महेंद्र सिंघ धोनी -- एक कसोटी पर्व .

Submitted by विश्या on 31 December, 2014 - 00:39

काल झालेल्या मेलबर्न कसोटीत भारताने सामना अनिर्णीत ठेऊन कसोटी शृंखला गमावली पण त्या पेक्षा हि एक अतिशय हुशार, चलाख , धाडसी, क्रिकेटर जो पुढे कसोटी मध्ये पांढर्या कपड्यात कधीही दिसणार नाही असा म . धोनी याला गमावले आहे . हो गमावले आहे त्याने भारताबाहेर जरी काही सामने जिंकले नसले तरी आपण त्याच्या इतर कामगिरीवर पाहायला हवे होते , त्याच्यावर टीका न करता त्याला धीर द्यायला हवा होता .
2.jpg
२८ वर्षानंतर भारताने कसोटीत अव्वल स्थान फक्त माहीच्या कॅप्तानी मधेच मिळवले होते , कोणत्याही क्षणी कधीच, कोणत्याही परीस्तीत स्वताला अगदी व्यवस्तीत adjust करून तो शेवट पर्यंत सामना जिंकण्याचा प्रयत्न करत असे . कसोटी मालिका गमावण्याचा दबाव त्याच्यावर होताच पण BCCI आणि त्याच्यामध्ये पण काहीतरी झालेच असावे त्यामुळेच माही सारख्या लढवय्या ने असा निर्णय घातला असेल .(विधान जर तर चे जरी असले तरी माही बद्दल खूप विश्वास आणि त्याच्या प्रत्येक निर्णयांनी रचलेला इतिहास या वरून केले आहे ) धोनी इतका शांत आणि हुशार यस्टिरक्शक भारताला न कधी मिळाला न कधी मिळेल , संघ अडचणीत असताना स्वतावर जबाबदारी घेऊन सामने जिंकून देणे , जिंकताना शेवट तर आपल्याच style ने करणे , प्रत्येक खेळाडू ला सांभाळून घेणे , मैदानात कधीही कोणावरही चीड चीड न करता शांत पने परिस्तिति हाताळणे , आणि सामना जिंकला तरी फक्त स्टंप घेऊन कसलाही अग्रेसिव नेस न दाखवता मैदान सोडणे हि अनेक वैशिष्टे धीनिचीच आहेत .
कोणत्याही क्रिकेट प्रकारामध्ये त्याने स्वताला चांगला संघनायक सिद्ध केले आहे , कितीतरी शृंखला जिंकून दिल्या आहेत , किती सांगता येईल तेवढे कमीच एव्द्यावरच थांबतो ,

मी धीनीचा एक सच्चा चाहता , त्याच्या खेळ शैलीचा एक भक्ताच म्हणा तरी चालेल अश्या खेळाडूला दबाव तंत्रामुळे रिटयर्मेण्ट घ्यावी लागल्यामुळे भारतीय संघाला येतुन पुढे कधीच महिसारखा चांगला यस्टिरक्शक व संघनायक मिळणे नाही .

Hats ऑफ टू You माही
1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवस मावळला! पण महेंद्रसिंगच्या कसोटी पर्वावर कोणाला प्रतिसादाचे एक फूल चढवावेसे नाही वाटले. Sad

असो, फुरसतमध्ये, वा छोट्या छोट्या प्रतिसादांमध्ये, मी नक्की लिहेन.. कारण फार्रच ईंटरेस्टींग कॅरेक्टर. कधी याचा फॅन बनावेसे वाटावे वा कधी याची कमालीची चीड यावी, अश्या दोन्ही स्थिती अनुभवल्यात.

मला वाटते आपल्या माबो वर क्रिकेट रसिकापैकी कोणीच धोनी चे चाहते नसावेत , त्यामुळे त्यांना प्रतिसाद देण्यात रस नसेल ,,,,,,, पण काही माज्यासार्के चाहते आहेत धोनी चे जे त्याच्या खेळ प्रणालीला कायमच सलाम करतील ........

धोनीचे चाहते माबोच नाही तर जगभरात कमीच असतील, तुलना सचिन, दादा, वा हल्लीचा तो कोहली वगैरेंशी करता. कारण चाहते बनवण्यासाठी लूकमध्ये किंवा फलंदाजीच्या स्टाईलमध्ये एक एक्स फॅक्टर लागतो. लूक मध्ये त्याच्या तो होता सुरुवातीला , जो मासला अपील करू शकेल, पण लांबसडक केस कापले आणि तो गेला. फलंदाजीमध्येही त्याचे धोबीपछाड फटके एका ठराविक पण संख्येने मोठ्या वर्गाला आकर्षित करतील असे होते, मात्र ज्या खेळपट्टीवर त्याचे तंत्र उघडे पडायचे तिथे तो बघायलाही त्रासदायक व्हावे ईतका केविलवाणा वाटायचा.

विराट कोहलीचं पहिल्या कसोटीतल्या नेतृत्त्वाचं थोडं कौतुक झालं. पण ते कौतुक जास्त त्याच्या फलंदाजीचं होतं. लहान मूल जसं उभं राहिलं की ‘राजू उभा राहिला, आम्ही नाही पाहिला’ असं म्हणत सारेजण कौतुक करतात. आता कौतुकाचं उभं राहणं संपणार, आता जबाबदारीचं येणार. त्यात विराटला त्याचं टेंपरामेंट सांभाळावं लागणार आहे. आक्रमकता, थोडा उद्धटपणा मलाही आवडतो. नव्या पिढीचा तो गुणधर्म आहे. धोनी बर्फ होता, विराट हा निखारा आहे, हे इतपत ठीक आहे. पण निखाऱ्याची उबच मिळते असं नाही, चटकेसुद्धा बसतात. ते आपल्याला नको आहेत.

मला वाटतं की कसोटी क्रिकेटमध्येही धोनीची आठवण चटकन पुसली जाणार नाही.
द्वारकानाथ संज्गिरी यांनी आपल्या ब्लोग मध्ये लिहिलेलं विधान .

मला वाटतं की कसोटी क्रिकेटमध्येही धोनीची आठवण चटकन पुसली जाणार नाही.
>>>>>
कसोटीमध्ये धोनीने एक फलंदाज म्हणून फार आठवणीच ठेवल्या नाहीयेत. कर्णधार म्हणून ठेवले आहेत ते फक्त व्हाईटवॉश. त्याच्या आठवणी उलट पुसल्या जाव्यात म्हणून तोच प्रार्थना करेन.

कोहलीची त्याची तुलना फॅन फॉलोईंगवरून केली होती, कसोटी कर्णधार म्हणून नाही. किंबहुना एखाद्या सामन्यानंतर कोहलीला अश्या तुलनेत घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही.

कर्णधार म्हणून आपला दादाच !

महेंद्रसिंग धोनी याचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी अनपेक्षित व धक्कादायक असला तरी हा निर्णय तडकाफडकी किंवा एका दिवसात झालेला नसल्याचे समोर आले आहे. धोनीच्या निवृत्तीला रवी शास्त्री आणि विराट कोहली यांची जवळीक कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

>>>>>>>>

हे वाचा, पटणेबल वाटतेय.
सविस्तर बातमी इथे वाचा - http://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/Dhoni-Ravi-Shastri...

किंबहुना रवीशास्त्रीच्या नेमणूकीपासून उडत उडत काहीबाही खबरी कानावर येत होत्या, धोनी आणि त्याच्यातील बेबनावाबद्दल, आता खात्री पटली.

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या ईतका पैसा आला आहे ना, की प्रत्येकाला इथे आपले वर्चस्व राखायचे आहे आणि इतरांनी गाजवलेले खटकत आहे.

महेंद्रसिंग धोनी हा उत्कृष्ठ कप्तान होता. हा त्याच्या नेतृत्वाखाली भारत परदेशात जास्त जिंकला नाही हे सत्य आहे परंतु नाहीतरी कोणाच्या नेतृवाखाली भारतीय संघाने परदेशात अफाट कामगिरी केली.मोठीमोठी बिरुदे लावणारे खेळाडू संघात असतानाही भारत हा परदेशात हरायचाच.नुझीलन्डला आपला दौरा होता सामने काहीतर ५ कि ६ ला सुरु व्हायचे चुकून सात वाजता जाग आली नि सामना लावला तर शेवटची जोडी खेळत असायची . धोनीने भारताला १९८३ नंतर वर्ल्ड कप जिंकून दिला हि त्याची सर्वात मोठी कामगिरी.

तश्या अनेक कारणांची यादी मिळाली आहे धोनीच्या निवृतीबद्दल पण सत्य कारण मिस्तर धोनी कडूनच कळेल , ते हि अतिशय शांत आणि हसर्या चेहऱ्याने तो अचानकच कारण हि जाहीर करेल .... पण व्हाईट वाश हि अनेक करण्धाराना मिळाला आहे त्यात धोनी पण ,,, सौरव दादा बद्दल सांगत असाल तर ज्यावेळी बोउन्सर चा नियम आला त्या नियामापासूनच दादाची कारकीर्द संपली होती ,,,,,,,,,, कित्येक गोलंदाज दादा ला बोउन्सर वर बकरा बनवत होते शिवाय आधुनिक खेळात दादाचा टिकाव लागणे शक्यच नव्हते .

धोनीचे चाहते लाखो असतील.

धोनी मोठा एबल आणि कूल कप्तान होता. एकाच माणसाला एकाच खेळातील तीन तीन प्रकारांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी नोंदवणे (व तेही कप्तान, यष्टीरक्षक आणि फलंदाज अश्या तिहेरी भूमिकांमधून) हे नक्कीच अतिशय अवघड असावे. धोनीने त्याच्या निर्णयाचा गाजावाजा केला नाही ह्यातून तो बहुधा अतिशय परिपक्व प्रवृत्तीचा माणूस असणार असे म्हणता येईल.

माझ्या मनातील विचारांनुसार इतर कप्तानांची धोनीबरोबर तुलना केल्यासः

१. सुनील गावसकर चलाख कप्तान होता. पण त्यावेळेसची मनोवृत्ती 'गावसकर गेला, आता काय राहिले मॅचमध्ये' अशी होती. धोनीने हे होऊ दिले नाही. धोनीच्या कप्तानीमध्ये तेंडुलकर, द्रविड, विराट, युवराज, रैना आणि इतर कित्येक चांगले फलंदाज सातत्यापूर्वक खेळले व कोणा एकावर कधी अतिरिक्त भार पडला नाही. गावसकर खेळाडू म्हणून थोडा स्वार्थी वाटायचा तसा धोनी वाटला नाही.

२. कपिलदेव अत्यंत देशभक्त कप्तान होता. भारत हरायला आला की कपिलचा चेहरा रडवेला झालेला असायचा. कपिलला शूर खेळाडू म्हणायला हवे. स्वतः परफॉर्म करेल, स्वतः बळी मिळवेल, स्वतः झंझावाती खेळेल आणि मग इतरांवर परफॉर्मर्न्सचे दडपण आणेल अश्या प्रकारचे त्याचे वर्तन असायचे. पण त्याबाबतीत धोनी उजवा ठरवावा लागेल. ह्याचे कारण धोनीने 'आपण खेळलो नसलो तरीही दुसरा खेळेल' हे नेहमी बघितले. थोडक्यात, निव्वळ भावनिकता आणि जिगरबाज खेळ करणे एखाद्याला कप्तान बनवण्यास पुरेसे नसते हे त्याने सिद्ध केले.

३. अझर उद्दीन हा बराच काळ केवळ कप्तान असल्यामुळे संघात होता अशी अवस्था झालेली होती. अझरची कप्तानी खरे तर मला नीटशी आठवतही नाही. त्याने कप्तान म्हणून काही विशेष क्लृप्त्या लढवल्याचे स्मरत नाही. पारंपारीक प्रणालीने त्याने कप्तानी केलेली असावी. धोनी त्याहून खूपच उजवा.

४, रवी शास्त्री, वेंगसरकर, श्रीकांत (ह्यापैकी कसोटी कर्णधार कोण किती वेळा होते आणि होते की नव्हते हे तूर्त माहीत नाही) ह्यांना विचारात घेण्याचे प्रयोजन वाटत नाही.

५. मात्र सौरव गांगुली हा एकच असा कर्णधार आहे जो धोनीला वरचढ ठरावा. पुन्हा एकदा भारतीयांची मानसिकता 'तेंडुलकरच गेला, आता काय राहिलंय मॅचमध्ये' अशी होती तेव्हाच्या काळात त्याने सांघिक भावना निर्माण केली. सचिन, द्रविड, कुंबळे आणि तो स्वतः ह्या चार खांबांवर त्याने संघाचा डोलारा उभा केला होता. एक भारतीय कप्तान परकीय भूमीत विजयाचा जल्लोष करताना शर्ट काढून तो फिरवू शकतो हा निर्जीव आणि मृत झालेल्या मानसिकतेत घडवून आणलेला अचाट बदल गांगुलीच्या खात्यात जमा करावा लागेल. तळापर्यंत जिगरबाज खेळाडू नसताना, दरारा बसेल अशी आक्रमता ठेवून त्याने प्रतिस्पर्ध्यांचा समाचार घेतलेला होता. तो स्वतः एक अष्टपैलूही होता. तशीही बंगाली माणसे अतिशय श्रूड असतात. गांगुली अपवाद नव्हता. त्याचा संघावर वचक होता. वचक असणे चांगले की वाईट हा प्रश्न निराळा! सचिनचा समकालीन असल्यामुळे काहीसा झाकोळला गेलेला गांगुलीचा फलंदाज म्हणूनचा परफॉर्मन्ससुद्धा तसा अद्भुतच आहे. धोनीमध्ये गांगुलीतील अनेक गुणवैशिष्ट्ये असायला हवी होती असे वाटते. तसे असते तर तो अधिक वरचढ कर्णधार ठरला असता.

नथिंग टेकिंग अवे फ्रॉम धोनी! महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटला एक अविस्मरणीय काळ मिळवून दिला ह्यात शंकाच नाही. हॅट्स ऑफ!

-'बेफिकीर'!

>>कारण चाहते बनवण्यासाठी लूकमध्ये किंवा फलंदाजीच्या स्टाईलमध्ये एक एक्स फॅक्टर लागतो
अतिशय विनोदी विधान.... मला वाटते की निदान भारतात तरी सच्चे चाहते बनतात ते त्या खेळाडूतली पॅशन बघून, त्याचा अ‍ॅटिट्युड बघून, त्याची कामगिरी आणि वर्तन बघून
लूक्स आनि स्टाईलवर फारतर गर्दी जमवता येते पण विश्वास नाही कमवता येत
धोनी कायम "टीम फर्स्ट" मोडमध्ये राहीला आणि चमकोगिरी पासून चार हात ला.न्ब राहिला.... मास कमावला नसेल त्याने पण क्लास नक्कीच कमावला
कसोटीसाठी तो योग्य कर्णधार नव्हता असे म्हणणार्‍या.न्चे मला हसू येते.... एकतर एखादा खेळाडू चा.न्गला कर्णधार असतो कि.न्वा नसतो.... धोनी मध्ये एकूणच कर्णधाराचे गुण नव्हते असे त्याचा कट्टर टीकाकारही म्हणणार नाही.... कसोटीत त्याला योग्य टीम मिळाली नाही आणि म्हणून त्याचे रेकॉर्ड फारसे चा.न्गले दिसत नाहीत.... पण आत्ताच्या ऑस्ट्रॅलियाला गेलेल्या स.न्घात एखादा श्रीनाथ/ एखादा कपील असता (कि.न्वा अगदी गेला बाजार अगदी भुवी जरी फिट असता) तरी निकाल कदाचित उलटा दिसला असता..... असो

मला वाटते की निदान भारतात तरी...
>>>>>>
आपल्याला इथे निदान भारतात तरी का म्हणावेसे वाटले हे जाणून घ्यायला आवडेल.

बाकी मैदानातील कामगिरी चांगली असणे हे तर मस्ट'च आहे. किंबहुना ते कॉन्स्टंट ठेऊन त्याउपर कोठला फॅक्टर चाहत्यांची संख्या कमीजास्त करतो हे दिले आहे.

आता साधे गोलंदाजांचेच उदाहरन घ्या. कितीही वर्ल्डक्लास गोलंदाज भारतात घडला तरी त्याचा चाहता वर्ग फलंदाजांच्या चाहता वर्गापेक्षा कमीच राहतो. तर ऑनफिल्ड परफॉर्मन्स हा एवढाच क्रायटेरीया नसून त्याची वॅल्यू पब्लिकला त्यांच्या स्वताच्या आवडीनुसार काय किती भावते यावर ठरते.

...

कसोटीसाठी तो योग्य कर्णधार नव्हता असे म्हणणार्‍या.न्चे मला हसू येते.... एकतर एखादा खेळाडू चा.न्गला कर्णधार असतो कि.न्वा नसतो.... धोनी मध्ये एकूणच कर्णधाराचे गुण नव्हते असे त्याचा कट्टर टीकाकारही म्हणणार नाही....
>>>>>>>>>>>>>>
आपल्या देशात कोणी एखाद्या खेळाडूचा वा कलाकाराचा दोष दाखवला तर त्याला लगीच टिकाकार संबोधण्यात येते. मग त्याचे मुद्दे खोडण्यात स्वारस्य नाही दाखवले तरी चालते. तो टिकाकार आहे तो असेच बोलणार असेही म्हटले तरी पुरते. हे तरी धोनीचे झाले, सचिनबद्दल तर अवाक्षरही विरोधात लिहिले तर आणखी गहजब होतो..

असो, हे जरा अवंतर झाले,
पण धोनी हा नव्हताच चांगला कसोटी कर्णधार.. एकतर डावपेच जेमतेम, आणि सर्वात महत्वाची म्हणजे कातडीबचाव मानसिकता आणि अ‍ॅटीट्यूड.

पण धोनी हा नव्हताच चांगला कसोटी कर्णधार.. एकतर डावपेच जेमतेम, आणि सर्वात महत्वाची म्हणजे कातडीबचाव मानसिकता आणि अ‍ॅटीट्यूड. >>>>>>>> सुफ चुकीचे विधान आहे हे ...... त्याने किती तरी सामन्यात असे काही निर्णय घेतले आहेत कि हरलेले सामने भारताने खेचून आणून जिंकले आहेत , आताच्या संघात त्याला गोलंदाजी पूरक व प्रभावी मिळाली नसल्याने त्याला पराभव स्वीकारावा लागला .

त्याने किती तरी सामन्यात असे काही निर्णय घेतले आहेत कि हरलेले सामने भारताने खेचून आणून जिंकले आहेत ,
>>>>>>>>

अश्या एखाद्या कसोटी विजयाचे उदाहरण द्या..

मग मी त्याच्या कातडीबचाव मानसिकतेचे आणि अ‍ॅटीट्यूडचे उदाहरण देतो..

India toured Pakistan in January–February 2006 and Dhoni scored his maiden century in the second Test at Faisalabad. India were left in a tight spot as Dhoni was joined by Irfan Pathan with the team still 107 away from avoiding a follow-on. Dhoni played his typical aggressive innings as he brought up his maiden Test hundred in just 93 balls after scoring the first fifty in just 34 deliveries.[77]

2011 world cup final
याहून मोठे उदाहरण असू शकत नाही Happy

नाही तेव्हा धोनी कर्णधार नव्हता. ती फटकेबाजी पाटा खेळपट्टीवरचीच होती. काही प्रतिकूल परिस्थिती वगैरे नव्हती. नक्की आकड्यांसाठी गूगाळले तर हे सापडले.
पाकिस्तानने ५८८ धावा ठोकल्या, आपल्या द्रविडने १०३ आणि लक्ष्मणने ९० मारले, त्यानंतर धोनीने १४८ फटकावतानाच समोरून इरफान पठाणने देखील ९० धावा जमवल्या. आपले टोटल ६०३ झाले. पाकिस्तानने पुन्हा दुसर्‍या डावात पाट्याचा फायदा उचलत ४९०-८ पर्यंत डिक्लेअर केले.. आणि सामना अनिर्णित राहिला.. त्यांच्यातही कित्येकांनी हाथ साफ केलेले दिसतील..

विशेष उल्लेखनीय - आफ्रिदी या कसोटी प्लेअरने त्याच सामन्यात १२८ चेंडूत १५६ धावा ठोकलेल्या..

आणि प्लीज, वेगवान गोलंदाजांना सुरुवातीपासून पुढे चालत येऊन खेळणार्‍या फलंदाजाला कसोटी फलंदाज बोलू नका..

आणि हो, २०११ विश्वचषक कसोटीचा नसून एकदिवसीय होता ..
तुर्तास आपण कसोटीबद्दल बोलतोय Happy

असो,
एकदिवसीयमध्येही जर धोनी हा दादाच्या काळात असता आणि त्याच्या कर्णधारपदाखाली खेळला असता तर त्याने त्याच्यातील आक्रमक फलंदाजाला बाहेर काढून योग्य तसे वापरले असते आणि त्याचे आणखी भले केले असते. धोनीला बरेचदा वरच्या क्रमांकावरही खेळवले असते. तो रोहित शर्मा कशी द्विशतके ठोकत असतो तश्या कामगिर्‍या धोनीच्या नावावरही लागल्या असत्या.

ऋन्मेष - धोनी हा दादाचाच 'पिक' होता. त्याच्याच कप्तानपदाच्या काळात तो वन डे साठी संघात आला. पाक विरूद्ध २००५ मधे पहिल्यांदा दणदणीत शतक मारले व तेव्हापासून त्याचे नाव चर्चेत आले. तू म्हणतोस तसे त्याने बर्‍यापैकी केलेले ही आहे. नंतर काही काळाने कसोटीत आला तेव्हा तोपर्यंत द्रविड कप्तान झालेला होता.

हो फारएण्ड, आठवतोय तो सामना, वन डाऊन पाठवला होता त्याला.. सेहवागने सुद्धा त्या सामन्यात धुतले होते, पण नंतर तो आणि पाठोपाठ दादा बाद झाल्यावर मी कॉलेजला निघून गेलो.. मागाहून समजले की धोनी म्हणून कोणी नवीन बंदा पुढे पाठवलेला त्याने १४८ धावांची खेळी केली.
एकदिवसीयमध्ये त्याची शतकीय खेळी करण्याची क्षमता रैना, युवराज यांच्यापेक्षा जास्त होती, पण तो मात्र मागे राहण्यातच धन्यता मानू लागला. अर्थात ते देखील काही चुकीचे होते असे नाही म्हणता येणार.. पण शतकांमध्ये आपलीच एक मजा असते.

सहज आठवले, आजच संगकाराने बहुधा १२००० कि काय कसोटी धावा पुर्ण केल्यात. सरासरी देखील त्याची काहीतरी ५७-५८ च्या आसपास आहे.

कारण चाहते बनवण्यासाठी लूकमध्ये किंवा फलंदाजीच्या स्टाईलमध्ये एक एक्स फॅक्टर लागतो.
>>>>

प्रचंड मोठा विनोद! अगदी कणेकर म्हणतात तसं (विझी स्वत:ला शिकारी म्हणवायचा)!

शिवनारायण चँडरपॉल, जॅक कॅलीस, राहुल द्रविड, मार्टीन क्रो, डीन जोन्स आणि असे कितीतरी यांच्या बॅटींगमध्ये किंवा लुक्समध्ये कोणता एक्स फॅक्टर होता?

आजच्या तारखेलाही धोनीपेक्षा या सर्वांचे फॅन्स जगभरात जास्तं आहेत.

वर काही जणांनी धोनीने हरलेला सामना जिंकून दिला यात २०११ वर्ल्ड कप फायनलचे नाव दिले आहे. तो सामना गंभीरने आधी कोहली आणि नंतर धोनीच्या साथीने हातात आणून दिला होता. तसेही युवी तेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये होता मात्र धोनी स्वतः त्याच्या आधी खेळायला आला होता. खाली रैना अजून खेळायचा होता तेव्हा तो सामना आपण जिंकण्याच्या स्थितीतच होतो (२७५ चे टार्गेट).
अर्थात धोनी हा एक चांगला खेळाडू (फलंदाज),कर्णधार यष्टीरक्षक होता हे मान्यच करावे लागेल. विदेशात कसोटी मध्ये व्हाईट वॉश सोडल्यास त्याची एकूण कारकीर्द चांगलीच ठरली.टी २० आणि वनडे विश्व चषक जिंकणे हा आपल्यासाठी कळस होता.

भारताच्या क्रिकेट इतीहासातील एक ऊत्तम इष्टीरक्षक कप्तान
कदाचित आजवरच्या सर्व कप्तानांपै़की सर्वात अधिक 'परिपक्व' असे म्हणल्यास वावगे ठरू नये.

एकदिवसीय व २०/२० साठी धोनी सारखा दुसरा कप्तान नाही हे मान्य केले तरी कसोटी साठी मात्र त्याच्या कप्तानपदाच्या अनेक मर्यादा ऊघड आहेत.

भारतीय क्रिकेट चा भार खांद्यांवर पेलणे हे अक्षरशः द्रोणागिरी ऊचलण्या सारखेच आहे. धोणी ते समर्थपणे पार पाडले यात शंका नाही.

'cool as cucumber' captain will be missed!

>>>वर काही जणांनी धोनीने हरलेला सामना जिंकून दिला यात २०११ वर्ल्ड कप फायनलचे नाव दिले आहे. तो सामना गंभीरने आधी कोहली आणि नंतर धोनीच्या साथीने हातात आणून दिला होता<<<

अहो ते तर जाऊदेत, तो सामना एकदिवसीय होता आणि प्रश्न विचारला गेला होता कसोटी सामन्याबद्दल!

Lol

मी कालपासून बघतोय कोणीतरी लिहील Proud

बेफिकीर,
त्या विश्वचषकाच्या सामन्याचा उल्लेख आधी झाला तेव्हाच मी माझ्या (3 January, 2015 - 22:29) या पोस्टमध्ये विश्वचषक कसोटीचा नसून एकदिवसीयचा होता असे लिहिलेय.

बाकी बरेचदा धोनी आधी संथ खेळत सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जायचा जिथून फटकेबाजी करून जिंकवून द्यायची क्षमता तो एकटाच राखून असायचा, याउलट रैना तेव्हा खेळपट्टीवर असल्यास तो आल्याआल्याच हिशोबाला लागायचा. अर्थात शेवटी वन-टू-वन मध्ये जेव्हा सामना जायचा तेव्हा धोनी समोरच्या गोलंदाजाला जे सहजरीत्या सीमापार भिरकवायचा त्या दांडपट्ट्याला तोड नाही.

पण सध्या ईथे विषय कसोटीबद्दलच असल्याने त्यातील त्याच्या फलंदाजीबद्दल असे काहीही कौतुकाने नाही बोलता येत. मला तर बरेचदा आश्विनने त्याच्या आधी यायला हवे असे वाटून जायचे.

धोनीच्या बचावात्मक कसोटी कप्तानी संदर्भात २५ डिसेंबरला, म्हणजे त्याच्या निवृत्तीच्या घोषणेच्या आधी क्रिकेटच्या धाग्यावर एका सामन्याचे उदाहरन दिले होते.. ते इथेही टाकतो विषयाला अनुसरून.. पण मला शंका आहे कदाचित माझी टिका वाचूनच तर नाही ना धोनीने तडकाफडकी निवृत्ती स्विकारली..

.........................
.........................

हाच तो, वेस्टईंडिज विरुद्धचा सोडून दिलेला सामना.

http://www.espncricinfo.com/west-indies-v-india-2011/engine/match/489228...

कातडी वाचवून खेळणारा सो कॉलड कूल कर्णधार महेंद्रसिंग धोनी. विजयाची संधी न साधता सामना अनिर्णित घोषित केला. कारण काय तर हा अंतिम सामना असून आपण मालिकेत १-० ने आघाडी घेतलेली आणि दुसरे म्हणजे आपण हा अनिर्णित राखूनही रॅंकिंगमध्ये नंबर वन राहणार होतो. अर्थात ते कसोटी नंबर वन फसवेच होते. कारण सिनिअर गेल्यानंतर हे परदेशात कसोटी न जिंकता कसे नंबर वर राहणार होते त्याचे त्यालाच माहीत. असो. पण बघा स्कोअरबोर्ड, आणि फायनल स्कोअरबोर्ड न बघता कॉमेंटरी मध्ये आधीच्या षटकांपासूनच चांगल्या स्थितीत असतानाही कशी बचावात्मक नांगी टाकायला सुरुवात केली हे ही बघा. किंबहुना त्यापेक्षाही सामना लाईव्ह बघतानाच यांची बॉडी लॅंगवेज समजत होती. विकेट हातात असून रिक्वायर्ड रनरेट वाढवत नेत होते वा प्रयत्न न करता जाऊ देत होते.

४७ षटकांत १८० बनवायचे होते. ४ पेक्षा कमी धावगती आणि मॉडरेट टारगेट. त्याआधी त्या दिवशी सकाळी विंडीजच्या नवव्या विकेटने ३७ ओवर खेळून काढल्या होत्या. खेळपट्टी अनप्लेयेबल नव्हती. आपली सुरुवात जरा संथच पण किमान विकेट राखून झाली होती. तरीही सेट झालेला द्रविड आणि लक्ष्मण खेळपट्टीवर होते, खुद्द तथाकथित फटकेबाज फिनिशर म्हणून प्रसिद्ध असलेला धोनीही शिल्लक होता. (खरे तर फक्त पाटा खेळपट्ट्यांवरचा कलाकार आहे तो, पण ते तरी कुठे कबूल करतोय), एवढेच नव्हे तर चेस करताना सचिन तेंडुलकरपेक्षाही जिगरबाज समजला जाणारा विराट कोहलीसुद्धा शिल्लक होता.. १५-१६ षटकांत ८८ धावा हव्या होत्या. ७ गडी हातात.. वगैरे वगैरे.. डिक्लेअर केले तसे डोक्याला शॉटच लागला होता. स्साला फुकट झोपेचे खोबरे यांच्या नादात. या अश्या निरर्थक जागरणी देणार असाल तर जाऊ नका मग पुन्हा वेस्टईंडिजला खेळायला.. लढून हरला असता तरी गम नव्हते मग.. विजयाची जास्त संधी असताना हरायची थोडीशी भिती आणि वेळ पडल्यास सामना अनिर्णित राखायचीच जास्त शक्यता असूनही ती थोडी भिती डोक्यात घुसवून घेणारा असा हा कर्णधार.. जर माझ्या हातात असते तर मी धोनीला कसोटी कर्णधार म्हणून कधीच ठेवला नसता. दुर्दैव बीसीसीआय क्रिकेट संघाचे.!

...................
...................

आणि हो, तेव्हा कोहली कर्णधार असता तर नक्कीच स्वता प्रयत्न केल्याशिवाय एवढा सोपा सामना सोडून दिला नसता, आणि इतरांनाही हातपाय झाडायला लावले असते. आणि म्हणूनच धोनी कसोटीमधून गेला ते चांगलेच झाले.

मी फक्त धोनीच्या खेळीबद्दल लिहिले बेफी अर्थात तुमच्यासारख्यांच्या डोक्यात हे शिरणार नाहीच म्हणा

आणि आडुन काय लिहितात? समोर लिहायला शिका जरा

Pages