Jadhav, examined at exh 149. He is investing officer of the said case.
8] Is is undisputed fact, that, Dinesh Shinde, is the husband of Mangala, and other accused are relatives of Dinesh. The case of the prosecution is based on the direct as well as circumstantial evidence.
9] On scrutinizing the direct evidence of P.W. 1, Mangala, it appears that, she has alleged in all nine acts of illtreatment and harassment on the part of accused. First act of harassment, is about the first night of their marriage. Mangala during her evidence stated that , at the first night of marriage, Dinesh disclosed his illicit relations with Chaya and insisted Mangala to accept the said relationship, otherwise he is ready to give divorce. In the connection, cross examination of Mangala has important value. She has admitted that, at the first night of marriage, there was XXXXXX in between her and Dinesh. She has admitted that, after three days of marriage, she went alongwith Dinesh for honeymoon. If really, Dinesh would have disclosed his illicit relations with Chaya, naturally, there would be no xxxxxxx in between Dinesh & Mangala. And Mangala never went with Dinesh for Honeymoon. In this regard, F.I.R. at exh. 112 remain silent. If really, there was any incident of disclosing the illicit relations, in natural cource Mangala would have mentioned all the incident in her written complaint at exh. 112. But for the first time, P.W.1 Mangala, has made material improvement in her statement. When she was confronted with her statement, she has no explanation to offer justifying these improvements. Her evidence is therefore inconsistent in respect of incident took place on the first night.
10] Now it is necessary to turn on the second incident of harassment, which is occurred at Kisumu, at Kenya. P.W.1 Mangala during her evidence stated that at Kisumu, Dinesh, used to confine her in the house. He was not allowed Mangala to meet with neighbours. But during cross examination, Mangala admitted that, when resided at Kenya, she used to visit, Laxmi temple situated near their house. Here it is necessary to state that, Mangala is medical practioner. She is well educated lady, it is admitted fact that, she was resided with Dinesh at Kisumu from May 1993 to 12/08/1993 Therefore it is necessary to see as to whether there is an illtreatment and confinement caused by Dinesh to Mangala or not ?

11] P.W.1 Mangala during her cross examination specifically admitted that, she wrote a letter to Rekha Sawant which is at exh 130. She admitted that the contents of the letter to be true and correct. On perusal of the said letter, it appears that, she used to visit Laxmi temple daily at Kisumu. So this letter, which is in the hand writing of Mangala itself discloses that, she used to visit Laxmi temple daily at Kisumu.
12] Mangala Shinde during cross examination admitted that, she wrote a letter on 03/07/1993 to accused Shalini. The said letter is at exh.131. Mangala admitted the contents of the said letter to be true and correct. In the said letter, it is contended that, Mangala used to go for purchasing the vegetables, utensils. She used to go to hospitals and give the aid to the Doctors. The said letter is dt. 03/07/1993.
13] Again during cross examination P.W.1 Mangala admitted that, she has written a letter to Rekha on 28/06/1993 which is at exh 127. She admitted the contents of the letter to be true and correct. In the said letter, it is contended that. She used to visit house of neighbourers and the person resided at ‘B’ wing used to come with her for shopping.
14] On perusal of letter which is in handwriting of Mangala at exh 127,130 and 131, it is clearly appears that, Mangala used to go for shopping, temples, for medical practice, and to neighbourers. Mangala also admitted that, she used to go to Laxmi temple. This version on part of the Mangala, clearly shows that there was no confinement to Mangala on the part of Dinesh at Kisumu. Therefore, evidence of Mangala in regarding to the incident of confinement at Kisumu is not reliable, trustworthy.
15] Now it is necessary to turn to the incident, when Mangala came early in the house, she saw Dinesh and Chaya XXXX. During cross examination, Mangala admitted that she is not able to state the date and time when accused was xxxxxx. Mangala admitted that on 09/11/1994 she wrote a letter to Dinesh. She admitted the contents of the letter to be true and correct. Wherein it is contended that Dinesh is having good character, well educated, and gentlemen. It is also contended that, there was no problem in between her and Dinesh, but there was only misunderstanding in between them. This letter itself shows that there was only misunderstanding in between Mangala & Dinesh and there was no actual illicit relationship between Dinesh & Chaya. If really Dinesh is having any illicit relations, in natural cource, Mangala would not call Dinesh as a person having good character, and a gentleman. This admission on the part of the Mangala, create shadow of doubt about the incident of xxxx.
16] P.W.1 Mangala during her evidence specifically mentioned different incidents which occurred after her returning at India. She has stated that, on one occasion, Ashok Sawant came to her father and shown one letter which was read over by her sister Jayashree and thereafter Ashok fled away. In this regard, evidence of P.W.1 Mangala is not a direct evidence. Her evidence is hearsay evidence. In this regard, it is the duty caste on prosecution to examine Jayashree. The evidence of P.W. 2 Mahadev remain silent on the point of letter shown by Ashok Sawant. Incident which is narrated by Mangala in regarding to accused Ashok is not appeared in the complaint and F.I.R. For the first time by making improvement, she has narrated all this story which is not corroborated by her father Mahadev and sister Jayashree. Therefore, evidence of Mangala in regarding the act of accused Ashok Sawant is not looking genuine and trustworthy and reliable.
17] Mangala has narrated the incident which is occurred when she was at Bhayander, she told that, after watching the movie whwn she came to the house, that time Dinesh came there and beat her in presence of her father, mother, and brother. But this statement is not appeared in the complaint at exh. 112 of Mangala. No plausible explanation given by Mangala for non appearing this version in her complaint, nor this fact is corroborated by her father Mahadev P.W. 2, mother P.W.3 Nalini and her brother P.W. 4 Nitin. Therefore, evidence of Mangala is not reliable, cogent and trustworthy.
18] P.W.1 Mangala, during her evidence specifically stated that in December, 1995, she gave Rs 30,000/- in cash and 20 tolas of gold to Dinesh. She has nowhere stated that accused has demanded the said amount to her and therefore, she delivered the same which shows that she voluntarily gave the amount to Dinesh. She has not submitted documentary evidence about purchasing and possessing of said articles. The statement of Mangala is not corroborated by her father P.W.2 and mother P.W.3 Nalini
19] Now it is necessary to turn on the direct evidence of P.W. 2 Mahadev on the point of illegal demand of Rs 1,00,000/- from Dinesh to Mahadev. P.W. 2 Mahadev during his evidence specifically stated that when Dinesh was at Kisumu he made phone call and demanded Rs. 1,00,000/- P.W. 2 Mahadev during his evidence stated that, on 30/07/1993 he sent a letter to Dinesh and Mangala which is at exh. 138. On perusal of the said letter, it is specifically mentioned that मंगला रिकामटेकडी बसणार नाही. तूम्ही तिला पाठवण्याची व्यवस्था करा, अन्यथा मी पैसे पाठवीन. These contents clearly shows that, P.W.2 Mahadev insisted Mangala to return back to India from Kisumu, Kenya, as she is not able to get job at Kisumu. P.W.1 Mangala, during cross examination specifically admitted that, she is not able to obtain the permission to start medical practice at Kisumu. Present witness P.W.2 during the letter contended that he is not allowed to sit in a house and he himself stated that he is sending money to Dinesh. If really, there was intentional demand on the part of Dinesh, Mahadev never send such type of letter to Dinesh and the evidence led by the prosecution by way of documentary evidence at exh. 138 itself wash out the allegations made by P.W.2 Mahadev.
20] P.W. 2 Mahadev during his evidence stated that Dinesh demanded Rs 1,00,000/- on phone call. But during cross examination, he is not able to give satisfactory explanation as to why this version did not appear in his statement. This material improvement is proved by the accused, thru investigation officer. So the material improvement on the part of P.W.5 Mahadev itself shows that, for the first time, he has narrated demand of money on the part of accused Dinesh.
21] In this connection, it is necessary to scrutinize the cross examination of P.W. 2 Mahadev, wherein, he has admitted that he sent a letter to Dinesh on 21/02/1994 which, is at exh.132. On perusal of letter at exh. 132, it appears that, P.W. 2 Mahadev contended that, Mangala disclosed him that Dinesh well treated her. She never made any complaint about Dinesh so letter at exh. 132 clearly shows that Dinesh never illtreated Mangala. Further during cross examination P.W.2 Mahadev admitted that, Dinesh has sent cheque worth of Rs. 18,000/- to Mangala when Mangala was resided at Mumbai. If really, there was any demand on the part of Dinesh, in natural course, no prudent person can sent any amount to his wife. So this admission on the part of Mahadev that Dinesh sent a cheque worth of Rs. 18,000/- to Mangala itself shows that, Dinesh never demanded ay amount to Mangala. Whatever evidence adducted on the part of P.W. 3 and 4 Nalini and Nitin is of hearsay nature and direct evidence of Mahadev and Mangala itself is not trustworthy, therefore, it is not helpful to the prosecution.
22] Now it is necessary to turn on the circumstantial evidence on which prosecution has relied. Prosecution has relied on letter written by Mangala to he father from Kisumu dt. 12/07/1993. P.W.1 Mangala, P.W.2 Mahadev and P.W.3 Naline stated that, Mangala has sent the letter from Kisumu to Mahadev. On perusal of the said letter, at exh. 109, it appears that, it was written on the paper but no envelop or postal receipt or postal mark is appeared on the said letter. Prosecution has not brought evidence which would show that the letter was sent by Mangala to P.W.2 Mahadev. The said letter is dt. 12.07.1993. It is admitted by Mangala that, she sent another letter dt. 03/07/1993 to accused Shalini. In the said letter it is specifically mentioned that, Dinesh looking after her and well treated her and she purchased some utensils. She used to go outside. The letter at exh. 131 is having envelope which shows that it was sent by Mangala to accused Shalini. But letter at exh. 109 did not disclose this fact and the contents in the letter at exh 131 clearly shows that there was no harassment on the part of Dinesh to Mangala at Kisumu. Therefore, documentary evidence i.e. letter which is at exh. 109 which is not having envelop and postal mark is not looking to be trustworthy and genuine.
23] In view of the above discussion and reasons, evidence lead by the prosecution falls short of proving beyond reasonable doubt that the accused had treated Mangala cruelty. No single act regarding to other accused is mentioned by Mangala. Evidence of prosecution witnesses are not trustworthy, reliable. There was material contradiction and improvements in the direct evidence. Therefore, prosecution has failed to prove the guilt of accused beyond all reasonable doubts. Hence, point No. 1 is answered in the negative and in answer to point no. 2 following order is passed :
ORDER
1] Accused 1] Smt Shalini Vishwanath Shinde, 2] Sou. Chaya Shekhar Shinde, 3] Ashok Vishnu Sawant, 4] Shri Shekhar Vishwanath Shinde 5] Sou Rekha Ashok Sawant 6] Shri. Dinesh Vishwanath Shinde are hereby aquitted under sec. 248 (1) of Code of Criminal Procedure of the offence punishable under sec. 498 (A) r.w. sec. 34 of Indian Penal Code.
2] Their Bail Bonds stand cancelled.

Vasai
Dt 15th day of November, 2007
sd\-
( Mahesh Krishnaji Jadhav ) C.J.J.D. & J.M.F.C. Vasai.

आपल्या या पुर्वीच्या घटना माहित नसल्याने प्रतिसाद/ प्रतिक्रीया देता येत नाही.

आपल्याला झालेल्या मानसीक यातना ,त्यामुळे खालावलेल मनोकायीक स्वास्थ्य भरून निघण तस सोप
नाही .संगतवार लिहाल तर मन नक्कीच हलक होईल खर पण जर व्यक्तीगत अनुभवाना गोष्टीच स्वरूप
दिलत व व्यक्तिंची नाव बदललीत व डीसक्लेमर जोडलात तर बर अस मला आपल वाटत .तरीपण
लिहीण्या अगोदर थोरा मोठ्यांचा सल्ला जरूर घ्यावा .झाल गेल उगळण्यापेक्षा विसरलेल जास्त चांगल .
हा पब्लीक फोरम आहे याच भान असलेल बर .

नमस्कार,
हा पब्लिक फ़ोरम आहे, याचे मला भान नक्कीच आहे.
हा खटला महाराष्ट्र सरकार तर्फ़े चालवण्यात आला.हि खाजगी केस नव्ह्ती.
हे निकालपत्र सार्वजनिक आहे.कुणालाहि ते उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे
यात लपविण्यासारखे असे काहि नाही.
जून्या मायबोलीवर हे सगळे उपलब्ध आहे. याला कहाणीचे स्वरुप द्यायचे नाहि,
तसेच मन मोकळे वगैरे करण्याचा पण प्रयत्न नाही हा.
पण या कलमाच्या बाबतीत किती घोळ घातला जातो, हेच मला सांगायचे आहे.
अजूनही मला अनेकजण या बाबतीत सल्ला विचारत असतात.
निव्वळ या कलमाला वाहिलेली संकेतस्थळे आहेतच. योग्य तो सल्ला मी घेतला
आहेच. या बाबतीत अनेक प्रकारचे गैरसमज आहेत, आणि चर्चा होणे गरजेचे आहे
असे मला वाटते.
या बाबतीत काय काळजी घ्यावी. पुरावे कसे गोळा करावेत व सादर करावेत.
कुठले पुरावे कायद्याच्या कसोटीवर उतरतील व कुठले उतरणार नाहीत.
न्यायदानाची प्रक्रिया कशी चालते.
या बाबतीत माझ्या अनुभवातून इतरानी सावध व्हावे, एवढाच माझा हेतू आहे.
हे सर्व योग्य त्या गांभीर्याने वाचले जाईल आणि बाबतीत मायबोलीकर सुजाण
व सूज्ञ आहेत, याची मला खात्री आहे.

आमच्या गावाकडे एक म्हण आहे. "ज्याचं जळतं त्यालाच कळतं" तुम्ही काय भोगलत त्याची आम्ही फक्त कल्पनाच करु शकतो. अशी वेळ कुणावरही न येवो. "मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार." भोग संपले, इथून पुढे चढता आलेख, नवीन सकाळ. Wish you all the very best!!!

मला इथे जे मुद्दे मांडायचे आहेत ते असे :-

विवाह कसे ठरवले जातात ?
सध्या उपवर आणि उपवधु मंडळींची अवस्था काय आहे ?
४९८ अ कलम काय आहे, कुणासाठी आहे ?
याचा मुख्यत्वे दुरुपयोगच कसा केला जातो ?
मुलीकडचे लोक काय करतात ?
मुलांकडचे लोक काय करु शकतात ?
पोलीस काय करु शकतात , करतात ?
कोर्टात काय होते ?
आरोपीना कसे वागवले जाते, त्याना काहि अधिकार आहेत का ?
साक्षीपुरावे कसे नोंदवले जातात ?
वकिल काय करु शकतात, करतात ?
कोर्टाचे निर्णय असे दिले जातात ?

या क्षेत्राचा तब्बल ७ वर्षाचा अनुभव असल्याने, हे लिहिण्याचे धाडस करतोय.
या संदर्भात अनेक जणांशी बोललो आहे. त्यातूनच हे लिहितोय.

आपल्याकडे अजूनही लव्ह मॆरेज, हि कल्पना रुजलेली नाही. "त्यांचे त्यानीच जूळवलॆ" हे उदगार
बऱ्याचवेळा कुत्सितपणेच काढले जातात. मुलामुलींची निखळ मैत्री नसते असे नाही, पण भावी
जोडीदार म्हणून क्वचितच एकमेकांकडे बघितले जाते.

अनेकांशी बोलल्यावर मला आढळलेली कारणे साधारण अशी आहेत.

१) शिक्षणातील स्पर्धेचे, करियरचे एवढे दडपण असते, कि या दृष्टीने विचार करता येत नाही.
अगदी लहान वयापासूनच हे दडपण मुलांच्या मनावर असते. नोकऱ्या सहसा मिळत नाहीत,
हव्या त्या क्षेत्रात करियर करायला जमत नाही. निवडलेला कोर्स झेपत नाही. आईवडीलानी
शिक्षणावर केलेल्या खर्चाचे ओझे वाटते. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार वगैरे कल्पना मागे पडतात.
नुसते पदवीधर होणे हे ध्येय आजकाल असूच शकत नाही. आणि उच्च शिक्षणाला लागणारा
वेळ बघता, हा निर्णय लांबणीवर टाकला जातो. मुलीपेक्षा मुलगा जास्त शिकलेला हवा, हा
पगडा अजूनही आहे.

२) भावी जोडीदाराच्या कल्पना इतक्या पराकोटीच्या असतात, कि त्याच्या जवळपास येणारे
कुणी भेटत नाही. त्यामुळॆ एखादा योग्य जोडीदार संपर्कात असला तरी, त्याची निवड करता
येत नाही. माझ्या ओळखीच्या अनेकजणांच्या या कल्पना अवाजवी होत्या. आणि कल्पनेतल्या
जोडीदाराच्या कल्पनादेखील उच्च असतील, आणि कदाचित त्याबाबतीत आपणे उणे ठरू, हे
भान असत नाही. समजा अशी व्यक्ती भेटली, तरी तिच्या व्यक्तिमत्वाने भारावल्यावर, आपले
खुजेपण लक्षात येते, आणि मग मात्र त्या व्यक्तिला प्रस्ताव करण्याचे धाडस न झाल्याने,
झुरणे हाच एक उपाय हातात उरतो. शिवाय त्या व्यक्तीला टाळून ज्यावेळी दुसऱ्या व्यक्तीची
निवड केली जाते, त्यावेळी सतत उघड वा मनातल्या मनात तुलना करत राहिल्याने, निराशेत
आणखीनच भर पडते.

३) अजुनही आपापला जोडिदार निवडण्याचे स्वातंत्र्य मुलामुलीना असत नाही. अनेक घरात
"सातच्या आत घरात" हे बंधंन अजुनही आहे. तसेच समजा कुठल्याही कारणास्तव एखादा
मुलगा व मुलगी बाहेर फ़िरताना एकत्र आढळले, तर भुवया उंचावल्या जातात. आईबाबांची
पसंती हा या निवडीतला अडथळा असतोच. शिवाय आर्थिक स्वातंत्र्य नसल्याने, असा धाडसी
निर्णय घेणे अनेकाना जमत नाही. यात घराची समस्या हि मुख्य आहे.

४) जात आणि धर्म, याचा पगडा तरूण मनावर अजूनही आहे. या बाबतीतील माझे अनुभव
धक्कादायक आहेत. लग्न करीन तर आपल्या जातीतल्या मुलीशीच, असे निर्धार केलेले अनेक
तरुण मला भेटलेत. अजूनही, " आमच्या घरात डोक्यावर पदर घ्यावा लागतो". " मोठ्यांसमोर
सुनांनी बोलायचे नसते". "दोन भावांच्या बोलण्यात, बायकानी भाग घ्यायचा नसतो", असे ग्रह
आहेत. या व्याखेत बसणाऱ्या मुली, "बघितल्या"शिवाय कश्या सापडतील ?

५) आणि समजा एखाद्याने धाडस केलेच, तर "तू आम्हाला मेलास / मेलीस आणि आम्ही तूला
मेलो" असे ऐकवले जाते. अश्या धमक्यांमूळे अनेक तरुण, स्वतंत्र निर्णय घेउ शकत नाहीत.

६) मुली आजकाल अभिमानास्पद यश मिळवतात. कुणाही आईवडीलांना त्यांचा अभिमान
वाटणे अगदी सहाजिक आहे. पण खुपदा हा अभिमान, मालकीहक्काकडे झुकताना मी
बघितलाय. त्यामुळे जावयाला, किंचीतही मताधिकार दिला जात नाही. त्याच्यातल्या
वैगुण्यांचा उल्लेख वारंवार केला जातो. दोन्हीकडून आडमुठी भुमिका घेतली गेल्याने, सगळेच
अवघड होऊन बसते. पण हे झाले लग्नानंतरचे, मुलांवर मुलीच्या उच्च शिक्षणाचे दडपण आलेले
मी बघितले आहे. आणि याही कारणानी, विवाह प्रस्ताव टाळला गेलेला मी बघितला आहे. काही
मुली स्वत:हून आपल्या उच्च शिक्षणाचे, उत्तम पगाराच्या नोकरीचे दडपण, भावी जोडीदारावर
येणार नाही, असे ठरवताना, मी बघितल्या आहेत, पण त्यांच्या हेतूबद्दल नेहमीच शंका
घेतली जाते.

स्वतंत्रपणे विवाहाचा निर्णय न घेण्याची आणखीही कारणे असतील, (ती पुढे येतीलच) मी यावर
मुद्दामच मत नोंदवत नाही इथे. हि फ़क्त माझी निरिक्षणे आहेत. चर्चा मग करुच. पण हा काहि
माझ्या लेखनाचा मूळ हेतू नाही.

म्हणजे आपल्याकडे एकंदरीत, "कांदेपोहे" या प्रकाराला पर्याय दिसत नाही. विवाहमंडळे आणि
संकेतस्थळे हा पर्याय आहे.
विवाहमंडळांचा एक धक्कादायक अनुभव, "कुसुम मनोहर लेले" या नाटकात आलेला आहे. तो
प्रातिनिधिक आहे, असे मी म्हणणार नाही ( पण ती सत्यघटना होती ). विवाहमंडळांची जी
सध्याची यंत्रणा आहे, त्यात केवळ माहिती ठेवली जाते. त्यांचे फ़ॊर्म्स असतात, ते भरुन जर
देय असेल तर शुक्ल देऊन आपले नाव त्यांच्याकडे नोंदवता येते. यापलिकडे त्या माहितीची
पडताळणी करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नाही. तसेच ती माहिती अद्यावत ठेवण्याची पण त्यांच्याकडे
यंत्रणा नाही. अगदी प्रतिष्ठीत मंडळे देखील, हि फ़ाईल घ्या आणि शोधा, असा प्रकार करतात.
या "सभासदां"शी संपर्कात राहणे देखील त्याना जमत नाही, तसेच सभासददेखील त्यांच्या संपर्कात
रहात नाहीत. विवाह ठरल्याचे, झाल्याचे कळवले जात नाही. माझा विवाह देखील अश्याच मंडळांतर्फ़े
सुचवलेल्या मुलीशी झाला होता. आणि विवाह झाल्यावरदेखील, अनेक प्रस्ताव येतच होते.
यात काहि मंडळे खरोखरच सेवाभावाने वागतात तर काहि निव्वळ व्यापारी हेतूने चालवली जातात.
तसेच तीच तीच "स्थळं" एका शहरातील सर्व मंडळांकडे नोंदवलेली असतात.
अशी अपेक्षा ठेवणे गैर आहे, पण हि मंडळे फ़ार जबाबदारी घेऊ शकत नाहीत. या बाबतीत काहि
मंडळांची नावेदेखील "सूचक"च असतात. पण तरिही या जाहीरातींचा जोर कायम आहे.

संकेतस्थळे काहि प्रतिष्ठित संस्था आणि वृत्तपत्रे चालवत आहेत. पैसे भरुन सभासद होणाऱ्यांसाठी
अगदी चित्रीकरणाची पण सोय आहे. पण त्यांची संकेतस्थळे मात्र फ़्री आहेत. तिथे कुणालाही
नाव नोंदवता येते, आणि या संकेतस्थळांचा गैरवापर अर्थातच होत आहे. आपला स्वत:चा फ़ोटॊ
देण्याऐवजी, नटनट्या अथवा मॉडेल्सचे फ़ोटो दिलेले दिसतात. इथे आंबटशौकीपणा चालतोच.
इथेही माहिती पडताळण्याची सोय नाही. एखाद्याच्या वतीने दुसराही कुणी, नाव नोंदवू शकतो.
माझ्याही एका मित्राने, मला न सांगता असे नाव नोंदवले होते. एका मुलीने मला एका दिवसात
१,०६४ ईमेल्स पाठवल्या होत्या. डिलीट करता करता नाकी नऊ आले होते माझ्या.

मला तरी असे वाटते, कि ओळखीपाळखीतून जर असे विवाहप्रस्ताव आले तर ते फ़ारच उत्तम.
दोन्ही कुटुंबाना वैयक्तीक स्तरावर ओळखणारी, एक तरी जबाबदार व जेष्ठ व्यकी असेल, तर
पुढचे अनर्थ टळू शकतात, आणि हेच माझ्याबाबतीत झाले नाही.

"कांदेपोहे" प्रकाराबद्द्ल पुढे चर्चा करु.( या नावाचा एक बाफ़ इथे होता, पण माझा हेतू
वेगळा आहे.)

दिनेशदा, या सगळ्यांतून सुटल्याबद्दल अभिनंदन. आणि वरच्या पोस्ट्मधील खूप (जवळजवळ सर्वच) मुद्दे विचार करण्याजोगे आहेत.
वडील वकील असल्याने आणि एका मैत्रिणीला (तिचे मागणी घालून लग्न होऊन नंतर सासरकडून प्रचंड छळ झाला होता) तिच्या डिवोर्स मध्ये मदत केल्याने या अशा प्रसंगात किती मानसिक त्रास होतो ते अगदी जवळून पाहिले आहे.

दिनेश,
तुम्ही जुन्या मायबोलीवर लिहिलेलं सगळं मी पुन्हा पुन्हा लक्षपुर्वक वाचलं होतं, प्रत्येकवेळी त्यातून नविन वेदना उलगडत होती. Sad केसचा निकाल तुमच्या बाजुने लागला हे मला तेव्हाच समजलं होतं. इथे अगदी तपशीलवार माहीती मिळाली.

सर्व त्रासातून कायदेशिर मुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी अतोनात शुभेच्छा. Happy

एक गोष्ट इथे सांगितल्याशिवाय राहवत नाही. इतक्या मानसिक त्रासातून जात असताना सुद्धा तुम्ही कायम हसतमुख राहीलात त्यासाठी तुम्हाला सलाम आहे. Happy

आभार दोस्तानो, मला इथे अनेक विषयाना वाचा फोडायचीय. या गोष्टींची उघड चर्चा आपण करत नाही.
पण तूम्ही सगळे आपलेच आहात, मग मी का संकोच करु ?
-------------------------

बैठकीत चार सहा पुरुष बसलेत. विड्या काड्या ओढताहेत. एखादा पोरगेलासा तरुण, बाईमाणसे
नाहितच. कुणीतरी चहा आणून ठेवतय. भुरभुर चहा प्यायला जातोय. पोरीचा बाप ओशाळून
बसलाय. त्याला धीर द्यायला म्हणून एखादा नातेवाईक. मुलीची आई व लहान भावंडे दारामागे.
"मुलीला आणा" असा पुकारा झाल्यावर नऊवारी साडी नेसलेली, जेमतेम १६ ते १८ वर्षांची
एक पोरगी येणार, सगळ्याना सामायिक नमस्कार करुन अंगठ्याने जमीन उकरत अवघडत
, खाली मान घालून, उभी राहणार. बस सांगितल्याशिवाय बसणार नाही.
मग नाव विचारल्यावर नाव सांगणार, सुईत दोरा ओवून दाखवणार, ओलेत्या पायाने चालून
दाखवणार, शिकली असेल तर वाचून दाखवणार. तिची आई, तिने केलेले भरतकाम, विणकाम
ह्ळूच बाहेर पाठवणार. पत्रिका, पदर, गोत्र जुळल्याची खात्री केली असेल तर मग मानपान आणि
हुंड्याच्या गोष्टी होणार. मुलाला पोषाख, येण्याजाण्याचा खर्च याच्याही चर्चा होणार. अगदीच कुणी
उदार असला, तर मुलगी आणि नारळ द्या म्हणणार, पण रितीप्रमाणे सगळे व्यवस्थित करा, असे
सांगायला विसरणार नाही.

फ़ार जुनं नाही हे दृष्य. आपली आई नसेल, पण आपली आजी नक्किच या सगळ्यातून गेली
असणार. आज फ़ार काही बदललेले नाही, या नाट्यमय दृष्यात. मुलाची आई, त्याचा एखादा
मित्र हि वाढीव पात्रे. मुलीची आईदेखील दारामागे नाही तर बैठकीत आलीय. मुलीत थोडा
आत्मविश्वास आलाय. ती थेट बोलतेय.हुंड्याचा थेट उल्लेख टाळला जातोय, पण आडवळणाने
मुलाच्या शिक्षणावर किती खर्च झालाय, ते सांगितले जातेच. मुलाचा पगाराचा ( कदाचित वाढीव)
आकडा, तोंडावर फ़ेकला जातो. कदाचित हे सगळे घरात न घडता, एखाद्या हॉटेलमधेही
घडतेय पण बाकी बहुतेक सगळे तेच व तसेच. एक महत्वाचा आणि फ़ार मोठा बदल म्हणजे,
मुलामुलीना जरा एकांतात भेटू दिले जाते, आणि ते एकमेकांशी बोलतात...

पण काय बोलतात ?

अनेकजणांशी बोलल्यावर मला हे प्रश्न ठराविकच आढळले.
मजेशीर वाटतय. पण आवडता रंग कुठला, हा हमखास विचारला जाणारा प्रश्न. काय कळते
त्यातून कोण जाणे ?

आवडता गायक, आवडते गाणे. छंद हे सगळॆ विचारले जातेच.

आवडता नट, नटी पण विचारले जाते. समजा मुलाने ऐश्वर्या आणि मुलीने हतिक रोशनचे नाव
घेतले तर, त्या दोघांचेहि एकमेकांशी लग्न झालेले नाही, हा विचारच कुणाच्या डोक्यात येत नाही.
करियर प्लॅन्स पण विचारले जातात. आणखी बरेच काहि सटरफ़टर बोलले जाते.
एखाद्याला अगदीच प्रामाणिकपणाचा झटका आला तर, आपले फ़सलेले प्रेमप्रकरण वा मोडलेले
लग्न याबद्दल पण सांगितले जाते. आणि यावेळी, हमखास, उदारपणाचा आव आणून, आता
ते विसरायला हवे, असा साळसूद सल्ला दिला जातो, ( पण मनाच्या एका भक्कम कोपऱ्यात
याची नोंद केली. पुढे आयुष्यभर टोमणे मारायला !! )

घरी कोणकोण असतं, हे पण विचारलं जातं

आणि एवढ्याश्या माहितीवरुन आयूष्यातला एक महत्वाचा निर्णय घेतला जातो.

पत्रिका बघितली जातेच.आमचा पत्रिकेवर विश्वास नाही म्हणणाऱ्या बहुतेक जणांची, पत्रिका कुठेच
जुळत नसते आणि हमखास जुळणारी पत्रिका करुन देणारे, पण आहेतच.

रक्तगट विचारला वा सांगितला जातो (त्याचे नेमके काय महत्व आहे, हे बऱ्याचजणाना माहित नसते.
निगेटिव्ह ग्रुप म्हणजे वाईट, असे समजणारे पण अनेकजण बघितले आहेत मी.) लग्नाचा दृष्टिने
कुठल्या वैद्यकिय चाचण्या व्हायला व्हाव्यात, हेच माहित नसते. आणि आजकालच्या जमान्यातही,
एच आय व्ही टेस्टबद्दल आग्रह धरला जात नाही.

पण यावर एकवेळ मात करणे शक्य आहे, पण बाकि बाबींचे काय ?

फ़ार पुर्वी, बालिका वधु, नावाचा एक सिनेमा आला होता. लग्न म्हणजे वाजत गाजत
एका घरातून दुसर्‍या घरी जाणे, असे त्यातल्या नायिकेला वाटत असते.
मला नाहि वाटत कि आजही तरुणाना, नेमका अर्थ कळलाय. आपल्या समाजाने
ज्या काहि सुसंस्कृतपणाच्या कल्पना केल्या व जोपासल्या आहेत. त्यातला हा एक
संस्कार वा बंधन आहे म्हणा. आज तो भाबडेपणा उरला नसला, तरी सोय म्हणुन
म्हणा वा बंधन म्हणुन म्हणा, आपण हे मान्य केलेय. कायदा सुद्धा याकडे अजून
एक संस्कार म्हणुनच बघतोय. तसेच आपण पितृसत्ताक पद्धती मान्य केलीय, हे
एक सत्य आहे.

एका चर्चच्या बाहेर लिहिलेले वाक्य वाचले ते असे, मॅरेज इज टू फ़र्गिव्हर्स लिव्हिंग
टूगेदर. आपल्या घरात आपले आईबाबा, बहिण भाऊ असतात. क्वचित इतरही माणसे
असतात. त्या सगळ्य़ांशीच आपले पटते असे नाही, सगळ्यांचेच स्वभाव आपल्याला
आवडतात असे नाही. असे असताना, आपण हरघडी तडजोडी करतच जगतो ना ?
आपलाही स्वभाव फ़ार काही आदर्श नसतो, आपल्याही स्वभावाचे कंगोरे, इतराना
टोचत असतात. आणि तेही आपल्याला संभा्ळूनच घेत असतात. याची आपल्यालाही
जाणीव असते. यात थोडा भाग अनेक वर्षांच्या सवयीचा असतो तर थोडा, अपरिहार्यतेचा.
आपण त्याना सोडून कुठे जाणार वा त्याना तरी आपल्याशिवाय कोण आहे, हा विचार
आपल्या मनात सतत असतो.

पण लग्न करुन आणलेली मुलगी मात्र खुपदा परकी वाटते. हा परकेपणा काळाच्या
ओघात कमीकमी होत नष्ट झाला तर सोन्याहून पिवळे, पण तसे होताना दिसत नाही.
हा परकेपणा दोन्हीबाजूने असतो.

याची कारणे अनेक असतात, पण त्यापैकी काहि कारणे तरी, आधी समजण्यासारखी
असतात.

१) पैसा :
पैसा वा आर्थिक कारण, हे अनेक बेबनावात मूळ कारण असल्याचे मला दिसले.
पैश्याने काय विकत घेता येते व काय नाही, याचे भान यायला अनेक पावसाळे
बघावे लागतात. पण लग्नाळू वयात मात्र, पैसा असला तर अनेक सुखं मिळवता
येतील असा ग्रह असतो.
मुलाच्या आर्थिक कुवतीबाबत भ्रमनिरास झाल्यामुळे कुरबुरी सुरु होतात. आणि
हाच मुद्दा लग्न ठरवताना दुर्लक्षित ठेवला जातो.
पैश्याला कोण किती महत्व देतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्या राज्याच्या
काही ठराविक भागात पैश्याला फ़ारच महत्व दिले जाते, असा माझा अनुभव आहे.
"पोरगा आजारी पडला आणि माझे दोन हज्जार रुपये खर्च झाले" अशी वाक्ये
मला तरी ऐकायला असह्य वाटतात. पण याबाबतीत स्पष्ट बोलणे होत नाही.
माझ्याकडे अमुक एवढे पैसे आहेत. माझी मिळकत एवढी आहे. माझ्या पुढच्या
आयुष्यात मला तूझ्याकडून एवढ्या पैश्याची अपेक्षा आहे, इतके स्पष्ट बोलणे
होत नाही. शिवाय हि अपेक्षा जोडिदारानी, एकमेकांकडूनच ठेवायची आहे,
एकमेकांच्या आईवडीलांकडून नाही.
मुलीनी तिच्या लग्नानंतर, तिच्या आईवडीलाना आर्थिक मदत करावी, यात
गैर काहीच नाही, पण याबाबतीतही स्पष्ट बोलणे होत नाही. माझ्या सासुबाईनी,
हि अमुक तारखेपर्यंत आमच्याकडे राहिली, तरी तिच्या त्या दिवसापर्यंतचा पगार
आम्हाला द्या, असा हिशेबच मांडला होता.
हे वाचायला विचित्र वाटतेय, पण जॉंईंट अकाऊंट उघडायला दिलेला नकारही
बेबनावाला कारण ठरलेला मी बघितला आहे. स्वत:चे स्वतंत्र खाते ठेवण्यातही
गैर काहि नाही, पण या बाबतीत स्पष्ट बोलणे होत नाही. आर्थिक बाबी स्वतंत्र
ठेवणे, हा एक विचार आहे. एका जोडीदाराला तो नॉर्मल वाटणे आणि दुसर्‍याला
तो अनावश्यक वाटणे, हा फ़रक असू शकतो, हेही तेवढेच नॉर्मल आहे. एकाला
ते स्वातंत्र्य वाटेल, तर दुसऱ्याला तो अविश्वास वाटेल.

२) स्वभाव
कुठल्याही "वर/वधु पाहिजे" जाहिरातीत, स्वभाव अगदी "मनमिळाऊ" असेच
लिहिलेले असते. पण तो तसा असतो का ?
स्वभावाला औषध नसते, हे आता काहि तितकेसे खरे नाही. योग्य वेळी,
योग्य ते उपचार घेऊन, अनेक मनोविकारांवर ताबा मिळवता येतो. पण
मानसोपचार घेण्यात आपल्याला कमालीचा कमीपणा वाटतो. त्या क्लिनीकमधे
जाणे, म्हणजे आपण वेडे आहोत, असा विचित्र ग्रह आपण करुन घेतलेला आहे.
मुला मुलींच्या पालकाना याची कल्पना नसते असे नाही, पण भावी जोडिदाराला
हे सांगणे, कमीपणाचे मानले जाते. शिवाय "एकदा लग्न झाले कि सुधारेल",
असा विचार केला जातो.
शिजोफ़्रेनिया, हा विकार नको तितका फ़ैलावला आहे. पण त्याबाबत आपल्याला
जाण नसते. यावर उपाय नक्किच आहेत, पण त्या पुर्वी विकाराचा स्वीकार
करणे गरजेचे आहे.
माझ्या सासुबाईनी, साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे असताना, तोंडावर रुमाल ठेउन
"नाहितरी, तिरसटच आहे ती" असे पुटपुटले. मे.जजसाहेबानी ते नेमके ऐकले,
आणि नियमानुसार त्यानी ते वाक्य, जबानी म्हणून नोंदवले. हेच जर त्या
लग्नाआधी पुटपुटल्या असत्या, तर बरे नसते का झाले ?

स्वभाव म्हणजे नुसते मनोविकार नाहीत. स्वभावाला अनेक कंगोरे असतात.
एखाद्या बाबीबाबत आपण कमालीचे आग्रही असतो. यात स्वच्छता, वैयक्तीक
स्वच्छता, टापटीपपणा ( जिथली वस्तू तिथे ), जागरण, आहारपद्धती, पोषाख,
अश्या अनेक बाबी येतात. या बाबतीत जी व्यक्ती आग्रही असते, तिच्या इतरांकडूनही
तश्याच अपेक्षा असतात. किमान सहकार्याची तरी अपेक्षा असतेच असते. पण
जर जोडिदार तसा नसेल, तर याबाबतीत वाद होतात. जी व्यक्ती अशी आग्रही
नसेल, तिला हि बंधने, अत्यंत जाचक वाटू शकतात. याबाबतीत बोलणे जरी झाले.
तरी ते सकारात्मक असते. म्हणजे मला ना खुप नीटनेटके रहायला आवडते, एवढेच.
पण समोरचा तसा नसेल, तर मला किती संताप येतो, त्रासदायक ठरते, हे
सांगितले जात नाही. याबाबतीत प्रत्येकानेच स्वत:चे अवलोकन करायला हवे.

याबाबतीत आणखी एक पैलू आहे तो असा, कि आपला मुलगाच जर अव्यवस्थित
राहणारा असेल, तर आई, त्रागा करत का होईना, सगळे निस्तारत राहते.
पण असा सहनशीलपणा जोडीदाराच्या बाबतीत दाखवणे, कमालीचे अवघड जाते.

आणखीही मुद्दे आहेत, ते बघूच.

मला असे वाटते की ठरवलेल्या लग्नांमध्ये जे criteria आहेत त्यांना थोडे शिथिल करणे गरजेचे आहे. मुलगी सुंदर, सुशिल, स्मार्ट, आपल्याच पोटजातीची, मुळ गाव आपल्याच गावाजवळचे असलेली, अमुक तमुकच शिक्षण घेतलेली, अमुक तमुक इतकीच उंची असलेली, गोरी, लांब केस असलेली, अमुक तमुक स्टेशनपर्यंतच कामाचे ठिकाण असलेली, अमुक तमुक वेळी घरी हजर होणारी, स्वयंपाक येत असलेली, कमितकमी अमुक तमुक पगार असलेली, इ. अटी पुर्ण होऊन पत्रिका जुळली तरीही अमुकच नक्षत्रावर आणि तमुकच राशीत जन्मलेली, तमुकच चरण पत्रिकेत नसलेली मुलगी मुलाला किंवा पालकांना हवी असते.

काही मुलीच्या पालकांच्या सुद्धा अवास्तव अपेक्षा असतात. माझ्या भावासाठी एक मुलगी सांगुन आली होती. पत्रिका वगैरे जुळल्यानंतर तिचे वडिल आमच्या घरी आले होते. (भाऊ सिए आहे आणि ती मुलगी सुद्धा सिए होती). 1 BHK flat पाहून ते म्हणाले ' आमच्या मुलीला कायम स्वतंत्र रूम आहे.' हे ऐकून आम्ही नकारच दिला. माझ्या मामेभावाचे स्थळ एका मुलिकडच्यांनी या साठी नाकारले की तो डोम्बिवलीला राहतो आणि ते पार्ल्यात राहतात.

या आणि अशा अनेक गोष्टींमध्ये एक महत्वाची गोष्ट नजरेआड केली जाते ती म्हणजे 'स्वभाव'.

वरिल प्रतीसदाला शम्भर मोदक. बहुतेक जणाना आखुड्शिन्गी बहुदुधी सुन / बायको हवी असते.
ही एक बाजू आहे.तसेच सुनेने मात्र खाली मान घालुन ऐकावे अशी अपेक्शा करणारे लोक
मुलिच्य सास्रि मात्र तिची सत्ता असवी यासाटई प्रयत्नशील असतात.असो.
मुख्य मुद्दा ह की ज्या त्रुटि / रुढी मुळे आप्ल्याला तड्जोडी करव्या लागल्या त्या विषयी सगळे
उदसिन असतात.त्या पुढच्या पिढीने करावे की नाहि या बाबिन्ची चर्चा व्हायला हवी.

दिनेश,
खर सांगायच तर ४९८अ चा असा निकाल मोबो वर देणे मला योग्य वाटत नाही, हे जरा अतिच होतय असे वाटते
कदाचित तुमच्यावर अन्याय झाला असेल ही.
बर्‍याच वेळा ४९८अ चा दुरुपयोग होतो ही. परंतु टाळी एका हाताने वाजत नाही.
परंतु तुम्हाला मे. कोर्टाने <<< Therefore, prosecution has failed to prove the guilt of accused beyond all reasonable doubt .>>> असे वाक्य टाकले आहे. म्हणजेच तुम्हाला clean acquittal दिलेले नाही. माझ्या मते पोलीसांचा तपास करण्याची पद्धत योग्य नसल्याने बर्‍याच वेळा फायदा आरोपीला होत असतो. त्यामुळे दिवसा ढवळ्या खुन करणारे सुद्धा निर्दोष सुटतातच कि!!!
फिर्यादी पक्ष त्यांची केस निट शाबुत करु शकलेले नाही, म्हणुन तुम्ही सुटले. परंतु तुमचा अविर्भाव गड जिंकल्याचा आहे. यात तुमचा अतिऊत्साह आहे. तो नसावा असे वाटते.

chhayadesai52,
यांच बरोबरच आहे कि!!

नमस्कार नरेन,

क्लीन अक्विटल म्हणजे काय असते ?
असे एखादेच विधान वेगळे काढून, त्याचा आपल्याला हवा तो अर्थ लावणे, याला अर्थ आहे ?
कोर्टाची विधाने आपण नीट वाचलेली दिसत नाहीत.
पोलीसाना योग्य तो अवधी, मे कोर्टाने दिलेला होताच.
योग्य तो तपास करायला, कुणी रोखले होते त्याना ?
निदान जे पुरावे सादर करतो आहेत, ते बनावट तर नाहीत ना, एवढे ते बघू शकत होते ना ?

एखाद्या खून्याशी आपण केलेली तुलना, बघता, मी आपल्या कल्पनाशक्तीला दाद देतो.

४९८ अ चा नेमका किती गैरवापर होतो, याची कल्पना आहे का आपल्याला ?
तसेच माझ्यावर अन्याय झाला, असे मी कुठे म्हणतोय. उलट मलाच नव्हे तर आम्हा सगळ्यानाच न्याय मिळाला, हे सत्य आहे.

मी निकालाच्या नंतर जे लिहिले आहे, ते आपण वाचलेले दिसत नाही ?
आणि पुढे जे लिहिणार आहे, तेही अवश्य वाचा. प्रतिक्रिया देण्याची घाई करु नका.
(खोटी कागदपत्रे सादर करणे, खोटी शपथपत्रे सादर करणे, हे सगळे यायचेय हो अजून.)

३. नातलग
माझ्या आजोळी आणि वडीलांच्या घरी देखील, एकत्र कुटंबपद्धति आहे. आजोळी
तर आजही गोकूळ आहे. पण शहरात वेगळ्या कल्पना असल्यामूळे सहसा एकत्र
कुटुंब दिसत नाहीत.
एकत्र नसली, तरी निदान आईवडील तर घरात असतातच. क्वचित एखादा भाऊ
वा बहीण. त्यांची जर लग्नं व्हायची असतील तर ते असणारच. आपल्या समाजात
मोठ्या भावावर, आईवडीलांची जबाबदारी, परंपरेने टाकली आहे. आणि ऐकून नवल
वाटेल, त्यांचे घरातले अस्तित्वच, खुपदा बेबनावाचे कारण ठरते.
डोंबिवलीच्या एका दांपत्याने, अश्याच त्रासाला कंटाळून, पारसिकच्या बोगद्यात
आत्महत्या केली होती. ( या घटनेवर आधारित एक नाटक व एक सिनेमा
आला होता. )
घरात इतकी माणसे असतील, तर त्या सगळ्य़ांचे स्वभाव अगदी आदर्श असतील
हे कसे शक्य आहे. घरातलेच माणूस म्हंटल्यावर, आपण त्याला संभाळून घेतोच.
नविन आलेल्या सुनेला मात्र हे फ़ारच अवघड वाटते. आणि वेगळे राहण्याचा हट्ट
सुरु होतो.
आईवडील समजुतदार असतील तर ते आपणहूनच वेगळे व्हायचा सल्ला देतात.
पण कधी कधी आर्थिक वा भावनिक कारणांसाठी, वेगळे होणे अशक्य होते.
मुलीचा वेगळे राहण्याचा आग्रह आणि मुलाची वेगळे न होण्यामागची कारणे
यांची चर्चा होत नाही, लग्नाआधी. फ़क्त नवरा हवा, पण सासरचे एकही माणूस
घरात नको, असला विचित्र आग्रह असतो, कधी कधी मुलींचा.
याबाबतीत, कौटूंबिक न्यायालयात, एका मुलीने, मला असे सांगितले, कि "मी
नाही का आले माझे माहेर सोडून. मग तो का नाही सोडू शकत, आपल्या
आईबाबाना ?". मला उत्तर देणॆ अवघड झाले. लग्नाआधी हे का नाही विचारले,
असे मी विचारल्यावर, तिच्याकडेही काही उत्तर नव्हते.
इथे कोण बरोबर वा कोण चूक, असे मत मी नोंदवत नाही, फ़क्त आपले जे
काही मत असेल, ते लग्नाआधी स्पष्टपणे मांडले पाहिजे, असे मला म्हणायचे
आहे.

४. घरकाम

अगदी एका माणसाचे घर असले तरी, अनेक व्यवधानं ठेवावी लागतात. दोन
माणसांचे असेल तर त्याहून जास्त. आणि घरात जर जास्त माणसे असतील
तर अर्थातच थोडे काम जास्त असते. घरकामाला माणसे असली तर थोडा भार
कमी असतो.
पण तरीही घरातला प्रत्येक जण आपला वाटा उचलतच असतो. नविन माणूस
आल्यावर काम थोडे वाढते आणि थोडे काम वाटलेही जाते. यात थोडा अन्याय
झाला, तर तिथे एक ठिणगी पडते.
हेही विचित्र वाटेल, पण बेबनावाचा हा एक महत्वाचा मुद्दा आढळला मला.
मुद्दाम जास्त काम सांगणे, कामात चुका काढत राहणे हे जसे होते, तसेच
अजिबातच काम न करणे, इतरांकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे, हे ही होतेच.
गेल्या पिढीतल्या, बऱ्याच बायका नोकरी करत होत्या, त्या आता सासू झाल्यावर
नोकरी करणाऱ्या सुनेबाबत त्या थोडा समजुतदारपणा दाखवू शकतात. पण ज्या
बायकानी नोकरी केली नाही, त्यांच्या नव्या सुनेकडून अवाजवी अपेक्षा असतात.
आजकालच्या नोकऱ्यांमधे, पुर्वी बाई म्हणून ज्या सवलती मिळत होत्या, त्या
मिळत नाहीत. कामाचे तासही जास्त असतात. नोकरीची, व्यवसायाची, करियरची
टेंशन्स संभाळत, आदर्श, गृहिणी होणे, जवळपास अशक्य होते.
एकत्र कुटुंबात आजही, नवऱ्याने बायकोला घरकामात मदत केली, तर त्याच्याकडे
छद्मीपणाने बघितले जाते. दोघांचे घर असले तरी, घरकाम म्हणजे बायकांचे काम,
असा पारंपारीक रागच आळवला जातो.
शिक्षणाचा ताण बघता, मुलीना घरकाम करायला सवड मिळत नाही, आणि लग्नानंतर
अचानक पडलेली जबाबदारी, पेलणे अवघड होते.
घरकाम निपटण्याची काहि कौशल्ये असतात. ते काम करण्याची आवडही असू शकते,
पण सवय वा आवड नसेल, तर हेच काम करणे, मानसिक व शारिरिक दृष्ट्याही
थकवणारे ठरते.
हा अर्थातच वैयक्तीक आवडीनिवडीचा भाग झाला, पण या बाबतीतही मनमोकळी
चर्चा होत नाही. मुलाच्या आणि मुलीच्याही या बाबतीतल्या, अपेक्षा/मर्यादा स्पष्टपणे
सांगण्याची हिम्मत सहसा नसते, त्याच्याकडे.
"मला ना बाहेरचे काहि आवडत नाही." " एवढी हॉटेल्स असताना, रोज काय ती
उठाठेव करायची?" "आईने कधी चहाही नाही करु दिला मला.". "बायकानी सगळा
वेळ किचनमधे का काढायचा ?" अशी उलटसुलट मते असू शकतात, नव्हे असतातच,
फ़क्त त्याची लग्नापूर्वी चर्चा होत नाही.

५. मनाविरुद्ध लग्न
मला, "हम दिल दे चुके सनम" सारखी कहाणी अनेकजणांकडून ऐकायला मिळाली, फ़क्त
तिचा प्रत्यक्षातला शेवट, त्या सिनेमासारखा नव्हता.
मनाविरुद्ध लग्न होण्याची अनेक कारणे मला आढळली. प्रियकर वा प्रेयसीने दिलेला
नकार. प्रियकर व प्रेयसीला घरच्यानी दिलेला नकार, प्रियकर, प्रेयसीबाबत समजलेले
सत्य आणि झालेला भ्रमनिरास अशी कारणे होतीच पण मनाविरुद्ध लग्न करण्यात
आईवडीलांनी आणलेला दबाव हे देखील कारण होते. या दबावाची कारणे अनेक होती,
"वय झालं, अजून कसे कोणी पसंत पडत नाही तूला ?", "घरात लहान भावंडे आहेत,
त्यांचा विचार केलास का ?", "यापेक्षा चांगले स्थळ तूला कुठे मिळणार आहे ?"
असे या दबावाचे स्वरुप होते.
नेमक्या एका कमजोर क्षणी अशी व्यक्ती लग्नाला होकार देते, आणि पुढे कायम
दुर्मुखलेल्या चेहर्‍याने वावरत राहते.

दुसऱ्या व्यक्तीने केलेले हरेक प्रयत्न निष्प्रभ ठरतात. एका क्षणी दोघांचाही संयम
संपतो.

६. फसवणूक
फ़सवणूक, हे घटस्फोटाचे कारण ठरू शकते, पण ते सिद्ध करणॆ कठीण जाते. बेबनावाचे
हे एक कारण मला आढळले. यात वय, आजार, शिक्षण, मिळकत, मालमत्ता, व्यंग अश्या
अनेक बाबतीत सत्य परिस्थितीची कल्पना न दिली गेल्याचे दिसले.

७. इतर
इतर कारणांमधे शारिरिक अक्षमता हे एक महत्वाचे कारण आणि अगदी क्वचित सेक्सुअल
प्रेफ़रेन्स हे कारण आढळले.
मारहाण आणि छळ ही कारणे आहेतच. पण ज्यांच्यावर खरेच असे शारिरीक अत्याचार होतात,
त्यापैकि किती व्यक्ती, न्यायालय तर सोडा, पोलीसांपर्यंत पोहोचतात, हे बघावे लागेल.

वरील कारणे मला, कौटुंबिक व इतर न्यायालयात भेटलेल्या व्यक्तिंच्या बोलण्यातून आढळली.
कुठलेही कारण असले तरी, ते न्यायालयीन कसोटीवर उतरणॆ अत्यंत गरजेचे असते.
पण न्यायालयात जाण्यापुर्वी, काहि बाबी पडताळणे आवश्यक असते. तेच आपण पुढे बघू.

>> म्हणजेच तुम्हाला clean acquittal दिलेले नाही<<<

नरेन, तुम्ही "No single act regarding to other accused is mentioned by Mangala. Evidence of prosecution witnesses are not trustworthy, reliable. There was material contradiction and improvements in the direct evidence. "ही वाक्ये वाचायला विसरला होतात का?

कोणताही निर्णय देताना कोर्टाला त्या निर्णयाप्रत येण्याचे कारण द्यावे लागेल ना?
पुढे एक परिच्छेद देत आहे. त्या परिच्छेदा प्रमाणे criminal proceedings मध्ये कोणताही आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी ही आरोपकर्त्याची असते... या केसमध्ये आरोपकर्त्याना ती जबाबदारी पार पाडता आली नाही आणि ती का पार पाडता आली नाही, ते कोर्टाने विशद केले आहे.

In the ‘Law of Evidence’ by Ratan Lal and Dhiraj Lal (@ pages 10-11), this aspect is highlighted thus:

Difference between evidence in civil and criminal proceedings

…………………

In a civil case, a Judge of fact must find for the party in whose favour there is a preponderance of proof, though the evidence is not entirely free from doubt. In a criminal case, no weight of preponderant evidence is sufficient, short of that which excludes all reasonable doubt……

In a criminal trial the degree of probability of guilt has got to be very much higher – almost amounting to a certainty – than in civil proceeding, and if there is slightest reasonable or probable chance of innocence of an accused, the benefit must be given to him……..

The onus of proof in criminal cases never shifts to the accused, and they are under no obligation to prove their innocence ………

दिनेश, लहान तोंडी मोठा घास घेत आहे त्याबद्दल माफी असावी. हे तुमचे वैयक्तिक पान आहे हे माहीत असुनही मला हे सांगावेसे वाटते की जे झाले ते वाईटच झाले पण तुम्ही ते परत इथे प्रकाशीत करुन ज्यांना माहीती नाही त्यांना माहीती करुन देत आहात. जरी महाराष्ट्र सरकार विरुध्द केस असली तरी कुणीही ही माहीती खोदुन काढुन तुम्हाला विचारले असते तर हे देणे जास्त योग्य दिसले असते. तसेच.

15] Now it is necessary to turn to the incident, when Mangala came early in the house>>>
( I am deleting the lines, to protect the honour of my sister in law – Dinesh ) >>>

निदान या गोष्टी तरी इथे मांडायला नको होत्या असे मला वाटते. To protect the honour of your sister in Law तुम्ही त्यांचे नाव कशाकरता प्रकाशीत केलेत? एक सामान्य माणुस म्हणुन मला जे पटले नाही व वाटले ते मी लिहीले आहे. काही चुकले असल्यास माफ करावे.

दिनेश जे झाले ते अत्यंत भयानक आहे.

जे झाले ते स्पष्ट आणि स्वच्छ लिहायला तुम्हाला किती त्रास होत असेल ह्याची कल्पना पण करवत नाही.

तुम्ही माण्डताय ते मुद्दे शब्दशः पटत आहेत, आणि खूप खूप महत्वाचे ही आहेत. लग्न हा एक जुगार असतो म्हणतात. तुम्ही डाव हरलात, पण तुमच्या सारखा कुणी हारु नये ह्या साठी तुम्ही करताय तो आटापिटा मनाला भिडतोय.

लिहा दिनेश, मी वाचतेय. अगदी जजमेंटल न होता. एक केस स्ट्डी म्हणून वाचतेय.

केपी, इथे मला लिहिताना किती क्लेष होताहेत, याची कल्पना येणार नाही. मी मुद्दामच निकाल आधी दिलाय, कारण याचा शेवट काय झाला, ते आधी कळावे. मला हि एखादी उत्सुकता वाढवणारी कादंबरी करायची नाही. शिवाय मी इथे सगळ्यानाच माझे आपले मानतो, त्यामुळे संकोच बाजूला ठेवूनच लिहितोय.
मी जर नाही लिहिले तर लोक सावध कसे होतील ? आम्ही सर्वानी जो कायदेशीर लढा दिला, तो कसा दिला, इतराना त्यातून काय बोध घेता येईल, तेच बघायचेच. आता मे. कोर्टाने निकाल दिल्यानंतर, सगळेच मळभ दूर झालेय. या आरोपाना काहि अर्थच उरलेला नाही. पण जर मी इथे लिहिले नाही, तर काय आरोप झाले, ते कसे कळणार ?

हे लेखन प्रतिवाद करणार्‍यांना सावध करण्यासाठी जितके आहे, तितकेच तक्रारदाराना परीणामांची भीषणता दाखवण्यासाठी देखील आहे.
( आणि खास नरेन, यांच्या माहितीसाठी, या कलमाखाली, आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. इतर ९८ % केसेसमधे, नवर्‍याकडची माणसे ( यात वृद्ध आईवडील, भाऊ, वहीनी, बहीणी, मेहुणे, लहान मुलेदेखील ) बरबाद होतात. नव्हे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. मी तगलो, ते मला मिळालेल्या, सपोर्ट ग्रुपमूळे. मग तिथे मी हे लिहू नये का ? )

असो, आता हे मूळ कलम काय आहे, त्याबाबत वेगवेगळ्या उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने, काय मते मांडली आहेत, आणि हे कलमच कसे समाजविघातक आहे, त्याचे खाली, एका संकेतस्थळावरुन घेतलेले उतारे देतोय. तसेच हे कलम रद्द न होण्यामागे, कुणाचे काय हेतू आहेत, तेही यातून स्प्ष्ट व्हावे.

Passed by Indian Parliament in 1983, Indian Penal Code 498A, is a criminal law (not a civil law) which is defined as follows,
“Whoever, being the husband or the relative of the husband of a woman, subjects such woman to cruelty shall be punished with imprisonment for a term which may extend to three years and shall also be liable to fine. The offence is Cognizable, non-compoundable and non-bailable.
Please read the Act 46 of 1983 to understand 498a better.
How are you at risk and why it is dangerous for the society?
Your wife/daughter-in-law who's demands are not met can make a written false complaint of dowry harassment to a nearby police station. The husband, his old parents and relatives are immediately arrested without sufficient investigation and put behind bars on a non-bailable terms. Even if the complaint is false, you shall be presumed guilty until you prove that you are innocent.
498a can only be invoked by wife/daughter-in-law or her relative. Most cases where Sec 498A is invoked turn out to be false (as repeatedly accepted by High Courts and Supreme Court in India) as they are mere blackmail attempts by the wife (or her close relatives) when faced with a strained marriage. In most cases 498a complaint is followed by the demand of huge amount of money (extortion) to settle the case out of the court. This section is non-bailable(you have to appear in court and get bail from the judge), non-compoundable (complaint can't be withdrawn) and cognizable (register and investigate the complaint, although in practice most of the time arrest happens before investigation). There have been countless instances where, without any investigation, the police has arrested elderly parents, unmarried sisters, pregnant sister-in-laws and even 3 year old children. In these cases unsuspecting family of husband has to go through a lot of mental torture and harassment by the corrupt Indian legal system. A typical case goes on for years (5-7 years is typical) and the conviction rate is about 2% only. Some accused parents, sisters and even husbands have committed suicide after time in jail.

Why supreme court calls 498a as "Legal Terrorism"?
25 reasons “Why IPC 498A is Anti-Social?”
1 It is handled under the Criminal law for marriage related matters and not under Civil Laws.

2 Non-bailable warrant does not require proof before arrest. No investigation necessary. This exposes the vulnerability of the accused taking away their basic human rights.

3 Even those who were not part of the 'day-to-day' family life could be named and arrested on one complaint, which can also include pregnant women and children.

4 Accused is presumed guilty until proven innocent. No where in the world it is so.

5 Gifts are sometimes misunderstood as dowry. Who decides that the gift exchanged were 'gifts or dowry'?

6 It is non-compoundable which means that the complaint can’t be taken back that hinders any scope of reconciliation between the couple.

7 After a man is accused of 498A, he will not take his wife back later.

8 Old parents who lived with dignity and respect have to live with the stigma of harassing their daughter-in-law for the rest of their lives.

9 Groom’s relatives don’t find a suitable bride after they are accused under 498A

10 Most of the cases are filed because the husband refuses to throw his parents out of the house at the wife’s demands.

11 Husband’s job is at risk when he is accused under 498A who could even be the only breadwinner of the family.

12 The health of the old parents dangerously deteriorates after they are arrested in a 498A case.

13 Some even commit suicide for not able to withstand the depression and frustration of been falsely accused.

14 Old parents after 498a case become very apprehensive and advice their son not to marry again.

15 The family ends up paying a very high price to settle the case, the money that was saved for the parent’s health.

16 Most often the lawyers tend to take the family for a ride to extract as much money as possible.

17 The possibility of a woman over-reacting on a trivial matter in the family is never considered as a reason of complaint.

18 A woman tries to get divorce proceedings faster by filing a 498a case even if no dowry was demanded.

19 The witnesses (neighbors) tend to support the woman for not getting into a police case. They even fear of been accused by the woman if they don’t support the woman.

20 Some women marries an NRI and slaps a 498A case only to extort large sum of money

21 Even after knowing that the complaint can be false, police tend to support the woman and asks the man to settle the case with a financial compensation.

22 The case can easily linger in the court for years and only the groom’s family has to pay the price.

23 498A case can be filed even after the divorce, which only means that the accuser wants to demand money legally apart from maintenance.

24 There is no prohibition clause in the 498A law that would stop women to misuse it.

25 It is nearly impossible to file a case of defamation on the accuser because the police will not register the case and it would be hard to prove it.
Note :The existence of dowry deaths in the rural areas is not the reason for lenient laws as understood by women organizations. The law is already unfair, biased and inapplicable. The true reason for dowry deaths in rural areas is poverty and under-developed civilization. Dowry deaths still flourishing in the rural areas and misuse of 498a law is flourishing in the urban areas. Unwillingness of the women’s organization to alter the law so that misuse of law can be stopped is evident. On the contrary, women organizations are planning to strengthen and increase the severity of the 498a law to curb dowry death, which is absolutely preposterous. One must not forget that the chunk of the GDP comes from the urban cities where these laws are prevalently misused. If the misuse of laws still continues then the social infrastructure will collapse which will have a direct unfavorable impact on the country’s economy. If the law can’t curb dowry deaths, can’t even stop misuse, then what is the use of such a law that causes millions of people to suffer ?

याची झळ आमच्या ओळखीतल्या एका कुटुंबाला बसली होती नुकतीच. सगळ्यात लहान भावाच्या मेंटली डिस्टर्बड बायकोने आत्महत्या केली. तिच्या माहेरच्यांनी केस केली. पोलिसांनी काहीच ऐकून न घेता यांच्या घरातल्या अनेक वस्तू जप्त केल्या केवळ माहेरच्यांनी सांगितलं आम्ही दिल्या म्हणून. गेली तिचा मुलगा आहे. तेव्हा पावणेतीन वर्षांचा होता. त्याच्याकडे तिच्या माहेरचे मामा इत्यादी बघायलाही तयार नाहीत. तो रडायला लागला तर दोन्ही मोठ्या काकू त्याला सांभाळत होत्या. सासू, सासरे, नवरा, दोन्ही मोठे दीर सगळे आतमधे. सासूला बेल आधी मिळाली. पण स्वत:च्या राहत्या घरात जायची परवानगी नाही. दोन्ही मोठ्या सुना आपापली मुलं, गेली तिचं मूल आणि आजारी सासू हे सगळं सांभाळत हा सगळा केसचा प्रकार सांभाळत होत्या. सासरे आणि दोन्ही दिरांना बेल मिळायला महिना गेला, नवर्‍याला दोन महीने. मग पुढे दीड दोन वर्ष सगळं चाललं होतं. तिच्या मानसोपचार तज्ञाचं स्टेटमेंटही होतं. वस्तूंसाठी छळ हे कारण तगच धरू शकलं नाही. कारण कोर्टात जप्त केलेल्या सगळ्या वस्तूंच्या पावत्या आणि कुणाच्या खिशातून खर्च झालाय हे सगळं सिद्ध झालं. एवढंच नाही तर काहीच खातरजमा न करता कारवाई करणार्‍या पोलिस इन्स्पेक्टर वर चौकशी लागली.

या केसमुळे असं नाही पण त्याच सुमारास या कायद्यामधे पोलिसांना पूर्ण खातरजमा केल्याशिवाय अटक, जप्त्या अश्या गोष्टी करू नयेत असाही एक अधिनियम निघाला.

या कायद्याचा गैरवापर होतो हे मान्य करूनही माझ्यामते हा कायदा असणं हे गरजेचं ठरतं कारण गैरवापराच्या केसेस पेक्षा जास्त खरोखर संरक्षण मिळवून देणार्‍या केसेस आहेत एवढं नक्की.

नी, मी वर दिलेल्या आकडेवारीनुसार ९८ टक्के गैरवापराच्या केसेस आहेत. ज्या स्त्रिया खरेच जाचाला बळी पडतात, त्यांच्या पर्यंत, कायदा, पोलीस आणि संघटना, यांच्यापैकी काहिच पोहोचत नाही.
त्यांच्या संरक्षणासाठी वेगळा कायदा होणे आवश्यक आहे.
माझ्याही केसमधे प्रत्यक्ष केस नोंदवणारा पोलीस निरिक्षक भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन निलंबित झाला.
आपल्या ओळखीत कितीतरी स्त्रिया जन्मभर नवर्‍याचा जाच सहन करतात. या कायद्याचा आधार त्यानी घेतला, तर विवाह बंधनच संपुष्टात येउन, त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार निघून जाईल.

अमि, क्रिमीनल लॉ मधला, एका महत्वाचा मुद्दा स्पष्ट केल्याबद्द्ल आभार.

या कायद्याचा आधार त्यानी घेतला, तर विवाह बंधनच संपुष्टात येउन, त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार निघून जाईल.<<
म्हणजे त्यांनी सहन करावं? माफ करा ही अपेक्षा पटत नाही.
९८% गैरवापराच्या केसेस? माझ्या अभ्यास नाही पण मी गैरवापराच्या केसेस कमी बघितल्यात आणि न्याय मिळाल्याच्या जास्त.
तसेच या ९८% पैकी खोटे साक्षी पुरावे जमा करून 'बाइज्जत बरी' होणारेही असणारच. आणि मग ती केस आपसूक गैरवापराच्या स्टॅटीस्टिक्स मधे जाऊन पडते. हा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही.

With all due respect to people who had suffered because of this... I still think that the law is much needed.

लिहा दिनेश, मी वाचतेय. अगदी जजमेंटल न होता. एक केस स्ट्डी म्हणून वाचतेय.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
दिनेश तुमच्यावर काय प्रसंग आणि यांची केसस्टडी....
कशाला तुम्ही हे वारंवार लिहुन स्वतःला क्लेश करुन घेता.
आता नविन जीवनाची सुरुवात करा.
झाले गेले विसरुन जावे
पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच र्‍हावे!!!!!!!!!!!
आम्ची सुध्दा आतडी पिळवट्तात हे वाचुन. क्रुपया हे बंद करा.

<<<< आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे.>>>
मग नंतर त्याच पॉलिश केलेल स्पष्टीकरण देवुन तुमच्या म्हणण्याचा अर्थ लागु नये, इतके लोक खुळे नाहीत.
तुमच्या मनातील स्री व्देश यातुन प्रकर्षाने जाणवतो. तुमचा हा हट्टाहास फक्त लोकांची सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न आहे हे स्पष्ट दिसतय. मग यात तुमच्या जवळच्या नातेवाईक स्री ची बदनामी झाली त्याचे तुम्हास सोयरे सुतक नाही याचे आश्चर्य वाटते.
फक्त २%च केसेस सिध्द होतात हे जरी खर असल, तरी याला खर कारण आपल्या न्यायसंस्थाचे धोरणच असे आहे कि, १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. म्हणुनच ९८ लोक सुटतात. नशीब २ ना विरुद्ध तरी गुन्हा शाबीत होतो. म्हणुन ९८ स्रीयांनी केलेल्या केसेस खोट्या असतात असे नाही. कदचीत खोट्या केसेसचे प्रमाण जास्त असेलही. पण प्रत्येक निर्दोष झालेली केस खोटी असते असे नाही.
<<<<खास नरेन, यांच्या माहितीस<>>
तुमच्यापेक्षा नक्कीच मी या केसेस जास्त पाहिल्यात आणि पाहत आहे. परंतु तुम्ही सर्व ज्ञानी असल्याचा अविर्भाव आणत आहात. माणसाने फक्त आपल्याच बाजुने विचार करु नयेत. दुसर्‍यांच्या बाजुचा ही विचार करावा.
<<<क्लीन अक्विटल म्हणजे काय असत>>>
म्हणजे जर मे.कोर्टाला वाटल कि, फिर्याद खोटी आहे. तर कोर्ट फिर्यादीस नोटीस काढुन त्याचेवर कारवाई करते. मग तुमच्या केस मध्ये असे झाले का?
<<<माझ्याही केसमधे प्रत्यक्ष केस नोंदवणारा पोलीस निरिक्षक भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन निलंबित झाला<<<>>>
या पोलीस निरिक्षकाने किती प्रमाणिक पणे खटल्याचा तपास केला असेल? आणि किती न्याय त्या केसला दिला असेल? म्हणुनच मी यापुर्वी लिहले आहे कि, <<<माझ्या मते पोलीसांचा तपास करण्याची पद्धत योग्य नसल्याने बर्‍याच वेळा फायदा आरोपीला होत असतो<<<>> .
तुमच्या वरची केस पुर्णपणे खरी आहे असे मी म्हणत नाही. म्हणुन मी तुमच्यावर अन्याय झाला असेलही असे लिहले होते. परंतु जिथे धुर आहे, तिथे काही तरी जळतय हे नक्की.

"घरातील गोष्टी चावडी वर आणु नये." हे आपली संस्क्रीति सांगते ते खरच आहे.
म्हणुनच मी तुम्हास या ठीकाणी विरोध दर्शविला. माझा विरोध तुमच्या केसला नाही, तर तुमच्या अश्या प्रसिध्दीस आहे. त्यातील काही मुद्दे ही हरकतीचे आहेत.म्हणुनच मी काही शंकाही उपस्थीत केल्या आहेत. म्हणुन वाईट माणुन घेउ नका.

केपी, इथे मला लिहिताना किती क्लेष होताहेत, याची कल्पना येणार नाही.>>>
माझ्या पोस्टमधला मुद्दाच तुम्हाला कळलेला दिसत नाहीये.

दिनेश, तुमचा हेतु उदात्त असला तरीही तुम्ही तुमच्या नातेवाईकांची नावे (त्या निकालातला काही तपशील गाळताना तुम्हीच I am deleting the lines, to protect the honour of my sister in law – Dinesh असे म्हणत आहात. ) देताना तुम्हाला त्यांचा Honour Protect करावासा वाटला नाही हे खटकले. असो. मी माझे मत नोंदवले.

असो.

दिनेश,

एवढ्या वर्षांच्या मानसिक त्रासानंतर तुम्हाला आणि कुटुम्बियांना मनःशांति मिळाल्या बद्दल समाधान वाटल. तुमचे अनुभव हे तुमचे स्वतःचे असल्याने ते इथे प्रकाशित करावेत का करु नयेत हा निर्णय सर्वस्वि तुमचा असावा हे माझ मत.

वरति तुम्हि लग्नांच्या संदर्भात जो उहापोह केला आहे त्यावरुन माझा असा समज झालाय कि या कलमाचा (४९८ अ ?) दुरुपयोग हा बहुतांशि ठरवुन केलेल्या विवाहातच होतो अस आपल्याला म्हणायचय. पण माझ्या माहितितल्या एका अतिशय सज्जन मुलाला प्रेमविवाहातहि असा अनुभव आला. ह्या मुलाने एकाच ठिकाणि काम करणार्‍या मुलिबरोबर प्रेम्विवाह केला (आंतरप्रांतिय विवाह), त्या मुलिने काय विचाराने हे लग्न केले तिचे तिलाच ठावुक पण लग्नानंतर तिला त्याचि कुठलिच गोष्ट पटेनाशि झालि, शेवटि ह्या कलमाचा वापर करुन त्याला आणि त्याच्या घरच्यांना त्रास देण्याचि धमकि देत (ज्याचि चुणुक तिने त्याच्या ऑफिसवर महिला संघटनेचा मोर्चा नेउन दाखवलि होति) वाजविपेक्षा जास्त प्रमाणात पोटगिचि मागणि करत परस्पर संमतिने घटस्फोट देण्यास ती तयार झालि. असे असुनहि प्रत्यक्ष सहि करण्याअगोदर पुन्हा एकदा तिने पोटगिचि रक्कम आणखि थोडि वाढवुन मागितलि!

तात्पर्य एवढेच कि फसवणुक कोणत्याहि प्रकारच्या लग्नांत होउ शकते. तसहि प्रेमविवाह करुन नंतर मुलिचा छळ केल्याचि उदाहरणहि काहि कमि नाहित. पितृसत्ताक्क पध्धति असलि तरिहि पुर्विइतकि पुरुषप्रधानता राहिलि नसल्याने विवाहानंतर पुरुषांच्या फसवणुक झाल्याचि उदाहरण दिसायला लागलित, बाकि फसवणुक हि कोणत्या एका गटाचि मिरासदारि अधि नव्हतिच! एक मुलगि दाखवुन दुसर्याच मुलिशि लग्न लावुन देण्याचि उदाहरण दोन पिढ्या आधिहि ऐकलि आहेत.

दिनेश, तुमच्या आयुष्यात घडलेल्या एका वादळाची कहाणी तुम्ही इथे नाही मान्डायची तर कुठे?
तुम्हाला बसलेल्या ठेचा बाकी कुणाला माहीत करुन घ्यायचि गरज वाटत नसली, अन अशा गोष्टी (माझ्यासहित) इतर कित्येकान्च्या आयुष्यात घडायची सूतराम शक्यता दिसत नसली तरी घडलेल्या घटना कुणी सान्गुच नयेत अन कुणी वाचूच नयेत असे आहे की काय?
अन तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटना वाचून कुणी मायबोलीकर लगेच स्वतःची मने कुणाएका बाजूने पूर्वग्रहदुषित करतील इतकी का मायबोलीकरान्ची मने अन बुद्ध्या तकलादू आहेत?
किम्बहुना, आपल्यातच वावरणार्‍याच्या बाबतीत असेही घडत असू शकते हे माहिती करुन घेण्याची सन्धी मला वाटते की (घालून घेतली तर) अक्कलेत भर घालणारीच आहे!
तुम्ही इथे या विषयावर काही एक लिहीणे, मत माण्डणे यात मला तरी गैर वाटत नाही!

अन्यथा आहेच की, लिम्ब्याला मूळव्याध आहे, दमा आहे, पाठदुखी आहे, दातदुखी आहे तरी त्याचा उल्लेख त्याने चूकूनही करू नये अशी अपेक्षा असणारे नरपुन्गव काही कमी नाहीत! का? तर मूळव्याध म्हणले की डोळ्यासमोर भलते सलते दृष्य येते म्हणून? Lol
अन वर असले काही लिहीले की लग्गेच तुम्ही "सहानुभुतीची" भीक गोळा करणारे ठरता! Proud
खड्या अनुभवाचे चरचरीत बोल ऐकवण्यामागची तळमळ जाणवण्यायेवढी सजगता जर असती तर काय हवे होते? पण तसे ते नसते! प्रत्येकजण आपापल्या दैवगतिने प्राप्त परिस्थितीचा व त्यातुन आलेल्या अक्कलेचा चष्मा लावून "दुसर्‍याकडे-त्याच्या आयुष्याकडे" बघत असतो.
जोवर असे बघताना तो "स्वतन्त्र-त्रयस्थ" अस्तो तोवर तर्‍हेतर्‍हेची मते, कित्येकदा अ नि अ, नोन्दवायला त्यान्ना कुणाची भिती बाळगायचि गरज नस्ते! पण जर आपल्या दैवगतीने प्राप्त झालेल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण बाजुला ठेवून समोरच्याच्या परिस्थितीशी मनाने/विचाराने एकरुप व्हायचा प्रयत्न केला, तर अन तरच, तुमच्यासारख्यान्चे "असले" अनुभव काय व्यक्त करतात, व ते अनुभव का व्यक्त व्हावेत हे समजू शकेल!
तर थोडक्यात म्हणजे, तुम्ही जो विषय काढला आहे, तो अतार्किक, अप्रस्तुत, अस्थानी वगैरे नसून, भले आमच्या सुरक्षित बुडाला अशा विषयान्मुळे चटके बसत नसतील, तरी असे विषय नि त्यान्चे चटके अस्तित्वातच नाहीत असे नाही! माझ्या मते ज्यान्ना यात काही गम्य वाटत नसेल, त्यान्नी वाचू नये, वादळात सापडलेल्या उन्टासारखे वाळून तोन्ड खुपसून बसावे, हाच उपाय योग्य ठरेल! Proud

लिंबुडाच्या पहिल्या पॅराला अनुमोदन.

(मुळव्याधाबद्दल मात्र काहीच बोलायचे नाही. त्याचा अन या बीबीवर मांडलेल्या समस्येचा/विषयाचा काय संबंध? तुला मुळव्याध असल्यामुळे चिंचवडाहून स्वारगेटास स्कुटरीवरनं येता येता तुझे कसे अतोनात हाल झाले हा विषयावर इथे पोस्ट/बीबी टाकून इतरांना मार्गदर्शन/प्रबोधन किंवा तुला सोल्युशन्स मिळतील, असे तुला म्हणायचे आहे काय? Uhoh )

Pages