ऑस्ट्रेलियन ओपन - २०१५

Submitted by Adm on 16 January, 2015 - 14:35

नवीन वर्षाच्या टेनीस सिझनची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन सोमवार १९ जानेवारी पासून सुरू होते आहे.

पुरूष एकेरीत अग्रमानांकन ज्योकोला तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्सला मिळाले आहे.
ज्योकोला त्यामानाने सोपा ड्रॉ असून उपांत्य फेरीआधी स्पेनच्या फर्नांडो व्हर्डास्कोचे आव्हान येऊ शकतं.
माजी विजेत्या फेडररसमोर उपांत्यपूर्व फेरीत मरे तर उपांत्य फेरीत नदाल उभे ठाकू शकतात.
नदालची पहिली फेरी मिखेल योझुमीशी तर चौथी फेरी लुकास रसोल बरोबर होऊ शकते. फॅब फोरखेरीज वावरिंकाही विजेतेपदाच्या शर्यतीत असेल.

महिला एकेरीत सेरेना विल्यम्सला त्यामानाने कठीण ड्रॉ असून तिच्या मार्गात झ्वोनारेवा, यांकोविच येऊ शकतात. सेरेनाखेरीज शारापोव्हा, क्विटोव्हा आणि बुचर्ड विजेतेपदाच्या शर्यतीत असतील.

ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी हा धागा.

स्पर्धेच्या वेबसाईटची लिंक : http://www.ausopen.com/index.html
अमेरिकेतील टिव्ही शेड्युल : http://www.tennistours.com/australian-open/tv-schedule/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नै रे आज नै कल्हिच आयी Proud

जोक्स अपार्ट, मला खरंच आठवेना आधी या दोघांच्यात काही सुसंवाद घडला होता की काय. मी होते काय त्यात? (स्वगतः नसणारच. सुसंवाद आणि आम्ही? छे! :फिदी:)

चमन
मी फ़क्त फ़ेडरर च्या नविन स्ट्रॅटेजी बद्दल मला काय वाटते ते सांगितले. ही नविन स्ट्रॅटेजी त्याने विबल्ड्नपासुन जास्त वापरायला सुरुवात केली आहे.

फ़ेडररला वया प्रमाणे बेसलाइन वरुन पॉवर गेम खेळणे कठीण आहे.त्यच्या बॅक इजुरी मुळे कोर्ट कवरेजवर मर्यादा आलेली आहे. त्याला नविन काही तरी करावेच लागेल जर या लेवला खेळयचे असेल. या नविन स्ट्रॅटेजी मधे त्याची सर्विस जर कमी पडली तर बर्‍याच मर्यादा येतात.

मी तुमच्या मताशी सहमत आहे. राफ़ा आणि ज्योको; फ़ेडरर च्य तुलनेत सामन्य खेळाडु आहेत.;) Wink Wink

अरे ये क्या हो रहा है रॉड लिव्हर अरेनापे !!>>
हो गया Sad .. २० अन्फोर्सेड एरर्स ते पण पहील्य सेट मधे. दुसर्या मधे टाय ब्रेक मधे ५-४ असताना, फर्स्ट सर्विस पड्ली नाही, सेकन्ड सर्वला सेप्पी ने खुप प्रेशर टाकले.

अवघड आहे...सेकन्ड सीड होल्ड वा १७ वे मेजर ...

काल दुसरा सेट पाहिला.. तो बरा चालू होता खर तर.. सेप्पी ५-४ सर्व्हिंग फॉर सेट असताना फेडररने चांगल ब्रेक मिळवला होता.. (अ‍ॅक्च्युअल ब्रेक पॉईंट मटका बसला. नेटला लागून अगदी जवळ वगैरे) पण गेम बिल्ड चांगला केला होता.. नंतर टायब्रेकर चुरशीचा झाला..
पहिल्या सेट मधल्या एरर्सबद्दल माहीत नाही..

मग कोण लिहितय कालच्या मॅचचा टेक्निकल अ‍ॅनालिसिस ? Wink

<<मी तुमच्या मताशी सहमत आहे. राफ़ा आणि ज्योको; फ़ेडरर च्य तुलनेत सामन्य खेळाडु आहेत.डोळा मारा डोळा मारा डोळा मारा
अन्ध श्रद्धा काय ते दिसतय!

सशल, मी आलेय. मॅचेस बघता येत नाहिए. पण लाइव स्कोरस बघते.
नेहेमी प्रमाणे माझा पठिंबा जोकोला. Happy

नेहेमी प्रमाणे माझा पठिंबा जोकोला >>> सरिनाला नाही का पाठिंबा यंदा?

तिचा ड्रेस आणि त्याचं विश्लेषण वाचलंत का?

नाही वाचले सिडीं! बरेच काही सुटले. आणि हो, सरिना ला पण पुर्ण पाठिंबा. आजही आवडते.

टिव्हि चॅनल कट केलीय ह्या वेळेस. म्हणुन मॅचेस बघता येत नाहीये. Sad

अरे वा सुमंगल.. वेलकम.. !
बायांमध्ये सरिनाच जिंकणार असं वाटतय.. बरीच फॉर्ममध्ये वाटते आहे..

अर्रररर च च च च! हरला का? निदान बोटाला लागल आहे/दुखतं आहे अस सांगुन इज्य्रुरी टाइम तरी घ्यायचा; निदान सेप्पीची लय तरी बिघडली असती. मग करायचा कमबॅक मॅच मधे आणि जिंकायची ५ सेट मधे. या बाबतित नडालची शिकवणी लावायला हरकत नाही.

मॅच कोणी बघितली का? दोन सेट टायब्रेक मधे हरला म्हणजे एकुणच वाईट खेळ झाला असणार.

सेप्पीच अभिनंदन!

सेप्पीची लय बिघडवून काय उपेग? आधी स्वतःची लय मिळून धड सर्व्हिस तर करत यायला हवी ना? दोनदा टायब्रेकमध्ये नुसते पोचलेच नव्हते तर मिनि ब्रेकही घेतला होता दोन्हीत. तरी हे असं.

त्या टिमने राफ मॅच पॉइंटवर सर्व्ह करत असताना कोणी प्रेक्षक किंचाळला म्हणून राफाला पुन्हा सर्व्ह करायची संधी दिली. त्याच्या विरोधात खेळणारेसुद्धा त्याचे चोचले पुरवत असतात. अतिच होतंय हे.

बरोब्बर मयेकर यालाच खिलाडु वृत्ती म्हणतात. मरे काय म्हणाला राफ़ाच्या इज्युरी टाइम बद्द्ल ते एकदा ऐका आणि मागच्या वर्षीची फ़ायनल पण आठवा.

तेच तर मी म्हणतोय Wink
राफाची दिखावू खिलाडूवृत्ती प्री आणि पोस्ट मॅच पुरतीच असते. मग तो हरलेला खेळाडू कोर्ट सोडून जाताना, बॅगा भरणं सोडून टाळ्या काय वाजवतो आणि इंटर्व्ह्युत त्याचे पुन्हा सर्व्ह टाकू देण्याबद्दल कौतुक काय.
अगदी मोजकेच खेळाडू असा मोठेपणा दाखवू शकतात असं म्हणून पुन्हा बाकीच्या खेळाडूंना टोमणा.

-----
बाकी फेडररसारख्या निसर्गदत्त प्रचंड गुणवत्ता व त्याजोडीला दुखापतींपासून दूर राहिलेलं शरीर लाभलेल्या खेळाडूला त्याच्या सर्वोच्च स्थानावरून, त्याचा खेळ उच्च कोटीचा असतानाच, त्याच्यापेक्षा बर्‍याच कमी गुणवत्तेचे, आपल्या शरीराला नुकसान पोचेल अशा पद्धतीने खेळणारे खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करून खाली खेचतात आणि पुन्हा वर चढू देत नाहीत यासारखा दुसरा दैवदुर्विलास (हा शब्द अशाच जागी वापरतात ना?) तो काय?

मयेकर इज्युरी टाइम बद्दल बोला. मुद्दा तो आहे. प्री आणि पोस्ट मॅच इंटरव्यु बद्दल नको.

<<आपल्या शरीराला नुकसान पोचेल अशा पद्धतीने खेळणारे खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करून खाली खेचतात>>

यातच सगळ आल.

मयेकर तुम्ही सगळी मॅच बघीतली असेल तर थोड लिहा ना. हायलाइट पण बघायला मिळालेले नाहीत.

सगळी मॅच पाहिली. मॅचच्या सुरुवातीला काँमेंट्री करणारा फार जोरकस फटके न मारणार्‍या, तरीही चेंडू परतवत राहणार्‍या सेपीशी सामना असल्याने फेडररला योग्य वेळा चांगला सराव मिळेल असं म्हणत होता. तसाच सेपीचा खेळ होता. पण फेडरर फेडरर नव्हताच. (आता कोणीतरी म्हणेल, अलीकडे असतो कुठे? Wink ) सो मेनी अनफोर्स्ड एरर्स , इनकसिस्टन्स सर्व्ह.

<<<आपल्या शरीराला नुकसान पोचेल अशा पद्धतीने खेळणारे खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करून खाली खेचतात>> याच्याकडे परत येऊया. निसर्गदत्त अफाट गुणवत्ता घोर (की ढोर?) मेहनतीपुढे फिकी कशी पडते? मानसिक क्षमतेचे काही लफडे बिफडे असते का यात?

इंज्युरी टाइमबद्दल बोलायचं? हो तेवढ्यापुरता दुसरा खेळाडू वरचढ ठरतो. पण इंज्यरी टाइम संपला की पारडं कसं फिरतं? दुसर्‍या खेळाडूची लय जाते का? असं त्या पाच सेटर सामन्यातला फक्त शेवटचा सेट पाहिला तेव्हा तरी दिसलं नाही. एकीकडे पूर्ण फिट आहे का अशी शंका यावा असा तरीही दोन्ही बाजूंनी अटीतटीचा खेळ होऊन तो निकाल आला.

जर इंज्युरी टाइम बद्दल काही वाद नसता तर बर्‍याच खेळाडुंनी यावर आक्षेप घेतला नसता.देल्या वर्षी अंतिम सामन्यात यावरुन वाद झाल होता. वावरिंकाने आक्षेप घेतला होता. तो एक सेट त्यानंतर हरला होता. बर्‍याच वेळी अस दिसुन येत काही कारणाने सामन्यात व्यत्यय आला तरी आधी आघाडीवर असणारा खेळाडु हरतो. फ़रक नक्कीच पडतो. ही इंज्युरी खरी असते की तो एक स्ट्रेटेजीचा भाग आहे हा मुद्दा विचार करण्या सारखा नक्कीच आहे.

अझारेंका सिबुल्कोवा पहातय का कोणी ? भारी सुरू आहे !
दोघीची चांगल्या खेळतायत पण सिबुल्कोवा आत्तातरी कमांडीग आहे.. भारी प्लेसमेंट्स आणि डाऊन द लाईन शॉट्स

मेडिकल टाइम आउट'वर येऊ फुरसतीत.
मार्टिना हिंगिस डबल्स खेळतेय. मिश्र दुहेरीत पेसच्या साथीने.
कालची डेव्हिड फेरेर आणि सिमॉन मॅच मस्त झाली.
दिमित्रोव्हचं फारच कौतुक चाललंय. फ्युचर नंबर १.

>>जर इंज्युरी टाइम बद्दल काही वाद नसता तर बर्‍याच खेळाडुंनी यावर आक्षेप घेतला नसता.देल्या वर्षी अंतिम सामन्यात यावरुन वाद झाल होता. वावरिंकाने आक्षेप घेतला होता. तो एक सेट त्यानंतर हरला होता. बर्‍याच वेळी अस दिसुन येत काही कारणाने सामन्यात व्यत्यय आला तरी आधी आघाडीवर असणारा खेळाडु हरतो. फ़रक नक्कीच पडतो. ही इंज्युरी खरी असते की तो एक स्ट्रेटेजीचा भाग आहे हा मुद्दा विचार करण्या सारखा नक्कीच आहे.

मला वाटते १००% स्ट्रेटेजीचा भाग आहे.

इंटरेस्टींग क्वार्टरफायनल्स !

व्हिनस लय दिवसांनी चांगली खेळते आहे.. व्हिनस आणि सेरेना दोघी बॅक टू बॅक दोन मॅच थ्री सेटर खेळल्या आहेत..
सेमी त्यांच्यातच व्हायची शक्यता आहे..

पुरूषांमध्ये नंबर २ वगळता १ ते ८ मानांकित खेळाडू क्वार्टरमध्ये आहेत. निशिकोरी फेरर मॅच चांगली झाली म्हणे..
आज राफा वि बर्डीच..

मला वाटते १००% स्ट्रेटेजीचा भाग आहे. >>>> जर सगळे व्यवसायिक खेळाडू आहेत, तर प्रतिस्पर्ध्यांकडे काही काऊंटर स्ट्रॅटेजी नसते का ? दुसरं म्हणजे इंज्युरी ब्रेक नंतर प्रतिस्पर्ध्याची लय बिघडली ह्यापेक्षा दुखापती वर उपचार झाल्याने राफाचा खेळ उंचावला असं होऊ शकत नाही का?

Pages