माझे व्हेज कार्विंग आणि सॅलड डेकोरेशन

Submitted by मनीमोहोर on 11 January, 2015 - 11:21

मला व्हेजिटेबल आणि फ्रूट कार्विंग आणि सॅलड डोकोरेशन मध्ये खूप रस आहे. नेट वरच्या कलाकृती पाहून मी भारावून जाते. ह्या कलेचा उगम थायलंड मध्ये झाला. फार पूर्वीपासून शाही मेजवानीत तिथे अशी फळ आणि भाज्यांची सजावट शेफ करत असत. मला फार काही येत नाही पण प्रयत्न चालू असतो. हे मी केलेले काही आयटेम. ( ह्यांना कला़कृती म्हणायचं माझं धाडस होत नाहीये.)

१) गाजराची फुलं

From mayboli

२) गाजर आणि मुळ्याची फुलं तयार करुन ती टुथ पिक च्या सहायाने मोसंब्यावर लावून फ्लॉवर पॉट तयार केला आहे.

From mayboli

३) ही काकडी आणि टोमॅटोची कमळं तयार केली आहेत.

From mayboli

४) टोमॅटोच्या कमळांनी सजलेले हे औक्षणाचे तबक

From mayboli

५) ही आहेत कांद्यापासून तयार केलेली फुल

From mayboli

हे मी केलेले सॅलड डोकोरेशन

१)
From mayboli

२)
From mayboli

ही ती सुरी. ही सुरी छोटीच आहे. साधारण पाच इंच लांब असेल. हीच हँडल लांब आहे आणि प्रत्य़क्ष सुरीचा भाग त्यापे़क्षा लहान आहे. धार नॉर्मल आहे आणि पुढे हीला पॉईंट आहे. खूप धारेची सुरी लागत नाही कार्विंग साठी तर लागतो हातावर कंट्रोल. कार्वींग करताना आपण भाजी कापताना सुरी धरतो तशी नसते धरायची तर लिहीण्यासाठी आपण पेन जसं धरतो तशी धरायची सुरी. अनामिकेने ( मधल्या बोटाच्या जवळचे बोट ) ज्यावर कार्व करणार आहोत त्यावर हलकेच दाब द्यायचा आणि कट करायच फर्मली असं टेकन्किक आहे त्याचं. प्रॅकटीस नी जमतं. मला ही खूप छान जमतयं असं नाही अजून खूप सुधारणा हवी आहे याची जाणीव आहे. कार्विंगचे व्हिडीओ बघताना मी मंत्रमुग्ध होऊन जाते त्यांचं स्कील बघुन.

हं चला तर तयार व्हा टोमॅटो काकडीवर वार करायला (स्मित) इथे फोटो टाका मात्र आपल्या कलाकुसरीचे.

1-knife.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्कृष्ट Happy सुरीवर विलक्षण ताबा हवा नाही का अन धारदार सुरीही. काही टमाटर शहीद होतात का करताना? किती वेळ लागत असेल एका फुलाला? कळीला?

दक्षिणा, आपण ते खाऊ शकतो पण ते इतक सुंदर दिसत की कोमेजे पर्यंत त्याच काही ही करावस वाटत नाही.

अनघा, हो खूप काही शहीद होत हे करताना माझं. आमच्याकडे गमतीत म्हणतात ही की भाज्या महाग झाल्या आहेत त्या माझ्या कर्विंग मुळेच !!!

सुरीवर आणि हातावर खूप ताबा लागतो. आणि दुरुस्ती नाही ह्यात. कट बसला की बसला !! तरी ही मला इंटरेस्ट असल्याने खूप मजा येते हे करताना.

सुंदर आहे कार्विंग.औक्षणाचे ताट आणि रुमाल खुप छान . कमळाच्या फुलामधले दिवे सॅलड्चे आहेत का ? की कश्याचे आहेत.

कोरीव काम खूप सुंदर केलं आहे. औक्षणाचं तबकतर फार आवडलं.

इतक्या सुंदर कलाकृतींखाली तितक्याच सुरेख असल्या तरी क्रोशाच्या मॅट्स नकोत असं वाटलं. त्या डिस्ट्रॅक्टिंग वाटतात. त्यामुळे कलाकुसर केलेल्या भाज्या मुख्य आकर्षण उरत नाहीत.

सर्वांना परत एकदा धन्यवाद.

सिनि , ते दिवे सॅलडचे नाहीयेत , कणकेचे आहेत.

भोपळी मिरचीची पान करणार होते पण वेळ कमी पडला . त्यामुळे नाही जमलं.

मृण्मयी , सुचने बद्दल आभार. पुढच्या वेळेस लक्षात ठेवीन.

धन्यवाद सर्वांना परत एकदा.

अ. आ, तुमच्या फुलांच्या रांगोळ्यांची मी फॅन आहे. तुम्हाला आवडलं खूप छान वाटलं

@अ. आ, तुमच्या फुलांच्या रांगोळ्यांची मी फॅन आहे. >> धन्यवाद हो. __/\__
@तुम्हाला आवडलं खूप छान वाटलं>> हम्मम्म.. त्याला कारण आहे तसचं. मी या प्रांतातला सराइत खेळाडू नाही. पण कधि कधि कुठे चान्स मिळाला,तर गंमत म्हणून मी ही हे करुन पाहातो.
https://fbcdn-sphotos-d-a.akamaihd.net/hphotos-ak-xap1/v/t1.0-9/s720x720/10615977_703589363060686_6512412855089105338_n.jpg?oh=b8260f1f0686485bc50e96849b5ede34&oe=556819F1&__gda__=1429085359_5e164c672cf07160612864e3e79ff7b5

khup suMdar aahet he "prayatna" Happy malaa sagaLE aavadale.

khup suMdar aahet he "prayatna" Happy malaa sagaLE aavadale.

खुप सुंदर आहेत.
नेटवर याचे अनेक व्हीडीओज आहेत, तसेच थायलंड मधे प्रत्यक्ष बघताही येईल. याच्या खास सुर्‍या वापरल्या तर लवकर होते हे काम.

होय दिनेश. मी नेट वरील विडिओ पाहुनच शिकतेय. अजुन अगदीच प्राथमिक स्वरुपात आहे.

माझ्याकडे अजुन कोणतही कार्विंग टुल नाहीये , एक फक्त १५ रुपये वाली पुढे टोक असलेली सुरी आहे.

भारी कौशल्याचं काम आहे हे!

पण मला एक नेहमी पडणारा प्रश्न आहे - सॅलड डेकोरेशन एकवेळ ठीक आहे, ते फायनली पोटातच जातं. (ना?)
पण व्हेज कार्विंगचं पुढे काय होतं?
खोचकपणे नाही, खरंच मनापासून विचारते आहे.

मागे एकदा या गोष्टींचं एक प्रदर्शन पहायला गेले होते. खूप कल्पकतेनं काय-काय केलेलं होतं. अवाक झाले ते पाहून. पण मी गेले तोवर त्यात वापरलेली फळं, भाज्या सगळं कोमेजून गेलेलं होतं. म्हणजे प्रदर्शनाअखेरीस ते सगळं फेकून द्यावं लागतं का?

ललिता , ह्याच पुढे काही ही होत नाही. ते कोमेजण्या आधी डिसमेंटल करुन आपण उपयोगात आणु शकतो पण नाही मोडवत ते.

तसं बघायला तर फुलांच्या बुकेच , फुलांनी अगर रांगोळी / रंगानी काढलेल्या रांगोळ्यांच पुढे काय होणार हे माहित असुन ही आपण जीव तोडुन काढतोच ना? तसच आहे हे पण.

हे एक प्रकारचे स्कील / कलाच आहे आणि त्याला मोल नाही त्यात इंटरेस्ट असलेल्यांसाठी.

मध्यंतरी घरी झालेल्या एका छोट्याशा पार्टीत मी टेबल नॅपकीन सुंदर रीतीने फोल्ड करुन ठेवले होते. परंतु एका बाईं नी आपण दररोज कुठे वापरतो ? ही घडी मोडवत नाहीये म्हणून तो शेवटपर्यंत ओपन नव्हता केला. त्यांना ती पण एक कलाच वाटली आणि त्यांनी ती घडी मोडली नाही.

Pages