चित्रपटातील मला खटकलेली आक्षेपार्ह द्रुष्ये.

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 January, 2015 - 13:06

आज माझ्या या धाग्यावर,
http://www.maayboli.com/node/52037?page=9

बेफिकीर यांचा हा प्रतिसाद वाचण्यात आला,
<<<
आज चुकून कुछ कुछ होता है चित्रपटातील एक सुरुवातीचा प्रसंग बघितला गेला. त्यात प्राचार्य अनुपम खेर स्वतःही अपरिपक्वपणे वागत होता आणि विद्यार्थी शाहरुख त्याच्या खांद्यावर हात ठेवून वगैरे त्याला पट्टी पढवत होता. ह्या दृष्यात शाहरुखचा दोष काहीच नाही. हा कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाचा विषय आहे. पण एकुणात ते दृष्य पटले नाही. एखाद्या (सुपरस्टार म्हणवणार्‍या) अभिनेत्याने येथे हरकत घ्यायला हवी होती असे वाटले.
>>>

आणि, हा धागा सुचला.

सुरुवात मीच करतो,
शाहरूखचा विषय निघताच त्याचे ‘बादशाह’ या चित्रपटातील एक गाणे आठवले.. "मै तो हून पागल".. ज्यात तो गोंधळ घालून पळताना त्याला पोलिस गाठतात आणि मग तो गुणगुण गाणे गात त्यांना गुणगारा देऊन निसटतो. अर्थात हि जिम कॅरीच्या मास्क चित्रपटावरून केलेली उचलेगिरी आहे. पण यात एक महिला पोलिस अधिकारी, ज्या विनोदी कम उत्तान पद्धतीने नाचताना दाखवली आहे, ते नेहमीच मला हा चित्रपट पाहताना खटकते. (बादशाह मी किमान बारा वेळा पाहिला आहे), पण ते द्रुश्य तेवढे विनोदी कमी आणि आचरट जास्त वाटते.

वर बेफिकीर यांनी शाहरूख आणि प्राध्यापक जोडीचे उदाहरण दिल्याने सर्वप्रथम मला आठवतो तो, मै हू ना, चित्रपट!
चित्रपट तसा सुपरहिट! मात्र यातही एकूण एक प्राध्यापकवर्गाला मस्करीचा विषय बनवण्यात आले होते. एक असतो तो (सतीश शाह) मुलांच्या तोंडावर थुंकी उडवणारा, एक मॅडम असतात (बिंदू) त्या मुलांना पकडून पकवणार्‍या, शाहरूख हा आपला स्टुडन्ट आहे माहीत असूनही त्याच्याबद्दल मनात वेगळ्या भावना ठेवणार्‍या, प्रिन्सिपल (बोमन इराणी) कमालीचा धांदरट आणि विसरभोळा, हिरोईन मॅडम (सुश्मिता सेन) यांच्याबद्दल बोलायलाच नको. थोडक्यात प्राध्यापक नामक सॉफ्ट टारगेट यात पुरेपूर वापरले होते.

अर्थात नक्कीच हा कथा-पटकथा-कार, दिग्दर्शक, आणि कोरीओग्राफर यांचा भाग झाला. मात्र मुख्य अभिनेत्याचीही जबाबदारी असतेच. सहमत!

सेन्सॉर बोर्ड फक्त अश्लील आणि हिंसक द्रुष्यांना कात्री लावते, तसेच कोणा समूह वा संघटनेच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा अ‍ॅक्शन घेते. मात्र अशी द्रुष्ये कोणाला खटकू शकतात वा आक्षेपार्ह वाटू शकतात असा विचारही त्यांच्या डोक्याला शिवत नसेल, वा कदाचित समजून उमजूनही चलता है म्हणत कानाडोळा करत असतील.

पण आपल्याला अश्या आक्षेपार्ह द्रुष्यांची इथे यादी करत चर्चा करायला हरकत काय आहे. सर्वात मोठा सेन्सॉर बोर्ड जनता जनार्दन. तेवढेच प्रत्येकाचे चित्रपटांकडे बघण्याचे दुष्टीकोन समजतील.

तर येऊ द्या लोकहो, तुम्हाला चित्रपटातील खटकलेली, तरीही सेन्सॉर बोर्डाने न कापलेली, तुमच्यामते आक्षेपार्ह द्रुष्ये! Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>सेन्सॉर बोर्ड फक्त अश्लील आणि हिंसक द्रुष्यांना कात्री लावते, तसेच कोणा समूह वा संघटनेच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा अ‍ॅक्शन घेते. मात्र अशी द्रुष्ये कोणाला खटकू शकतात वा आक्षेपार्ह वाटू शकतात असा विचारही त्यांच्या डोक्याला शिवत नसेल, वा कदाचित समजून उमजूनही चलता है म्हणत कानाडोळा करत असतील.<<<

ह्या पॅरामधील मुद्दा आवडला व हा मुद्दा अस्पष्टपणे मनात रेंगाळत होता असेही वाटले. किंवा, हा पॅरा वाचल्यानंतर उगाचच तसे वाटले असेलही!

अगदी बरोबर आहे. संवेदनशील विषय, वादग्रस्त विषय, व्यसनाधीनतेची दृष्ये, अश्लील (बोर्डाच्या मतानुसार जे अश्लील असेल ते) अश्या गोष्टींना कात्री लावली जाते. पण जी दृष्ये आपल्याकडील एकंदरीत असलेल्या सांस्कृतीक भूमिकेशी फारकत घेणारी असतात त्यांचाही विचार व्हायला हवा आहे. उदाहरणार्थ जाँबाज चित्रपटातील अनिल कपूर आणि अमरीश पुरी ह्या दोघांचे काही संवाद हे बाप-बेटा ह्या नात्यात आपल्या सर्वमान्य संस्कृतीप्रमाणे नसतात. त्याचा थोडा अधिक गंभीरपणे विचार व्हायला हवा असे वाटते. Happy

ऋन्मेऽऽष,

मला शिक्षकांची केलेली अवहेलना अधिक घातक वाटते. अश्लील वा हिंसक दृष्यांचा परिणाम उघडपणे जाणवतो. याउलट शिक्षकांचे उडवलेली टर पाहून त्यांच्याबद्दलचा अनादर छुप्या पद्धतीने मनात शिरतो. शाळाकॉलेज ही मजा मारायची ठिकाणे आहेत असा अत्यंत चुकीचा संदेश दिला जातो. याचे दुष्परिणाम प्रभावशील प्रेक्षकाला (मुले, तरुण, इत्यादि) जाणवेपर्यंत बरीच वर्षे गेलेली असतात.

आ.न.,
-गा.पै.

सहमत,
आणि हि अशी वर्तणूक करणारे चित्रपटात व्हिलन टोळीतील नसून हिरो म्हणून असणे हे जास्त घातक असते. त्यामुळे ते चुकीचे आहे हे बिंबण्याऐवजी तरुणाईकडून फॉलो केले जाते.

गापैंनी जे म्हंटले आहे तसेच मलाही म्हणायचे आहे.

एक अडचण मात्र आहे. अश्या प्रकारची दृष्ये दाखवल्यामुळे समाजमनावर होणारे परिणाम नेमके क्वाँटिफाय करता येणार नाहीत व अ‍ॅट्रिब्यूटही करता येणार नाहीत. त्यामुळे हा मुद्दा वादग्रस्त तेवढा बनून राहील.

काही विचारात घेतले जावेत असे प्रकारः

१. शिक्षकांची थट्टा
२. शिक्षिका म्हणून येणारी स्त्री अवास्तव पोषाखात असणे व विद्यार्थी ते पाहून चेकाळणे
३. प्रेमिकांचे कॉलेजमध्येच समूहनृत्य व समूहगान, कॉलेजमध्ये सहसा कोणी घालणार नाही असे पोषाख
४. विनोदाच्या नावाखाली बीभत्सता किंवा शारीरिक विनोद
५. गीत / नृत्यात अभिनेत्रीच्या विशिष्ट भागांवर कॅमेरा रेंगाळवणे
६. वाहतुकीचे कायदे मोडणे, एखाद्या संस्थेचे कायदे मोडणे
७. पोलिसांना मारहाण केलेली दाखवणे (कथेची गरज हे समजू शकतो, पण त्याचे परिणामही दाखवायलाच हवेत)
८. आयटेम साँग्ज

गुलामी चित्रपटात सुरुवातीला एक कोणी माणूस मरतो तर त्याच्या मेलेल्या अवस्थेत त्याचा अंगठ्याला ठसा लावून जमिनीच्या कागदपत्रांवर ठसे घेतात व प्रॉपर्टी हडप करतात. ते बघून आमची कामाची बाई म्हटली होती तुम्हाला पण असेच करणार लोक. ... मी जागाच बदलली व तिच्या शी संबंधच तोडले. म्हणजे लोकांवर नक्की परीणाम होतो व ते सिनेमातल्या प्रमाणे वागू बघतात.

मुलींची छेड काढणे व स्टॉकिंग करणे कधीतरी ह्यामुळे मुलगी प्रेमात पडेलच असा हिरोचा विश्वास असणे.

बायको व मेहुणी ह्यांच्या प्रेमात अडकलेला हीरो. नागर्जुनाचे असे खूप सिनेमे आहेत. टेरिबली व्हल्गर
आपण बघूच शकत नाही.

टेरर अ‍ॅटेक सदृश्य सीन्स.

१) इंडीपेनंडन्स डे सिनेमात वर्ल्ड ट्रेड सेंटर वर जो अ‍ॅटेक झाला त्याच्या शी मिळते जुळते अ‍ॅटॅक, एकाच वेळी अनेक ठिकाणी एलिअन्स करतात असे दाखवले आहे.
२) एका सिनेमात उल्कापात होउन वरील दोन इमारती पडल्या आहेत असे चक्क दाखवले आहेत. असे बघून विघातक शक्तींना कल्पना मिळू शकते. चित्रपटाचे नाव विसरले. आठवले कि लिहिते. ब्रूस विलीस
ऑइल ड्रिलर असतो ह्यात.

गुणगारा >>>>> अरे भाऊ ते गुन्गारा आहे,गुणगारा नाही. आधी मला वाटले की काहीतरी गार गार लिहीतोयस.:फिदी:

शारिरीक व्यंगावर किंवा सवयींवरचे विनोद हे अत्यंत दयनीय कल्पनाशक्तीचे लक्षण वाटते.
कभी अल्विदा ना कहना मधले किरण खेर ला टारगेट केलेले जोक.. फसलेले.

शारिरीक व्यंगावर किंवा सवयींवरचे विनोद हे अत्यंत दयनीय कल्पनाशक्तीचे लक्षण वाटते. >>> सहमत.

>>>मुलींची छेड काढणे व स्टॉकिंग करणे कधीतरी ह्यामुळे मुलगी प्रेमात पडेलच असा हिरोचा विश्वास असणे. <<<

अनुमोदन! हे वगळलेच पाहिजे चित्रपटातून!

सर्व जेम्स बाँड सिनेमे बघितलेत तर एक मिझोजिनिस्टिक स्ट्रीक आहे. जुन्या सिनेमात जसे डायमंडस आर फॉरेवर मध्ये तर तो चक्क तिला थोबाडित मारतो. हा कसला जंटलमन. गोल्डफिंगर मध्ये बाँड व व्हिलन यांन्ना काही बोलायचे असते तर ते हिरॉइनच्या बम वर टपली मारून मेन्स बिझनेस प्लीज गो म्हणतात. रिअली नाव.

थ्री इडियट मधला भाषण बदलण्याचा सीन. तसा पहायला मजेशीर वाटत असला तरी ओम वैद्य चे म्हणणे पटते नंतरचे. त्याने व्यक्तीशः या तिघांचे काहीही वाईट केलेले नसताना त्याच्याबरोबर असे का केले जावे? 'बुलीइंग',जाड विद्यार्थ्यां)विद्यार्थिनींवर)वर बीभत्स विनोद, स्वतःची कर्तव्ये नीट करणार्‍या पोराला चिडवून बंक करणारे हिरो म्हणून प्रोजेक्ट करणे या गोष्टी टाळल्या जाव्यात.

>>>थ्री इडियट मधला भाषण बदलण्याचा सीन. <<<

अत्यंत हीन सीन! तो बघत असताना चित्रपटगृहातील अनेक मंडळी खो खो हसत होती हे पाहून थक्कच झालो, ना त्यातील विनोद चांगला होता ना त्यातील संकल्पना! अतिशय स्वस्त व विकृत विनोद होता तो!

त्याशिवाय, प्राचार्यांच्या दारासमोर नशेत लघुशंका करणे, सुरुवातीला रॅगिंग केलेले दाखवणे, सतत पार्श्वभाग दाखवून 'तोहफा कबूल हो' म्हंटले जाणे हे सगळेच एक तर किळसवाणे किंवा तिरस्करणीय होते.

"प्राचार्यांच्या दारासमोर नशेत लघुशंका करणे" हे सेन्सॉर मधे कटायला हवे होते. मूळ कादंबरीतही इतकी खालची पातळी गाठलेली नाही. कादंबरीचा गाभा नेहमी टिपी करुन जीपीए गाठता न आलेल्या मुलांना पेपर चोरण्याच मोह होणे आणी त्यातून जन्मलेल्या भयंकर घटना हा आहे.

थ्री इडियट मधला भाषण बदलण्याचा सीन फक्त मजेशीर समजत असाल तर त्यानंतर आमिरचा डायलॉग आठवा. मला तरी तो सीन चुकीचा वाटला नाही तर योग्यच वाटला. माझा येक मित्र पाठांतर किंग होता. दहावीला त्यानी कित्येक मराठी निबंध पाठ करुन ठेवलेले होते. ते कमीत कमी वेळेत लिहिण्याचा सराव केलेला होता. बिचार्‍याच ईंजिनिअरींगला ड्रॉईंग सब्जेकट मुळ वर्ष वाया गेल होत.

प्राचार्यांच्या दारासमोर नशेत लघुशंका करणे आणि त्यानंतर्चे त्याचे परीणाम यात त्या वयातल बेफिकीर वागण दाखवायच होत. ते ठळकपणे समोर पण आल. त्यात पण मला आक्षेपार्ह काहीच वाटल नाही.
रॅगिंगच्या सीन मधुन अश्या कठीण समयी तुम्हाला पटकन निर्णय घेता येण किती महत्वाच असत हे जाणवल.
उलट त्यातुन खुप मोठा मेसेज मिळाला.

शारिरीक व्यंगावर किंवा सवयींवरचे विनोद हे अत्यंत दयनीय कल्पनाशक्तीचे लक्षण वाटते.>>>+१

या गाण्यांमधले शब्द आक्षेपार्ह वाटले.

https://www.youtube.com/watch?v=bCMqDAzYLBE

https://www.youtube.com/watch?v=j3iJtYnc2WI

अर्थात या गाण्यांचे संगीत / ठेका / चाल आकर्षक असल्याने अनेकदा वाजवली / ऐकली जातात. असे शब्द कानांवर पडून गैरवर्तन घडण्याची शक्यता अधिक.

जे होस्टेलवर राहीलेले आहेत आणि ग्रूपमधे मिसळलेले आहेत त्यांना "प्राचार्यांच्या दारासमोर नशेत लघुशंका करणे" याच्यापेक्षाही आचरट गोष्टींचा अनुभव असतो. ते वयच अस असत की त्यात पुढच्या आपल्यावर आणि इतरांवर होण्यार्‍या परीणामाचा विचार केला जात नाही.

In short if above is implemented current hindi film industy needs to be closed Happy

शारिरीक व्यंगावर किंवा सवयींवरचे विनोद हे अत्यंत दयनीय कल्पनाशक्तीचे लक्षण वाटते. >>>मिहि सहमत.

बोडीगार्द सिनेमात तो एक अति जाडा (शी म्हन्द्जे अगदीच) पांचट विनोद करणारा कलाकार, सलमान भाऊ बरोबर कॉलेजमध्ये हिरोईनला शोधण्यासाठी जाताना लेडीज स्पोर्ट्स कपडे घालतो ते काय प्रयोजन ...... बुरखा घालून गेला असता तरी चालले असते पण नाही तो ज्या प्रकारे ते लेडीज कपडे फ़्लोन्त करतो ते इतके चीप वाटते. :$

सुशांत,

तुम्ही हे ज्यांना सांगत आहात ते वाचक आणि तुम्ही स्वतः त्या सीनमधून काय सांगायचे होते हे समजण्याच्या क्षमतेचे मुळातच आहेत. त्यामुळे ते आपापसातच समजावून सांगण्याने काही साध्य होणार नाही.

विषय चालला आहे तो समाजातील अश्या घटकांवर होऊ शकणार्‍या परिणामांचा ज्यांना त्यात नेमके काय दाखवायचे होते हे न समजता ते कसे दाखवले गेले इतकेच लक्षात राहील. आशा आहे की ह्याउप्पर तुम्ही इतरांना अधिक काही कन्व्हिन्स करू पाहात नसाल.

@ सुशांत- आय आय टी आणि आर इ सी आणि पुष्कळ इंजिनीयरिंग कॉलेज मधे या घटना होतात याची कल्पना आहे. पण त्या दाखवायलाच हव्या का? लघुशंका/ शॉक हा प्रयोग कोण्या कॉलेज कार्ट्याने करुन पहायचा ठरवला तर? लोक चांगल्या गोष्टी उचलणार नाहीत पण वाईट नक्की उचलतात.
'सुंदर मुलगी एंगेज आहे' हे कळल्यावर उदास होऊन फक्त गप्पात समाधान मानणारे नंतर शा खा आदर्श ठेवून पोरगी लग्न होईपर्यंत )किंवा झाल्यानंतर पण) कधीतरी काहीतरी बिनसून आपल्याला गटेल अशी आशा ठेवतात, तिच्या गप्पांना 'लाईन देणे' समजतात, फ्रेंडशीप इज लव्ह अशा भिकार कल्पना बाळगून 'काही चौकोन चौरस असू शकतील' हे न मानता 'प्रत्येक चौकोन हा चौरसच आहे' या गैरसमजूतीत जगतात आणि मग निराशा झाल्यावर स्वतःचा किंवा तरुणीचा जीव घेतात. )नो ऑफेन्स ऑन शा खा, हे सर्व चित्रपट आवडीने पाहिलेले आहेत.)
चित्रपटात द्वापार किंवा सत्य युग दाखवावे असे म्हणत नाही, पण त्याचे अनुकरण होऊअ शकेल हा पाचपोच बाळगून काही गोष्टी दाखवणे टाळावे असे वाटते.

अगदी सहमत मी-अनु

=================

मुद्दा अधिक ठसावा इतक्याचसाठी हे खालचे वाक्य लिहीत आहे:

थ्री इडियट्समधील लघुशंकेचा प्रसंग पाहून तुम्ही आम्ही तसे करणार नसतो, पण तसे करणे काही विशेष नाही किंवा मजेशीर आहे असे समजायला लागणारा एक गट (वयोगट / बौद्धिकदृष्ट्या विशिष्ट गट) असू शकतो. हे गंभीर आहे.

तेव्हा, येथील वाचकांना त्या घटना कश्या समजल्या नाहीत हे सांगण्यात कृपया अधिक वेळ दवडू नयेत अशी विनंती! Happy

विषय चालला आहे तो समाजातील अश्या घटकांवर होऊ शकणार्‍या परिणामांचा >>> बेफि, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे:
चित्रपटातील दृश्यांत काय दाखवावे याबद्दल सरकारच्या (सेन्सॉर द्वारे जाहीर केलेल्या) गाइडलाइन्स मधे (सर्वसाधारणपणे) बसणारी दृश्ये असतील तर त्यापुढे जाउन समाजातील (बोली भाषेतील शब्द वापरायचा तर) "सर्किट" लोक ते पाहून कसे वागतील याचा अंदाज घेउन त्याप्रमाणे ते नियंत्रित करावे काय? उदाहरण म्हणजे शाहरूखच्या सुरूवातीच्या काळात त्याचे व्हिलनिश रोल्स लोकप्रिय होत होते (बाजीगर, डर, अंजाम ई) तेव्हा त्याचे अनुकरण करून मुलींना एकतर्फी प्रेमातून त्रास देण्याचे प्रकारही खूप होत होते (मीडियामधे तरी बरेच येत होते). हे असे काही होईल म्हणून तसे वागलेला हीरोच दाखवू नये, किंवा दाखवला तर तो ग्लोरिफाय करू नये काय - यातले ग्लोरिफाय करू नये हे मला पटते.
(अर्थात फिल्मफेअरने अंजाम करता शाहरूखला व्हिलनचे अ‍ॅवॉर्ड देऊन योग्यच केले होते:) )
(या धाग्यावर शाहरूखला आणल्याबद्दल संबंधितांची आगाऊ माफी Happy )

Pages