ऑस्ट्रेलियन ओपन - २०१५

Submitted by Adm on 16 January, 2015 - 14:35

नवीन वर्षाच्या टेनीस सिझनची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन सोमवार १९ जानेवारी पासून सुरू होते आहे.

पुरूष एकेरीत अग्रमानांकन ज्योकोला तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्सला मिळाले आहे.
ज्योकोला त्यामानाने सोपा ड्रॉ असून उपांत्य फेरीआधी स्पेनच्या फर्नांडो व्हर्डास्कोचे आव्हान येऊ शकतं.
माजी विजेत्या फेडररसमोर उपांत्यपूर्व फेरीत मरे तर उपांत्य फेरीत नदाल उभे ठाकू शकतात.
नदालची पहिली फेरी मिखेल योझुमीशी तर चौथी फेरी लुकास रसोल बरोबर होऊ शकते. फॅब फोरखेरीज वावरिंकाही विजेतेपदाच्या शर्यतीत असेल.

महिला एकेरीत सेरेना विल्यम्सला त्यामानाने कठीण ड्रॉ असून तिच्या मार्गात झ्वोनारेवा, यांकोविच येऊ शकतात. सेरेनाखेरीज शारापोव्हा, क्विटोव्हा आणि बुचर्ड विजेतेपदाच्या शर्यतीत असतील.

ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी हा धागा.

स्पर्धेच्या वेबसाईटची लिंक : http://www.ausopen.com/index.html
अमेरिकेतील टिव्ही शेड्युल : http://www.tennistours.com/australian-open/tv-schedule/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पराग, सरीना ४थ्या राऊंडला खेळतांना थकलेली वाटत होती. जिंकते की नाही कोण जाणे. जिंकेल, जिंकेल. व्हिनस छानच खेळतेय. पण नविन मुली चांगल्याच जोमाच्या आहेत. बघु...

विनसचे प्रचंड कौतुक.. ३४-३५शीत व्यावसायिक अत्यंत स्पर्धात्मक टेनिस खेळणे चेष्टा नाही. ८०च्या दशकातल्या बिली जीन किंग नंतर या वयाची खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपौपांत्य फेरीत. म्हणजे तब्बल ३० वर्षांनी

बायांच्या पहिल्या दोन क्वार्टर फायनल पाहिल्या..
माकारोव्हा वि हॅलेप बरीच बोर होती.. कमी वाईट खेळल्याने माकारोव्हा जिंकली..
शारापोवा वि बुचर्ड मस्त झाली.. पोव्हा इतकी कंसिस्टंट नेहमी खेळली तर काय हवं अजून! बुचर्डला लय सापडलीच नाही शेवटपर्यंत.. बर्‍याच चुका केल्या..
आता नदाल वि. बर्डीच.. !

टण्या, व्हिनसबद्दल अनुमोदन!

काल मुलर वि जोकोविच बघायला मिळाली. मुलरची सर्विस प्रत्येक सेट्च्या सुरुवातिला चांगली पडत होती. शेवट्च्या सेट मधे ब्रेक पॉइंट गमावल्यावर ज्योकोविच चे इमोशनल आउट्बर्स्ट जरा जास्तच वाटले.

@ पराग

राफ़ा मेडिकल टाइम आउट नंतर जसे खेळतो ते बघुन वाट्त नाही त्याला खरोखरच काही दुखापत झाली असेल. त्यच्या खेळात कोर्ट कवर करण्यात कुठेही जाणवत नाही त्याला काही दुखापत झाली होती.

याचा आणि त्याच्या खेळाच्या कॅलिबरचा काही संबध नाही. तो उत्तमच आहे आणि त्याने मिळवलेली ग्रॅंड्स्लॅम टायटल अशीच आलेली नाहीत तरी सुध्धा प्रतिस्पर्धी खेळाडुची लय बिघडवण्या साठी तो शक्य तितका टाइम वेस्ट करतो हा त्याच्या स्ट्रॅटेजी चा भाग आहे असेच वाटते.

@ मयेकर
तुम्ही चर्चा नाही केलित तरी चालेल. नेहेमी प्रमाणे हा काय म्हणतो, तो काय म्हणतो ते पहा अशा लिंक दिल्यात तरी चालेल.

युरो, तुम्ही म्हणता त्यात खुप तथ्य आहे. स्टॅमिना राखण्यासाठी काही वाट्टेल ते Wink

राफा गेला, फेडेक्स गेला, जोकोला ५वे ऑस्ट्रेलियन ओपन Happy

नदाल गेला(?) मला वाटले कि गायब होउन ६/८ महिन्यांनी येतो आणि धुम मचावतो. आता ती हि जादू संपली.

Sad Sad
काल काहीच ठिक होत नव्हतं राफाचं.. पहिले दोन सेट तर खूपच हालत. फोरहँडच्या तुफान एरर्स.. बर्डीच बरा खेळला एकंदरीत.. तिसरा सेट फिरवणार की काय असं वाटत होतं टायब्रेकरमध्ये.. पण सुरूवातीला गमावलेले पॉईंट्स महाग पडले.

आज पण चांगल्या मॅचेस आहेत.

राफ़ा मेडिकल टाइम आउट नंतर जसे खेळतो ते बघुन वाट्त नाही त्याला खरोखरच काही दुखापत झाली असेल. >>>> आधीचा खेळ आणि नंतरचा खेळ ह्याची तुलना करून बघायला हवी ना त्यासाठी.. गेल्या ऑओ फायनलला त्याचू दुखापत अगदी व्यवस्थित जाणवत होती..
म्हणजे ही स्ट्रॅटेजी कधी नसेलच असं मी म्हणत नाही.. (अजून वाचलं पाहिजे इकडे तिकडे) पण दरवेळी तो असंच करतो असं मला वाटत नाही..

कालच्या व्हिनस च्या मॅच चा शेवटचा सेट बघितला का? असं वाटलं ह्यावेळी प्रत्यक्ष तिची बहिणही रोखू शकणार नाही तिला ..

नवरा तिला हवा बरेच दिवसांनीं बघितली काल ..

Parag, it is still Today.why are you saying yesterday? Didn't he take medical time out today? Wink

Didn't he take medical time out today? >>>> Lol 'निकाल' पाहून कळलं नाही का? Proud

it is still Today.why are you saying yesterday? >>>> हां ऑस्ट्रेलियात आणि भारतात टूडेच.. आमच्या इथे मॅच सुरू असताना कालची रात्री होती म्हणून काल म्हटलं..

कालच्या व्हिनस च्या मॅच चा शेवटचा सेट बघितला का? >>>> नाही ना.. पहायचा होता.. पण सापडला नाही मला नंतर कुठे.. हायलाईट्स पाहिले.. ती बर्‍याच दिवसांनी तिच्या सुरूवातीच्या स्टान्सने खेळते आहे!

व्हीनस आणि सेरेना यांच्यात फायनल झाली तर मजा येइल.

शारापोवाची एक पण मॅच बघितलेली नाही यंदा. कशी खेळते आहे?

पग्या, बर्डिक ब-रा खेळला? पहिले दोन सेट राफा वाईट खेळत होताच पण त्यापेक्षाही बर्डिच खूप चांगला गेम खेळत होता म्हणून तर ६-२, ६-० असे सील केले दोन्ही सेट्स.

व्हीनस आणि सेरेना यांच्यात फायनल झाली तर मजा येइल. >>>>> नाही होणार.. सेमीच होईल दोघीही आजच्या मॅचेस जिंकल्या तर..

बर्डिक ब-रा खेळला? >>>>> पद्धत आहे असं म्हणायची.. Proud

व्हिनसचं मॅच फारच बोर झाली.. शेवटचा सेटमध्ये जिंकायचा चान्स होता.. पण ती आज जशी खेळली ते पहाता तिला सेरेना समोर काहीच जमलं नसतं असं वाटलं..

<>>> हाहा 'निकाल' पाहून कळलं नाही का? फिदीफिदी>>

दुसर्‍या सेट नंतर पेन किलर्स घेतले पण काही उपयोग झाला नाही. ट्रेनरला बोलवायचा विचार करेपर्यॅत मॅच सॅपली.

राफ़ा ने इतक्या सहज हराव हे काही बर वाटल नाही. ३ रा सेट राफ़ा जिंकला असता तर मॅचचा निकाल वेगळाही लागु शकाला असता.

असो तरी कष्टकरी खेळाडुंच्या संघटनेच्या वतिने राफ़ा हरल्याच्या दु:खात सहभागी.

युरो, तुम्ही एसेस माझ्यावर का सोडताय? तुम्ही जे लिहिताय तेच तर मी म्हणतोय.

राफाचं ते प्रत्येक पॉइंटपूर्वी स्वतःला दहा ठिकाणी चिमटे काढणं बघून प्रेक्षक कंटाळतात तर प्रतिस्पर्धीही वैतागून, त्यापेक्षा हरलो तरी चालेल असे म्हणतच असेल.

तुम्ही म्हणताच आहात तर कोण काय म्हणतंय त्याच्या लिंक्स नाही पण अवतरणे देतोच.
"राफ़ा आणि ज्योको; फ़ेडरर च्य तुलनेत सामन्य खेळाडु आहेत."
ते

"याचा आणि त्याच्या खेळाच्या कॅलिबरचा काही संबध नाही. तो उत्तमच आहे आणि त्याने मिळवलेली ग्रॅंड्स्लॅम टायटल अशीच आलेली नाहीत"

अर्थातच संपूर्ण परिच्छेदातली मला सोयीची तेवढी वाक्ये मी उचलली आहेत.
-----
पराग, इकडे तिकडे वाचताना मला एक सॉलिड(संशोधनात्मक) लेख मिळाला होता. लिंक देऊ का? (इथे देणार नाही Wink )
-----
बरं आता दुसर्‍या सामान्य खेळाडूबद्दल बोलायचं का?
----
उरलेले सामने विदाउट टेन्शन पाहता येतील

पराग , मयेकर प्लीज मी लिहीलेल पर्सनली घेवु नका. आपल्या भावना दुखावण्याचा हेतु नाही. चुकुन दुखावल्या असल्यास माफ़ करा.

सेरेना अपेक्षेनुसार अगदी सहज जिंकली !

स्टॅन द मॅन जिंकला वाटतं ! पाहिली का कोणी मॅच ?
पेस आणि हिंगीस सेमीला पोहोचले..

आजच्या मॅचेस बोर आहेत.. पोवा ची सोडल्यास..

मयेकर.. Proud द्या की लिंक..

युरो, आम्ही (म्हणजे मी.,, मयेकर सांगतील त्यांच्याबद्दल) भावना-बिवना दुखावण्याच्या पलिकडे गेलो आहोत ह्या बाबतीत.. Wink

मी पाहिली ना .. निशिकोरी चांगला खेळत होता पण स्टॅन द मॅन त्याही पेक्षा भारी खेळत होता .. आणि सर्व्हज् तर काय .. त्या कामेन्टेटर ने म्हंटल्याप्रमाणे मिसल्स् ..

खेळासंबंधीत धाग्यावरच खेळाडुवृत्ती कमी पडतीये असं इथल्या काही पोस्टी वाचून वाटलं. टू बॅड!

बायांमध्ये ऑल अमेरिकन आणि ऑल रशियन सेमीज आहेत Happy

निशिकोरी हारल्यानंतर आता मी मरे आणि स्टॅन (द मॅन!) या दोघांना सपोर्ट करतेय. परंपरेनुसार बर्डिक वाईट हारेल. काय पग्या? Happy

Pages