शाळा कशी निवडावी ?

Submitted by नितीनचंद्र on 21 January, 2015 - 00:26

एखादे जोडपे लग्न करुन एका बालकाला जन्म घालते. स्त्रीच्या बाळंतवेदना संपतानाच आणि पुरुषाची संसारात आणखी एक जबाबदारी याची जाणिव होतानाच एक जबाबदारी येऊन पडते ती म्हणजे मुलासाठी शाळेचा शोध. लहान मुलाची वयाची दोन अडिच वर्षे संपतात न संपताच तोच कोणत्या प्ले ग्रुपला मुलाला पाठवावे म्हणजे ज्यु. केजीत सहज दाखला मिळुन किमान दहावी पर्यंतची अ‍ॅडमिशन ही समस्या संपेल अश्या विचारात पालक असतात.

मग कोणते प्ले ग्रुप कोणत्या अभ्यासक्रमाच्या ( राज्य स्तरीय अभ्यासक्रम, सी बी एस सी किंवा इंटरनॅशनल ) शाळेशी सलग्न आहे याची चर्चा होत असावी. आजकाल राज्यस्तरीय अभ्यासक्रम आणि मातृभाषेतले शिक्षण टाकाऊ नसले तरी उद्या आपला पाल्य स्पर्धेत मागे पडेल या भितीने सी बी एस सी किंवा इंटरनॅशनल या शाळांकडे शहरात पालकांचा ओढा आहे असे जाणवते.

यात काही शाळांचा अ‍ॅक्टीव्हीटी बेस जास्त असतो. नाशीकमधे अशाच एका शाळेच्या पालक संघाने आयोजीत केलेल्या सुप्रसिध्द शालेय शिक्षणतज्ञ श्री राजीव तांबे यांच्या व्याख्यानाला हजर रहाण्याचा योग आला. यावेळेस या शाळेच्या प्राचार्या यांनी शाळा सुरु करण्यापासुन पालकांना या शाळेत दाखला देण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या प्रयत्नांचा आढावा घेतला. यावरुन तरी धोपट मार्गा सोडु नको. नविन प्रयोग नको मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे असा विचार करणारे पालक जास्त असावेत असा कल दिसला.

कसा घेतात पालक निर्णय याची माहिती हवी आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी झालीये चर्चा या विषयावर. मुलांचे संगोपन ग्रूपमध्ये असेल तो धागा.
इथे लिंक देते नंतर त्याची हवं तर.

http://www.maayboli.com/node/27143

http://www.maayboli.com/node/50857

फार वर्षांपूर्वीची गोष्ट नाही; पण या शतकाच्या सुरुवातीची आहे खरी. पालक म्हणून माझा जबरदस्त हट्ट हा होता की मी कोणत्याही धोपटमार्गास सोडणार नाही. म्हणजे माझ्या अपत्यास पिढीजातपणे मातृभाषेच्याच माध्यम असलेल्या शाळेत घालेन.
'प्राण जाये पर वचन न जाये' या उक्तीप्रमाणे या वचनाच्या आड येणारे सगळे काटेकुटे मी दूर सारले.
याउप्पर, 'अपत्य सहा वर्षांचे होईपर्यंत कोणत्याही शाळेत घालू नये' अश्या वचनाप्रत मी येणार, इतक्यात माझ्या अपत्याने खो घातला आणि त्या बालहट्टास शरण जात इ.स. २००४ साली मी माझ्या कन्येस जवळच्या बालवाडीत पाठवायला तयार झालो-तिच्या वयाच्या चौथ्या वर्षी.
माझा सल्ला आहे- येत्या काळात पालकांनी शक्यतो अपत्यांना सहा वर्षांचे होईपर्यंत शिक्षणास पाठवणे वर्ज्य करावे. जेणेकरून आई-वडील हेच प्रथम शिक्षक असतात हा समाज तिघांच्याही ठायी रुजू होईल.