सुजाण आणि विचारी नागरीक तयार होत आहेत का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 January, 2015 - 04:34

..

सर्व किस्से याच महिन्याभरातील आहेत, एकापाठोपाठ घडलेले, म्हणून हा प्रश्न / लेख पडला.

...

किस्सा १ -

मित्राच्या फॅमिलीबरोबर त्याच्या खाजगी वाहनातून त्याच्याच घरी जेवायला जात होतो. वेळ रात्रीची होती, मित्र स्वत: गाडी चालवत होता. मी त्याच्यासोबत पुढे बसलो होतो आणि पाठीमागे त्याची बायको आणि मुलगा बसलेला. मुलाचे नाव होते केश्विन, वयवर्षे ५-६.. हाच या छोट्याश्या किस्स्याचा नायक!

केश्विनची त्याच्या वयाला अनुसरून सतत काहीतरी बडबड चालू होती. विषय होता चित्रपटांचा, गाण्यांचा आणि विडीओ गेम्सचा. तो जी नावे घेत होता त्यापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त मी कधी ऐकलीही नव्हती. यालाच स्मार्ट जनरेशन नेक्स्ट बोलत असावेत असा निष्कर्श काढून, मी त्या मायलेकाच्या संवादात उडी घेण्याचे टाळत, माझे अज्ञान प्रकट न करता, गप्प श्रोत्याची भुमिका बजावत होतो.

ईतक्यात गाडी एका सिग्नलला लागली. रात्रीची वेळ आणि तुरळक रहदारीचा फायदा उचलत मित्राने हळूच गाडी पुढे काढली. हे पाहताच मागून त्याच्या खांद्यावर एक थाप पडली. "बाबा सिग्नल रेड आहे ना, मग का चालू केलीस गाडी? तुला रुल्स माहीत नाहीत का? सांगू माझ्या टीचर्सना नाव? करशील असे पुन्हा? .." मित्राची अशी त्याच्या मुलाकडूनच शाळा घेतली गेलेली पाहून मला गंमत वाटली. त्याचे पप्पांच्या जागी ‘बाबा’ म्हणून हाक मारणे याचे कौतुक वाटले, तर वडीलांचा एकेरी उल्लेख करण्याचीही मौज वाटली.

पण या सर्वात लक्षात राहिलेला मुद्दा हा होता की "वाहतूकीचे नियम पाळा" हि जी गोष्ट त्याला त्याच्या आईवडीलांनी शिकवली नव्हती, किंबहुना जी त्यांनाच शिकायची गरज होती, ती तो शाळेतून शिकून आलेला. तसेच ती नुसती शिकायची गोष्ट नाही तर काटेकोरपणे आचरणात आणायची आहे हे देखील त्याला समजले होते. एवढेच नव्हे तर वडिलांच्या धाकाची भिती न बाळगता त्यांनाही तो ती शिकवत होता. हे एवढे मुल्यशिक्षण मला तरी कधी आमच्या शाळेत मिळाले नव्हते, वा मिळाले तरी ते तितक्याच गंभीरपणे घ्यायचे आहे हे आमच्या मनावर ठसवण्यात आले नव्हते. प्लीज आता माझी शाळा नका विचारू.

...

किस्सा २ -

ऑफिसमधल्या मैत्रीणीची ५-६ वर्षे वयोगटातीलच एक मुलगी सहज म्हणून आईचे ऑफिस बघायला तिच्याबरोबर ऑफिसला आली होती. दुपारची वेळ होती. आमचे जेवण कॅंटीनमध्येच उरकून आम्ही चारपाच जण पान-आईसक्रीम वगैरे चरायला बाहेर पडलो. मैत्रीणीला यातले काहीच खायची इच्छा नसल्याने तिने फक्त कसलीशी सुगंधित सुपारी घेतली. त्याचे ते छोटेसे पाकिट फोडून तोंडात रिकामे केले आणि त्याचे वेष्टण चालताचालताच फूटपाथकडेला भिरकाऊन दिले. बस्स! अजून एक शाळा बघणे नशीबात आले.

"मम्मी बॅड मॅनर्स!.." म्हणत तिची मुलगी जे सुरू झाली ते मोठ्या मुश्किलीनेच माझ्या मैत्रीणीला तिचे तोंड दाबता नाकी नऊ आले. त्यानंतर, ‘मी असे रस्त्यावर कचरा टाकायचे प्रकार कधी करत नाही, नेमके आजच असे अनवधानाने चूकून झाले, तर बाईसाहेबांना तेवढाच चान्स मिळाला’ म्हणत मैत्रीणीची सारवासारव सुरू झाली, पण आता हा किस्सा ऑफिसभर पसरणार हे भय तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते. मला मात्र त्याही परीस्थितीत तिच्या मुलीचे कौतुकच वाटत होते. त्याचबरोबर तिच्या शाळेचे आणि शिक्षकांचेही वाटलेच. आशा करतो, घरी गेल्यावर तिला धपाटा पडला नसावा!

...

किस्सा ३ -

चला लोकांचे किस्से खूप झाले आता घरातलाच एक सांगतो. तर नवीन वर्षानिमित्त घरातल्यांचेच छोटेसे स्नेहसंमेलन होते. निकटचे मित्र आणि नातेवाईक, सहपरीवार त्यांच्या चिल्ल्यापिल्यासह जमले होते. केक मेणबत्त्यांच्या साहाय्याने सजवला जात होता. अश्यातच कोणीतरी केकवरच्या मेणबत्त्या सहज मोजल्या तर १३ भरल्या. लगेच आमची आत्या म्हणाली, १३ अनलकी नंबर नको. आणि आणखी एक मेणबत्ती तिच्यातर्फे जोडण्यात आली. लागलीच तिच्या मुलीकडून वार झाला, "मम्मी असे काही नसते, हे सुपरस्टिशन आहे.." .. छकुली वयवर्षे ९-१० ..!

आत्येने लगेच हो ग्ग बाई, म्हणत आपल्या मुलीच्या आधुनिक विचारांचे आणि तिच्या स्मार्टनेसचे कौतुकच केले. पण चौदाव्या मेणबत्तीला मात्र धक्का दिला नाही. मी मात्र ‘येस्स, कर्रेक्ट छकुली’ म्हणत त्या मेणबत्तीला केकच्या बाहेरचा रस्ता दाखवला आणि छकुलीने मांडलेल्या मुद्द्याचे कौतुक कृतीतून करत तिला समर्थन दिले. अन्यथा अश्या छोट्या अंधश्रद्धा पाळण्यात काही गैर नाही अशी नवीन अंधश्रद्धा तिच्या मनात बसली असती!

...

असो,
लेख संपला

मॉरल ऑफ द स्टोरी - हेच तर शोधायचे आहे. शिर्षकात तसा अंदाज बांधला आहे, पण बाकी वाचकांवर सोडतो Happy

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान आहे ! आमच्या मुलांनी पण आमची अशी शाळा खुप वेळा घेतली आहे. अजुन ही घ्रेतात.

दिवाळिला फटाके न फोडने टिचर च्या सांगण्यावरुनच बंद झालेल.

दिवाळिला फटाके न फोडने टिचर च्या सांगण्यावरुनच बंद झालेल. > अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गुरुकुल मधे टाका. आपल्याच सणांना कशाला बंदी ? Wink Light 1

फटाकेच बंद करायला सांगत आहेत ना, फराळ तर नाही ना. तर त्यावरून धार्मिक सणांविरुद्ध कारस्थान आहे अशी शंका घेत आपलेच मन कलुषित करण्यात काय अर्थ. (आपण दिवा दाखवल्याने आपले वाक्य उपरोधानेही असू शकते, तसे असल्यास हे असा विचार करणार्‍या इतरांसाठी आहे असे समजावे)
पण यावरून मनात आले, सर्वधर्मसमभाव आणि समानतेची शिकवण देखील शाळांमध्ये मिळेल आणि ते विचार आचरणात आणतानाचा किस्सा क्रमांक ४ मला यात जोडता येईल तो एक सुदिन.

अर्थात असा किस्सा कोणाच्या अनुभवातही असेल, वा वर उल्लेखलेल्यासारखे ईतरही असतील, जाणून घेण्यास उत्सुक.

अवांतर - गुरू कूल मोहोब्बते का?

पहिले मत म्हणजे धाग्यात नेहमीचा फाफटपसारा टाकण्याचा मोह बराच आवरलेला दिसत आहे.
बाकीची मते नंतर..

धाग्यात नेहमीचा फाफटपसारा टाकण्याचा मोह बराच आवरलेला दिसत आहे.
>>>>>>>
सहमत आहे.
नवीन वर्षाचा संकल्पच आहे तसा..
अचूक धागा, ठाम मत!

बाकीच्या मतांच्या प्रतीक्षेत Happy

अवांतर - गुरू कूल मोहोब्बते का? >>> मोहोब्बते नीट पाहीला असतात तर हा प्रश्न विचारला नसता तुम्ही. त्यात नारायण शंकर राजला स्पष्ट सांगतो की आपल्या इथे गुरूकुलात कुठलेही सणवार साजरे करण्याची पद्धत नाही Happy

र्म्द Lol

जोक्स अपार्ट - हो लहान मुलांना हे समजते व ते वेळोवेळी दाखवतात हे खरे आहे. पण हे नंतर नक्की कधी बदलते माहीत नाही.

बाकी फटाक्यांना यात आणू नका. पहिली गोष्ट म्हणजे कायदा तोडणे आहे, कदाचित दुसरीही. ती अंधश्रद्धा व फटाके उडवण्यात तसे काही नाही. ते अयोग्य आहे असे अनेकांचे मत आहे व ते ठीक आहे (फटाके उडवण्याच्या विरोधाशी मी सहमत नाही). पण वरचे दोन व यात फरक आहे.

भारतात असताना पहिली दोन उदाहरणे (अगदी सुशिक्षित समाजातील) अनेक बघितली व प्रत्येक वेळेस डोक्यात तिडीक आल्याचे लक्षात आहे.

१३ नंबर बद्दल वाचून मजा वाटली. १३ बद्दलली भीती पाश्चात्य आहे. मी भारतीय संस्कृतीत, आपल्या रीतीरिवाजात कधी १३ ला वेगळे वा अशुभ समजलेले पाहिलेले नाही.

मायबोलीवर किती धागे काढावेत याबद्दल टीचर मुलांना काही शिकवत नसाव्यात बहुधा, नाहीतर आणखी एक किस्सा झाला असता. Wink

आमच्या घरी सगळेजण छोटा-मोठा कचरा जसे चॉकलेटचे रॅपर, कागद वै. असे काही असेल तर सरळ खिडकीतुन बाहेर टाकतात पण याच सगळयांना मात्र घरात अजिबात कचरा चालत नाही जसे लेक स्वतःच्या हाताने जेवताना खाली सांडते म्हणुन तिला आपण भरवायचे. मी सांगितले की कचरा बाहेर टाकु नका तर त्यांच्या नजरेत मी जास्त शहाणी. म्हणुन मी आता त्यांना न शिकवता लेकीलाच रस्त्यात कचरा न टाकण्याबद्दल शिकविले. आता जर घरातील मंडळी कचरा बाहेर फेकताना दिसले तर लेकच (४ वर्षे) त्यांना ओरडते आणि तुम्ही कसे 'wrong' करताय असे त्यांना सांगत राहते. (मी तिला फक्त रस्त्यात कचरा न टाकण्याबद्दल शिकविले दुसर्यांना शिकविण्याबद्दल नाही)

हल्ली घरातील मंडळी कचरा बाहेर फेकत नाही. आता हे त्यांना मनापासुन करावसे वाटते की लहानगीने आपला अपमान करु नये असे वाटते हे मला माहित नाही. पर 'जो भी हो रहा है वो अच्छाही हो रहा है'

ह्म्म तर हल्लीची मुलांना चांगले काय आहे अन वाईट काय आहे हे बरोबर कळते आणि ते वेळप्रसंगी बहुतेक बरोबर वागतात.

छान किस्से ऋ.

माझ्याकडे ही होतात हे किस्से. अर्थात कचर्याबद्दलचे. (कारण तिचा बाबा स्वतःच ट्राफिकचे रुल्स मोडत नाही कधीच. )आणि मी घरच्या आणि सार्वजनिक स्वच्छतेचे संस्कार केलेत Happy त्यामुळे दुसरं कुणी कचरा फेकतांना दिसलं की ती थांबवतेच.

फारेण्ड, फटाक्यांच्या बाबतीत सहमत. आपले आपले मत. मी स्थळ काळ वेळेचे भान ठेवावे या मताचा आहे.

13 नंबर पाश्चात्य समाजात अशुभ समजला जातो तरीही आपल्यातही असे बरेच आहेत जे रिस्क नको म्हणून याला अशुभ मानतात.
तसेही अंधश्रद्धेला लॉजिक नसतेच, मग यातही कशाला लॉजिक शोधा. Happy

<< मॉरल ऑफ द स्टोरी - हेच तर शोधायचे आहे. शिर्षकात तसा अंदाज बांधला आहे, पण बाकी वाचकांवर सोडतो >>
शीर्षकानुसार लेखाचं तात्पर्य / सार << सुजाण आणि विचारी नागरीक तयार होत आहेत का? >> असं असेल तर तसं मला तरी वाटत नाही. याउलट आजची पिढी ठाम आहे इतकंच मत या किश्श्यांमधून काढता येईल. योगायोगाने तुमच्या तिन्ही किश्श्यांमधील मुलांची सकारात्मक होती आणि ती त्यांनी ठामपणे मांडली. हल्लीची पिढी कुणाच्याच आणि स्वत:च्याही बापालादेखील भीत नाही. बापाला एकेरीत संबोधायची फॅशन या वृत्तीला अजुनच खतपाणी घालते. स्वतःची चूक / बरोबर कुठलीही मते तितक्याच ठामपणे सर्वांसमोर मा़ंडते.

मी दोन्ही प्रकारची मुले पाहिली आहेत - सकारात्मक विचारांची आणि नकारात्मक विचारांची देखील. तुम्ही साधारणतः वय वर्षे १० अथवा त्याखालची मुले यांचे अनुभव मांडले आहेत. वय वर्षे १० ते १५ मधील मुलांचे अनुभव देखील मांडा. शिवाय कुठलाही निष्कर्ष काढायचा असला (तुम्ही किंवा वाचकांनी देखील) तरी तीन जणांबद्दलचे अनुभव हे प्रमाण फारच कमी होईल. मी फावल्या वेळेत मुलांच्या Tuition Classes मध्ये शिकविण्याचे काम केले आहे. एका वर्गात २०+ विद्यार्थी. सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची विचारसरणी असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जवळपास सारखेच आहे [निम्मे, निम्मे]. जे माझ्या मते अतिशय घातक आहे. लहान मुलांमध्ये चांगल्या विचारसरणीचे प्रमाण ९०% अथवा अधिक असायला हवे कारण जसजसे वय वाढत जाते त्या प्रमाणे हळुहळु चांगले लोक एकतर निष्क्रिय बनतात अथवा बदमाश तरी. पुढे एका विशिष्ट वयोगटानंतर (साधारण पस्तिशी चाळिशीनंतर) लोकांमध्ये लबाडीचे प्रमाण वाढु लागते. या वयामध्ये कर चुकवेगिरी, लाच देणे / खाणे, इतर कायदे मोडणे, मित्रांना, नातेवाईकांना फसविणे याबद्दल मनात वाईट वाटण्याचे प्रमाण कमी / नष्ट होते आणि दुर्जन व्यक्ति घडण्याचे प्रमाण वाढु लागते. हल्लीचा काळ तर झपाट्याने बदलत चालला असल्याने पंचविशी तिशी तच तरूण बनचुके / सराईत होत चालले आहेत. पुन्हा त्यावर कुल डूड, चलता है, यही प्रॅक्टीकल जिंदगी है अशी उलट उत्तरेही ऐकायला मिळत आहेत.

तेव्हा वय वर्षे १० च्या खाली तीन चांगली मुले दिसली म्हणून सुजाण नागरिक बनत चालले आहेत असा निष्कर्ष काढण्यात घाई होत आहे असेच म्हणेन. माझ्या आठवणीप्रमाणे पुर्वी तर या वयोगटात सर्वच मुले चांगली असायची कारण त्यांना शाळेत जे शिकविले जायचे ते पुस्तकी आदर्शवादाप्रमाणे सारे काही चांगलेच असायचे. [फक्त पालकांची भीती असल्याने थेट पालकांच्या चूका दाखवून त्यांना ते झापत नसत म्हणून त्यांचा चांगुलपणा असा आरशासारखा चमकून दिसत नसे.] हळुहळु मोठे होत असताना त्यांना आदर्शवाद आणि व्यावहारिकता यांतला फरक कळु लागायचा आणि त्यातले अनेक जण आयडिअल न होता प्रॅक्टीकल होऊ लागायचे. तेव्हा आताच्या ह्या पिढीतलेही आपला चांगुलपणा अजून किती काळ टिकवितात याचे निरीक्षण करा. जस्ट वेट अ‍ॅन्ड वॉच.

अवांतर

केश्विन म्हणजे आई केतकी + बाबा अश्विन असे आहे काय? नाही सध्या असे अनेक ठिकाणी पाह्यला मिळते आहे. आई प्रज्ञा + बाबा प्रदीप = मुलगा प्रदीप. अर्थात या सुत्रानुसार आई ऋचा + बाबा उन्मेष = मुलगा ऋन्मेष असे देखील होऊ शकते. (पण तुमचे तसे नाही, तुमचे नाव आजीच्या सल्ल्यानुसार ठेवण्यात आले आहे हे ठाऊक आहे.)

मोहोब्बते मधले गुरुकुल हे ब्रिटीश स्टाईल किंवा कॉन्व्हेंट शाळेसारखे असल्याने तिथे भारतीय सणवार हे वर्ज्यच असणार.

आई प्रज्ञा + बाबा प्रदीप = मुलगा प्रदीप. >>>>>>>> ??????? हे कसकाय बुवा??

केवढं मोठ्ठं लिहिता हो तुम्ही चेसुगु.

सहमत आहे चेतनजी, आजची पिढी ठाम आणि बिनधास्त आहे, पण त्यांच्या याच वृत्तीचा फायदा घेत नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचारांची पेरणी करता आली तर ते उत्तमच ठरेल ना.
तसेच जातीयवादाची धार कमी करणे,,, अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि ग्रहतार्‍यांवर अवलंबणे कमी करणे,,, स्त्री-पुरुष समानतेचे संतुलन इत्यादी बाबींतही सुधारणा होतील.
कारण हि पिढी ठाम आहे, ती तुमचे जुनाट विचार पुढे घेऊन जाणारी नाही.. प्रश्न आहे तर आधुनिक विचार फीड करण्याचा, ते आपलेच काम आहे.

अवांतरला प्रत्युत्तर - केश्विन हे नाव मी असेच बदलून दिलेय, हे नाव कोणाचे असल्यास योगायोग समजा Happy

@ मोहोब्बते - ते सणांना बंदी वगैरे फक्त आमिताभचे काटाकडक कॅरेक्टर रंगवायच्या नादात आले होते. स्वत:ची प्रतिष्ठा जपण्याच्या नादात परंपरा गेटच्या बाहेर आणि आत फक्त अनुशासन!

प्रज्ञाचा प्र
प्रदीपचा दीप
= प्रदीप

आता प्रदीप प्रदीप दोन दोन झाले हा निव्वळ योगायोग म्हणा किंवा ड्रॉबॅक ऑफ फॉर्मुला Happy

अरे आता तुम्ही सारखे सारखे अमिताभ आणि गुरुकुल आणु नका रे मधे मग ऋन्मेषने शा.खा. आणला तर उगाचच चिडाल त्याच्यावर Wink

Paradip हे ओरीसातील एक बंदर आहे! खपून जाईल हे पण नाव!>> फार हसले. शेल्डन सारखा सर्कॅझम अलर्ट देत जा. त्याचाही इथे काहीच उपयोग नाही.

शनीवारच्या कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये बिबळ्याचे नाव प्रदिप असते. ऋन्मेषच्या पहिल्या शाखा आणी गफ्रे नसलेल्या लेखाबद्दल अभिनन्दन!

पण बाबाचं आणि मुलाचंही नाव प्रदीप च नसणार ना. >>

मग पाचवा हेन्री, आठवा चार्ल्स च्या धर्तीवर दुसरा प्रदीप म्हणायचं ना

स्पार्टाकस, काल दुसर्‍या धाग्यावर प्रदीपकुमार किती मोठा स्टार आहे हे सिद्ध करताना आपण त्याने किती मोठ्या हिरोईनींबरोबर काम केले आहे याची लिस्ट दिली होती, तो वेगळा का? तिथेही प्रदीप १, २ आहे का?

Pages