चिमुकली हिरकणी

Submitted by डॅफोडिल्स on 7 January, 2010 - 10:00

माझ्या मैत्रीणीची मुलगी अवनी हिच्या ट्रेक चे हे वर्णन तिच्या आईने सांगितलेले.

avani1.JPGहीच ती चिमुकली हिरकणी अवनी आपटे.

Exiting and popular trek ,fort Alang, Madan and Kulang.(Around 5000 ft.--level of kalsubai)
Location--Bhandardara Dam, Egatpuri Region, Near mountain Kalsubai, Sayadri Range, Maharashtra..India
Event Organiser--Serac Club,Pune
Duration-- 3days 4 nights
Age Limit--Above 15 years..
Child Name--Avani Apte (mother --Varsha apte)
Date of Birth-6th nov. 2004
School--Undri bishop's Co-Ed,Pune
Class-- यु. के. जी.
म्हणतात ना धाड्साला वयाची मर्यादा नसते ..हे खरे करून दाखविले आहे पुण्याच्या अवनी आपटे हिने..वय ५ वर्ष..मागील वर्षी 27december रोजी 'नागफणी (duke's Nose, लोणावला) valley crossing करून सगळ्यांना अचंबित करणार्‍या ह्या चिमुकलिने धाडसाची सिमाच पार केली आहे. खेळण्या-बागडण्याच्या , हट्ट करण्याच्या वयात तिने कळसुबाईच्या कुशीत विसावलेल्या अलंग, मदन आणि कुलंग ला आलिंगन देऊन जणू गोड़ पापाच घेतला आहे ... अलंग, मदन आणि कुलंग च्या भेटीचे स्वप्न पहाणार्‍या भल्याभल्यांच्या तोंडचे पाणि पळविलेच आहे तिने...
महाराष्ट्राचे everest मानल्या जाणार्या ह्या तिन्ही किल्याना भेट देणं ही एक मोठी अवहानात्मक गोष्ट..तिथे भल्याभल्यांचे डोळे गरगरतात... परन्तु अवनिने मात्र डोंगर-दर्‍यातुन वाट काढत, काटे-कुट्यांना न जुमानता हे आवाहन मोठ्या ताकदीने अणि जिद्दीने पेलले आहे..

हा इवेंट manage केला होता serac club ह्यानी..
हा किती अवघड ट्रेक आहे ह्याची पूर्वकल्पना आम्हाला दिली होती ,त्याचबरोबर आमचा अवनिवरही पूर्णतः विश्वास होता..नेहमी गोष्ट पूर्ण करण्याच्या तिच्या ह्या स्वभावामुळे आम्ही तिलाही घेउन जाण्याचा निश्चय केला.तिला निसर्गाची ,प्राण्यांची अणि जंगलाची आवड त्यामुळे तिला आपण कधी एकदा ट्रेक साठी निघतो ह्याची जणू घाईच लागली होती.

आम्ही २४ डिसेम्बर १२-०० वाजता पुण्याहून निघालो व् सकाळी ७-०० च्या सुमारास अम्बेवाडी येथे पोहचलो...सकाळी फ्रेश होउन, नाशता करून आम्ही १०-३० ला अलंग च्या दिशेने निघालो...मॅडम(अवनी) गॉगल, डोक्याला रुमाल बांधून आणि हातात काठी घेउन सगळ्यांच्या पुढे..

avani_gogle.jpg
ही दोंगारवाट जरा अवघडच...भरपूर चढ़-उतार,जहाडी-जुदपे अन झुडपांची ऊँची देखिल तिच्या उन्चीपेक्षा दिड पट..त्यात तिने ओढ्यातल्या निर्मल, शुद्ध पाण्याचा आस्वादही मनोसोक्त लुटला...सगळ्यांशी मजा-मस्ती करत हा अवघड ,परन्तु तिच्यासाठी मजेदार प्रवास तिने कधी सम्पविला ह्याची खबर देखिल लागली नाही..दुपारचे दोन वाजले ..छोट्याश्या गुहेत दुपारचे जेवण संपवले आणि लगेच 30ft.climb दोरीच्या साह्याने पार करत पुन्हा खडकाळ पायवाट व पुन्हा 80 ft. climb करून थोडासा आराम करून पुन्हा दोराच्या साहयाने खडकाळ व् अवघड पायवाट पार करून अलंगच्या माथ्याशी पोहचलो...तेव्हा साधारण ५-०० वाजले होते ..परन्तु तिची मस्ती अजूनही सुरूच ..तिच्या तोंडावर थकव्याचा लवलेशही नव्हता..प्रत्येक टीम मेम्बर तिच्याकडे पाहूनच अधिकाधिक फ्रेश होंत होते......
avani2.JPG
नंतर रात्रीचे जेवण व् विश्रांति नंतर दुसर्‍यादिवशी पुन्हा नव्या जोश अणि जोमाने पुढचे आवाहन पेलण्यास तयार...मी आईच्या नात्याने खुपच बिकट परिस्थितीत होते. एकदा तर वाटले की आपण तिच्यावर मोठा बोजा तर लादत नाही ना? पण तिच्या प्रसन्न अणि गोड़ चेहर्‍याने माझी शंका काही अंशी नाहीशी झाली...ह्या सगळ्यांमधे आमचे टीम प्रमुख अणि सदस्यांचा सिंहाचा वाटा होता...सातत्याने cheer करीत ते तिचा आत्मविश्वास द्विगुणित करीत होते...
avani4.JPG
पुन्हा खडकाळ वाट उतरत, 80 ft.rapel व् 30ft.rapel करत मदनच्या दिशेने निघालो...तिचा आत्मविश्वास सगळ्याना वेड लावणारा ..आमच्या ग्रुप व्यतिरिक्त आणखी ४/५ ग्रुप तिला cheer करीत होते व् तिचे अभिनन्दन करीत होते.तेव्हा मात्र माझे डोळे भरून आले..पुन्हा खड़काळ पायवाट उतरत आम्ही मदन च्या म्ध्याशी पोहचलो ...आमचा actually plan होता मदन climb करून मदन rapel चा ...पण खुप गर्दिमुळे तो plan drop करत आम्ही मदन पायाथ्याशी पोहचून कुलं चढायला सुरवात..सगलाच अनुभव रोमहर्शी होता..हा मार्ग अजुनच अवघड..काही ठिकाणी अक्षरश: रांगत जाण्याशिवाय पर्यायच नव्हता..
avani3.JPG
माझ्या पोटात गोळा कायमच.. पण अवनी ने मात्र गुणगुणत अवघड मार्गही अगदी सहजरित्या पार केला..तिची ही कामगिरी सर्वांना थक्क करणारी अणि जेव्हा ती कुलंग च्या माथ्याशी पोहचली तेव्हा मोठ्या जल्लोशाने तिचे स्वागत झाले...माझी मात्र खुपच दमछाक झालेली पण ती मात्र नेहमी सारखी फ्रेश....ह्याचे सगले श्रेय आमच्या ग्रुप मेम्बरसला,त्यांचे साह्य,देवाची कृपा आणि तिची जिद्द ...पण मी मात्र घाबरलेले....जर चढणंच एवढं अवघड तर उतरणं किती असेल ह्या विचाराने मला काही सुचेनासेच झाले होते....शेवटी जेवण वगरे घेउन रात्रीची विश्रांति झाली...

avani_group.jpgavani_climb.jpg
सकाळी उठून आवरून पुन्हा तारेवरची कसरत सुरु होणार होती...ती फक्त आमच्यासाठी...अवनिचा जोश जरादेखील कमी झालेला नव्हता...पुन्हा डोंगरवाटेतुन प्रवास सुरु...कार्विच्या अणि बाम्बूच्या जंगलातून सारखं घसरायला होंत होंत. पण त्यावरही मात करत, उतार संपल्यावर निवांतच चालत कुलंग च्या पायथ्याशी पोहचलो..तेव्हा माझ्या जिवात जिव आला अणि अवनिला मिठीत घेउन तिचा गोड़ पापा घेतला ...हा प्रवास माझ्यासाठी जेवढा चित्तथरारक होता तेवढाच तिच्यासाठी आनंददायी ,आम्हाला प्रेरणादायी ठरला..
avani_last.jpg
अशाप्रकारे आभाळाएवढं आवाहनही चुटकीसरशी काही क्षणात जमीनदोस्त करण्याची ताकद ह्या चिमुराडित कशी पोलादाप्रमाणे उभी ठाकली कुणास ठाउक........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवनीचा फोटो मस्तच आलाय Happy
मी ही केलाय अलंग-मदन-कूलंग हा ट्रेक.हा ट्रेक म्हणजे पट्टीच्या ट्रेकर्सना पण धडकी भरवणारा आहे.
अवनीने ज्या जिद्दीने तो ह्या लहान वयात केला,ह्या चिमुकलीच्या जिद्दीला हॅटस ऑफ!!!!!!!!

_/\_
आत्तातरी माझ्याकडे अवनीसाठी एवढेच आहे ! Happy
उद्या परत एकदा वाचून प्रतिसाद देईन !

उद्या चाललोय याच ट्रेकला Happy

वॉव.. अवनीमॅमला आमचा सॅल्युट बर का !!!! Happy नि एवढ्याश्या छकुलीला अशा "खतरनाक" ट्रेकवर घेउन जाणार्‍या आईचेदेखील कौतुक !! Happy

उद्या चाललोय याच ट्रेकला >> >> काय बोलतोस सुन्या.. मीपण तिथेच चाललोय.. Proud भेटु मग !! ढॅणटॅणॅन !!

ह्म्म्म पालकांचे धाडस मोठं आहे.
माझ्या पोरीला मी एकवेळ न्यायचे धाडस करेन .....पण तिची आई जीव काढेल माझा ! Proud

सान्वी लेख छान लिहीला आहेस. फ़ोटोही सही आलेत. Happy

मस्त एकदम गोड फोटो आहे अवनीचा. कॉन्फिडन्स फोटोतही दिसतोय. आअणि आता अभिनंदन तिचं नी तिच्या आईबाबांचं .

fundoo!

ग्रेट. असे धाडस करु पहाणारे वेडे पालक बघुन मला धीर आला. पण अस नेताना बाळ खाली उतरे पर्यंत पोटात काय गोळा आलेला असतो ह्याचा अनुभव आहे मला.

अवनीमॆडम तुमच्या धाडसाला त्रिवार मुजरा....
कसलं क्युट पिल्लु आहे, एवढ्याश्या जिवात एवढी हिंमत! ग्रेट....... _/\_

तोडलस् ग.................!
_/\_

ह्या चिमुकलीच्या जिद्दीला हॅटस ऑफ!!!!!!!! अगदी अगदी
खरच कौतुक आहे ह्या चिमुरडीचे.... >>>>> +१०००००००

अशा जिद्दी आणि धाडसी चिमुकलीचे पालकही धाडसीच असणार ....

गोडबोलेसाहेब - हा धागा वर आणल्याबद्दल मनापासून धन्स ... Happy

Pages