आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती नवरा
तो बायको

हे पण ऐकायला लागेल आता.

ओह वेट.....आठवलं...........ते बघितलंय की............."हा माझा बायको" Rofl (संदर्भः अशी ही बनवाबनवी)

बापरे ! इथे तर प्राथमिक शाळेचे वर्ग चालु आहेत.:फिदी:
ऋन्मेऽऽष@, बशीतुन प्यायला तरी तो चहाच आणि कपातुन प्यायला तरी तो चहाच.

सिनी अग्ग्ग नाही.... जसे पाणी आपण ज्या भांड्यात ठेवतो त्याचा आकार घेते, तसेच चहा आपण ज्यातून पितो त्याचे लिंग घेते.. ती ती ती बशीतली चहा आणि तो तो तो कपातला चहा ! Happy

अजिबात वाद न होता इतकी मुद्देसूद चर्चा ह्यापूर्वी पाहण्यात नव्हती.>> ती ही धाग्याच्या मूळ विषयाला धरून Proud

ती ती ती बशीतली चहा आणि तो तो तो कपातला चहा>>>> ती बशी = तो चहा , तो कप = तो चहा ,मग तो बशीतला असो किंवा कपातला Happy माझ्यामते काही शब्द सवयीमुळे तसे बोलले जातात ,पण ते चुकीचेच असतात जसे की ती चहा.

जोक्स अपार्ट, खरेच थंडी फार आहे, माझा चहा गरमच होत नाहीये गॅसवरून ग्लासमध्ये घेईघेईपर्यंत थंडतोय, आणि मी गरम समूजन फुंकर मारायला जातोय तर गंडतोय ..

थंडतोय.
थंड तोय. तोय = पाणी
थंड पाणी घालू नका.

रच्याकने,
थंडणे असे नवे क्रीयापद सापडले. मभादिनाच्या शुभेच्छा.

धाग्याची समरी आता मीच लिहीते.

१. धाग्याचा विषय गंभीरही होता आणि चर्चा होण्यासारखाही.
२. खरं तर धाग्याच्या विषयात वाद होण्यासारखंही काही नव्हतंच
३. पण का कोण जाणे लोकांना अवांतर लिहीण्याची उर्मी आली.
४. विषयाशी संबंधित पोस्ट्स १ टक्क्याच्या जवळ असाव्यात.
५. अधून मधून विषयाशी प्रामाणिक रहा या लोकशाही संमत मार्गाने केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखवली गेली.
६. काही अपवाद वगळता एकंदर खेळीमेळीचे वातावरण राहीले हे समाधानकारक आहे.
७. मधेच एका सदस्याचा गैरसमज होऊन त्याने फुक्कटची सीआयडी गिरी करण्याचा अतीशहाणपणा केला. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले.तो संशय निराधार होता हे पुढे केलेल्या खुलाशाने स्पष्ट झाले, पन काहींचा त्यावर विश्वास बसला नाही. अशा लोकांचे समाधान होणे अशक्य बाब असते, त्यांना इग्नोर करणेच योग्य असते. त्या सीआयडी सदस्याने जर संपर्क साधला असता तर त्याला असं कानामागून हात घालून घास भरवण्याची वेळ आली नसती.
८. वरील घटनेमुळे नव्यानेच मिळालेले मित्र दुरावले. इथे काही कंपू असल्याचे लक्षात आले अव एका कंपूतल्या कुनाशी मैत्री झाल्यास दुसरा कंपू डूख धरतो आणि नव्याने मित्र झालेल्या नव्या सदस्याला बदनाम करण्याची संधी शोधत राहतो असा समज झाला.
९. संशय फेडण्यासाठी जो पुरावा दिला तो बिनतोड असाच होता. पण त्यामुळे विषयांतर होऊन धागा पुन्हा एकदा भरकटला. मुळात आरोप करण्यात आला तेच विषयाला धरून नव्हतं. एखाद्याच्या प्रोफाईलचा फोटो धाग्याचा विषय कसा असू शकेल ? पण असे अवांतर आरोप करणा-याला सोडून व्हिक्टीमलाच फाशी दिली जाण्याची वेळ या धाग्यावर आलेली होती हे मात्र खरेच.
१०. यावरून काही लोकांनी त्यांच्या दृष्टीने जुन्याच कुणाच्या नावाने माझ्यावर हीणकस आरोप केले जे माझ्या स्त्रीमनास लज्जा व संताप उत्पन्न करणारे होते. अर्थातच काही स्त्री सदस्यांनी ज्या या धाग्यावर वाचनमात्र होत्या, त्यांनी वेगळेच आरोप केले ज्यांना अत्यंत सभ्य मार्गाने उडवून लावण्यात आले. कोण कुठला धागा वर काढतो यावर इतकी बारीक नजर असण्याचे कारण तरी काय ? यानिमित्ताने सहज आठवलं, २०१२ सालच्या डिशचा उल्लेख प्रत्यक्षात देखील कुणी करणार नाही, पण नेटवर अशा गोष्टी घडतांना दिसतात. आलीया भोगासी !!
११. अशा वेगवान घडामोडी घडत असताना समरी काढतो असं म्हणणारे एक सदस्य सामरी अवतारात नाहीसे झाले यामुळे समरी काढावयास लागली.

चक्रम
तुम्ही स्त्री असाल तर एखाद्या स्त्री बद्दल ती बार मधे जाते असं पब्लीक फोरम मधे लिहीणे शोभतं का ? पुरूष असाल तरी सुद्धा ते लागू आहेच. पण अपेक्षा ठेवणं शहाणपणाचं नाही हे अनुभवाने सांगावंसं वाटतंय. सन्माननीय अपवाद हे स्वतःवर घेणार नाहीत याची खात्री आहेच.

(न रानातला की बाणातला ते आपल्या सोयीने घाला)>>मला कुणी सांगेल का? न रानातला कधी वापरायचा व बाणातला कधी?

Pages