चित्रपटातील मला खटकलेली आक्षेपार्ह द्रुष्ये.

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 January, 2015 - 13:06

आज माझ्या या धाग्यावर,
http://www.maayboli.com/node/52037?page=9

बेफिकीर यांचा हा प्रतिसाद वाचण्यात आला,
<<<
आज चुकून कुछ कुछ होता है चित्रपटातील एक सुरुवातीचा प्रसंग बघितला गेला. त्यात प्राचार्य अनुपम खेर स्वतःही अपरिपक्वपणे वागत होता आणि विद्यार्थी शाहरुख त्याच्या खांद्यावर हात ठेवून वगैरे त्याला पट्टी पढवत होता. ह्या दृष्यात शाहरुखचा दोष काहीच नाही. हा कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाचा विषय आहे. पण एकुणात ते दृष्य पटले नाही. एखाद्या (सुपरस्टार म्हणवणार्‍या) अभिनेत्याने येथे हरकत घ्यायला हवी होती असे वाटले.
>>>

आणि, हा धागा सुचला.

सुरुवात मीच करतो,
शाहरूखचा विषय निघताच त्याचे ‘बादशाह’ या चित्रपटातील एक गाणे आठवले.. "मै तो हून पागल".. ज्यात तो गोंधळ घालून पळताना त्याला पोलिस गाठतात आणि मग तो गुणगुण गाणे गात त्यांना गुणगारा देऊन निसटतो. अर्थात हि जिम कॅरीच्या मास्क चित्रपटावरून केलेली उचलेगिरी आहे. पण यात एक महिला पोलिस अधिकारी, ज्या विनोदी कम उत्तान पद्धतीने नाचताना दाखवली आहे, ते नेहमीच मला हा चित्रपट पाहताना खटकते. (बादशाह मी किमान बारा वेळा पाहिला आहे), पण ते द्रुश्य तेवढे विनोदी कमी आणि आचरट जास्त वाटते.

वर बेफिकीर यांनी शाहरूख आणि प्राध्यापक जोडीचे उदाहरण दिल्याने सर्वप्रथम मला आठवतो तो, मै हू ना, चित्रपट!
चित्रपट तसा सुपरहिट! मात्र यातही एकूण एक प्राध्यापकवर्गाला मस्करीचा विषय बनवण्यात आले होते. एक असतो तो (सतीश शाह) मुलांच्या तोंडावर थुंकी उडवणारा, एक मॅडम असतात (बिंदू) त्या मुलांना पकडून पकवणार्‍या, शाहरूख हा आपला स्टुडन्ट आहे माहीत असूनही त्याच्याबद्दल मनात वेगळ्या भावना ठेवणार्‍या, प्रिन्सिपल (बोमन इराणी) कमालीचा धांदरट आणि विसरभोळा, हिरोईन मॅडम (सुश्मिता सेन) यांच्याबद्दल बोलायलाच नको. थोडक्यात प्राध्यापक नामक सॉफ्ट टारगेट यात पुरेपूर वापरले होते.

अर्थात नक्कीच हा कथा-पटकथा-कार, दिग्दर्शक, आणि कोरीओग्राफर यांचा भाग झाला. मात्र मुख्य अभिनेत्याचीही जबाबदारी असतेच. सहमत!

सेन्सॉर बोर्ड फक्त अश्लील आणि हिंसक द्रुष्यांना कात्री लावते, तसेच कोणा समूह वा संघटनेच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा अ‍ॅक्शन घेते. मात्र अशी द्रुष्ये कोणाला खटकू शकतात वा आक्षेपार्ह वाटू शकतात असा विचारही त्यांच्या डोक्याला शिवत नसेल, वा कदाचित समजून उमजूनही चलता है म्हणत कानाडोळा करत असतील.

पण आपल्याला अश्या आक्षेपार्ह द्रुष्यांची इथे यादी करत चर्चा करायला हरकत काय आहे. सर्वात मोठा सेन्सॉर बोर्ड जनता जनार्दन. तेवढेच प्रत्येकाचे चित्रपटांकडे बघण्याचे दुष्टीकोन समजतील.

तर येऊ द्या लोकहो, तुम्हाला चित्रपटातील खटकलेली, तरीही सेन्सॉर बोर्डाने न कापलेली, तुमच्यामते आक्षेपार्ह द्रुष्ये! Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गे कॅरेक्टर्स आणि / किंवा त्यावर केलेले फालतू विनोद मला खटकतात.

उदा. कल हो ना हो - शाखा आणो सैखा.

शांताराम कागाळे | 16 January, 2015 - 18:56
बादशाह मी किमान बारा वेळा पाहिला आहे

का ? एक वेळा बघितल्यावर समजला नाही ?

दिवाकर देशमुख | 16 January, 2015 - 18:57
एका वेळेत कळायला डोक असावे लागते

हाहा खो खो हसून हसून गडबडा लोळण

Uhoh

आक्षेपार्ह चित्रपटांमधे राणी मुखर्जीचा 'राजा की आयेगी बारात' हा शिरोमणी म्हणावा लागेल. संपूर्ण चित्रपट आणि त्यातून दिला गेलेला संदेश (!) अतिशय आक्षेपार्ह होता.
ज्यांनी बघितला नाही त्यांच्यासाठी थोडक्यात कथा -
नायिका शिक्षिका आणि नायक बडे बाप की बिगडी हुई औलाद. नायिकेला सतत छेडछाड करतो पण ती बधत नाही हे बघितल्यावर सरळ ती शिकवत असताना वर्गात घुसून विद्यार्थ्यासमोर तिच्यावर बलात्कार करतो. नायिका त्याच्याविरुध्द कोर्टात जाते. तिथे तिने आपल्याविरोधी बोलू नये म्हणून खटला सुरु होण्याआधी नायक तिला मारायला तिच्यावर गुंड धाडतो. पण त्यातून ती बचावते आणि खटला सुरू होतो. नायिकेची मुख्य तक्रार आपल्यावर बलात्कार झाला ही नसून केवळ त्यामुळे आता आपल्याशी कोणी लग्न करणार नाही आणि आपली बारात यावी हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही ही असते! न्यायाधीश तिचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून नायकाला तिच्याशी लग्न करण्याची शिक्षा करतात. नायक नाखुषीने तिचा स्वीकार करतो. नायिका लग्नानंतर त्याला एकदम पती परमेश्वर मानू लागते. नायक तरीही तिला घराबाहेर काढायचे सर्व प्रयत्न करतो. शेवटी तिच्यावर जहरी नाग सोडतो. पण जिस नारीके गलेमे मंगलसूत्र और मांगमे सिंदूर होता है उसे नाग छू नही सकता! तो नाग नायकालाच डसतो. नायक शेवटचे आचके देत असताना नायिका विष चोखून त्याला वाचवते आणि स्वत: मरणाच्या दारात उभी ठाकते. तेव्हा कुठे नायकाचे डोळे उघडतात आणि शेवट गोड होतो (!)
राणी मुखर्जीचा अभिनय, गुलशन ग्रोव्हर चा सकारात्मक रोल आणि श्रवणीय संगीत एवढ्याच जमेच्या बाबी होत्या.

>> बाप रे काय भीषण आहे ही कथा
खरोखर!!
हे कसे काय सेन्सर बोर्डाने सोडले? विद्यार्थ्यांसमोर बलात्कार!!? आणि नायिकेची तक्रार लग्नाच्या स्वप्नाची!? धन्य.

शिणूमातलं आपल्याला काय समजत नाही.

पण धाग्याबद्दलची काही निरिक्षणे:

१. ऋन्मेष यांना टीआरपी नको, म्हणून कोकणस्थ इथे डिट्टेलवार लिहित नाहियेत. पण धागा विषय इतका टेम्प्टींग आहे, की लिहिल्याशिवाय रहावत नाहिये. सो प्रतिसाद संख्या वाढतेच आहे.

२. धागा ॠन्मेषचा, अन 'ऑप' बेफ़िकीर असल्यासारखे वाटते आहे.

३. सुशांतचे पॉईंट्स व्हॅलिड आहेत, ते खोडता येत नाहीत म्हणून त्यांना 'तुम्ही दिशाहीन चर्चा करीत आहात' 'आवरा' इ. सांगून (सु)शांत केले गेले आहे.

४. ऋन्मेषने और एक ट्यार्पीवाला धागा यशस्वीरित्या काढलेला आहे.

>> रुद्रभीषण बायोलॉजी
ब्लीडिंग गम्स हो गा पै.

वेडा,
त्या स्टुंडट ऒफ द ईयरपेक्षा घाणेरडा सीन आमीरखाच्या मेला सिनेमात होता. तिथे रोनित रॉय शिंपडतो, इथे पिताना दाखवलेय.

डिविनिता,
विकी डोनर मला चीप नाही वाटला, इनफॅक्ट आवडलेला तो चित्रपट. त्यात चीप विनोद करणे सहजशक्य असून सहजपणे टाळले होते. निदान मला आठवत तरी नाहीये.

गे विनोदाचा निर्माता करण जोहार आहे. त्याच्या बरेच चित्रपटांत तसले विनोद असतात. दोस्ताना तर त्यावरच आधारला होता.

अनिल कपुर जुही चावलाचाही एक बलात्कार लग्न षिनेमा होता. >>> बेनाम बादशाह बौतेक त्याचे नाव.. सहमत आहे, न पटणेबल आणि अत्यंत चुकिचा संदेश जाणारा चित्रपट त्या आयेगी राजा की बारात सारखा..

अवांतर - ईब्लिस, आपल्या निरीक्षणांबद्दल नो कॊमेंट्स, पण आपल्याला सिनेमात जास्त रस नसून आपण इथे आलात हेच खरे धाग्याचे यश Happy

लघुशंकेच्या सीनबद्दल म्हणाल तर रश अवर ३ मधे सुद्धा लघुशंका आहे आणि हा सिनेमा जगभर तुफान चालला. त्यात सिच्युएशन अशी होती कि ते पटतं. मनोरंजन करणा-या सिनेमात फारशा अपेक्षा ठेवता येत नाही. पण उगीच कुणाच्या संस्कृतीवर घाला घालावा अशा पद्धतीचे सिनेमे बनवणं याला आळा बसावा ही माफक अपेक्षा आहे. कुणाच्या धार्मिक श्रद्धांना विनाकारण दुखावणं हे पण खटकतं. निर्माता दिग्दर्शक काही सामाजिक जागृतीच्या उद्देशाने सिनेमे काढत नाही. त्याला गल्ला हवा असतो.

पीके हा सिनेमा वाइट की चांगला हा मुद्दा बाजूला ठेवूयात. पहिल्या वेळी हा सिनेमा आवडून जातो. पण नंतर विचार केल्यावर हे जाणवतं की या सिनेमाचा उद्देश चांगला नाही. या सिनेमाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला नसता तर त्या सिनेमाचा धंदा ६०० कोटीच्या पुढे गेला असता का असा प्रश्न पडतो. काही वेळा यातल्या काही संघटनांचे हेतूच कळत नाहीत. विरोध आहे तर इग्नोरास्त्र सोडायला हवे होते. इतरही उपाय होते.बंदी आणता आली असती. फना हा सिनेमा गुजरातेत चालला नाही. नायिकेला प्रेम करायला अतिरेकीच का सापडावा बरं ? कथेत बदल करून नायक वाट चुकलेला एखादा देशभक्त असतो हे दाखवता आलं असतं. पुढे त्याला उपरती होते आणि तो दह्शतवाद किती वाईट आहे हे कबूल करतो असा शेवट दाखवणं शक्य होतं. पण ।आ अतिरेकी नव्या मोहीमेवर निघतो असा शेवट करने हे खटकण्यासारखंच होतं.

सिनेमाचे नाव आठवत नाही. पण सोनम आहे बहुतेक त्यात खूप आगाऊ दाखवलीये आणि चक्क वडिलांना मारते... डोक्यात गेला सीन.

<< पण सोनम आहे बहुतेक त्यात खूप आगाऊ दाखवलीये आणि चक्क वडिलांना मारते... >>

सोनाक्षी सिन्हा - हॉलिडे.

घरी शॉटगनला सुद्धा अशीच मारत असेल काय?

मला सचिन पगारेंची आठवण का बरे यावी?
<<
काँग्रेसचे सर्वच लोक नित्यस्मरणीय असल्याने त्यांची नेहेमीच आठवण येत रहाते.
ग्लासभर (साधेच) पाणी घ्या. उचकी थांबेल Wink

बहुधा येथे(ही) मी प्रतिसाद दिल्याचे काहीजणांना आवडलेले दिसत नाही
<<
हे "काहीजणांना" माझ्याबद्दल असेल, तर टोक अधिक स्पष्ट करतो. (प्वाइंट किल्यर कर्तो)
ऑप = धागा निर्माता/चालक अशी संज्ञा कित्येक फोरम्स वर प्रचलित आहे.
या धाग्यावरील चर्चेचे सूत्रसंचालन तुम्हीच करीत होता, असे ते निरिक्षण आहे.

बाकी माझ्या आवडी-निवडींना इतके महत्व आहे हे पाहून सद्गदित झालो... Proud

Lol इब्लिस Biggrin

देवानंद सुरुवातीचे काही चांगले चित्रपट सोडले तर नंतरचे सगळेच चित्रपटात कैच्याकै दाखवलेले होते. बर झाले नंतरच्या फडतुस आणि अत्यंत भिक्कार चित्रपट लोकांनी बघायचे सोडुन दिले.

सिनेमाचे नाव आठवत नाही. पण सोनम आहे बहुतेक त्यात खूप आगाऊ दाखवलीये आणि चक्क वडिलांना मारते... डोक्यात गेला सीन. >> बहुतेक युसूफ अंकल कलेक्टर असतात, त्यांचा मुलगा तुरुंग दत्त असतो.

ऋन्मेषने कोणताही धागा काढला कि तो पहिल्या पानावर असलाच पाहिजे असा नवा नियम झाला आहे का ???
अभिनंदन ऋन्मेष

Pages