सुजाण आणि विचारी नागरीक तयार होत आहेत का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 January, 2015 - 04:34

..

सर्व किस्से याच महिन्याभरातील आहेत, एकापाठोपाठ घडलेले, म्हणून हा प्रश्न / लेख पडला.

...

किस्सा १ -

मित्राच्या फॅमिलीबरोबर त्याच्या खाजगी वाहनातून त्याच्याच घरी जेवायला जात होतो. वेळ रात्रीची होती, मित्र स्वत: गाडी चालवत होता. मी त्याच्यासोबत पुढे बसलो होतो आणि पाठीमागे त्याची बायको आणि मुलगा बसलेला. मुलाचे नाव होते केश्विन, वयवर्षे ५-६.. हाच या छोट्याश्या किस्स्याचा नायक!

केश्विनची त्याच्या वयाला अनुसरून सतत काहीतरी बडबड चालू होती. विषय होता चित्रपटांचा, गाण्यांचा आणि विडीओ गेम्सचा. तो जी नावे घेत होता त्यापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त मी कधी ऐकलीही नव्हती. यालाच स्मार्ट जनरेशन नेक्स्ट बोलत असावेत असा निष्कर्श काढून, मी त्या मायलेकाच्या संवादात उडी घेण्याचे टाळत, माझे अज्ञान प्रकट न करता, गप्प श्रोत्याची भुमिका बजावत होतो.

ईतक्यात गाडी एका सिग्नलला लागली. रात्रीची वेळ आणि तुरळक रहदारीचा फायदा उचलत मित्राने हळूच गाडी पुढे काढली. हे पाहताच मागून त्याच्या खांद्यावर एक थाप पडली. "बाबा सिग्नल रेड आहे ना, मग का चालू केलीस गाडी? तुला रुल्स माहीत नाहीत का? सांगू माझ्या टीचर्सना नाव? करशील असे पुन्हा? .." मित्राची अशी त्याच्या मुलाकडूनच शाळा घेतली गेलेली पाहून मला गंमत वाटली. त्याचे पप्पांच्या जागी ‘बाबा’ म्हणून हाक मारणे याचे कौतुक वाटले, तर वडीलांचा एकेरी उल्लेख करण्याचीही मौज वाटली.

पण या सर्वात लक्षात राहिलेला मुद्दा हा होता की "वाहतूकीचे नियम पाळा" हि जी गोष्ट त्याला त्याच्या आईवडीलांनी शिकवली नव्हती, किंबहुना जी त्यांनाच शिकायची गरज होती, ती तो शाळेतून शिकून आलेला. तसेच ती नुसती शिकायची गोष्ट नाही तर काटेकोरपणे आचरणात आणायची आहे हे देखील त्याला समजले होते. एवढेच नव्हे तर वडिलांच्या धाकाची भिती न बाळगता त्यांनाही तो ती शिकवत होता. हे एवढे मुल्यशिक्षण मला तरी कधी आमच्या शाळेत मिळाले नव्हते, वा मिळाले तरी ते तितक्याच गंभीरपणे घ्यायचे आहे हे आमच्या मनावर ठसवण्यात आले नव्हते. प्लीज आता माझी शाळा नका विचारू.

...

किस्सा २ -

ऑफिसमधल्या मैत्रीणीची ५-६ वर्षे वयोगटातीलच एक मुलगी सहज म्हणून आईचे ऑफिस बघायला तिच्याबरोबर ऑफिसला आली होती. दुपारची वेळ होती. आमचे जेवण कॅंटीनमध्येच उरकून आम्ही चारपाच जण पान-आईसक्रीम वगैरे चरायला बाहेर पडलो. मैत्रीणीला यातले काहीच खायची इच्छा नसल्याने तिने फक्त कसलीशी सुगंधित सुपारी घेतली. त्याचे ते छोटेसे पाकिट फोडून तोंडात रिकामे केले आणि त्याचे वेष्टण चालताचालताच फूटपाथकडेला भिरकाऊन दिले. बस्स! अजून एक शाळा बघणे नशीबात आले.

"मम्मी बॅड मॅनर्स!.." म्हणत तिची मुलगी जे सुरू झाली ते मोठ्या मुश्किलीनेच माझ्या मैत्रीणीला तिचे तोंड दाबता नाकी नऊ आले. त्यानंतर, ‘मी असे रस्त्यावर कचरा टाकायचे प्रकार कधी करत नाही, नेमके आजच असे अनवधानाने चूकून झाले, तर बाईसाहेबांना तेवढाच चान्स मिळाला’ म्हणत मैत्रीणीची सारवासारव सुरू झाली, पण आता हा किस्सा ऑफिसभर पसरणार हे भय तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते. मला मात्र त्याही परीस्थितीत तिच्या मुलीचे कौतुकच वाटत होते. त्याचबरोबर तिच्या शाळेचे आणि शिक्षकांचेही वाटलेच. आशा करतो, घरी गेल्यावर तिला धपाटा पडला नसावा!

...

किस्सा ३ -

चला लोकांचे किस्से खूप झाले आता घरातलाच एक सांगतो. तर नवीन वर्षानिमित्त घरातल्यांचेच छोटेसे स्नेहसंमेलन होते. निकटचे मित्र आणि नातेवाईक, सहपरीवार त्यांच्या चिल्ल्यापिल्यासह जमले होते. केक मेणबत्त्यांच्या साहाय्याने सजवला जात होता. अश्यातच कोणीतरी केकवरच्या मेणबत्त्या सहज मोजल्या तर १३ भरल्या. लगेच आमची आत्या म्हणाली, १३ अनलकी नंबर नको. आणि आणखी एक मेणबत्ती तिच्यातर्फे जोडण्यात आली. लागलीच तिच्या मुलीकडून वार झाला, "मम्मी असे काही नसते, हे सुपरस्टिशन आहे.." .. छकुली वयवर्षे ९-१० ..!

आत्येने लगेच हो ग्ग बाई, म्हणत आपल्या मुलीच्या आधुनिक विचारांचे आणि तिच्या स्मार्टनेसचे कौतुकच केले. पण चौदाव्या मेणबत्तीला मात्र धक्का दिला नाही. मी मात्र ‘येस्स, कर्रेक्ट छकुली’ म्हणत त्या मेणबत्तीला केकच्या बाहेरचा रस्ता दाखवला आणि छकुलीने मांडलेल्या मुद्द्याचे कौतुक कृतीतून करत तिला समर्थन दिले. अन्यथा अश्या छोट्या अंधश्रद्धा पाळण्यात काही गैर नाही अशी नवीन अंधश्रद्धा तिच्या मनात बसली असती!

...

असो,
लेख संपला

मॉरल ऑफ द स्टोरी - हेच तर शोधायचे आहे. शिर्षकात तसा अंदाज बांधला आहे, पण बाकी वाचकांवर सोडतो Happy

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पार्टाकस, काल दुसर्‍या धाग्यावर प्रदीपकुमार किती मोठा स्टार आहे हे सिद्ध करताना>>

अं अं, सिद्ध करायची गरजच नाही. तो आहेच मोठा स्टार.

मी अनेक वेळा अनुभव घेत्लय. लहान मुलं किती स्वछ आणि निरागस मनाची असतात . आणि बरेच वेळेला तीच बरोबर वागत असतात . ह्या मुलांना आईवडील च चुकीचं वागायला शिकवतात
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गुरुकुल मधे टाका. आपल्याच सणांना कशाला बंदी >>>
सण साजरे करण्याचा आणि फटके फोडून हवा आणि ध्वनी प्रदूषण करण्याचा काय संबंध ? खरा तर आपण सन साजरा करण्याच्या चुकीच्या कल्पना बंद केल्या पाहिजेत . तेव्हाच सण खर्या अर्थाने साजरे होतील .

हे किस्से खरे असतील तर मग चांगले नागरिक होणारी पिढी तयार होत आहे असे मानायला हरकत नसावी.

माझ्या पिढीत किंवा त्या आधीच्या-नंतरच्या पिढीत नागरिकांची कर्तव्ये शाळेत नागरिकशास्त्राच्या पेपराला २५ मार्काला असायची म्हणुन वाचली जायची. फक्त परिक्षेच्या पेपरापुरताच त्याचा संबंध. बाकी शाळेचा आत-बाहेर, घराच्या आत्-बाहेर, समाजात या सगळ्याची गरज कधी कोणाला वाटलीच नाही. स्वच्छता राखणे, वाहतुकीचे नियम पाळणे, कचरा कचराकुंडीत टाकणे इत्यादी गोष्टी कोणाच्याच खिजगणतीत नव्हत्या.

पण आता ह्या गोष्टींचे मिडीयातुन, शाळांतुन खुप हॅमरिंग होते. अर्थात यात वाईट काहीच नाहीय. हॅमरिंग न करताच आपण चांगल्या नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे गरजेचे होते. आपण ते केले नाही म्हणुन आजचे हे हॅमरिंग होतेय.

ह्या हॅमरिंगची चांगली फळे दिसु लागलीत असे आता म्हणायला हवे. खुप चांगली गोष्ट आहे ही.

स्पार्टाकस, काल दुसर्‍या धाग्यावर प्रदीपकुमार किती मोठा स्टार आहे हे सिद्ध करताना आपण त्याने किती मोठ्या हिरोईनींबरोबर काम केले आहे याची लिस्ट दिली होती, तो वेगळा का? तिथेही प्रदीप १, २ आहे का?

एखादा नट खुप मोठ्ठा स्टार असु शकतो पण त्याचबरोबर तो अभिनयात माठही असु शकतो. जे लोक चित्रपट पाहताना केवळ स्टारकडे न पाहता त्याचा अभिनयही पाहु इच्छितात त्यांना अशा माठांचा त्रास होऊ शकतो. भारतीय चित्रपटस्रूष्टीत असे स्टार खुप झालेत जे अभिनयात माठ होते. आणि अभिनयात स्टार असणारे कित्येकजण स्टारपदाच्या आसपासही पोचू शकले नाही. इथली गणिते वेगळी आहेत. Happy

चेतन गुगळे, तुमचा प्रतिसाद नंतर वाचला. तुमचे मतही अगदी बरोबर आहे. मी स्वतः अशा मुलांचा अनुभव घेतलाय. अशा मुलांशी साधे बोलणे हाही एक खुप फ्रस्ट्रेटींग अनुभव आहे.

धन्यवाद साधना.
<< मी स्वतः अशा मुलांचा अनुभव घेतलाय. अशा मुलांशी साधे बोलणे हाही एक खुप फ्रस्ट्रेटींग अनुभव आहे. >>
अगदी, अगदी. आपलेच डोके दुखायला लागते. अशा मुलांना समजावण्यास जावे तर त्यांना आपल्याला चिडविण्यात अजुनच आनंद वाटतो. एका बड्या उद्योगपतीची मुलगी तर ट्युशन सुरु असताना चित्रपटातील / अल्बममधील हिंदी इंग्रजी गाणी गात सुटायची, मध्येच किंचाळायची. तिला असे नको करु सांगितले तर मला "यू आर अ फ्रिक" असे म्हणायची.

साधना,
सहमत १०० टक्के .. मॉरल ऑफ द स्टोरी!

नागरिकशास्त्राच्या पेपराला २५ मार्काला असायची म्हणुन वाचली जायची. Happy

ऋन्मेऽऽष - ह्या तिन्ही एपिसोड मधे तुमची गर्लफ्रेंड ( जिच्याशिच तुम्ही लग्न करणार आहात ती ) कुठे होती? तिचा उल्लेख नसणारा लेख तुम्ही लिहुच कसा शकलात?

Pages