चित्रपटातील मला खटकलेली आक्षेपार्ह द्रुष्ये.

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 January, 2015 - 13:06

आज माझ्या या धाग्यावर,
http://www.maayboli.com/node/52037?page=9

बेफिकीर यांचा हा प्रतिसाद वाचण्यात आला,
<<<
आज चुकून कुछ कुछ होता है चित्रपटातील एक सुरुवातीचा प्रसंग बघितला गेला. त्यात प्राचार्य अनुपम खेर स्वतःही अपरिपक्वपणे वागत होता आणि विद्यार्थी शाहरुख त्याच्या खांद्यावर हात ठेवून वगैरे त्याला पट्टी पढवत होता. ह्या दृष्यात शाहरुखचा दोष काहीच नाही. हा कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाचा विषय आहे. पण एकुणात ते दृष्य पटले नाही. एखाद्या (सुपरस्टार म्हणवणार्‍या) अभिनेत्याने येथे हरकत घ्यायला हवी होती असे वाटले.
>>>

आणि, हा धागा सुचला.

सुरुवात मीच करतो,
शाहरूखचा विषय निघताच त्याचे ‘बादशाह’ या चित्रपटातील एक गाणे आठवले.. "मै तो हून पागल".. ज्यात तो गोंधळ घालून पळताना त्याला पोलिस गाठतात आणि मग तो गुणगुण गाणे गात त्यांना गुणगारा देऊन निसटतो. अर्थात हि जिम कॅरीच्या मास्क चित्रपटावरून केलेली उचलेगिरी आहे. पण यात एक महिला पोलिस अधिकारी, ज्या विनोदी कम उत्तान पद्धतीने नाचताना दाखवली आहे, ते नेहमीच मला हा चित्रपट पाहताना खटकते. (बादशाह मी किमान बारा वेळा पाहिला आहे), पण ते द्रुश्य तेवढे विनोदी कमी आणि आचरट जास्त वाटते.

वर बेफिकीर यांनी शाहरूख आणि प्राध्यापक जोडीचे उदाहरण दिल्याने सर्वप्रथम मला आठवतो तो, मै हू ना, चित्रपट!
चित्रपट तसा सुपरहिट! मात्र यातही एकूण एक प्राध्यापकवर्गाला मस्करीचा विषय बनवण्यात आले होते. एक असतो तो (सतीश शाह) मुलांच्या तोंडावर थुंकी उडवणारा, एक मॅडम असतात (बिंदू) त्या मुलांना पकडून पकवणार्‍या, शाहरूख हा आपला स्टुडन्ट आहे माहीत असूनही त्याच्याबद्दल मनात वेगळ्या भावना ठेवणार्‍या, प्रिन्सिपल (बोमन इराणी) कमालीचा धांदरट आणि विसरभोळा, हिरोईन मॅडम (सुश्मिता सेन) यांच्याबद्दल बोलायलाच नको. थोडक्यात प्राध्यापक नामक सॉफ्ट टारगेट यात पुरेपूर वापरले होते.

अर्थात नक्कीच हा कथा-पटकथा-कार, दिग्दर्शक, आणि कोरीओग्राफर यांचा भाग झाला. मात्र मुख्य अभिनेत्याचीही जबाबदारी असतेच. सहमत!

सेन्सॉर बोर्ड फक्त अश्लील आणि हिंसक द्रुष्यांना कात्री लावते, तसेच कोणा समूह वा संघटनेच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा अ‍ॅक्शन घेते. मात्र अशी द्रुष्ये कोणाला खटकू शकतात वा आक्षेपार्ह वाटू शकतात असा विचारही त्यांच्या डोक्याला शिवत नसेल, वा कदाचित समजून उमजूनही चलता है म्हणत कानाडोळा करत असतील.

पण आपल्याला अश्या आक्षेपार्ह द्रुष्यांची इथे यादी करत चर्चा करायला हरकत काय आहे. सर्वात मोठा सेन्सॉर बोर्ड जनता जनार्दन. तेवढेच प्रत्येकाचे चित्रपटांकडे बघण्याचे दुष्टीकोन समजतील.

तर येऊ द्या लोकहो, तुम्हाला चित्रपटातील खटकलेली, तरीही सेन्सॉर बोर्डाने न कापलेली, तुमच्यामते आक्षेपार्ह द्रुष्ये! Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज वेळेअभावी फक्त वाचता येतेय, पण चांगली चर्चा चालू आहे,

एक सहज नमूद करावेसे वाटतेय, या विषयाच्या परीघात "थ्री ईडियट्स" सारखा (सर्वच प्रकारच्या प्रेक्षकांनी उचलून धरलेला) सिनेमादेखील आरोपीच्या पिंजर्‍यात उभा राहतोय हे विशेष.

माफ करा, पण त्या थ्री इडियट्स मधल्या सीन मधे 'रॅगिंग करणार्‍यांन अद्दल घडवली' हा मुख्य मुद्दा नसून ' आम्ही जे केवळ पुस्तकात वाचून सोडून दिलं ते याने लक्षात ठेवून योग्य गरजेच्या वेळेला अमलात आणलं आणि स्वतःला वाचवलं म्हणून हा पठ्या आमच्या मनात तेंव्हा आदराची जागा घेऊन गेला' हे दाखवायचं आहे.

आणि कमॉन गाईज, आमची पिढी बर्‍याच अंशी सिनेमात दाखवतात ते खरं नसतं हे समजते. समाजातील काही घटक असे आहेत जे या गोष्टींवरून प्रेरना घेऊन गुन्हेगार बनतात पण असे लोकं कशातूनही प्रेरणा घेऊ शकतातच.

>>>(सर्वच प्रकारच्या प्रेक्षकांनी उचलून धरलेला)<<<

ह्याचे थोडे अ‍ॅनॅलिसीस करायचा प्रयत्नः

आपण आपल्याला ज्याची आवड आहे त्या क्षेत्रात जावे आणि जे मनाला पटेल ते मनापासून करावे, मग यश मिळतेच!

हा जो त्या चित्रपटातील मुख्य संदेश आहे तो संदेश ठसवण्यासाठी योजलेली गंमतीशीर प्रसंगांची मालिका आणि प्रत्यक्ष तो संदेश हे प्रेक्षकांसाठी नवे असल्याने चित्रपट गाजला. ह्याचा अर्थ असा नव्हे की चित्रपटात काही हरकतपात्र दाखवले गेलेले नव्हते. Happy

त्यामुळे तो चित्रपट एक कलाकृती म्हणून गाजला असला तरी तुम्ही काढलेल्या ह्या धाग्याच्या व्याप्तीत त्या चित्रपटातील दृश्यांवर चर्चा होणे साहजिक आहे.

>>>माफ करा, पण त्या थ्री इडियट्स मधल्या सीन मधे 'रॅगिंग करणार्‍यांन अद्दल घडवली' हा मुख्य मुद्दा नसून ' आम्ही जे केवळ पुस्तकात वाचून सोडून दिलं ते याने लक्षात ठेवून योग्य गरजेच्या वेळेला अमलात आणलं आणि स्वतःला वाचवलं म्हणून हा पठ्या आमच्या मनात तेंव्हा आदराची जागा घेऊन गेला' हे दाखवायचं आहे.<<<

धाग्याच्या मूळ विषयाशी ही पोस्ट फारकत घेऊन असल्यामुळे पास!

ह्याचा अर्थ असा नव्हे की चित्रपटात काही हरकतपात्र दाखवले गेलेले नव्हते
>>
याला अगदीच अनूमोदन पण तुम्ही ज्या प्रसंगांवर हरकत घेताय ते प्रसंग हरकत घेण्याजोगे नाहीत असं मला वाटतंय. (त्यावेळेला सेंबो मधे असणार्‍यांनाही असच वाटलं असावं आणि म्हणून तो सीन पास झाला असावा हे सांगायचंय मला)

ह्याचे थोडे अ‍ॅनॅलिसीस करायचा प्रयत्नः ...... यापुढे आपण जे अ‍ॅनालिसिस केलेय तेच अप्रत्यक्षपणे सांगणारी माझी पोस्ट होती.
उलट गाजलेले चित्रपट जास्त परीणाम सोडून जातात त्यामुळे त्यावर चर्चा करताना निकष तुलनेत जास्त काटेकोर लावायलाही हरकत नाही.

बाकी थ्री ईडियट्समधील दृष्यांबाबत काय म्हणावे याबाबत मी स्वत:च तळ्यात मळ्यात असल्याने तुर्तास अर्धविराम. कारण माझ्या स्वतःवर त्या चित्रपटाने चांगला परीणाम केलेला, पण इतर त्यातून चुकीचे तेच उचलणार नाहीत याची खात्रीही ठामपणे देऊ शकत नाही. त्यामुळे इथे वर काही जणांनी त्यावर नोंदवलेला आक्षेपही पटतोय.

कारण माझ्या स्वतःवर त्या चित्रपटाने चांगला परीणाम केलेला, पण इतर त्यातून चुकीचे तेच उचलणार नाहीत याची खात्रीही ठामपणे देऊ शकत नाही. त्यामुळे इथे वर काही जणांनी त्यावर नोंदवलेला आक्षेपही पटतोय.
>>
+१
पण म्हणूनच मला त्या त्या प्रसंगांचे सरसकटीकरण (चांगलाच किंवा चुकीचाच) करणे पटत नाहीये.

मला बच्चन फॅमिलीच परद्या बाहेरच वागणं खटकलं होत जेव्हा एश्वर्याच झाडाशी लग्न करुन देण्यात आल होत. सेलेब्रिटीजने जरा जपुनच वागायला हव कारण लोकांच त्यांच्याकडे लक्श अस्ते, आईडोल असतात ते त्यांचे आणि अर्थातच त्यांचे अनुकरण करत असतात. ह्या घटनेच्या दरम्यानच वेल्कम टु सज्जनपूर नावाचा चित्रपट बघितला त्यात गावातील एक अडाणी मांगलिक मुलीची काहीतरी कथा होती(आता आठवत नाही पण बहुतेक असच तिला झाडाशी लग्न कराय्ला लावतात म्हणुन चिडते ) ती बघुन एश्वर्याची किव आली होती.

बेफी तुम्ही अत्यंत वरवरचा मेसेज घेताय की संस्थेने रॅगिंग करणार्‍यांवर काहीतरी कारवाई करावी. त्यात रॅगिंग हा कठीण प्रसंग होता आणि अश्या कठिण समयी मोजक्या वेळात महत्वपुर्ण निर्णय घेता येण आणि ते अमलात आणन हा मेसेज घेतला तर त्यात रॅगिंग करणार्‍यांवर कारवाई केलेली का दाखवली नाही हा फुटकळ प्रश्नच पडला नसता.
बेफी तुम्ही परत येकदा विचार करुन पहा.

< आपण आपल्याला ज्याची आवड आहे त्या क्षेत्रात जावे आणि जे मनाला पटेल ते मनापासून करावे, मग यश मिळतेच! >
यातुन फक्त येव्हडाच मेसेज घेतला असेल तर तुम्ही तो पिक्चर परत येकदा पहा. इतर बरेच संदेश आहेत त्यात.....आणि सगळेच महत्वाचे आहे.....

मला आमिर खान बिलकुल आवडत नाही. इतर कुठलेही खान आवडत नाहीत.
नाहीतर उगाच मला आ खा फॅनच लेबल चिटकवाल.....

>>>बेफी तुम्ही अत्यंत वरवरचा मेसेज घेताय की संस्थेने रॅगिंग करणार्‍यांवर काहीतरी कारवाई करावी. त्यात रॅगिंग हा कठीण प्रसंग होता आणि अश्या कठिण समयी मोजक्या वेळात महत्वपुर्ण निर्णय घेता येण आणि ते अमलात आणन हा मेसेज घेतला तर त्यात रॅगिंग करणार्‍यांवर कारवाई केलेली का दाखवली नाही हा फुटकळ प्रश्नच पडला नसता.
बेफी तुम्ही परत येकदा विचार करुन पहा.<<<

सुशांत,

ह्या विषयावर ह्या धाग्यावर माझी ही शेवटची पोस्ट!

१. धाग्याचा विषय आहे 'आपल्याला वाटलेली आक्षेपार्ह दृश्ये'!

२. ह्या चर्चेत रॅगिंगचा तो सीन आला.

३. रॅगिंग सर्वत्र होते हे मान्यच आहे.

४. आमीर खान चित्रपटाचा हिरो आहे व तो काहीतरी वेगळा आहे हे दाखवणे मान्यच आहे.

५. आमीर खान रॅगिंग करणार्‍यांना अद्दल घडवतो हे उत्तमच आहे.

६. तो तसे करतो ह्यात त्याची ऐन प्रसंगी कसे वागावे ही तल्लख बुद्धी दिसते हे दाखवले आहे व ते लोकांनी शिकावे असा मेसेज आहे हे मान्यच आहे.

७. त्याने तसे केल्यामुळे त्याच्याबद्दल इतरांच्या मनात आदर निर्माण होतो हे मान्यच आहे.

८. पण जगात रॅगिंग घडते, ते असे असे असते, ते वाईट असते पण तरी घडत असतेच इतकाच संदेश ग्रास्प करणारे काही घटक समाजात असतात. ह्या घटकांमध्ये पौगंडावस्थेतील मुले, अशिक्षित वर्ग, असंस्कृत वर्ग असे अनेक प्रकार असू शकतात. ते गंमत म्हणून एखाद्याला तसाच शॉक द्यायचा प्रयत्न करू शकतात. ते गंमत म्हणून कनिष्ठ मुलांवर / विद्यार्थ्यांवर असे प्रकार करून पाहू शकतात.

९. तेव्हा एकुणातच, ते रॅगिंग होणे, कोणीतरी कल्पकतेने त्या रॅगिंग करणार्‍या अद्दल घडवणे, त्याच्याबद्दलचा आदर वाढणे वगैरे बाबींपेक्षाही रॅगिंगला जबरदस्त शिक्षासुद्धा असते हे दाखवणे खूप महत्वाचे आहे. त्याचा विचार व्हायला हवा इतकेच मी म्हणत आहे.

१०. त्या चित्रपटात कॉलेज प्रशासनाने दखल घ्यावी ह्या पातळीला तो विषय गेलेलाच नाही असे दाखवलेले आहे हे हानिकारक आहे. त्याने कथेला वेगळे वळण लागत असते तर ते पुन्हा कसे पूर्वपदावर आणायचे ते बघणे सहज शक्य होते. पण कॉलेज प्रशासनाला रॅगिंग झाल्याचे समजले देखील नाही हा संदेश भयानक आहे.

मी जे म्हणत आहे ते येथील अनेकांना समजले व पटले असेल, तसे असले तर त्यांनी कृपया अनुमोदन द्यावे. अन्यथा ही माझी तशीही त्या विषयावरची ह्या धाग्यावरील शेवटची पोस्ट!

Happy

थ्री इडियट बद्दल आणि एकः
हिरानीला/ मुन्नाभाई वाल्याना प्रसिद्धीसाठी या चीप विनोदांची गरज नव्हती. त्यांचे संदेश त्यांनी मुन्ना भाई आणि लगे रहो मधे हे अगदी टोन डाऊन करुन पण चांगले पोहचवलेले होते.
ठीक आहे, समाज कोणत्याही गोष्टींचे वाईट अनुकरण करणार, पण 'वाईट कामे करणारी चित्रपटातली देव माणसे आणि त्यांना नियंत्रित करु पाहणारा बोमन ईराणी खलनायक कारण त्याच्यामुळे शर्मन ने उडी मारली खिडकी बाहेर' असा उलटा संदेशही नको जायला ना?
साने गुरुजींच्या गोष्टी दाखवू नका, पण कायदा तोडणारे सगळे महान आणि त्यांचे आयुष्यात भलेच होते आणि बाकीचे बोंबलत बसतात असा संदेश पोहचवताना थोडा विचार?
लहान मुलांच्या डोळ्यावर सगळीकडे हात ठेवता येत नाहीत. मुलं काय लक्षात ठेवतात? 'गुंडे' हा पूर्ण असंबद्ध चित्रपट बघून त्यातले फक्त 'गुंडे मधे शुशु करतात' हा एक भाग लक्षात ठेवणारी दोन मुले माझ्यासमोर आहेत. चित्रपटाचा संदेश इ.इ. विसरुन 'शुशु करताना अश्शी मज्जा करुन अद्दल घडवता येते हां!!' हे लक्षात ठेवणारा दहा ते १५ वर्षाचा एक ग्रुप आहेच. (प्लीज नोट, यांच्यात तो प्रयोग यशस्वी करण्याच्या केपेबिलीटीज आहेत शाळेत ताजे ताजे शिकल्याने.)

थ्री इडियट मधले ते सीन कधीही आणि 'कॉलेजात हे चालतंच'म्हणून जस्टिफाईड नाहीत. बाकी कथा आणि मसाला चांगला होता म्हणून लोकांनी ते सहन करुन विसरले हा एकच अर्थ निघतो.
जाऊदे, हे पटत नाहीये आणि 'फक्त सानेगुरुजी किंवा किलबिल टाईप चित्रपट काढा' तेही पतत नाहीये. मधला मार्ग मनाला सुचेपर्यंत गप्प रहावे म्हणतेय.

<< ते गंमत म्हणून एखाद्याला तसाच शॉक द्यायचा प्रयत्न करू शकतात. ते गंमत म्हणून कनिष्ठ मुलांवर / विद्यार्थ्यांवर असे प्रकार करून पाहू शकतात.>> याबद्दल - १५ /२० वर्षापूर्वी असे रॅगिंगचे प्रकार घडलेले आहेत ( हा सिनेमा यायच्या आधीच) आणि त्यापायी मुलांचे जीवही गेलेल्या बातम्या ऐकल्या / वाचलेल्या आठवतात. यातले काही प्रकार इंजि. कॉलेज मधेच घडलेले होते. काही वेळा दूरच्या ठिकाणी हॉस्टेलवर रहाणारी मुले भितीने कायमची घरी आली अशा बातम्या वाचल्या होत्या. अलिकडच्या काळात रॅगिंग पुर्ण बंद केले गेलेय असे म्हणतात त्यामुळे असे प्रकार घडत नसावेत ( खरंतर कल्पना नाही).
पण या चित्रपटातली ही काही दृश्ये आक्षेपार्ह किंवा किळसवाणी वाटली होतीच.

बर्‍याच चित्रपटातुन आणि जाहिरातीतही अनेक चुकीचे संदेश जात असतात त्याबद्दल खरंच विचार व्हायला हवा.

बेफी तुमच्या ८ नंबर्च्या मुद्द्याला मी आधीच उत्तर दिलय...
मला वाटत की अ‍ॅटलिस्ट आपण जेंव्हा अशे चित्रपट पहातो त्यावेळेस आपल्या मुलाबाळांना / आजुबाजुच्या पोराटोरांना त्यातला मेसेज काय आहे तो समजाऊन घेण्यासाठी मदत करावी. हे करताना त्यांच्यातलच होऊन केल तर ते त्यांना जास्त लवकर पटत.

मुद्दा ९ आणि १० आपलच म्हणन खर यासाठी केलेली कारण मिमांसा. हे माझ मत आहे. तुमच यावर उत्तर अपेक्षित नाही.

तुमच्या साठी परत येकदा सांगतो मला कुठलाच खान आवडत नाही. तस तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे तुमचा. पण ३ ईडीयट्स हा मला आवडलेला चित्रपट आहे , याचा अर्थ तो सगळाचा सगळा चांगलाच आहे अस ही नाही. पण या सीन्सचा उल्लेख आला त्यामुळ याबद्दल बोलतोय.

एखादा खान कोणाला आवडतो की नाही ह्यावर ही चर्चा नाही आहे. चित्रपटात जे दाखवलं आहे त्यातील योग्य मेसेज मुलाबाळांना जर पालकांनी देणे अपेक्षित असेल तर चर्चाच समाप्त होईल. योग्य मेसेज सेन्सॉर बोर्डाने जबाबदारी घेऊन द्यावा ह्यावर येथे चर्चा आहे असे माझे आकलन मला सांगते.

तसेच, मी माझंच म्हणणं खरं असण्यासाठी लिहिणार ना? प्रतीपक्षाचं म्हणणं खरं आहे हे सिद्ध करायला मी कशाला धडपडेन? Happy

येकाच गोष्टीकड पहाण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. मला आर्धा भरलेला ग्लास दिसतो , तुम्हाला अर्धा रीकामा दिसतो.
तुम्ही म्हण्ता पौगंडावस्थेतील मुले, अशिक्षित वर्ग, असंस्कृत वर्ग याना चित्रपटातुन काय मेसेज द्यायचा ही जबाबदारी सेंसॉर बोर्डाची. मी म्हण्तो त्यातला चांगला संदेश काय हे इतरांना )आपल्या मुलाबाळांना आजुबाजुच्या पोराटोरांना) हे समजाऊन घेण्यात मदत करा. यात तुम्हीच पहा तुम्हाला कोणती भुमिका चांगली वाटते. जबाबदारी ढकलणे की चला आपण मिळुन करुयात.
तुमच्या ह्या मता प्रमाणे वागल तर कोणी रामायण महाभारतपण वाचु नये....कारण त्याच सेंसॉरींग करणार कोण आता..........

Pages