स्वेटर घातलेली हिरवी मिरची

Submitted by मया on 17 January, 2015 - 05:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हिरवी मिरची, मीठ, बेसन,लाडू बेसन,मैदा खायचा सोडा, तेल, आणि पाणी (पीठ भिजवण्यासाठी. साधारण १ वाटी.)

क्रमवार पाककृती: 

साधे बेसन, लाडू बेसन आणि मैदा एकत्र करुन घ्यावा.
त्यात मीठ आणि ओवा घालावा. (हळद ऐच्छिक)
चमचाभर तेल तापवून पीठात ओतावे मग १ वाटी पाणी आणि नंतर लागेल तसे हळूहळू पाणी घालून हाताने मिसळत पीठ तयार करावे. गुठळ्या मोडाव्यात.
पीठ जाडसर झाल पाहिजे.

जाडसर भिजवलेल पीठ त्या मिरचीच्या चीरेमध्ये भरावे आणि तिला जाडजूड करावी कारण बिया काढून बारीक केलेलीत ना? अश्याच कृतीने सगळ्या मिरच्या भरून घ्याव्यात. आता राहिलेलं पीठ असेल त्या थोडस पाणी टाकून घ्या जितके तळण्यासाठी योग्य असेल तुम्ही अंदाज बघून घ्या किती पीठ लागेल (मिरची भरण्यासाठी आणि टळण्यासाठी)

शेवटची कृती :कढईत तेल चांगले तापवून घ्यावे.
पिठाचा थेंब टाकून तापल्याची खात्री करुन घ्यावी. पीठ लगेच वर आले पाहिजे.
भरलेल्या मिरच्या पिठात नीट बुडवून (१-१) तेलात सोडाव्यात. टाकण्यापूर्वी पीठ फार निथळून काढू नये. मिरचीला चिकटलेलेच रहावे.
- मिरची पिवळसर/सोनेरी रंगावर तळावी नाहीतर खाण्याची मजा निघून जाते. कढईत जेवढी जागा असेल तेवढ्याच मिरच्या एका वेळी टाळाव्यात.

तुम्हाला यात काही सुचवायचं असेल तर सुचवा ?

वाढणी/प्रमाण: 
जितक्या जो खाऊ शकतो............
अधिक टिपा: 

कामचुकार बायकांना आणि माज्यासारख्या चटपटीत खाणार्यांना हे नक्की जमेल कारण कृती खूपच सोपी होती……….

माहितीचा स्रोत: 
नाक्यावरचा बटाटेवडे वाला
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पाकृ!
एक प्रश्न, आत भरलेलं पीठ कच्चं आहे. ते तळण्याच्या कृतीत नीट शिजतं का? कारण वर म्हटल्याप्रमाणे तेल कडकडीत तापवायचं आहे. असं नाही ना होणार की मिरच्या वरून लाल होतील अन आतून कच्चट राहातील?

योकू : करून बघा टळल जात आणि मस्त होतात खायला पण मस्त लागतात काही चित्रे टाकली असती पण कशी टाकतात ती माहित नाही

हो..फार सुंदर लागते ही मिरची.मी एका धाब्यावर खाल्ला होता. पण कसं करायचं माहीत नव्हते. अता नक्की करुन पाहीन.