निकाल

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

१५ नोव्हेंबर २००७. या दिवशी या सर्व पर्वाचा अंत झाला. सुरवात झाली २८ एप्रिल २००० रोजी. पण खरी सुरवात झाली
ती १८ मार्च १९९३ रोजी. त्या काळात असे वाटत होते कि याचा अंत कधीच होणार नाही का ?
आता काय आहे स्थिती ? मी या सगळ्याकडे तटस्थपणे पहायला शिकलो का ? जखमा बुजल्या, खुणाही नाहीत. पण ...
सल नक्कीच आहे. एका अर्थाने मी श्रीमंतही झालोय. ज्यानी त्या काळात जपलं, त्यांचे कधीच न फ़िटणारे ऋण आहे. पण एकदातरी हे सगळे लिहून काढायचे आहे. त्या सगळ्याना हे वाचून दु:ख होणार आहे. त्यानी जपलं नसतं तर मी आज उभाही राहु शकलो नसतो. पण त्यानाही हे सगळे कुठे माहित आहे ? दिनेश आपला आहे आणि त्याला जपायचं, या कर्तव्य भावनेने, ते मला जपत राहिले. अजूनही जपत आहेत. त्याना कल्पनाही नाही, कि त्यानी मला कुठल्या वादळात सहारा दिला. त्यानी मला एवढे बळ दिले कि आज मी इतराना जपण्याची वल्गना करु शकतोय. एका कोलमडलेल्या झाडाला, परत उभे करण्याच्या किमयेची, हि कहाणी.

ते म्हणजे माझे मायबोलीकर. माझे आई वडील, भावोजी, बहीण, भाऊ, वहीनी, भाचा, भाची, पुतण्या सगळ्यांची साथ होतीच. पण ती माझ्या रक्ताची माणसे आहेत. त्यांची साथ मी गृहीतच धरली होती. पण या मायबोलीकरानी, त्यांची साथही त्यानी, मला गृहित धरायला भाग पाडले. एखाद दुसरा अपवाद वगळता, सगळेच माझ्यापेक्षा वयाने लहान. पण त्यांचा ( आणि त्यांच्या कुटूंबियांचादेखील ) समजूतदारपणा, बघता, त्यांच्याकडून दादा म्हणवून घ्यायला, मला खरे तर संकोच वाटतोय. आज हा सगळा संकोच बाजूला ठेवतोय.

आणि हेदेखील मला मानायलाच हवे, कि बघा मी किती शूर आहे, सगळे कसे धैर्याने सोसतोय, हा माझा गर्व देखील या काळात दूर झाला, कारण माझ्यापेक्षा शूर माणसे, मला इथेच या मायबोलीवर भेटली. मला जमिनीवर ठेवल्याबद्दल मी त्यांचाही ऋणी आहे.

तसेच हे सगळे इथे लिहिण्यामागे, कुठलीही सनसनाटी निर्माण करण्याचा माझा उद्देश नाही. आपण सर्व "शहाणे" आहात आणि शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढायची नसते, हेही आपण जाणताच. त्यामुळे होते काय, कि आपल्या कोर्टाच्या कामकाजाबद्द्लच्या कल्पना या सिनेमा, नाटकातील (बहुतांशी) खुळचट दृष्यावर बेतलेल्या असतात. मी तूझ्यावर केस करिन वा माझ्यावर केस कर अशी भाषा (इथेही ) अगदी सहज वापरली जाते. तसेच एखाद्याने वैवाहिक समस्या मांडली तर त्याबद्दल चुकीचे
मार्गदर्शन केले जाते किंवा या दृष्टीने सल्ले दिले जात नाहीत. ( हे दोन्ही अलिकडेच झाले इथे ) तर कोर्टाचे कामकाज कसे चालते. ४९८ अ कलमाचा दुरुपयोग कसा केला जातो. पोलीस व सरकारि वकिलांची भुमिका काय असते, कोर्टात पुराव्यांची छाननी कशी होते, कोर्टाची भाषा कशी असते, कोर्ट आपल्या निर्णयापर्यंत कसे पोहोचते, या सगळ्यांची पण नीट कल्पना यावी, हा माझा हेतू आहे.

दुसरे म्हणजे कुणाचीही बदनामी करण्याचा माझा हेतू नाही. मी काही वर्षांपूर्वी इथे लिहिले होते त्यावेळी, चंपकने, त्या मुलीची बाजू देखील मांडली जावी, असे लिहिले होते. (चंपक आणि त्याचे कुटूंबीय आता माझे खास मित्र आहेत ) मॆ. कोर्टाने तशी पूर्ण संधी दिली होती. तसेच फ़िर्यादीच्या वतीने इथे मायबोलीवर माझी बदनामी करण्याचा प्रयत्नही झाला होता. माझ्या मायबोलीकरानी (खास करुन श्यामली, मिलिंदा आदी ) तो प्रयत्न हाणून पाडला होता. नंतरही असे तुरळक प्रयत्न होत राहिले. त्यावेळी या खटल्याचे कामकाज चालू असल्याने, मला प्रत्यूत्तर देता आले नव्हते.

सुरवात करतोय ती मे.वसई कोर्टाच्या निकालपत्रापासुन :- तर ते असे आहे. ते इंग्रजीत आहे. पण त्याचे भाषांतर न करता ते, जसेच्या तसे इथे देतोय. यातले काहि उल्लेख, सत्य असले तरी, मी टाळतोय, कारण ते इथे लिहिण्याजोगे नाहीत.
( आणि या निकालपत्रापर्यंतचा खडतर प्रवासही, क्रमाक्रमाने येतोच आहे )

प्रकार: 

पहिल्या प्यार्‍यास दिलेल्या अनुमोदनाबद्दल आभार साजिर्‍या Happy

>>>> विषयावर इथे पोस्ट/बीबी टाकून इतरांना मार्गदर्शन/प्रबोधन किंवा तुला सोल्युशन्स मिळतील, असे तुला म्हणायचे आहे काय?
नाही नाही त्रिवार नाही
वविला जाऊन आल्यावर फोटोशिवायच तिथे कोणी कोणी काय काय केल, काय काय बघितल वगैरेची वर्णने टाकताना टाकणार्‍यास "जे म्हणायचे" अस्ते तेच मलाही, फक्त "मूळव्याध (अन सध्या भगन्दर)" बाबत म्हणायच अस्त! Wink Proud
चल, असा कोपच्यात ये, इथे विषयान्तर नको! Happy

९८ % केसेस्मधे आरोपी निर्दोष सुटतात हे सत्य. यातले नेमके किती आरोपी पुराव्याअभावी वा योग्य तपास न केल्याने सुटतात, याची माहिती कुणाकडे असेल तर मला हवीय.
नी ने दिलेल्या उदाहरणात, ती स्त्री हयात नव्ह्ती, तरिही ती केस खोटिच होती. कायदा हवा हे निर्विवाद, पण या कायद्यात ज्या त्रुटी आहेत, आणि त्यामुळे कुणाचा फ़ायदा होतो, तेच तर लिहितोय. आणि या त्रुटीमूळेच या कायद्याचा सर्रास गैरवापर होतोय, हे खरे आहे.
सुदैवाने, निकाल देताना, हायकोर्टाने व सुप्रीम कोर्टाने, वेळोवेळी जी मार्ग्दर्शक तत्वे घालून दिलेली आहेत, त्यामुळे मुंबईतील पोलीस अश्या केसेस नोंदवताना खुप काळजी घेतात, ( तेही लिहितोय.)

मराठमोळी,
प्रेमविवाहातदेखील असे घडू शकते, याची मला कल्पना नव्ह्ती. अश्या केसेस मला फ़ॅमिली कोर्टात दिसल्या. (त्या बहुदा फ़सवणुकीच्या होत्या)
पण अशा विवाहाना, प्रेमविवाह म्हणावे का ?

नमस्कार नरेन,
आपली पहिली प्रतिक्रिया, माहिती नसल्याने प्रतिक्रिया देता येत नाही, अशी होती ना ?

मी प्रत्यक्ष नोंदणी करणारा अधिकारी निलंबित झाला असे लिहिलेय, तपास करणारा असे नाही.
निलंबित झालेला अधिकारी, तपास कसा करेल हो ? निदान लिहिलेय ते नीट वाचत तरी जा.

प्रोफ़ाईल मधे नाही, पण ज्या अर्थी आपण अश्या केसेस बघता, असे लिहिलेत, त्या अर्थी आपण
वकील, पत्रकार किंवा तत्सम व्यावसायिक असावात, असा कयास करतो. मग आपल्याकडची अद्यावत
माहिती द्या कि. अगदी सायटेशन सकट द्या.
आपण घाईने प्रतिक्रिया दिल्यामूळे, माझ्या लेखनाचा प्रवाह खंडीत होतोय.
तरीपण लिहितोच :
फ़िर्यादीच्या सख्ख्या बहिणीने माझ्याविरुद्ध साक्ष द्यायला नकार दिला. ( याचा उल्लेख निकालपत्रातच आहे.)

फ़िर्यादीच्या सख्ख्या भावाने, ऐनवेळी कोर्टात, माझ्या बहीणीचा छळ झालाचे मला माहित नाही, असे सांगितले.

मला, वकिल कुमारी कॄपाली राजानीने, शेवटपर्यंत, विनामोबदला साथ दिली. आणिइ राजानींच्या घराण्यातील वकिलांच्या तिसर्‍या पिढीतली ती आहे. तसेच वकिलांचा संप असताना, निव्वळ माझ्यासाठि ती कोर्टात हजर राहिली

हायकोर्टातील सहाय्यक सरकारी वकील, सौ. मोलिना ठाकूर यानीदेखील माझी अखंड साथ केली. केवळ माझी केस चालवण्यासाठी, त्या हायकोर्टातून वेळ काढून येत असत. त्या सहसा अश्या केसेसमधे, नवऱ्याचे वकिलपत्र घेत नाहीत. फ़िर्यादीने त्याना फ़ॅमिली कोर्टाच्या पाचव्या मजल्यावरुन ढकलून द्यायचा प्रयत्न केला होता. त्यासंबंधीचा आमचा अर्ज, ( दिनांक १६/०३/२००६ रोजीचा ) त्या कोर्टात आहे. त्याचवेळी, तिथे महिला पोलीस नसल्याने, अश्या पक्षकारापासून आमच्या जीवाला धोका असा अर्ज, तिथल्या समस्त वकिलवर्गाने केला. (त्यात महिलाही होत्या.)

माझी आई, बहिण व वहिनी, मला प्राणापेक्षा प्रिय आहेत. ( त्यांचा पाहुणचार घ्यायला, या एकदा घरी, अनेक मायबोलीकर येऊन गेले. ) वहीनीवर थेट आरोप होते, पण माझ्या आईवर व बहिणीवर एकही आरोप नसतानादेखील त्याना आरोपी केल्याचे, तूमच्या चाणाक्ष नजरेतून कसे हो सुटले ? बदनामी मी नाही करत हो, त्यानी केलीय. मी केवळ आपलेपणाने इथे सांगतोय, आणि माझ्यासाठी तरी हे घरच आहे. इथे कुठलाच आडपडदा मी कधी ठेवला नाही.
सीतेवर बेछुट आरोप करुन धोबी मोकळा राहतो आणि सीता एकटी वनवास भोगते. हि आपली परंपरा नाही का ?
माझ्या केसमधे, फ़िर्यादिकडून पर ज्यूरी पासून सर्व गुन्हे आणि आगळीकी घडल्या. त्यासंबंधी सर्व पुरावे देत
मी वेळोवेळी अर्ज केले. पण त्यात होणारा कालापव्यय व मुख्य केसच्या निलालाला लागणारा विलंब बघता,
मीच ते नॉट प्रेस्ड केले.
बाकी मी ज्ञानी नक्कीच नाही. मी तसा आवही आणत नाही. गेली सात वर्षे, आरोपी, वकील व फ़िर्यादी
यांच्याशी केलेल्या चर्चेतून मला जे आढळले ते नोंदवतोय. आणि लिहितोय ते १०० टक्के सत्य आहे.

मी स्त्री द्वेष्टा आहे, हे आपल्याला मत देण्याचा अधिकार आहे, असे समजून सोडून देतोय. प्रतिक्रिया
द्यायची गरज मला वाटत नाही.
अगदी मायबोलीवरच्या अनेकाना मी या कलमाचा आधार घेण्यापासून रोखले आहे. तसेच अशी केस
झाल्यास बचाव कसा करावा, तेही सांगितले आहे. ( लिहायला आनंद होतोय, कि माझ्या अनुभवातून
अनेक जण शहाणे झाले. ) पण हा संवाद वैयक्तीक पातळीवर राहिला. सगळ्यानाच माझ्याशी वैयक्तीक
रित्या संपर्क साधणे शक्य होते वा होईल असे नाही, त्यांच्या साठी हा आटापिटा.

आपलाच,
दिनेश

वर लिहिल्याप्रमाणे, या कलमाचा (गैर)वापर जास्त करुन, शहरभागातच होतो. निव्वळ कायदा माहीत आहे, म्हणुन अशी तक्रार केलेली, महिला वकील माझ्या माहितीत आहे.
या कलमात अनेक त्रुट्या आहेत, त्यामूळे कोर्टदेखील हतबल होतात. मे. न्या. जाधव, यानी, " या खुर्चीवर बसून, हा वेष परिधान करुन, जितक्या सोप्या आणि कायदेशीर शब्दात सांगता येते, तेवढे सांगतो" असे म्हणत माझी समजूत घातली होती. त्यानी, ज्या रितीने हि केस हाताळली, ज्या रितीने आम्हाला न्याय दिला, त्याबद्दल आम्ही शतश: त्यांचे ऋणी आहोत. पण त्यांच्यापुढे केस जाईपर्यंत बराच वेळ गेला. ते सगळे ओघाने येतच आहे.

मी वर लिहिलेल्या अनेक कारणानी, नवरा बायकोत बेबनाव असू शकतो, पण यापैकी बरीच कारणे, हि या कलमासाठी पुरेशी नसतात. या कलमात, "शारिरिक व मानसिक छळा"ची व्याख्या केलेली नाही, यामुळे या कलमाखाली तक्रार नोंदवताना आणि नोंदवून घेताना, पत्नी, तिचे आईवडील आणि कुटुंबिय आणि अर्थातच पोलीस, यांची कल्पनाशक्ती भरारी घेते. एखाद्या मसाला चित्रपटात वा टिव्हीवरच्या सिरियल्स मधे शोभतील, असे प्रसंग रचले जातात.
(आपण या बाबतीत इतके सुदैवी आहोत, कि आपली न्यायसंस्था हि बहुतांशी स्वायत्त आणि अर्थातच न्यायी आहे. न्यायदानाला विलंब होतो हे खरे, पण त्याची कारणे वेगळी आहेत. पण सहसा साक्षीपुराव्यांची छाननी अगदी काटेकोरपणे केली जाते )
यातले मुद्दे असे :-

मारहाण :

मारहाण हा अगदी हुकुमी एक्का. विवाहांतर्गत मारहाण हि होतच नाही असे मी म्हणणार नाही. पण या केसेसमधे मात्र सत्य वेगळेच असते, सहसा.
तसेच मारहाण सिद्ध करण्यासाठी, पुरेसे वैद्यकीय पुरावे लागतात. प्रत्यक्ष मारहाण होताना, जरी साक्षीदार उपस्थित असले, तरी ते तिचेच नातेवाईक असतात. मारहाणीनंतर काय झाले, काहि वैद्यकीय उपचार घेतले गेले का, काहि तपासण्या केल्या का ? हे महत्वाचे ठरते. गरज पडल्यास त्या डॉक्टराची साक्ष नोंदवली जाते खोटी कहाणी रचल्यास ते शक्य नसते.
माझ्यावरही हा अरोप झाला होता. पण केवळ फ़िर्यादीच्या जबानीत ते होते. त्यावेळी, तिथे म्हणे उपस्थित असणार्‍या सासुबाई व सासरेबुवा यांच्या जबानीत, याचा उल्लेख नव्हता. सासरेबुवानी साक्षिदाराच्या पिंजऱ्यात असताना, कहाणी रचून बघितली. पण पोलीसांसमोर नोंदवलेल्या जबानीत, त्याचा उल्लेखच नसल्याने, कोर्टाने, त्यांचे म्हणणे ग्राह्य धरले नाही. शिवाय मी सादर केलेले पुरावे, सत्य सिद्ध करण्यास समर्थ ठरले.

पैसा व वस्तू यांच्या मागण्या :

"सतत माहेरून हे घेऊन ये, ते घेऊन ये असे बोलत असत" असे पण तक्रारीत नोंदवले जाते. ( या बाबतीत अमुक तोळे सोने, मारुती वा होंडा गाडी आणि फ़्लॅट हे नेहमीचे यशस्वी कलाकार. तोळा हे एकक कधीच कालबाह्य झालेय, तरिपण पोलीस तेच लिहितात. ग्रॅम्स त्याना कळत नाहीत. )
या मागण्या कोर्टात सिद्ध होणे शक्यच नसते. खुपदा त्या केलेल्याच नसतात, जरी वस्तूंची देवाणघेवाण झालेली असली, तरी ती खूपदा आपखुषीनेच झालेली असते.
जरी मुलीकडे या वस्तूंच्या खरेदीपावत्या असल्या तरी, त्यांची मागणी मूलाकडून झाली होती, हे सिद्ध करता येत नाही. आणि मुलाने त्याच्याकडच्या पावत्या सादर केल्या, तर या आरोपाना अर्थच उरत नाही.
माझ्या बाबतीत, मला २० तोळे सोने दिले गेल्याची भाषा झाली होती. पण याबाबतीत सोन्याची तात्कालीन किंमत, फ़िर्यादीची मिळकत, माझ्या परदेशातील सोने खरेदी केल्याच्या पावत्या, व परदेशातून वैध मार्गाने पाठवलेले पैसे, याची कागदपत्रे माझ्याकडे होती. पण ते पुरावे सादर करायची गरजच पडली नाही. पण कोर्टाने, सर्व जबाबदारी, फ़िर्यादि पक्षावर टाकून, अशी मागणीच न झाल्याचे व फ़िर्यादीने खरेदीचे पुरावे दाखल न केल्याचे, मत नोंदवले. ( आणि ते अर्थातच सत्य होते )
खुपदा अश्या केसेसमधे, बायका घर सोडून गेलेल्या असतात. आणि जाताना आठवणीने, माहेरचेच काय, सासरचे दागिनेदेखील घेऊन गेलेल्या असतात. अश्या वेळी मात्र मुलाची परिस्थिती विचित्र होऊ शकते. याबाबतीत काहीतरी पुरावा गोळा करणे त्याला गरजेचे ठरते, नपेक्षा, आधीच मुलीच्या ताब्यात असलेल्या, चीजवस्तूंची, पैश्यात भरपाई करण्याची वेळ येऊ शकते.
विवाहांतर्गत पैश्याची देवाणघेवाण सहसा, रोखीतच होते. आणि ती सिद्ध करणे कठीण जाते. माझ्याबाबतीत, मी केनयामधे होतो. त्यावेळी, तिथून भारतात पैसे पाठवण्यावर बंधन होती. त्यामुळे, तिथल्या सेंट्रल बॅंकेची रितसर परवानगी घेऊन मी पैसे पाठवत असे, तेही चेकने. फ़िर्यादी व तिचे कुटुंबिय यानी वेळोवेळी या पैश्याची पोच दिली होती. शिवाय माझे पासबूक होतेच. कोर्टाने तेच ग्राह्य मानले.

मी त्यांच्याकडे केलेल्या मागणीबाबत जो आरोप झाला होता, त्यासाठी फ़िर्यादीच्याच हस्ताक्षरातील एक बनावट पत्र सादर केले होते. त्यातही अजिबात कल्पनाशक्ती वापरलेली नव्हती. केनयामधे असताना, मी भारतीय रुपयांची मागणी केली, असा आरोप होता. या भारतीय चलनाला केनयात किंमत नाही, त्यावेळी लागू असलेल्या, फ़ेरा कायद्यामुळे, अशी ट्रान्स्फ़र शक्य नव्हती, त्या पत्रावर केनयामधुन पाठवल्याचा, कुठलाच पुरावा ( म्हणजे पोष्टल स्टँप वगैरे ) नव्हते, यावरुन ते बनावट असल्याचे कोर्टाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ( आपण सादर करतोय तो एकमेव पुरावा, असा बनावट असल्याचा पोलीस वा
सरकारी वकील, यांच्या ते लक्षातच आले नव्हते, म्हणजे बघा !!! )

टोमणे मारणे :

सासूसासरे, दीर नंणदा, यानी सतत टोमणे मारले, हा एक लोकप्रिय मुद्दा. याची भाषा अगदी अलंकारीक असते, सतत घालुनपाडून बोलत असत, माहेरचा उद्धार करत असतात, माहेरची तुलना करत असत, उठताबसता पाणऊतारा करत असत, जीव नकोसा करत असत, आणि मी हे सतत माझ्या, आईबाबाना सांगत असे, अशी वाक्ये असतात.
(माझ्यावर असे आरोप झाले नव्हते, कारण आम्ही एकत्र कुटुंबात रहात नव्हतो. शिवाय एकत्र असताना आमच्यात संवादच नव्हता. साबुदाणा भिजवून ठेवलेत. फ़्रिजवर पैसे ठेवलेत (इति मी) मी बाहेर जातेय (इति ती) वगैरे चिठ्याचपाट्या माझ्याकडे होत्याच, )

पण असे टोमणे कोर्टात सिद्ध होणे शक्य नसते. सिनेमात दाखवतात तशी, आरोपींची जबानी वा उलटतपासणी होत नाही. आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी, फ़िर्यादिवरच असल्याने, हा मुद्दा कोर्टात टिकू शकत नाही.

धमक्या देणे :

गॅसवर, स्टोव्हवर जाळून टाकू अशी धमकी दिली, हे एक पेटंट वाक्य. अर्थातच ते सिद्ध करता येत नाही. हे थोडेसे कठोर लिहितोय, पण जे खरेच जाळून मारणारे असतात, ते पोकळ धमक्या देत बसत नाहीत, सरळ काडीच लावतात. आणि साक्ष द्यायला ती बिचारी जिवंतच रहात नाहि.
आणि जळूनही ज्या जिवंत राहतात, त्यापैकी बहुतेक जणी, मॄत्यूपुर्व जबानीत सत्य सांगत नाहीत. म्हणजे अंमलात आणलेली धमकी सिद्ध करणे, कठिण जाते.

कोंडून ठेवणे, माहेरच्या लोकांशी संबंध तोडायला लावणे :

घरात कोंडून ठेवत असत व माहेरच्यांशी संबंधच ठेवू देत नसत, हा ही एक आरोप. माझ्यावर पण झाला होताच. पण फ़िर्यादीच्या हस्ताक्षरातील पत्रे, हा तिच्याविरुद्धच सबळ पुरावा ठरला. हि पत्रे मी इतकी वर्षे जपून ठेवली असतील, याची तिला कल्पना येणे शक्यच नव्हते. ( याबाबत पुढे सविस्तर लिहितोच ) शिवाय माझ्या केनयामधील फ़्लॅटला बाहेरून लॉक करायची सोयच नव्हती, फ़क्त लॅच होते)
याबाबतीत दाराजवळचा एक फ़ोटो माझ्याकडे होताच. पण त्या पुराव्याची गरज पडली नाही.

व्याभिचार :
सासरच्या मंडलींचे चारित्र्यहनन करण्याचा यापेक्षा सोपा मार्ग कुठला असू शकतो ? याबाबतीत सासरे आणि दीर यांनाच बळीचा बकरा बनवले जाते. अत्यंत हीन पातळीवर जाऊन हे आरोप केले जातात.यात जावानाही ओढले जातात. आणि हे आरोप करताना, एक बघितले जाते, कि सासरची सर्वच माणसे यात गोवली जातील. म्हणजे सर्व घरच बरबाद होईल.
संघटना याबाबतीत कधीच लक्ष देत नाहीत. ज्यांच्यावर खोटे आरोप होताहेत, त्याही स्त्रियाच आहेत (खुपदा वृद्ध वा लहान मुलांच्या माता ) हे त्यांच्या खिजगणीतच नसते. ( त्यात प्रसिद्धी मिळण्याच्या चान्स नसतो ना ) या अश्या अरोपांमुळे, सासरचे अत्यंत निराश होतात, आणि प्रतिवादात लटके पडतात.
माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या उत्तम चारित्र्याची, सज्जनपणाची निखालस कबुली देणारी, फ़िर्यादीच्या हस्ताक्षरातील पत्र माझ्याकडे असल्याने, आम्हाला बचाव करणे सोपे गेले. सासरेबुवानी तर, १९९४ च्या एका पत्रात, "तूझ्याविरुद्ध, तिने कधीही, काहिही तक्रार केल्याचे, मलातरी आठवत नाहि" असे लिहिले होते. त्यानंतर तब्बल सात वर्षानी, त्याना अचानक जे आठवले, त्यावर कोर्ट विश्वास ठेवेल, अशी शक्यताच नव्हती.

दिनेशदा निकाल वाचुन अजुन काहि धक्कादायक गोष्टी कळाल्या. असे आरोप होउ शकतात ह्याची कल्पनाच नव्हती.
असो.
तुम्ही निर्दोष आहात आणि कोर्टाने तस मान्य केल ह्याचा आनंद आहेच. Happy

दिनेश,
तुम्हास झालेल्या त्रासा बद्द्ल आता सविस्तर कळले. तुम्ही कोणत्या परिस्थीतीतुन गेला आहात याची जाणीव झाली. मी अगोदरच लिहले आहे कि, तुमच्या वर अन्याय झाला असेल. परंतु पार्श्वभुमीची मांडणी व्हायला हवी. तुम्ही डायरेक्ट निकाल आणि इतर विश्लेषण दिले.
तरीही मी मागील प्रतिक्रीयेत शेवटच्या पॅरा मध्ये माझे म्हणणे थोडक्यात मांडले आहेच.

माझे लग्न नोंदणी पद्दतीने दि १८.०३.१९९३ ला झाले. मला केनयाचा व्हिसा मिळण्यासाठी
लग्नाची नोंद्णी होणे आवश्यक होते. पुढे २५.०३.१९९३ रोजी अत्यंत थाटात माझे परत
लग्न साजरे झाले. ( हे मुद्दाम लिहायचे कारण म्हणजे, पुढे त्याचा संदर्भ येत आहे. )
लग्नाचा खर्च माझे वडील आणि सासरेबुवा यांनी वाटून घेतला. मी लग्नाचा खर्च केला
नाही, कारण मला भपका नको होता. पण मी सगळ्यात लहान असल्याने, आईवडिलानी
माझे ऐकले नाही. माझ्या वडीलांच्या सवयीप्रमाणे, त्यानी लग्नाच्या खर्चाच्या सर्व पावत्या
जपून ठेवल्या होत्या. आणि कबूल केल्याप्रमाणे सासरेबुवानी, पूर्ण पैसे दिलेच नव्हते.
लग्नात कुठलीही देवाणघेवाण झालीच नाही. तिच्या माहेरून मिळालेली एकही वस्तू
आमच्या घरात आली नाही. ( सासुबाई म्हणे त्याच वस्तू वर्षाच्या सणाला देणार होत्या. )
पुढे दि १७.०६.१९९३ ला आम्ही दोघे केनयाला गेलो, जाताना कुठलीही वस्तू नेणे शक्यच
नव्हते ( याचाही संदर्भ पुढे येतोय )
तिथे तिची डॉक्टरकीची डिग्री मान्यताप्राप्त नसल्याने, तिला स्थानिक परिक्षा देणे आवश्यक
होते. आणि त्याला तिची तयारी नव्हती. आमच्या किसुमु गावात, सात आठ भारतीय डॉक्टर
जम बसवून होते. पण आमचे अजिबात न पटल्याने, सासरेबुवानी तिला परत बोलावून घेतले,
दि १२.०८.१९९३ रोजी ती परत आली. अशा रितीने आमचे लग्न जेमतेम ५ महिने टिकले.
मी एकटाच केनयात राहिलो. ती आमच्या घरी येऊन असंबंध बडबड करुन गेली. त्यावेळी
माझ्या वडिलांनी, तू तूझ्या वडीलाना घेऊन ये, आपण बोलू, असे सांगितल्यावर ती निघून
गेली. माझी मेहुणी, जयश्री हिने पुढाकार घेऊन, सगळ्यांचा समेट घडवण्याचा प्रयत्न केला,
पण रात्री साडेनऊ पर्यंत वाट बघूनही ती घरी आली नव्हती. नऊ महिने भरलेली बाई, इतक्या
रात्री कुठे गेलीय, याची सासूबाईना म्हणे कल्पना नव्हती.
१७.०३.१९९४ ला आम्हाला मुलगा झाला. त्यावेळी माझ्या घरचे सगळेच बाळाला बघायला
गेले होते. सगळे मिटले असे वाटत असतानाच, बारश्याला, आम्हाला निमंत्रण न देऊन
सासरेबुवानी आपला आडमूठेपणा दाखवलाच, तरीही, माझे वडील भोळेपणाने, बाळंतविडा
घेऊन गेले. बाळाला दागिने पण नेले होते त्यानी. बाळाचे नाव काय ठेवलेय, याचीपण
आम्हाला कल्पना नव्हती.
या दरम्यान मी नियमितपणे पत्र व पैसे पाठवत होतोच. पण सासरेबुवानी, तिला एकही
पत्र पाठवू दिले नाही (म्हणे). दिवाळसण व बाळाला बघायला म्हणून मी १९९४ च्या
दिवाळीला परत आलो. त्यावेळी, मी प्रयत्न करुनही, समेट होवू शकला नाही. इतकेच
नाही, तर मला भर रस्त्यावर अर्वाच्य शिव्या दिल्या गेल्या. मी काहीही न बोलता
केनयाला परत गेलो. तिथे पोहोचल्यावर फ़िर्यादीने मला १२ पानी पत्र पाठवले, त्यात
स्वत:च्या सर्व चुकांची कबुली दिली आहे शिवाय १०० वेळा, आय लव्ह यू, असे लिहिलेले आहे
(हे पत्र माझ्या ताब्यातील सर्वात महत्वाचा पुरावा ठरले. मी भारतात असताना, बाळाला माझा
खूपच लळा लागला होता. आणि त्या वादावादीनंतर त्याला फ़िट्स आल्या, व तो आजारी पडला,
याचाही उल्लेख पत्रात आहे.)
पुढे थोडी पत्रापत्री झाली. ती सर्व पुरावे म्हणून उपयोगात आली. मी १९९५ साली नोकरी
सोडून परत भारतात आलो. मी परत समेटाचे प्रयत्न केले. अगदी आईवडीलाना घेऊन
तिच्या घरी गेलो. ( त्या आधीदेखील माझे आईवडील तिच्या घरी गेले होते, ती घरी
नव्हती, पण नंतर तिने फ़ोनवरून माझ्या आईवडीलाना, अर्वाच्य शिव्या दिल्या. )
झालेला अपमान विसरुनदेखील ते माझ्यासाठी तिथे आले होते. तिचे आईवडील मात्र
बोलावूनदेखील कधी आले नाहीत आमच्याघरी.
माझ्या आईने तिला जवळ घेऊन, घरी ये, आम्ही तूला न्यायला आलोय, असे सांगितले.
पण त्यावेळी, मोठ्या भावाला व त्याच्या बायकोला घराबाहेर काढा, सासरे पण मला
घरात नकोत, असे सुनावले. मग मात्र मला राहवले नाही, मी तडक घराबाहेर पडलो.
(त्यापूर्वी, तिने माझ्यावर केलेल्या अत्याचारांची, तिच्याकडून सगळ्यांसमोर कबुली
द्यायला लावली होती. )
तरीही माझी आई, तिची समजून काढत बसली होती. मी बाहेरून फ़ोन करुन आईला
खाली बोलावले. आम्ही स्टेशनवर गेल्यावर, फ़िर्यादी व सासरेबुवा, आमची माफ़ी मागत
आले होते. पण मी जुमानले नाही. तो दिवस होता, १७.०३.१९९६. माझ्या मुलाचा दुसरा
वाढदिवस आणि आमच्या भेटीचा शेवटचा दिवस.

पुढे मी खुप आजारी पडलो. चार दिवस हॉस्पिटलमधे दाखल होतो. मला फ़िर्यादी
बघायलादेखील आली नाही. मी परत परदेशी गेलो. दोन वर्षे आमचा काहीच संबंध
नव्हता. मी तिला वकिलातर्फ़े परस्पर संमतिने घटस्फ़ोट घेण्यासंबंधी पत्र पाठवले.
त्यालाही तिच्याकडून उत्तर न आल्याने, जानेवारी १९९७ ला कौटूंबिक न्यायालयात
घटस्फ़ोटासाठी अर्ज केला. तिथला अनुभव तर भयानकच आहे. ( पण तो वेगळा
विषय आहे ) आजही माझा अर्ज निकालात निघालेला नाही.

आणि एप्रिल २०००मधे, मी परदेशी असतानाच, फ़िर्यादीने पोलीसात, मी, माझे
आईवडील, मोठी बहीण, मेहुणे, मोठा भाऊ व वहीनी यांच्याविरुद्ध ४९८ अ, कलमाखाली
तक्रार केली. या सगळ्याना अटक करवण्याचा तिचा डाव होता, पण वहिनीच्या
सावधपणामूळे, ती टळली. अटकपूर्व जामिन मिळवल्याने, अर्थातच तपास अधिकाऱ्याचा
कुटील हेतू सफ़ल झाला नाही. तक्रार नोंदवणारा अधिकारी, त्यानंतर लगेचच भ्रष्टाचाराच्या
अरोपावरुन निलंबित झाला, दुसर्‍या अधिकार्‍याने, काहिही तपास न करता, केस
नोंदवून घेतली. ( त्याच्यावर पुढे कोर्टाने अनेक ताशेरे ओढले, "अहो तोंड आहे ना, मग
बोला काहितरी," असे सुनावले )

एवढे होऊनही, मला माझ्या घरच्यानी काहीच कळवले नव्हते. ते बिचारे वर्षभर. कोर्टात
फ़ेऱ्या मारत होते. मी भारतात परत आल्यावर, ही केस खर्‍या अर्थाने सुरु झाली.
फ़िर्याद वाचल्यावर आणि माझ्याकडे असलेल्या पुराव्यांचा विचार करता, मला माझा
बचाव करणे, अजिबात अवघड वाटले नाही. कुठलाहि समझौता ( म्हणजे तिला मागेल
तेवढे पैसे देणे ) न करता कायदेशीर लढा द्यायचे मी ठरवले. त्याला अर्थातच माझ्या
कुटुंबियानी साथ द्यायचे वचन दिले, आणि ते निभावलेही. पण या लढ्यात इतकी वर्षे
जातील याची मला कल्पना नव्हती. माझ्या वडीलांचा अचानक मृत्यू, त्या मृत्यूचा धसका
घेतल्याने, माझ्या लाडक्या काकांचा मृत्यू, माझ्या बहिणीच्या सासर्‍यांचा मृत्यू, आईचा
हृदयविकार, मेहुण्यांची बायपास सर्जरी, अश्या संकटांशी सामना करत, तब्बल १०६ तारखांचा
हा लढा आम्ही लढलो. त्याची हि कथा.

तुमचा अनुभव वाचला, त्यावर इतरांच्या बर्‍या वाईट प्रतिक्रिया पण वाचल्या.
हे सगळे फारच भयंकर आणि सुन्न करणारे आहे.
माझ्या मते तुम्ही तुमचा अनुभव सगळ्यांपुढे मांडुन एक प्रकारे समाजकार्य केले आहे. ह्यामधुन वाचकांना व (विषेशतः वरपित्यांना) खुपच शिकण्या सारखे आहे. पण एक धोका आहे तो म्हणजे "सुक्या बरोबर ओलेही जळते" ह्याचा. जर ह्यातुन कुणी अति संशयाने (over reaction म्हणुन) जास्त चिकित्सक झाला तर एखाद्या जोडप्याचा संसार मांडण्या आधीच मोडला जायचा.

लग्न करुन संसार (सुखाने) करणे हे जवळ जवळ प्रत्येक व्यक्तिचे (मुलगा अथवा मलगी) स्वप्न असते - व ते स्वाभाविकच आहे. आपल्या लग्न जुळवण्याच्या प्रचलीत पध्दती मुळे हा एक जुगारच ठरतो. (तसे पहाता प्रेम विवाहात पण हे असे विपरीत घडण्याची शक्यता असतेच - पण कमी प्रमाणात).

तेव्हा एक विनंती करावीशी वटते, ती अशी की - आपल्या मते - अशी काय आणि कोणती काळजी प्रत्येक भावी जोडप्याने व त्यांना संबधीत नातेवाईकांनी घ्यावी की ज्यामुळे ४९८(अ) कलमाचा दुरुपयोग त्यांच्या बाबतीत होणार नाही.

हि जी केस केलेली असते, ती खोटीच असल्याचे, फिर्यादी, सरकारी वकील या सर्वानाच माहित असते.
ती चालविण्यात फिर्यादी वा सरकारी वकील, याना अजिबात रस नसतो. हि केस करण्यामागचा एकमेव हेतू, हा आरोपींकडून पैसे उकळणे आणि त्याना शक्य तितका त्रास देणे, हाच असतो. या खटल्याची
सुनावणी शक्य तितकी लांबणीवर टाकली जाते.
तसेच या जोडीला, पोटगीची केस, अगदी गरज नसतानादेखील टाकलीच जाते. वकिलांचा खर्च
त्या रकमेतून परस्पर भागवता येतो.
अरोपीना जामिन मिळवणे देखील मुष्किल करुन ठेवले जाते. माझ्या बाबतीत, माझ्या सर्व नातेवाईकाना
अटकपुर्व जामिन मिळाला होताच. याबाबतीत आमचे सर्व शेजारी, आमच्या बाजूने ठामपणे उभे राहिले.
आमच्या शेजारी, सौ. सीमा रेगे राहतात. त्यावेळेस, केवळ आठ दिवसांपूर्वीच त्यांचे ऑपरेशन झाले होते.
तरीही त्या कोर्टात हजर राहिल्या. ( जामिन राहण्यासाठी, रेशनकार्ड किंवा तत्सम पुरावा लागतो. इथे
जामिनदार कोर्टाला अशी हमी लिहून देतो, कि सुनावणीच्या वेळी, आरोपी कोर्टात हजर राहतील. मे. न्यायाधिश त्या व्यक्तिला काहि जुजबी प्रश्ण विचारतात व जामिन मंजूर केला जातो. शक्यतो, आरोप गंभीर
नसतील, तर जामिन दिलाच जातो. कारागृहात जागा, नसल्यामुळेहि असे केले जाते. )
अटक जरी झाली, तरी २४ तासाच्या आत, योग्य ते अधिकार असलेल्या कोर्टात आरोपीना हजर करायची
जबाबदारी पोलिसांची असते. आणि याबाबतीत देखील मला, फिर्यादी व पोलिसानी, शक्य तितका मनस्ताप
दिलाच. ( अटक करताना शक्यतो, सार्वजनिक सुट्टीच्या आधीचा दिवस निवडला जातो. त्यामूळे, कोर्टाला
रजा होती, हे एक भक्कम कारण मिळते. ) माझ्याबाबतीत असे झाले नाही.
जामिनाच्या अर्जाची सुनावणी, हि साधारणपणे दुपारच्या सत्रात म्हणजे दुपारी साडेतीनला होते. त्यावेळेपर्यंत तिष्ठत बसणे भाग असते. माझी वहिनी, माझ्याबरोबरच, पोलिसांच्यासाठी पण जेवणाचा डबा
घेऊन येत असे. जामिनाच्या अर्जाची सुनावणी करताना, मे. न्यायाधिश, पोलिसांकडून चौकशीचा प्राथमिक
अहवाल मागतात, आणि हि तत्परता पोलीस, कधीच दाखवत नाहीत, त्यामूळे बेल नाकारला जातो. माझ्या
बाबतीत हेच झाले.
दुसर्‍या सुनावणीच्या वेळी, सर्व काहि पुर्ण होत असतानाच, म्हणजे मे. न्यायाधिशानी, जामिनदाराला सहिसाठी बोलावल्यानंतर, अचानक तो रद्द केला. त्यावेळी फिर्यादी कोर्टात हजर होती. ( हे अत्यंत गैर होते, या अर्जाच्या सुनावणीच्या वेळि, फिर्यादीला पाचारण करण्याची गरज नसते. ) या सर्व गैरप्रकारांचा
उल्लेख करुनच, मी वरच्या कोर्टात अपील केले, व मला लगेच जामिन मंजूर झाला. मला जामिनदाराचीही
गरज पडली नाही. मे. न्यायाधिशानी, जुजबी रोख रकमेच्या आधारावर मला जामिन मंजूर केला.
तसा कुठलाही अधिकार नसताना, पोलीसांनी माझा पासपोर्ट जप्त केला होता. तो म्हणे त्यांचा पुरावा होता.
पुरावा असला, तरी तो एकदाही सुनावणीच्या वेळी, कोर्टापूढे सादर झाला नाही, आणि कोर्टाने निर्दोष सोडल्यावरही, पोलीसानी तो आपल्याकडेच ठेवला होता. त्यासाठी मला वेगळा लढा द्यावा लागला.

हे प्रकरण संपल्यावर, आम्ही सर्व एकत्र बसलो होतो. माझे मेहुणे, श्री अशोक, मला म्हणाले, तिला हवे
तेवढे पैसे देऊया व प्रकरण मिटवूया. या सर्व अपमानानंतर अशी हार पत्करणे, मला योग्य वाटले नाही.
अरोपाना, प्रत्यूतर देणे मला गरजेचे होते. तसेच माझे वकील, यानी असे सांगितले, कि, हे कलम, असे आहे, कि या खाली केलेले आरोप फिर्यादीला देखील मागे घेता येत नाहीत. ( या कलमात तशी तरतूद नाही ) असे असल्याने. पैसे जरी दिले, तरी सुनावणी टळत नाही. ( असे असले तरी, सरकारी वकील मात्र पैसे द्या, आणि आपापसात मिटवा, असा धोषा लावतात. मे.. न्यायाधिश सुद्धा असे विचारून बघतात. )
माझा निर्धार बघून, माझ्या लढ्याला सर्वानी बिनशर्त साथ द्यायचे ठरवले. कोर्टाने विचारल्यावरदेखील,
आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम राहिलो व सर्व आरोप फेटाळून लावले. )

या अश्या नकारानंतरच सुनावणी सुरु होते. यापुढचा टप्पा असतो, तो आरोपपत्र दाखल करण्याचा.
यासाठी पोलीसाना काहि मुदत दिलेली असते. आणि त्या मुदतीच्या आधीच काय नंतरदेखील, पोलीस ते
दाखल करायची टाळाटाळ करतात.
माझ्याही बाबतीत पोलीसांनी शक्य तितके ते टाळले. या तपासाच्या बाबतीत पोलीसानी बराच घोळ घातला.
पोलीसांच्या गुन्हा नोंदणीवर काहि बंधने असतात. शक्यतो, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडला, त्यानीच तो नोंदवायचा असतो. फिर्यादी, आम्ही राहतो त्या भागातल्या, पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवायला आली होती. पण तिथल्या पोलीस अधिकार्‍याने, त्यातला खोटेपणा, ताबडतोब ओळखला. (मुंबईचे पोलीस याबाबतीत कमालीचा सावधपणा दाखवतात, तो हाच. ) या कुटूंबाला आम्ही अनेक वर्षे
ओळखतो, आणि आमच्या स्थानकाच्या हद्दीत जर असे घडले असेल, तर त्याची आमच्याकडे नोंद असती,
असे सांगत त्यानी तो गुन्हा, नोंदवायलादेखील नकार दिला. (पुढे मला सासरेबुवांकडून धमकीचे फोन आल्यावर, फिर्यादीकडून ब्लँक कॉल्स आल्यानंतर, फिर्यादी तिच्या मित्राबरोबर आमच्या कॉलनीत फिरत
असताना आढळल्यावर, वेळोवेळी मी त्यांच्याकडे धाव घेतली, आणि प्रत्येकवेळी त्यानी मला सहकार्य केले. घरी आई एकटीच असायची, त्यावेळी तिला फिर्यादिकडून त्रास होईल, अशी मला सतत धास्ती असे. ती मी पोलीसांना सांगितल्यावर, त्याने माझ्या आईला, आपला खाजगी मोबाईल नंबर दिला, व कधीही गरज वाटल्यास फोन करा असे सांगितले. )
नंतर फिर्यादी, खास तिच्या मर्जीतल्या, पोलीस स्थानकात गेली. त्यानीदेखील ति तक्रार नोंदवायला प्रथम
नकारच दिला. मग फिर्यादीने, काहि राजकारणी व संघटनांचा दबाव आणायला सुरवात केली. पोलीस स्थानकांविरुद्ध लेखी तक्रारी केल्या. ( या कलमाची, हि आणखी एक खासियत. इथे राजकारण्यांचा दबाव
फारच असतो. सगळ्यानी महिलांच्या कल्याणाचा विडाच उचललेला असतो जणू. या बाबतीत ज्यांच्यावर
आरोप होताहेत, त्या देखील महिलाच आहेत, हे ते सोयीस्करपणे विसरतात. ) या दबावाला बळी पडून
त्या स्थानकाने ती तक्रार नोंदवली. ( कुणाला तरी हे पटेल का ? )
ज्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत, तक्रारीत नोंदवलेली एकहि घटना घडलेली नसताना, तिथे हा गुन्हा
दाखल होतो. ज्या पोलीस स्थानकाच्या, हद्दीत या तथाकथित घटना घडल्या, त्यांच्याकडे साधी चौकशी करायचीदेखील त्याना गरज वाटली नाही. पण केवळ एका फिर्यादीने सांगितले म्हणून, मी वास्तव्य करत असेन, अश्या केवळ कयासावरून, एका देशातल्या, भारतीय दूतावासाला, पत्र लिहिण्याचा उत्साह ते दाखवतात, हे जरा विचित्रच वाटतय नाही का ? या बाबतीत, तपास अधिकारी, उलटतपासणीच्या वेळी
मूग गिळून गप्प बसला होता, आणि मे. न्यायाधिशानी, कानउघाडणी केल्यावरच बोलू लागला.
पोलीसांनी सर्व तपास करून, मिळतील ते सर्व पुरावे पंचांसमोर जप्त करुन, आरोपपत्र दाखल करायचे असते. माझ्या बाबतीत, पोलीसांनी ते काहिच केले नव्हते. एकही कागदोपत्री पुरावा त्याना मिळाला नव्ह्ता,
कि घराबाहेरील एकही साक्षीदार सापडला नव्हता.
पोलीसानी दाखल न केलेले, पण सरकार पक्षातर्फे एकमेव कागदोपत्री पुरावा म्हणून दाखल झालेले पत्र,
तर सरकारी वकीलानी, माझ्यासमोरच फिर्यादीला लिहायला सांगितले होते. ( बहुदा त्यानापण काहिच
पुरावा नाही, हे लक्षात आले असावे. ) ते नंतर दाखल करण्यात आले होते. ते नियमबाह्य असल्याने,
ते दाखल करुन घेऊ नये, असा मी अर्जदेखील केला. मे. न्यायाधिशानी, ते न्यायदृष्टीने दाखल केले, ते आमच्या दृष्टीने योग्यच झाले.
अपेक्षेप्रमाणे, पोटगीचा खटला दाखल झालाच. तो आणखी एका वेगळ्या कलमाखाली, फॅमिली कोर्टातदेखील दाखल झाला. म्हणजे एकाचवेळी, मी चार प्रकरणाना तोंड देत होतो. एखाद्या प्रकरणाची सुनावणी होत असताना, जर कुणीही एखादा अर्ज केला, तर मे. न्यायाधिश त्याची सुनावणी करून, त्यावर आधी निर्णय देतात. मुख्य प्रकरणाची सुनावणी त्याने लांबणीवर पडते. फिर्यादीने, हे अगदी शेवटच्या घटकेपर्यंत करुन बघितले. मे. न्यायाधिशानी, अर्थातच तिचे सर्व अर्ज पुढे फेटाळून लावले. पण त्या आधी बरेच काही घडले होते.

सगळे वाचले. ४९८ अ चा गैरवापर झाला आहे हे पटले.

फिर्यादीला तसे का करावेसे वाटले हे समजले नाही. फिर्यादीने तर आहेच पण सासरेबुवांनी देखील काही तक्रार नाही असे पत्र लिहिले होते, तर मग कायदे, खटले मधे का आले?

माझ्या बघण्यातल्या एक ४९८ अ गैरवापराच्या घटनेत सुनेला सासूने लौकर ऊठ, स्वयंपाक कर अश्या प्रकारच्या सूचना सतत ८/ १० दिवस केल्या. लग्नानंतरच्या पहिल्या २ आठवड्यात. तर तिने वैतागून सासू मानसिक छळ करते अशी तक्रार केली. आणि मग बहुधा ती मागे घेता न आल्याने घोळ झाला.

>>>>>> माझे लग्न नोंदणी पद्दतीने दि १८.०३.१९९३ ला झाले.
या पोस्ट मधे, दरम्यानच्या काळात विमानतळावर झालेली अटक व कारावास नेमका केव्हा झाला याचाही उल्लेख असता तर बरे झाले असते, जमल्यास एडीट करुन टाकावा Happy

दुसरे असे की, ४९८अ हे कलम माझ्या अल्पस्मृतीप्रमाणे बहुधा १९९४ मधे लागू झाले असावे, ते नेमके केव्हा लागू झाले, व त्या अन्तर्गत खटला दाखल करताना, कलम लागू होण्यापूर्वीच्या व नन्तरच्या घटनान्चे आरोप, यान्चा मेळ कसा घातला जातो/गेला? माझा प्रश्न काहीसा पूर्वानुलक्षी प्रभावाबद्दल आहे, नेमक्या शब्दात मान्डता येत नाहीये. यावरही काही प्रकाश टाकलात तर बरे.

तब्बल १०६ तारखांचा हा लढा आम्ही लढलो. त्याची हि कथा.>>>>

१०६ तारखा. बापरे. या इतक्या तारखातून जाताना कोणाचेही मनोधैर्य खच्ची होऊ शकते.

हि जी केस केलेली असते, ती खोटीच असल्याचे, फिर्यादी, सरकारी वकील या सर्वानाच माहित असते.<<
सर्व केसेस अश्या नसतात. कृपया इतके जनरलाइज्ड विधान करू नये.

शिन्दे साहेब आपले अभिनन्दन...

एका फार मोठ्या सन्कटातून आपण बाहेर पडलात...

. पण या सगळ्या प्रकारामागे तुमच्या पत्नीचा नेमका ' मोटो' काय होता, हे समजलेले नाही... पैसा आणि 'दुसरा माणूस' जनरली हे दोन मुख्य मोटो असतात.

माझ्याही घरी हे सगळे घडण्याची शक्यता होती.. ( आणि अजुनही आहे,) .. लग्न होऊन नुकतेच ३ महिने झालेले, बायकोलाही लगेच पहिल्याच महिन्यात नोकरी मिळालेली.. आणि अचानक बायकोने बॉम्ब टाकला... माझे पालन हे तुमचे धर्म कर्तव्य आहे... पण मला शिक्षण मात्र आई बापाने दिलेले आहे, सबब माझ्या पूर्ण पगारावर त्यांचाच अधिकार आहे....

बायको मूळ एका खेड्यात नोकरी करत होती... सासरी आल्यावर मुम्बईत तिला फार चान्गल्या पगाराची नोकरी मिळाली... तिला नोकरी मिळण्यापूर्वीच मी तिला सान्गितले होते की तुझ्या पगाराच्गा १/३ तू माहेरी दे... उर्लेले सगळे तुझ्याच नावाने ठेव.. तिलाही ते पटले होते..

लग्नाआधी मात्र आई, बाप, मुलगी सगळ्यानी मुलगी नोकरी करेल असे कबूल केले होते... पण अचानक हा पवित्रा नवा होता...बायकोचे आई बाप, बहीण यांचे ही पगारासाठी आम्हाला फोन येऊ लागले, अन सगळा उलगडा झाला.

या विष्यावर बायको रोज भान्डण काढू लागली... शेवटी मी तिला स्पष्ट्पणे सान्गितले... घरात समाधान आणि शान्ती महत्वाची आहे... तु असलीस नसलीस तरी फरक पडच नाही... तू सरळ या मुद्द्यावर घटस्फोटच घे.. मी बिन बायकोचाच राहीन आणि सुखाने करियर तरी करीन...

कायद्यानुसार मुलीवर फक्त आई बापाच्या उदर निर्वाहाची जबाबदारी असते, तीही सर्व भावन्डात मिळून... मुळात बायकोचा १/३ पगार हा देखील तिच्या मुळच्या पगारापेक्शा अधिकच होता आणि कायदेशीर जबाबदारीच्या तर किती तरी अधिक होता.... भान्डण काढण्याचा सल्ला देणारी तिची बहीण मात्र रिकाम टेकडीच आहे....

बायको भान्डून माहेरी गेली... मीही खुशाल तिला जाऊ दिले.. तुझा सगळा पगार माहेरीच द्यायचा तर तिथेच रहा असे सान्गितले...

तिसर्‍याच दिवशी ती परत आली... माहेरी एक पैसाही देणार नाही या अटी वर नान्दत आहे...

मी ही तिला स्पश्टपणे सान्गितले आहे... तू घरात असली नसलीस तर फरक पडत नाही.. समाधान व शान्तता महत्वाची आहे... तू नोकरी कर न कर.. ४ वेळा अन्न, चार कपडे आणि ४ दिवस पुरेल एवढा नॅपकीनचा पुडा .. एवढ्या तुझ्या बेसिक गरजा मी भागवू शकतो... जेव्हा सन्सार हे आपलेही धर्म कर्तव्य आहे, याची अक्कल तुला येईल, तेन्व्हा पाहू पुढच्या संसाराचे...

माहेरी पैसे देण्यास माझा विरोध नव्हता..... पण बायकोने एवढे टेक्निकल बोलण्याचे कारण नव्हते... मी तिला स्पष्टपणे सान्गितले आहे ... तुझ्या आई बापाला कोर्टात जायला सान्ग... उदर निर्वाहाचे साधन नाही, पोरीचा पगार मिळावा म्हणून .. कोर्ट सान्गेल तेवढा हिस्सा त्याना देऊ..

प्रत्यक्षात आई बापाची शेती आहे... त्यामुळे ते तसे सान्गू शकत नाहीत... पोरीच्या बापाला कर्ज बुडवण्याची भारी हौस !... पोरीच्या पगाराचा दाखला काढून घेऊन त्यावरही कर्ज काढले तर, ही माझी भीती.. म्हणून स्वताचे सगळे व्यवस्थीत असूनही मी फन्दात पडलो. लग्न झाल्यावर चौथ्याच महिन्यात बापाने बन्के कडून आलेली एक कर्जाची नोटीस बन्केला परस्पर आमच्या घराकडे पाठवायला सान्गितली... कर्ज बायकोच्या माहेरच्या नावाने होते... नोटीस मात्र बायकोला माझ्या नावाने व आडनावाने आली... ते मी तिला भरायला सान्गितले... भान्डणे झाली, म्हणून पुढच्या नोटासा आमच्या घरी आलेल्या नाहीत.. लग्न हुन्डा , सोने न घेता केले, त्याची ही फळे मिळाली... रिकामटकड्या बहिणीने परस्पर एका महिला मन्डळा कडेही तक्रार दिली होती, त्यान्चे ही आमच्या घरी फोन येऊन गेले होते.... पण ती आपण होऊन परत आली, त्यानन्तर ते लोक काही आलेले नाहीत...

आता सगळे शान्त आहे... पण सुनामी परत कधीही येऊ शकते.. मी सध्या मालदीव मध्ये आहे... बायकोने मुम्बईतील नोकरी केवळ सासरचे ( !) कल्याण होऊ नये या उदात्त भावनेने सोडलेली आहे.. सध्या ती माझ्या मुळ गावी सासरी राहत आहे. मधल्या काळात तिने परत तीच खेड्यातली जुनी नोकरी चालू केलेली आहे , कारण तिच्या बहिणीला तिने नोकरी सोडण्याचा निर्णय नन्तर चुकीचा वाटला म्हणे ! . हे त्या बहिणीनेच मला फोन वर सान्गितले.... या सगळ्या प्रकारामुळे तिने नोकरी करूच नये या अटीवर मी तिला यायला सान्गितले होते... पण आता मी नोकरी करणारच हा तिचा भान्डण्याचा मुद्दा आहे ! . हा पश्चाताप १० वर्शानन्तर त्या बहिणीला झाला असता तर काय केली असतीस, याला मात्र तिच्याकडे उत्तर नाही.... माझा विसा अजून प्रोसेस मध्ये आहे, नन्तर तिला मी इथे बोलावून घेईन... नोकरी कर , न कर घर मात्र शान्त व समाधानी राहिले पाहिजे, या एक मेव अटीवरच तिला मी बोलावणार आहे....

मधल्या काळात मीही वकीली सल्ले घेतलेले आहेत... त्यातले काही मुद्दे :

१. बायको शिकलेली असेल, स्वताच्या पायावर उभी राहू शकत असेल, तर तिला पोटगीची गरज नसते.
२. अशिक्षित, न कमावणार्या बायकोला फक्त उदर निर्वाहा एतकी रक्कम द्यावी लागते... तिच्या वरील इतर जबाबदार्‍या, तिचे आई बाप, त्यान्ची कर्जे... अशान्ची जबाब्दारी नवर्‍यावर येत नाही.
३. बायको सतत वेगळी रहात असल्याण्याची धमकी देत असल्यास तिला खुशाल तसे करू द्यावे... तिला संसारात इन्टरेस्ट नाही आणि आपल्याशिवाय ती जगू शकते, हे आपल्याला सिद्ध करणे सोपे जाते..
४. आपल्याला नोकरीची ठिकाण बदलण्याची संधी असेल, तर आनन्दाने आपण तिला सोडून जावे... तिची मुळची नोकरी सोडून आपल्याजवळ येण्यास तिला विनम्रपणे सुचवावे..

......................***...........................

१. बायकोचे रिकामटेकडे भाऊ बहीण हे बर्‍याचदा अशा प्रकरणान्चे कारण असतात. त्या.न्च्या पासून कायदेशीर कारवाईने मुक्ती मिळवता येते का ?
२. सासू सासर्‍याना चारही मुली आहेत.. अशा वेळी मिळकत नसणार्‍या मुली आई बापाची जबाबदारी मिळवणार्‍या मुलीच्या गळ्यात सम्पूर्ण पणे घालू शकतात का ? कायदा काय सान्गतो? सम्बन्ध प्रेमाचे असते तर बायकोने सगळी जबाबदारी घेतली तरी माझी हरकत नव्हती.. पण आता मात्र जे कायदा बोलेले तेच फक्त करायचे आहे. अधिक जबाबदारी मुद्दामच घ्यायची नाही... आणि ती देखील आता सहजपणाने घ्यायची नाही. असे मी ठरवलेले आहे..
३. मी आता माझी कोणतीही मिळकत, नॉमिनेशन बायकोच्या नावाने करणार नाही.... याला कायदा विरोध करू शकते का?
४. पोटगी बाबत बरील मिळालेले मुद्दे हे खरे आहेत का ?
५. मी माझ्या सासू सासृयाना कायदेशीर नोटीस देऊन आमच्याशी सम्बन्ध ठेऊ नका असे सान्गू शकतो का? बायकोच्या फोन वर त्यानी तिच्याशी काहीही बोलावे, आमचा विरोध नाही... कारण माझ्या माघारी आता आमच्या आई वडिलाना त्या.न्चे फोन येत आहेत... सगळे विसरून जाऊ म्हणून.. पण माझ्या मते आता त्याना कायमचे तोडून ठेवणे हाच खरा सुरक्षित मार्ग आहे... माझ्या घरच्यान्ची मला चिन्ता वाटते.. बायको चे आई बाप अतिशय निर्लज्ज आणि पैशाला हपापलेले आहेत.. ( त्याना त्या.न्च्या दुसर्‍या एका जावयाने कर्जामध्ये बुडवले आहेत.. कर्ज प्रचन्ड आहे.. माझ्या माहितीनुसार २५ लाख तरी.. ) ' बुभुक्षितः किम न करोती पापम याचे माझ्या घरच्याना भान नाही, त्यामुळे ते भोळे पणाने माझ्या माघारी परत त्या लोकाना दार उघडून आत घेतील , ही माझी भीती आहे.

आता असं वाटतंय की डिस्टर्बड वैवाहीक जीवन असणारे सगळेच जण इथे येऊन आपल्या बायकोच्या आणि तिच्या आईवडीलांच्या नावाने खरेखोटे काहीही लिहून सहानुभूती मिळवू लागणारे.

दिनेश, तुमचा हेतू चांगला असला तरी अश्या अनेकांना प्रोत्साहन मिळणार आहे.

तुमच्या सहानुभूतीची भीक मागण्यासाठी मी हे लिहिलेले नाही... माझे शेवटी लिहिलेले ५ प्रश्न मला महत्वाचे वाटतात.. दिनेश यान्चे मत याबाबत जाणून घेण्यासाठी , त्याना आधी पार्श्वभूमी सान्गावी म्हणून मी हे सान्गितलेले आहे.... बिघडलेली पाककृती सुधारावी कशी , हे ते सुन्दरपणे सान्गू शकतात....

पण तुम्ही का इतके ' डिस्टर्बड' झालाय ? Happy तुम्ही भले नीधप असाल, बाकीच्यानी कायद्याचे सारेगम शिकू नये असा कायदा आहे का इथे ? Happy दिनेश या.न्ची कहाणी खरी असल्याची तुमची खात्री आहे ना, मग झाले तर ! तुम्ही फकस्त तेवढेच कन्सीडर करा की !

जागोमोहनप्यारे,
मी तुम्हाला काहीही वैयक्तिक बोललेले नाहीये. तेव्हा मला उद्देशून वा माझा आयडी घेऊन एकही पोस्ट आपण करू नये. अन्यथा अ‍ॅडमिन कडे तक्रार करण्यात येईल.
याउपर तुमच्याशी काहीही बोलायची इच्छा अथवा गरज मला वाटत नाही.

Happy

Happy एवढा श्यान पना सगळ्याकडे आला तर सगळे सरसेनापती होतील की ... ! दोन अडीच सूर शिकून काय लता मन्गेशकर होता येते व्हय ? Happy

एवढा श्यान पना सगळ्याकडे आला, तर सगळे सरसेनापती होतील की ! दोन अडीच सूर शिकून काय लता मन्गेशकर होता येते व्हय ? >>>>>>>>>>

ससे भाऊ चुप बसा.
एक माणुस चिडलाय वाटत?
...............................................
................................................
...............................................
...............................................
.....................................:हहगलो:

एवढा श्यान पना सगळ्याकडे आला, तर सगळे सरसेनापती होतील की
>>>>>>>>>>
लिहा, लिहा झोपेत लिहा. जाग आल्यावर परत पुसा. मोहना, शहाड, ठाकुर्ली.......
_______________________________________
माझ्या आय डि बददल जर कुणी लिहिले तर मी अदनान गामी कडे तक्रार करील.
अरे काय चाल्लय काय. ह्या बी बी च पार तुन्ही भज करुन टाकलय. समाजामध्ये जागृती निर्माण करन्यासठी हा बी बी चालु केला आहे. तसेच प्रबोधनासाठी सुध्दा हा बी बी महत्वपुर्ण भुमिका निभावत आसताना हा थिल्लरपणा इथे अजाबात खपवुन घेतला जाणार नाही याची सबंधींतांनी नोद घ्यावी.
हेमाशेपो.

माफ करा पण कुणाला मदत पाहीजे असल्यास तो ती इथुन घेउ शकतो. कुणाला इथे अस होइल तस होइल अस वाटत असल्यास त्यानी इथे येउ नये. अगदि dineshvs चा देखिल हाच मुद्दा आहे.

आपल्या घरातले प्रॉब्लेम्स चव्हाट्यावर प्रदर्शनाला मांडल्यावर त्यावर सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येणार याची तयारी ठेवायला हवी. कोणी इथे यावे वा येऊ नये हे सांगण्याचा कुणालाही अधिकार नाही.

काल इथल्या एका टीव्ही शो मधे sexual harassment ची केस होती.
पुरुष नि स्त्री दोघांचेहि आधी विवाहबाह्य संबंध होते एकमेकांशी आधी, पण नंतर त्यांचे बिनसले. नि बाईने केस केली. पुरुषाची वकील एक बाई होती नि बाईच्या बाजूने एक पुरुष वकील होता.

अर्थातच बाई वकील आटोकाट प्रयत्न करत होती की ही फिर्याद खोटी आहे, यात काही अर्थ नाही. पण तिचे काही चालत नव्हते. शेवटी तिने शेवटचा प्रयत्न म्हणून असे argument केले की,

"खरे तर हा sexual harrasment हा कायदा जेंव्हा स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी मानले जात असे, तेंव्हा विशेषतः स्त्रियांच्या रक्षणासाठी केला आहे,
पण आता बायका जर स्त्रीमुक्ति, बरोबरीचे हक्क वगैरे चळवळी करत असतात, तर मग त्यांच्या वाट्याला जे येते जगात, त्याच्याशी खंबीरपणे सामना करावा. पुरुषांना पण कधी कधी बायका त्रास देत असतात, पण असले खटले नेहेमी बायकाच का करतात? पुरुषांनाहि त्रास होतो, पण ते फार क्वचित कोर्टात जातात. मग या बाबतीत बायका हा कायदा का वापरतात? "

बिचारी वकील बाई खटला हरली, पण ७५०,००० ऐवजी तिच्या क्लायंटला फक्त १२५,००० डॉ. त्या बाईला द्यावे लागले!

अधिकाराच्या गोष्टी नाही केल्या तरच बर होईल. तुम्हाला हा "धागा" उधळायचा अधिकार कुणी दिला?
असो, अजुन काही बोलायचे नाहीय. व्रुथा विषयांतर होतेय. दिनेश दादा , माफ करा.
मुळ मुद्दा आणि त्याच्या अनुषंगाने येणारी चर्चा चालु द्या.

Pages