ऑस्ट्रेलियन ओपन - २०१५

Submitted by Adm on 16 January, 2015 - 14:35

नवीन वर्षाच्या टेनीस सिझनची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन सोमवार १९ जानेवारी पासून सुरू होते आहे.

पुरूष एकेरीत अग्रमानांकन ज्योकोला तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्सला मिळाले आहे.
ज्योकोला त्यामानाने सोपा ड्रॉ असून उपांत्य फेरीआधी स्पेनच्या फर्नांडो व्हर्डास्कोचे आव्हान येऊ शकतं.
माजी विजेत्या फेडररसमोर उपांत्यपूर्व फेरीत मरे तर उपांत्य फेरीत नदाल उभे ठाकू शकतात.
नदालची पहिली फेरी मिखेल योझुमीशी तर चौथी फेरी लुकास रसोल बरोबर होऊ शकते. फॅब फोरखेरीज वावरिंकाही विजेतेपदाच्या शर्यतीत असेल.

महिला एकेरीत सेरेना विल्यम्सला त्यामानाने कठीण ड्रॉ असून तिच्या मार्गात झ्वोनारेवा, यांकोविच येऊ शकतात. सेरेनाखेरीज शारापोव्हा, क्विटोव्हा आणि बुचर्ड विजेतेपदाच्या शर्यतीत असतील.

ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी हा धागा.

स्पर्धेच्या वेबसाईटची लिंक : http://www.ausopen.com/index.html
अमेरिकेतील टिव्ही शेड्युल : http://www.tennistours.com/australian-open/tv-schedule/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचा घोडा स्टॅन अजून आहे. Happy
गेल्या वर्षीचा रिपीट पर्फॉर्मन्स करणार.
त्याची मॅच जोकोने आवर्जून पाहिली.
जोको विरूद्धच्या मॅच मधे त्याने कुठल्याही विदुषकी चाळ्यांकडे लक्ष न देता मॅच मधे कॉनसनट्रेट करावया हवे. Happy
(काही वर्षांपूर्वी असाच फेडरर फसला होता, अमेरिकन ओपन ला)

बर्डीक ने पहीला सेट घेतला पण :).

बर्डीक सद्ध्या तरी जोरात आहे, नदाल बरोबरच्या मॅचमधे तीसर्या सेट मधे ज्या पद्दतीने मेन्ट्ल प्रेशर साम्भळले, ते पाहुन फायनल मधे तो असायला हवाच.

स्टॅन ह्यावर्षी पण जोकोला भारी पडणार का ते उद्याच कळणार. ३-४ तास तरी लागणार निकाल लागायला ( दोघेही नीट खेळले तर.)

>>जोको विरूद्धच्या मॅच मधे त्याने कुठल्याही विदुषकी चाळ्यांकडे लक्ष न देता मॅच मधे कॉनसनट्रेट करावया हवे. स्मित
(काही वर्षांपूर्वी असाच फेडरर फसला होता, अमेरिकन ओपन ला)

मागच्या वर्षां (नदाल विरुद्ध) फसता फसता वाचला Wink

>> भावना आणि क्षमा यांना नका बोलवू इथे. मजेतच चाललंय सगळं.

दुष्मन ना करे दोस्त ने वो काम किया है .. Wink

सेलिना जिंकलीच शेवटी .. ती मॅडिसन छान खेळत होती .. Just not good enough Happy

मरे वि. बर्डिक मॅच अपेक्षेप्रमाणे एकतर्फी झाली. पहिला सेट वगळता.

सेलिना जिंकलीच >>>>> खलच की शशल.. Proud

मॅडीसन पहिला सेट चांगला खेळली.. नंतरचा मी पाहिला नाही..
पोव्हा ने आतातरी जिंकावं सेरेनाच्या विरुद्धा.. माझ्यामते २००४ च्या विंबल्डन फायनल नंतर तिने सेरेनाला हरवलेलं नाही.. तपासायला हवं.. कालच्या मॅचमध्ये पोव्हा सर्व्हिस जोरदार करत होती चक्क.. !

(काही वर्षांपूर्वी असाच फेडरर फसला होता, अमेरिकन ओपन ला) >>>> हे कळलं नाही.

बर्डीच हरलाच :|
मरे एक बाजू लावून धरत शांतपणे फायनलला पोहोचला तर..

अमेरिकन ओपन मधे फ़ेडरर लगोपाठ दोन वर्ष जोको विरुद्ध सेमिफ़ायनल मधे हरला होता. एकदा तो सेट मधे ५-२ लीड करत होता आणि स्कोर ४०-१५ असा दोन मॅच पॉइंट फ़ेडरर च्या फ़ेवर मधे होता. तिथुन तो सलग ५ गेम हरला आणि पुढे ती सेमि फ़ायनल पण हरला.

पुढल्याच वर्षी जोको सर्व करत होता आणि २ मॅच पॉइट डाउन होता. तिथुन त्याने मॅच काढली.

कदाचित या दोनीही गोष्टींचा संदर्भ वर असावा.

या दोन घटनांमधे पहिल्यावेळी जोको ने प्रत्येक ब्रेक पॉइ.ट वाचवल्यावर बरेच हाव भाव केले होते त्याने कदाचित फ़ेड चे कोंसंट्रेशन गेले असावे असे म्हणणे असेल.

दुसर्‍यावेळी जोकोची गल फ़्रेड़ आणि फ़ेडरर ची काही तरी वाद वादी झाली होती पॉइंट च्य मधे ओरडण्या वरुन.(या वर्षी बार्र्कलेज वर्ल्ड टुवर सेमी मधे फ़ेडच्या बायकोच्या दोन पॉईन्ट्च्या मधे ओरडण्यावरुन वदा वादी झाली होती. वावरिंका सेमी हरला होता )

असाच वाद फ़ेडरर देल्पोट्रो विरुद्ध हरला तेव्हा झाल होत. फ़ेडरर ५-.२ पुढे असताना आणि सर्विग फ़ॉर द मॅच असताना एक लाइन कॉल देल्पोट्रोने बर्‍याच उशिरा चॅलेंज केला होता आणि तो फ़ेडरर विरुद्ध गेला होता. यात फ़ेडरर आणि चेयर अंपायर मधे वाद झाला होता. तिथुन फ़ेडरर तो सेट आनि पुढे मॅच (चॅपियन्शीप) हरला.

कदाचित या दोनीही गोष्टींचा संदर्भ वर असावा. >> करेक्ट. जोकोने तेंव्हा हातवारे केले होतेच पण वेळ्काढू पणा करून फेडररची लयही बिघडवली होती. आणि हा अखिलाडूपणा जोकोने मुद्दाम केला होता.

स्टॅन द मॅन ची स्टेनगन शेवटच्या सेट मधे अगदीच ढेपाळली..

पेस हिंगीस फायनल मधे.. सानिया नेहमी प्रमाणे सेमी मध्ये हारली..

जोको-वावरिंका सामन्याचा नेमका पाचवा सेट रेकॉर्ड झाला नाही. एक्स्टेण्डेड टाइम स्लॉट रेकॉर्ड करत नाही हा धडा मिळाला.

जोकोचं कॉन्संट्रेशन कमी पडलं. तिसरा सेट आपण जिंकल्याचं त्याच्या लक्षातच आलं नव्हतं.

आधी राफा, मग जोको आणि आता तर डेल पेट्रो सुद्धा ? कोणताही खेळ हा शारीरिक क्षमता , कौशल्य यांबरोबरच भावनिक व मानसिक ताकदीवरही खेळला जातो.

काही जोरदार झाली नाही. दोघं पण वाईट खेळले. जोको त्याचा नेहमीचा गेम खेळत नव्हता त्यामुळे आज वावरिंकाला चांगला चान्स होता जिंकायचा तर तो स्वतःच आणखी ढिसाळ खेळला. तिसरा सेट तर त्यानं फुकट घालवला. कमीत कमी टाय ब्रेकरमध्ये जाइल असं वाटलं होतं.

मयेकर

कोणता खेळाडु महान किंवा लहान या पेक्षा कोणता खेळाडु काय सिच्युएशन , कोणता अपोनंट आणि काय गेम प्लान,काय स्ट्रॅट्जी वापरात आणतो एवढच बघा. नैतिक / अनैतिक , चांगले /वाईट हा पश्न इथे नाहीच.

प्रत्येक सामन्याला सगळ्या रॅकेट्स चे गटींग सगळेच खेळाडु बदलतात. अपोनंट बघुन स्ट्रींग्च टेंशन बदलणारे खेळाडु सुद्धा आहेत.

आपल्याविरुद्ध वापरल्या जाऊ शकणार्‍या (सो कॉल्ड) स्ट्रॅटेजीवर उपाय योजणे (= स्वतःचा बालेकिल्ला बळकट करणे) शक्य नसेल हे पटत नाही.

धन्य झालो मयेकर! टाय ब्रेक मधे एक पॉइंट ला मिनी ब्रेक का म्हणतात किंवा डबल फ़ॉल्ट माईन्ड सेट म्हन्जे काय ? हे तुम्ही कघी ऐकल आहे का?

काही वेळ मॅच मधे अपोनंट पेक्षा जास्त पॉंइट जिंकुन सुद्धा एखादा खेळाडु हरतो हे तुम्ही बघीतल असेल. कारण लुजिंग इंपॉर्टंट पोइंट्स मॅटर्स.

असो; मयेकर तुम्हाला जो खेळाडु आवडतो तो लय भारी. टेनिस अजुन माणसच खेळतात मशिन्स नाही आणि म्हणुनच मॅच बघण्यात मजा आहे.

वावरिंका वि जोको हायलाइट बघायला मिळाले. ज्योको वॉज टेस्टेड फ़ॉर फ़र्स्ट ४ सेट्स. ज्योक्या बेसलाईन्च्या मागेच उभा होता. ज्योक्या ने वावरिंका च्या बॅहॅडवर हल्ला ठेवला होता पण वावरिंकाने दर वेळी क्रॉस कोर्ट मारण्या ऐवजी खतरनाक बॅहॅन्ड डाउन द लाईन विनर मारले.

४थ्या सेट मधे वावरिंका जास्त डॉनिनेटींग होता. स्वत:ची सर्विस ब्रेक झाल्या नंतर २ सर्विस ब्रेक करुन सेट जिंकला.

वावरिंका ने ऑन द रन मारलेला फ़ोरहॅड डाउन द लाइन पासिंग शॉट मात्र जबरद्स्त होता.

५ व्या सेट मधे काही कळायच्या आघिच ज्योक्याने २ सर्विस ब्रेक मिळवुन मॅच वर वर्चस्व मिळवले. ६-० स्कोर लाइन असली तरी पहीले ४ सेट मॅच एक्दम क्लोज होती.

फ़ायनल अशिच जबर्दस्त व्हवी ही अपेक्षा.

आपल्याविरुद्ध वापरल्या जाऊ शकणार्‍या (सो कॉल्ड) स्ट्रॅटेजीवर उपाय योजणे (= स्वतःचा बालेकिल्ला बळकट करणे) शक्य नसेल हे पटत नाही. >>>>> हेच मी वर लिहिलं होतं.. की स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी म्हणून सगळे फॅन ओरडत आहेत, तर हे त्या खुद्द खेळाडूंना समजतच असेल ना ? आणि मग काऊंटर स्ट्रॅटेजी का नाही काढत काही ?

सेरेना वि. शारापोव्हा फायनल पाहिली.. शारापोव्हाने पुन्हा ढिसाळपणा केलाच.. पहिल्या सेटच्या सुरुवातीला दोघी ठिक ठिक खेळत होत्या... मग सेरेनाने पाऊस पाडला (!) आणि कोर्ट बंद करण्यासाठी आणि पुसण्यासाठी ब्रेक घ्यावा लागला.. (!!) त्या ब्रेक दरम्यान शारापोव्हाची लय बिघडली आणि सेरेनाने चांगला खेळ करून पहिला सेट जिंकला..
दुसरा सेट त्यामानाने चांगला झाला. टायब्रेकरही नेक टू नेक झाला.. पण सेरेना जरा जास्त चांगली खेळली..
२००४ नंतरची पराभवाची मालिका शारापोव्हाला ह्या मॅचमध्येही खंडीत करता आली नाही.. अर्थात २००७ पेक्षा ह्या फायनलमध्ये शारापोव्हाने बरीच फाईट दिली..

सेरेनाचे १९ व्या ग्रँडस्लॅमसाठी अभिनंदन ! आता फक्त स्टेफीग्राफ तिच्या पुढे आहे.

मग सेरेनाने पाऊस पाडला (!) आणि कोर्ट बंद करण्यासाठी आणि पुसण्यासाठी ब्रेक घ्यावा लागला.. (!!) >> हे आवडले पग्या Lol

विजिगीषु,

मला वाटतं की वॉरिन्का दमला असावा. ज्योकोव्हिचकडे दम (स्टॅमिना) भरपूर आहे. मी सामना बघितला नाही.

आ.न.,
-गा.पै.

पग्या , Lol

ती सरीना स्टेफी चा रेकॉर्ड मागे टाकून मगच शांत होणार बहुतेक ..

वावरींका ला व्हिगन डायट फॉलो करायला सांगायला हवं ..

जबरदस्त सामना चाललाय. सव्वातीन तासांत फक्त तीन सेट. बहुधा ज्योको दमाच्या (स्टॅमिना) जोरावर जिंकेलसं दिसतंय.
-गा.पै.

चांगली झाली मॅच.. पहिले दोन सेट तब्बल ७२ आणि ८० मिनीटे सुरू होते.. खूप लांब लांब रॅलीज झाल्या पण अगदी उत्कंठावर्धक वगैरे नव्हत्या.. दोघेही जण फक्त इकडून तिकडे मारत बसत होते.. पहिल्या सेटमध्ये मरेला चान्स होता खरतर.. पण ज्योकोने मोक्याच्या वेळी चुका टाळून सेट जिंकला..
खरतर आज मरे जिंकला असता तरी चाललं असतं.. तो ज्योकोइतकाच चांगला खेळत होता... फक्त मोक्याच्या वेळी पॉईंट मिळवणे (किंवा न गमावणे) आणि स्टॅमिना ह्यांमुळे ज्योको जिंकला..

ज्योकोचे पाचव्या ऑओ बद्दल अभिनंदन !

सशलने पाहिली की नाही मॅच ? (संपलेलं करियर सुरू आहे अजून.. Wink )

लिएंडर पेसने दुसर्‍या मार्टीना बरोबर मिश्र दुहेरीचं विजेतेपद मिळवलं. त्याबद्दल त्याचेही अभिनंदन. आता हे पूर्ण वर्षभर एकत्र खेळणार आहेत म्हणे !

गापै, त्या मरेला जरा स्माईल द्यायला शिकवा हो.. किती मख्ख तोंड करून वावरत होता प्रेसेंटेशन सेरेमनीमध्ये.. !

Pages