ऑस्ट्रेलियन ओपन - २०१५

Submitted by Adm on 16 January, 2015 - 14:35

नवीन वर्षाच्या टेनीस सिझनची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन सोमवार १९ जानेवारी पासून सुरू होते आहे.

पुरूष एकेरीत अग्रमानांकन ज्योकोला तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्सला मिळाले आहे.
ज्योकोला त्यामानाने सोपा ड्रॉ असून उपांत्य फेरीआधी स्पेनच्या फर्नांडो व्हर्डास्कोचे आव्हान येऊ शकतं.
माजी विजेत्या फेडररसमोर उपांत्यपूर्व फेरीत मरे तर उपांत्य फेरीत नदाल उभे ठाकू शकतात.
नदालची पहिली फेरी मिखेल योझुमीशी तर चौथी फेरी लुकास रसोल बरोबर होऊ शकते. फॅब फोरखेरीज वावरिंकाही विजेतेपदाच्या शर्यतीत असेल.

महिला एकेरीत सेरेना विल्यम्सला त्यामानाने कठीण ड्रॉ असून तिच्या मार्गात झ्वोनारेवा, यांकोविच येऊ शकतात. सेरेनाखेरीज शारापोव्हा, क्विटोव्हा आणि बुचर्ड विजेतेपदाच्या शर्यतीत असतील.

ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी हा धागा.

स्पर्धेच्या वेबसाईटची लिंक : http://www.ausopen.com/index.html
अमेरिकेतील टिव्ही शेड्युल : http://www.tennistours.com/australian-open/tv-schedule/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

He didn't like the talk about his engagement etc. Even during play his body language is of a depressed person, even if he is playing well..

सशल ने पहिले दोन सेट बघितले .. मग झोप लागली ते एकदम सेरेमॉनी ला जाग आली ..

काल ज्योको पाया च्या दुखापतीचं नाटक करून "गेम्स्मनशिप" करत होता म्हणे .. मग कोणीतरी सिक्युरिटी वाल्यांचं नाटक करून माझ्या लाडक्याची लय बिघडवली .. पुढ ची नाटकं काय काय झाली ते बघावं लागेल ..

दोन वर्ष झाली इथे कोणीच काहीच लिहिले नाहीये...
यंदा राफा किंवा फेडेक्सला जिंकायची संधी निर्माण झालेली आहे..
पुनरागमनानंतर जोको आणि स्टॅन दोघेही चवथ्या फेरीत बाहेर गेलेले आहेत.. डेल पोर्टो पण बाहेर.. नदालची पुढची मॅच चिलीच बरोबर तर फेडररची पुढची मॅच बर्डीच बरोबर आहे.. पुर्वेतिहास बघता, दोघेही सेमीला जाण्याची शक्यता फारच जास्त आहे. तसं झालंच तर सेमी चे प्रतिस्पर्धी एकाला तरी सोपा असेल..

फेडररला draw एकदम सोपा मिळाला आणि सगळ्या वेळी रात्री खेळायला मिळालं म्हणून ओरडा सुरु आहे. इतर लोकांची दिवसा एक तरी match आहे. नोव्हाक आज बाहेर फेकला गेला. त्यामुळे फेडररचा मार्ग अजूनच सुकर झाला आहे. तो नक्कीच फायनलला पोचेल.

नदालला थोडं अवघड आहे. चिलीच चांगला खेळतो आहे. आणि त्याच्यावर मात करून नदाल सेमिला पोचला तर बहुतेक त्याची गाठ डिमिबरोबर पडेल. डिमीही एकदम चांगला खेळतो आहे. त्यामुळे थोडं मुश्कील आहे.

तरीही नदाल दोन्ही जिंकावा आणि नदाल फेडरर फायनल व्हावी अशी इच्छा आहे Happy

फेडररची कालची मॅच दुपारी होती. डिमी बहुतेक गेला. जोको जाणारच होता. Happy
पुण्यात पहिल्या राउंडला हरलेली व्यक्ति आठात गेली आहे. Happy

पराग भाउ रीटायर झालेत. Happy

नदाल दुखापतीमुळे बाहेर Sad

फेडरर त्या कोरियनशी हरावा आणि मारिन चिलिच किंवा त्या कोरियनने फायनल जिंकावी अशी सुप्त इच्छा आहे Happy

२०२२ ऑस्ट्रेलियन ओपन. थोड्यासाठी दुसरा धागा कशाला म्हणून इथेच.

जोकोने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. फेडररची वाटचल थांबलीय की काय अशी परिस्थिती आहे
जुनी राज्य पुसट होत चालली आहेत. त्यातला एकच खंदा वीर नदाल अजून शिल्लक आहे. काय मॅच झाली त्याची क्वर्टर फायनल. केवळ नदाल होता म्हणूनच जिंकला.
पण या ऑस्ट्रेलियन ओपनला नविन स्टार टेनिसच्या क्षितिजावर दिसत आहेत. मदवादेव, झेरेव, शापोलाव तर आहेतच. पण अजून दोन खेळाडूंच्या खेळाचा मला विषेश उल्लेख करावासा वाटतो. एक म्हणजे अमेरिकन फ्रिट्झ.
दुसरा कॅनेडियन ऑजिरालिसम (याचा उच्चार काय आहे कुणास ठऊक). हा कालच्या क्वर्टर मधे मदवादेव बरोबर हरला. यावेळेस तीन क्वार्टर फायनल मॅचेस मधे पहिले दोन सेट जिंकूनही पुढचे तीन सेट हरले खेळाडू.
पण २१ वर्षाचा ऑजिर खरोखरच ऑसम आहे. अचूक व खोलवर दोन्ही बाजूला फटके, खोलवर सर्वीस आणि नेट व्हॉली, जबरदस्त ताकदवान फोरहँड आणि या बरोबरीस बेडरपणा. खूप कमी चुका. पण ब्रेक पॉइंट कन्व्हर्ट करण्यात कमी पडला. त्याला मदवादेवच्या सर्वीस वर मॅच पॉइंट मिळालाही होता. पण ती सर्वीस मॅदवादेवनी मॅचची सर्वात वेगवान एस टाकली. एकदम चॅम्पीयन स्टफ. खूप दिवसानी एक उत्कृष्ट टेनिसचा सामना पहायला मिळाला. डोक्यात हवा गेली नाही तर ऑजिर हा खेळाडू नक्कीच पुढे ग्रँड स्लॅम जिंकू शकतो. विशेषतः विंबल्डन.

विक्रमसिंह , पूर्ण सहमत , मस्त झाला सामना !!! तीन सेट मध्ये मेदवेदेव हरतो की काय अशी परिस्थिती होती . पण अनुभव matters !!! पण मला फेलिक्स चे ही वाईट वाटले. त्याच्यासाठी हा चांगला धडा असेल

आजच्या खेळात सिसिपासच्या बाबांनी चिटिंग केली, मग मेदवेदेवने रेफरीशी बा-चा-बा-ची केली. मग मेदवेदेव आणि सिसिपासचे बाबा, दोघांना ओरडा बसला. प्रेक्षक खेळाच्या शेवटपर्यंत बूबूत्कार करत होते.

मस्त!
जोकोवर या वर्षीच्या सगळ्या स्पर्धांमध्ये बंदी घालायला हवी.
करोनाच्या पहिल्या लाटेतही त्याने सर्बियामध्ये टूर्नामेंट आयोजित केली होती.

काय जिद्द दाखवली नदालने! ०-२ सेट्स असे डाउन असुनही ! मजा आली बघताना.

या त्याच्या विश्वविक्रमी २१ वे ग्रँड स्लॅमला जिंकताना त्याने जी जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली, नेव्हर से डाय अ‍ॅटिटट्युड दाखवले तसा तो त्याच्या पुर्ण कारकिर्दीभर खेळला आहे. हा आपल्याला असा माहीत असलेला राफा जोपर्यंत खेळत आहे तोपर्यंत त्याचे असे प्रत्येक ग्रँड स्लॅम आपण टेनीसप्रेमींनी अ‍ॅप्रिशिएट केले पाहीजे. कारण इतका दिर्घकाळ सातत्याने राफासारखा खेळणारा व २१ ग्रँड स्लॅम जिंकणारा टेनीस प्लेयर आपल्या हयातीत परत आपल्याला बघायला मिळेल असे मला तरी वाटत नाही.

अभिनंदन राफा ! विश्वविक्रमी २१ वे ग्रँड स्लॅम जिंकल्याबद्दल!

खूपच मजा आली आज फायनल बघताना. अगदी शेवटच्या दोन गेम्स पर्यंत कोण जिंकेल याची उत्सुकता तापून होती . पण हॅटस ऑफ नादाळ या वयात या स्तरावर पाच तास इतका अप्रतीम खेळ . वाह वाह

या त्याच्या विश्वविक्रमी २१ वे ग्रँड स्लॅमला जिंकताना त्याने जी जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली, नेव्हर से डाय अ‍ॅटिटट्युड दाखवले तसा तो त्याच्या पुर्ण कारकिर्दीभर खेळला आहे >>>> +१११
जिद्दी आहे खरा नदाल, कौतुक करावं तेवढं कमीच आहे, २१ वे ग्रँड स्लॅम, अभिनंदन !!

Pages