मला व्हेजिटेबल आणि फ्रूट कार्विंग आणि सॅलड डोकोरेशन मध्ये खूप रस आहे. नेट वरच्या कलाकृती पाहून मी भारावून जाते. ह्या कलेचा उगम थायलंड मध्ये झाला. फार पूर्वीपासून शाही मेजवानीत तिथे अशी फळ आणि भाज्यांची सजावट शेफ करत असत. मला फार काही येत नाही पण प्रयत्न चालू असतो. हे मी केलेले काही आयटेम. ( ह्यांना कला़कृती म्हणायचं माझं धाडस होत नाहीये.)
१) गाजराची फुलं
From mayboli
२) गाजर आणि मुळ्याची फुलं तयार करुन ती टुथ पिक च्या सहायाने मोसंब्यावर लावून फ्लॉवर पॉट तयार केला आहे.
From mayboli
३) ही काकडी आणि टोमॅटोची कमळं तयार केली आहेत.
From mayboli
४) टोमॅटोच्या कमळांनी सजलेले हे औक्षणाचे तबक
From mayboli
५) ही आहेत कांद्यापासून तयार केलेली फुल
From mayboli
हे मी केलेले सॅलड डोकोरेशन
१)
From mayboli
२)
From mayboli
ही ती सुरी. ही सुरी छोटीच आहे. साधारण पाच इंच लांब असेल. हीच हँडल लांब आहे आणि प्रत्य़क्ष सुरीचा भाग त्यापे़क्षा लहान आहे. धार नॉर्मल आहे आणि पुढे हीला पॉईंट आहे. खूप धारेची सुरी लागत नाही कार्विंग साठी तर लागतो हातावर कंट्रोल. कार्वींग करताना आपण भाजी कापताना सुरी धरतो तशी नसते धरायची तर लिहीण्यासाठी आपण पेन जसं धरतो तशी धरायची सुरी. अनामिकेने ( मधल्या बोटाच्या जवळचे बोट ) ज्यावर कार्व करणार आहोत त्यावर हलकेच दाब द्यायचा आणि कट करायच फर्मली असं टेकन्किक आहे त्याचं. प्रॅकटीस नी जमतं. मला ही खूप छान जमतयं असं नाही अजून खूप सुधारणा हवी आहे याची जाणीव आहे. कार्विंगचे व्हिडीओ बघताना मी मंत्रमुग्ध होऊन जाते त्यांचं स्कील बघुन.
हं चला तर तयार व्हा टोमॅटो काकडीवर वार करायला (स्मित) इथे फोटो टाका मात्र आपल्या कलाकुसरीचे.
धन्यवाद परत एकदा सगळ्यांना.
धन्यवाद परत एकदा सगळ्यांना.
जागू, नक्की. माझी ही प्रॅक्टीस होईल आणि तु भेटशील ही त्या निमिताने.
आहा, मस्तच. आणि ते खालचे
आहा, मस्तच. आणि ते खालचे क्रोशाचे रुमाल तर फारच सुरेख
दोन्ही कार्विंग व रुमाल
दोन्ही कार्विंग व रुमाल आवडले. मी तरी दोन्हींना कलाकृतीच म्हणीन
सगळंच खूप छान झालंय पण ते
सगळंच खूप छान झालंय
पण ते फ्लॉवर पॉट वगैरे केलेलं तसंच ठेवता की खाता?
उत्कृष्ट सुरीवर विलक्षण
उत्कृष्ट सुरीवर विलक्षण ताबा हवा नाही का अन धारदार सुरीही. काही टमाटर शहीद होतात का करताना? किती वेळ लागत असेल एका फुलाला? कळीला?
दक्षिणा, आपण ते खाऊ शकतो पण
दक्षिणा, आपण ते खाऊ शकतो पण ते इतक सुंदर दिसत की कोमेजे पर्यंत त्याच काही ही करावस वाटत नाही.
अनघा, हो खूप काही शहीद होत हे करताना माझं. आमच्याकडे गमतीत म्हणतात ही की भाज्या महाग झाल्या आहेत त्या माझ्या कर्विंग मुळेच !!!
सुरीवर आणि हातावर खूप ताबा लागतो. आणि दुरुस्ती नाही ह्यात. कट बसला की बसला !! तरी ही मला इंटरेस्ट असल्याने खूप मजा येते हे करताना.
खुपच सुरेख
खुपच सुरेख
वेज कर्विन्ग आणि औक्षणाचे ताट
वेज कर्विन्ग आणि औक्षणाचे ताट आणि त्या खालचे क्रोशाचे रुमाल सगळेच खुप छान
वेज कार्विन्ग आणि औक्षणाचे
वेज कार्विन्ग आणि औक्षणाचे ताट आणि त्या खालचे क्रोशाचे रुमाल सगळेच खुप छान
अ प्र ति म!
अ प्र ति म!
सुंदर आहे कार्विंग.औक्षणाचे
सुंदर आहे कार्विंग.औक्षणाचे ताट आणि रुमाल खुप छान . कमळाच्या फुलामधले दिवे सॅलड्चे आहेत का ? की कश्याचे आहेत.
कोरीव काम खूप सुंदर केलं आहे.
कोरीव काम खूप सुंदर केलं आहे. औक्षणाचं तबकतर फार आवडलं.
इतक्या सुंदर कलाकृतींखाली तितक्याच सुरेख असल्या तरी क्रोशाच्या मॅट्स नकोत असं वाटलं. त्या डिस्ट्रॅक्टिंग वाटतात. त्यामुळे कलाकुसर केलेल्या भाज्या मुख्य आकर्षण उरत नाहीत.
सर्वांना परत एकदा
सर्वांना परत एकदा धन्यवाद.
सिनि , ते दिवे सॅलडचे नाहीयेत , कणकेचे आहेत.
भोपळी मिरचीची पान करणार होते पण वेळ कमी पडला . त्यामुळे नाही जमलं.
मृण्मयी , सुचने बद्दल आभार. पुढच्या वेळेस लक्षात ठेवीन.
कार्विंग आणि क्रोशाचे रूमाल
कार्विंग आणि क्रोशाचे रूमाल दोन्ही आवडले
मस्त !
मस्त !
वॉव, सुरेख, सुबक आणि कलरफुल.
वॉव, सुरेख, सुबक आणि कलरफुल.
ओहो... मनीमोहोर... किती सुरेख
ओहो... मनीमोहोर... किती सुरेख केलय हे. कलाकृतीच म्हणायला हव्यात ह्या.
मस्तच सुंदर झाल्यात सर्व
मस्तच सुंदर झाल्यात सर्व कलाकृती, दुधी , कलिंगड आणि भोपळयावरची कलाकृती सुद्धा येऊदे.
खूप कल्पक..आणि छान!
खूप कल्पक..आणि छान!
धन्यवाद सर्वांना परत
धन्यवाद सर्वांना परत एकदा.
अ. आ, तुमच्या फुलांच्या रांगोळ्यांची मी फॅन आहे. तुम्हाला आवडलं खूप छान वाटलं
@अ. आ, तुमच्या फुलांच्या
@अ. आ, तुमच्या फुलांच्या रांगोळ्यांची मी फॅन आहे. >> धन्यवाद हो. __/\__
@तुम्हाला आवडलं खूप छान वाटलं>> हम्मम्म.. त्याला कारण आहे तसचं. मी या प्रांतातला सराइत खेळाडू नाही. पण कधि कधि कुठे चान्स मिळाला,तर गंमत म्हणून मी ही हे करुन पाहातो.
khup suMdar aahet he
khup suMdar aahet he "prayatna" malaa sagaLE aavadale.
khup suMdar aahet he
khup suMdar aahet he "prayatna" malaa sagaLE aavadale.
खुपच जास्त आvडलेत...
खुपच जास्त आvडलेत...
मस्त. औक्षणाच्या ताटाचा फोटो
मस्त.
औक्षणाच्या ताटाचा फोटो फारच सुंदर!>>>+१
सर्वांना खूप खूप धन्यवाद.
सर्वांना खूप खूप धन्यवाद.
खुप सुंदर आहेत. नेटवर याचे
खुप सुंदर आहेत.
नेटवर याचे अनेक व्हीडीओज आहेत, तसेच थायलंड मधे प्रत्यक्ष बघताही येईल. याच्या खास सुर्या वापरल्या तर लवकर होते हे काम.
होय दिनेश. मी नेट वरील विडिओ
होय दिनेश. मी नेट वरील विडिओ पाहुनच शिकतेय. अजुन अगदीच प्राथमिक स्वरुपात आहे.
माझ्याकडे अजुन कोणतही कार्विंग टुल नाहीये , एक फक्त १५ रुपये वाली पुढे टोक असलेली सुरी आहे.
भारी कौशल्याचं काम आहे हे! पण
भारी कौशल्याचं काम आहे हे!
पण मला एक नेहमी पडणारा प्रश्न आहे - सॅलड डेकोरेशन एकवेळ ठीक आहे, ते फायनली पोटातच जातं. (ना?)
पण व्हेज कार्विंगचं पुढे काय होतं?
खोचकपणे नाही, खरंच मनापासून विचारते आहे.
मागे एकदा या गोष्टींचं एक प्रदर्शन पहायला गेले होते. खूप कल्पकतेनं काय-काय केलेलं होतं. अवाक झाले ते पाहून. पण मी गेले तोवर त्यात वापरलेली फळं, भाज्या सगळं कोमेजून गेलेलं होतं. म्हणजे प्रदर्शनाअखेरीस ते सगळं फेकून द्यावं लागतं का?
ललिता , ह्याच पुढे काही ही
ललिता , ह्याच पुढे काही ही होत नाही. ते कोमेजण्या आधी डिसमेंटल करुन आपण उपयोगात आणु शकतो पण नाही मोडवत ते.
तसं बघायला तर फुलांच्या बुकेच , फुलांनी अगर रांगोळी / रंगानी काढलेल्या रांगोळ्यांच पुढे काय होणार हे माहित असुन ही आपण जीव तोडुन काढतोच ना? तसच आहे हे पण.
हे एक प्रकारचे स्कील / कलाच आहे आणि त्याला मोल नाही त्यात इंटरेस्ट असलेल्यांसाठी.
मध्यंतरी घरी झालेल्या एका छोट्याशा पार्टीत मी टेबल नॅपकीन सुंदर रीतीने फोल्ड करुन ठेवले होते. परंतु एका बाईं नी आपण दररोज कुठे वापरतो ? ही घडी मोडवत नाहीये म्हणून तो शेवटपर्यंत ओपन नव्हता केला. त्यांना ती पण एक कलाच वाटली आणि त्यांनी ती घडी मोडली नाही.
Pages