माझे व्हेज कार्विंग आणि सॅलड डेकोरेशन

Submitted by मनीमोहोर on 11 January, 2015 - 11:21

मला व्हेजिटेबल आणि फ्रूट कार्विंग आणि सॅलड डोकोरेशन मध्ये खूप रस आहे. नेट वरच्या कलाकृती पाहून मी भारावून जाते. ह्या कलेचा उगम थायलंड मध्ये झाला. फार पूर्वीपासून शाही मेजवानीत तिथे अशी फळ आणि भाज्यांची सजावट शेफ करत असत. मला फार काही येत नाही पण प्रयत्न चालू असतो. हे मी केलेले काही आयटेम. ( ह्यांना कला़कृती म्हणायचं माझं धाडस होत नाहीये.)

१) गाजराची फुलं

From mayboli

२) गाजर आणि मुळ्याची फुलं तयार करुन ती टुथ पिक च्या सहायाने मोसंब्यावर लावून फ्लॉवर पॉट तयार केला आहे.

From mayboli

३) ही काकडी आणि टोमॅटोची कमळं तयार केली आहेत.

From mayboli

४) टोमॅटोच्या कमळांनी सजलेले हे औक्षणाचे तबक

From mayboli

५) ही आहेत कांद्यापासून तयार केलेली फुल

From mayboli

हे मी केलेले सॅलड डोकोरेशन

१)
From mayboli

२)
From mayboli

ही ती सुरी. ही सुरी छोटीच आहे. साधारण पाच इंच लांब असेल. हीच हँडल लांब आहे आणि प्रत्य़क्ष सुरीचा भाग त्यापे़क्षा लहान आहे. धार नॉर्मल आहे आणि पुढे हीला पॉईंट आहे. खूप धारेची सुरी लागत नाही कार्विंग साठी तर लागतो हातावर कंट्रोल. कार्वींग करताना आपण भाजी कापताना सुरी धरतो तशी नसते धरायची तर लिहीण्यासाठी आपण पेन जसं धरतो तशी धरायची सुरी. अनामिकेने ( मधल्या बोटाच्या जवळचे बोट ) ज्यावर कार्व करणार आहोत त्यावर हलकेच दाब द्यायचा आणि कट करायच फर्मली असं टेकन्किक आहे त्याचं. प्रॅकटीस नी जमतं. मला ही खूप छान जमतयं असं नाही अजून खूप सुधारणा हवी आहे याची जाणीव आहे. कार्विंगचे व्हिडीओ बघताना मी मंत्रमुग्ध होऊन जाते त्यांचं स्कील बघुन.

हं चला तर तयार व्हा टोमॅटो काकडीवर वार करायला (स्मित) इथे फोटो टाका मात्र आपल्या कलाकुसरीचे.

1-knife.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव ... खुप सुंदर ..
यातले काही फोटो मी सेव्ह करुन ठेवले तर चालेल का आयडिया साठी ? मी कॉपी करेल तुमची .. if you don't mind

अर्रे मैने कैसे मिस्स किया ये.. सुर्रेख आहे..

ममो तुझ्या कार्विंग नाईव्ज च्या सेट चा फोटो टाक ना इथे.. आणी कोणत्या ब्रँड चे, कुठून घेतलेस ते तेही कळव...

प्लीज

धन्यवाद सर्वांना परत एकदा.

वर्षु, अग माझ्याकडे कार्विंग नाईफ चा सेट वैगेरे काही नाहीये. भांड्यांच्या दुकानात कार्वींग ची म्हणून एक पंधरा रुपयेवाली सुरी मिळते तीच आहे.

हेडर मध्ये एक आणखी फोटो अ‍ॅड करत आहे. ती आहेत आपल्या नॉर्मल कांद्यापासून बनवलेली फुल.

कांद्या ची फुलं.. सुर्रेख!!!

इतर व्याप सांभाळून कधी वेळ मिळतो तुला बाई, हे सर्व करायला __/\__ कौतुक वाटतंय फार!!! Happy

सुंदर!! मस्त! औक्षणाचं तबक सुरेख झालंय Happy
ती पंधरा रुपये वाली सुरी घेऊन येते मी पण Proud आणि हे बघते जमतंय का Proud

हेडर मध्ये सुरीचा फोटो टाकत आहे. कार्विंग वरुन एक किस्सा आठवला तो सांगते.

एकदा बाजारात भाजी फळं वगैरे घ्यायला गेले होते. एक पपई वाला बसला होता. त्याकडे माझी नजर वळली . त्याने ही पाहिलं मी पपईकडे बघतेय ते. त्याला वाटलं की पोटेंशियल कस्ट्मर आली आहे तेव्हा त्याने पपईची भलामण करायला सुरवात केली ... ताई, घ्या ना गोड आहे, बिन बियांची आहे वैगेरे.

त्याला कुठे माहित होत की मला पपईत इंटरेस्ट नाहीये तर मला इंटरेस्ट आहे तो त्यांने पपईच्या केलेल्या कमळात. ( स्मित)

भाजीवाल्या ही कधी कधी मस्त कार्विंग करुन ठेवतात जसे चिकु, लाल पेरुची फुले. पपईचे कमळं . बीट कांद्यापासून फुले ई. वर कांद्याची केलेली फुले मी भाजीवाली कडून प्रेरणा घेऊनच केली आहेत ( स्मित)

ओहो..हि का सुरी ती ! ..
प्रचिबद्दल धन्यवाद ममो..
आणावी लागेल आता विकत Happy

फोटो आणि कार्विंगच्या टिप्ससाठी धन्यवाद मनीमोहोर.. अजून माहिती लिहीता आली तर नक्की लिहा.

Pages